Mukhyamantri Rojgar Yojana 2024 | नोंदणी सुरु


Mukhyamantri Rojgar Yojana: या योजनेअंतर्गत राज्यातील बेरोजगार युवकांना स्वतःचा उद्योग सुरु करण्यासाठी 10 लाख ते 25 लाखांपर्यंत कर्ज उपलब्ध करून दिले जाते.
या योजनेअंतर्गत 5 वर्षात सुमारे 1 लाख सूक्ष्म व लघु उद्योग सुरु करून 10 लाख रोजगाराच्या संधी निर्माण करण्याचे लक्ष ठेवण्यात आले आहे.

राज्यातील बहुतांश तरुण सुशिक्षित आहेत व शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांच्यावर कुटुंबाची जबाबदारी असते तसेच काहीतरी बनण्याची त्यांची स्वप्ने सुद्धा असतात परंतु त्यांना त्यांच्या शिक्षणानुसार नोकरी मिळत नाही त्यामुळे ते बेरोजगार आहेत. तसेच शिक्षण पूर्ण झाल्यावर बहुतांश तरुण स्वतःचा एखादा उद्योग सुरु करण्यासाठी इच्छुक असतात परंतु घरची आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरु करता येत नाही या सर्व गोष्टींमुळे त्यांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागते या सर्व गोष्टीचा विचार करून महाराष्ट्र शासनाने राज्यातील सुशिक्षित बेरोजगार व उद्योग सुरु करू इच्छिणाऱ्या तरुणांना स्वतःचा एखादा लघु उद्योग सुरु करता यावा या उद्देशाने व उद्योजकाला चालना देण्यासाठी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना ची सुरुवात केली. जेणेकरून राज्यातील तरुण स्वतःचा लघु व्यवसाय सुरु करून स्वतःचे आणि स्वतःच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करू शकतील आणि राज्यात रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध करतील व राज्यातील बेरोजगारी थोडीफार प्रमाणात कमी होईल.

महाराष्ट्रातील सुशिक्षित व व्यवसाय सुरु करू इच्छिणाऱ्या तरुण / तरुणींना आपला स्वतःचा व्यवसाय सूर करून आत्मनिर्भर बनता यावे व स्वरोजगार प्राप्त व्हावा याकरिता जिल्हा उद्योग केंद्र व खादी ग्रामउद्योग मंडळातर्फे सदर योजना राबविण्यात आली आहे.

या योजनेचा मुख्य उद्देश राज्यातील बेरोजगार युवकांना स्वतःचा उद्योग सुरु करण्यासाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध करून दिले जाते जेणेकरून ते स्वतःचा एखादा लघु उद्योग सुरु करू शकतील. [Mukhyamantri Rojgar Yojana]

महत्वाची गोष्ट:

 • या योजनेत महिलांचा सुद्धा समावेश करण्यात आला आहे व महिलांसाठी या योजनेत 30 टक्के आरक्षित देण्यात आले आहे
 • अर्ज करणारी व्यक्ती जर अनुसूचित जाती / अनुसूचित जमाती /महिला / अपंग / माजी सैनिक या प्रवर्गातील असल्यास 5 वर्षाची विशेष सूट देणार आली आहे म्हणजेच या प्रवर्गातील व्यक्ती वय वर्षे 50 पर्यंत अर्ज करू शकतात.

वाचकांना विनंती

आम्ही मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना ची संपूर्ण माहिती या लेखात दिली आहे त्यामुळे तुम्ही हा लेख शेवट पर्यंत वाचा व या योजनेचा लाभ मिळवा जर तुमच्या परिसरात असे कोणी व्यक्ती असतील जे स्वतःचा एखादा उद्योग सुरु करण्यासाठी इच्छुक असतील तर त्यांना या योजनेची माहिती अवश्य द्या किंवा आमचे हे आर्टिकल त्यांना शेयर करा जेणेकरून ते या योजनेचा लाभ घेऊ शकतील.

योजनेचे नावCMEGP Scheme In Marathi
उद्देशराज्यातील बेरोजगारी कमी करणे
लाभार्थीराज्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुण / तरुणी
लाभउद्योग सुरु करण्यासाठी 50 लाखांपर्यंत आर्थिक सहाय्य्य
अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन / ऑफलाईन

Table Of Content

Mukhyamantri Rojgar Yojana चे उद्दिष्ट

 • राज्यातील ग्रामीण तसेच शहरी भागातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना स्वतःचा एखादा लघु उद्योग सुरु करता यावा या उद्देशाने मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना ची सुरुवात करण्यात आली आहे. जेणेकरून तरुण / तरुणी स्वतःचा उद्योग सुरु करून स्वतःच्या पायावर उभे राहून आत्मनिर्भर बनतील व राज्यातील इतर तरुणांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध करतील.
 • राज्यातील उद्योजकांना उद्योग सुरु करण्यासाठी प्रोत्साहन देणे.
 • राज्यातील युवक / युवतींना स्वयंपूर्ण व आत्मनिर्भर बनविणे.
 • राज्यातील बेरोजगार कमी करणे.
 • राज्याचा औद्योगिक विकास करणे. [Mukhyamantri Rojgar Yojana]
Mukhyamantri Rojgar Yojana

मुख्यमंत्री रोजगार योजना महाराष्ट्र चे वैशिष्ट्य

 • महाराष्ट्र राज्यातील लघु ग्रामोद्योग भवन यांच्यामार्फत मुख्यमंत्री रोजगार निर्मिति योजना राबविण्यात आली आहे.
 • सदर योजनेअंतर्गत राज्यातील महिलांना 30 टक्के आरक्षण दिले जाते.
 • येणाऱ्या 5 वर्षात 10 लाख रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले आहे.
 • राज्यातील सुशिक्षित बेरोजगार तसेच स्वतःचा एखादा उद्योग सुरु करू इच्छिणाऱ्या तरुण / तरुणींसाठी महत्वाची अशी हि योजना आहे ज्याच्या साहाय्याने ते आपली स्वप्ने पूर्ण करू शकतील.
 • महाराष्ट्र राज्याचा आर्थिक विकास होण्यास मदत होईल.
 • ग्रामीण भागातील तरुण / तरुणी स्वतःचा एखादा व्यवसाय सुरु करू शकतील व ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी उपलब्ध करतील त्यामुळे ग्रामीण भागातील तरुण / तरुणींना नोकरीसाठी शहरी भागात जाण्याची गरज भासणार नाही.
 • लाभाची राशी लाभार्थ्यांच्या बँक खात्यात DBT च्या सहाय्याने जमा करण्यात येते. [Mukhyamantri Rojgar Yojana]
 • युवकांना स्वतःचा उद्योग सुरु करण्यासाठी राज्य सरकार देत आहे 1 लाखाचे कर्ज त्यासाठी वाचा थेट कर्ज योजना
 • राज्य सरकार चर्मकार बांधवांना विविध प्रकारचे व्यावसायिक प्रशिक्षण व उद्योग सुरु करण्यासाठी बिनव्याजी कर्ज देते आहे त्यासाठी वाचा चर्मकार समाज योजना

Mukhyamantri Rojgar Yojana Maharashtra चे लाभार्थी

 • व्यक्तिगत उद्योजक
 • संस्था
 • सहकारी संस्था
 • स्वयं सहायता गट
 • ट्रस्ट

CMEGP उद्योग लिस्ट

 • उत्पादन क्षेत्रातील उद्योग
 • सेवा उद्योग
 • कृषी पूरक व्यवसाय
 • कृषीवर आधारित उद्योग
 • ई-वाहतूक व त्यावर आधारित व्यवसाय
 • संघटित साखळीविक्री केंद्रे
 • फिरते विक्री केंद्रे
 • खाद्ययात्र केंद्रे

CMEGP Maharashtra Udyog List

 • हाताने बनविलेले चॉकलेट
 • टॉफी आणि साखर मिठाई बनवित आहे
 • थ्रेड बॉल आणि वूलन बॉलिंग लॅचि बनविणे
 • फॅब्रिक्स उत्पादन
 • लॉन्ड्री
 • कुकीज आणि बिस्किटे बनविणे
 • बारबर
 • साबण, तेल इत्यादी म्हणून हर्बल वस्तू बनविणे
 • कॅन केलेला लोणी, तूप आणि चीज बनविणे आणि शिजविणे
 • प्लंबिंग
 • डिझेल इंजिन पंप्स दुरुस्ती
 • स्प्रेयर्ससाठी टायर व्हॅलसीनीझिंग युनिट ऍग्रीकल्चर सर्व्हिसेस
 • बॅटरी चार्जिंग
 • आर्ट बोर्ड पेन्टिंग/स्प्रे पेन्टिंग
 • मेणबत्त्या आणि धूप काठी बनविणे
 • सोडा आणि विविध स्वादयुक्त पेय तयार करणे
 • सायकल दुरुस्तीची दुकाने
 • बॅन्ड पथक
 • मोबाइल आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे दुरुस्ती
 • इलेक्ट्रॉनिक उपकरणे दुरुस्ती
 • ऑफिस प्रिंटिंग आणि बुक बायनडिंग
 • काटेरी तारांचे उत्पादन
 • इमिटेशन ज्वेलरी (बांगड्या) उत्पादन
 • स्कू उत्पादन
 • ENGG
 • वर्कशॉप
 • स्टोरेज बॅटरी उत्पादन
 • जर्मन भांडी उत्पादन
 • रेडिओ उत्पादन
 • व्होल्टेज स्टॅबिलिझरचे उत्पादन
 • कोरीव वूड आणि आर्टस्टिक फर्निचर बनविणे
 • ट्रंक आणि पेटी उत्पादन
 • ट्रान्सफॉर्म मोटार पंप/जनरेटर उत्पादन
 • कॉम्प्यूटर असेंम्बली, वेल्डिंग वर्क
 • वजन काटा उत्पादन
 • सिमेंट प्रॉडक्ट
 • विविध भौतिक हाताळणी उपकरणे तयार करणे
 • मशीनरीचे सुटे भाग उत्पादन
 • मिक्सर ग्रिडर आणि इतर घरगुती वस्तू बनविणे
 • प्रिंटिंग प्रेस/स्क्रीन प्रिंटिंग
 • बॅग उत्पादन
 • मंडप डेकोरेशन
 • गादी कारखाना
 • कॉटन टेक्सटाईल फॅब्रिक्समध्ये स्क्रीन प्रिंटिंग
 • झेरॉक्स सेंटर
 • चहा स्टॉल
 • मिठाईचे उत्पादन
 • होजीअरी उत्पादन
 • रेडीमेड गारमेंट्सचे टेलरिंग /उत्पादन
 • खेळणी आणि बाहुली बनविणे
 • फोटोग्राफी
 • डिझेल इंजिन पंप संचाची दुरुस्ती
 • फळांचा लगदा काढणे व विक्री करणे
 • मोटार रिविंडिंग
 • वायर नेट बनविणे
 • हाऊसहोल्ड एल्युमिनियम युटेंसिल्सचे मॅन्युफॅक्चर
 • पेपर पिन उत्पादन
 • सजावटीच्या बल्बांचे उत्पादन
 • हर्बल सुंदर पार्लर/आयुर्वेदिक हार्बल उत्पादने
 • केबल टीव्ही नेटवर्क। संगणक केंद्र
 • पब्लिक ट्रान्सपोर्ट किंवा रुरल ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस
 • सिल्क साड्यांचे उत्पादन
 • रसवंती
 • मॅट बनविणे
 • फायबर आयटम उत्पादन
 • पिठाची गिरणी
 • कप बनविणे
 • वूड वर्क
 • स्टील ग्रिलचे मॅन्युफॅक्चर
 • जिम सर्विसेस
 • आयुर्वेदिक औषध उत्पादन
 • फोटो फ्रेम
 • पेप्सी युनिट/कोल्ड/सॉफ्ट ड्रिंक
 • खवा व चक्का युनिट
 • घराचा वापर कूलर बनवा
 • गुळ तयार करणे
 • फळ आणि व्हिजिटेबल प्रक्रिया
 • घाणी तेल उद्योग
 • कॅटल फीड
 • फॅन्सी ज्वेलरी बनविणे
 • डिस्पोजेबल कप-प्लेट बनविणे
 • दाळ मिल
 • क्लाऊड किचन – स्विगी / झोमाटो येथे अन्न विक्री
 • राईस मिल
 • कॅन्डल उत्पादन
 • तेल उत्पादन
 • शैम्पू उत्पादन
 • केसांच्या तेलाची निर्मिती
 • पापड मसाला उदयोग
 • बर्फ उत्पादन
 • बेकरी प्रॉडक्ट्स
 • पोहा उत्पादन
 • बेदाना/मनुका उद्योग
 • सोन्याचे दागिने उत्पादन (ज्वेलरी वर्क)
 • भांडींसारख्या अ‍ॅल्युमिनियम वस्तू बनवित आहेत
 • हॉस्पिटलमध्ये वापरलेला स्ट्रेचर बनविणे
 • सद्य मोजमाप वर मीटर किंवा व्होल्ट मीटर बनवा
 • कार हेडलाइट
 • कपड्यांची पिशवी
 • पर्स आणि हँडबॅग बनविणे
 • मसाले
 • काटेरी तार बनवणे (कुंपण)
 • बास्केट बनविणे
 • चामड्याचा पट्टा
 • शू पॉलिश पॉलिश
 • कपडा बॉक्स
 • प्लेट आणि वाटी तयार करणे
 • स्वीप
 • पारंपारिक औषधे बनविणे
 • कागदी पिशव्या आणि लिफाफे तयार करणे
 • साइन बोर्ड
 • सर्व प्रकारचे सुती डस्टर
 • कागदी पिशव्या, लिफाफे, आइस्क्रीम कप
 • रुग्णवाहिका स्ट्रेचर बनविणे (रूग्णांना रुग्णवाहिकेत बसवण्यासाठी वापरले जाते)
 • विद्युत मीटर अर्थात वोल्ट मीटर बनविणे
 • सुतार काम
 • 1200 मिमी पर्यंत आरसीसी पाईप बनविणे
 • आरसीसी दरवाजे खिडक्या बनविणे
 • चिनी मातीची भांडी
 • सर्व प्रकारचे वॉटर प्रूफ कव्हर
 • पॅकिंग बॉक्स बनविणे
 • मधुमक्षिका पालन
 • कुकुट पालन
 • चांदीचे काम
 • स्टोन क्रशर व्यापार
 • स्टोन कटिंग पॉलिशिंग
 • मिरची कांडप
 • सरकार ने मुलींच्या उज्वल भविष्यासाठी सुरु केली आहे एक महत्वपूर्ण अशी योजना त्यासाठी वाचा सुकन्या समृद्धी योजना

CMEGP योजना अंतर्गत मिळणारे अनुदान

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना अंतर्गत राखीव प्रवर्ग व खुला प्रवर्गातील लाभार्थ्यांना मिळणारे अनुदान खालील प्रमाणे आहे.

 • मुख्यमंत्री रोजगार निर्मिति योजना अंतर्गत शहरी भागातील अनुसूचित जाती / अनुसूचित जमाती / महिला / अपंग / माजी सैनिक प्रवर्गातील लाभार्थ्यांना बँकेने मंजूर केलेल्या प्रकल्पांच्या किमतीच्या 25 टक्के इतके अनुदान दिले जाते.
 • योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील अनुसूचित जाती / अनुसूचित जमाती / महिला / अपंग / माजी सैनिक प्रवर्गातील लाभार्थ्यांना बँकेने मंजूर केलेल्या प्रकल्पांच्या किमतीच्या 35 टक्के इतके अनुदान दिले जाते.
 • या प्रवर्गातील शहरी तसेच ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना 5 टक्के गुंतवणूक हि स्वतःकडची करावी लागले.
 • शहरी भागातील खुल्या प्रवर्गातील लाभार्थ्यांना बँकेने मंजूर केलेल्या प्रकल्पांच्या किमतीच्या 15 टक्के इतके अनुदान दिले जाते.
 • ग्रामीण भागातील खुल्या प्रवर्गातील लाभार्थ्यांना बँकेने मंजूर केलेल्या प्रकल्पांच्या किमतीच्या 25 टक्के इतके अनुदान दिले जाते.
 • या प्रवर्गातील शहरी तसेच ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना 10 टक्के गुंतवणूक हि स्वतःकडची करावी लागले. [Mukhyamantri Rojgar Yojana]

Mukhyamantri Rojgar Nirmiti Yojana अंतर्गत दिल्या जाणाऱ्या कर्जाची मर्यादा

 • लाभार्थ्याला स्वतःचा उद्योग सुरु करण्यासाठी 50 लाखांपर्यंत कर्ज दिले जाते.

CM Rojgar Yojana Maharashtra अंतर्गत दिल्या जाणाऱ्या कर्जावर आकारण्यात येणारे व्याजदर

 • योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या कर्जावर वार्षिक 2.75 टक्के व्याजदर आकारला जातो.

Mukhymantri Rojgar Yojana अंतर्गत अर्ज प्रक्रिया व प्रकल्प मंजुरी अंतर्गत कार्यवाही

 • मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाच्या सुलभ अंमलबजावणीसाठी संपूर्ण प्रक्रियेसाठी ऑनलाईन पध्दतीचा अवलंब करण्यात आलेला आहे. यासाठी स्वतंत्र CMEGP पोर्टल विकसित करण्यांत आले आहे त्याद्वारे कर्ज मागणी प्रस्ताव जिल्हा उद्योग केंद्रास किंवा खादी व ग्रामोद्योग मंडळ (KVIB) संस्थेस सादर करण्यात येतील.
 • महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र यांचे अध्यक्षते खालील जिल्हास्तरीय उपसमितीमार्फत अर्जाची छाननी करुन पात्र उमेदवारांची सुची तयार करण्यात येईल.
 • पात्र उमेदवारांना समुपदेशनसाठी निमंत्रित करण्यांत येवन त्यांद्वारे प्राथमिक निवड यादी जिल्हा उपसमिती मार्फत तयार करण्यात येईल.
 • सदर प्राथमिक यादी जिल्हास्तरीय कार्यबल समितीद्वारे अंतिम करण्यात येईल.
 • सदर जिल्हा कार्यबल समितीद्वारा अंतिम मंजूरी देण्यात आलेल्या कर्ज प्रस्तावांची शिफारस पुढील मंजूरीसाठी महाव्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र यांचेकडून संबंधित बँकास सादर करण्यात येईल.
 • ऑनलाईन द्वारा शिफारस करण्यांत आलेल्या प्रस्तावांची बँकस्तरावर प्रकल्पाची वित्तीय व्यवहार्यता, अनुषंगिक बाबी तपासून बँक कर्ज मंजूरी बाबतचा निर्णय घेईल. प्रस्तावास कर्ज मंजूरी असल्यास मंजूरी संबंधिचा तपशिल ऑनलाईन द्वारे बँकेमार्फत महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र यांना सादर करण्यात येईल.
 • अर्ज प्रक्रिया, छाननी, समुपदेशन, बँकेस कर्ज प्रस्तावची शिफारस, कर्ज मंजूरी या सर्व प्रक्रिया जिल्हा स्तरावर पूर्ण होतील. महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र हे बँकानी मंजूर केलेला तपशिल यथायोग्य असल्याचे खात्री करुन राज्यस्तरीय CMEGP सेल यांना कर्ज वितरण व अनुदान वितरणासाठी प्रस्ताव सादर करतील.
 • CMEGP सेल कडून प्रस्तावाची छाननी होऊन नोडल बँकेच्या मार्फत राज्य शासनाचे मार्जिन मनी अनुदान रक्कम संबंधित बँकाना वितरीत करण्यात येईल. मार्जिन मनी रक्कम ही बँक शाखेद्वारा 3 वर्ष कालावधीसाठी संबंधित कर्ज खात्याच्या नावे डिपॉझिट करेल. 3 वर्ष कालावधी पूर्ण झाल्यानंतर जिल्हा समितीच्या मान्यतेने राज्य शासनाचे मार्जिन मनी अनुदान संबंधित कर्ज खात्यावर जमा होईल. [Mukhyamantri Rojgar Yojana]

Mukhyamantri Loan Yojana Maharashtra अंतर्गत सुरु करण्यात येणाऱ्या प्रकल्प खर्चाचे वर्गीकरण

बँक कर्ज60 ते 75 टक्के
अर्जदाराचे भांडवल5 ते 10 टक्के
शासकीय अनुदान15 ते 35 टक्के

राखीव प्रवर्ग (अनुसूचित जाती / अनुसूचित जमाती / महिला / अपंग / माजी सैनिक)

बँक कर्ज60 टक्के (ग्रामीण भाग)70 टक्के (शहरी भाग)
अर्जदाराचे भांडवल5 टक्के (एकूण प्रकल्पाचे भांडवल)5 टक्के (एकूण प्रकल्पाचे भांडवल)
शासकीय अनुदान35 टक्के 25 टक्के

खुला वर्ग

बँक कर्ज65 टक्के (ग्रामीण भाग)75 टक्के (शहरी भाग)
अर्जदाराचे भांडवल10 टक्के (एकूण प्रकल्पाचे भांडवल)10 टक्के (एकूण प्रकल्पाचे भांडवल)
शासकीय अनुदान25 टक्के 15 टक्के
 • स्वतःचे घर बांधण्यासाठी सरकार देत आहे 2.5 लाखाचे आर्थिक अनुदान त्यासाठी वाचा रमाई घरकुल योजना
 • स्वतःचा व्यवसाय सुरु करू इच्छिणाऱ्या नागरिकांना सरकार देत आहे 1 लाख रुपयांचे कर्ज त्यासाठी वाचा वसंतराव नाईक कर्ज योजना
 • स्वतःचे घर बांधण्यासाठी राज्य सरकार देत आहे 2 लाखांचे आर्थिक सहाय्य त्यासाठी वाचा शबरी घरकुल योजना

Mukhymantri Rojgar Nirmiti Yojana अंतर्गत आवश्यक शैक्षणिक पात्रता

 • 10 लाखांपर्यंत प्रकल्पासाठी अर्जदार इयत्ता 7वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
 • 25 लाखांवरील प्रकल्पासाठी अर्जदार इयत्ता 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. [Mukhyamantri Rojgar Yojana]

Mukhyamantri Udyog Yojana Maharashtra चे फायदे

 • Mukhyamantri Udyog Yojana Maharashtra अंतर्गत राज्यातील सुशिक्षित आणि स्वतःचा एखादा उद्योग सुरु करू इच्छिणाऱ्या तरुणांना 10 लाख ते 50 लाखांपर्यंत कर्ज सुविधा उपलब्ध करून दिली जाते.
 • राज्यातील बेरोजगार तरुण स्वतःचा लघु उद्योग सुरु करून स्वतःच्या पायावर उभे राहतील व आत्मनिर्भर बनतील.आणि स्वतःच्या कुटुंबाचा सांभाळ करू शकतील.
 • राज्यात ग्रामीण तसेच शहरी क्षेत्रात रोजगाराच्या नवं-नवीन संधी उपलब्ध होतील  त्यामुळे राज्यातील बेरोजगारी कमी होईल.
 • राज्यातील तरुणांना स्वतःचा व्यवसाय सुरु करण्यासाठी कोणावर अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही.
 • योजनेअंतर्गत राज्यात रोजगार सुरु झाल्यामुळे महाराष्ट्र राज्याचा आर्थिक विकास होईल.
 • योजनेचा लाभ राज्यातील महिलांना सुद्धा देण्यात येईल.
 • राज्यातील बेरोजगारी कमी होईल.
 • नागरिकांचे जीवनमान सुधारेल.
 • नागरिकांचा सामाजिक तसेच आर्थिक विकास होईल. [Mukhyamantri Rojgar Yojana]

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना अंतर्गत आवश्यक पात्रता

 • अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असणे आवश्यक आहे.

मुख्यमंत्री रोजगार योजना महाराष्ट्र चे नियम व अटी

 • महाराष्ट्र राज्यातील नागरिकांनाच या योजनेचा लाभ दिला जाईल.
 • महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील व्यक्तींना मुख्यमंत्री रोजगार निर्मिति योजनेचा लाभ घेता येणार नाही.
 • अर्जदार व्यक्तीचे वय 18 ते 45 वर्ष दरम्यान असणे आवश्यक आहे ( अनुसूचित जाती / अनुसूचित जमाती / महिला / अपंग / माजी सैनिक या प्रवर्गासाठी 5 वर्षे शिथिल)
 • एका कुटुंबातील फक्त एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येईल.
 • योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या व्यक्तीने यापूर्वी केंद्र सरकार किंवा महाराष्ट्र सरकार च्या इतर कोणत्याही स्वरोजगार योजनेचा लाभ घेतला असता कामा नये किंवा लाभ घेत असता कामा नये.कारण अशा अर्जदाराला या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
 • जर अर्जदार व्यक्ती 10 लाखांपर्यंत प्रकल्प किंमत असलेला व्यवसाय करणार असेल तर त्यासाठी त्याला इयत्ता 7वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.आणि जर र्जदार व्यक्ती 25 लाखांपर्यंत प्रकल्प किंमत असलेला व्यवसाय करणार असेल तर त्यासाठी त्याला इयत्ता 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
 • मुख्यमंत्री रोजगार निर्मिति योजनेची अंमबजावणी महाराष्ट्र राज्यापुरतीच मर्यादित आहे. [Mukhyamantri Rojgar Yojana]

मुख्यमंत्री रोजगार योजना महाराष्ट्र अंतर्गत निवासी उद्योजकता प्रशिक्षण

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाच्या अंतर्गत उत्कृष्ट उपलब्धी होणेच्या दृष्टीने कर्ज प्रस्ताव मंजूर झालेल्या प्रकरणामध्ये लाभार्थीचे दोन आठवडे कालावधीचे निवासी उद्योजकीय प्रशिक्षण अनिवार्य असून यशस्वीरित्या प्रशिक्षण पूर्ण करणा-या अर्जदारांनाच कर्ज वितरण व अनुदान सहाय्य वितरणासाठी पात्र ठरविण्यांत येईल. सदर प्रशिक्षणासाठीचा खर्च CMEGP योजनेसाठी उपलब्ध करण्यात आलेल्या तरतुदीतून करण्यात येईल. एकूण तरतुदीच्या 5% इतकी रक्कम प्रशिक्षण कार्यक्रमासाठी राखून ठेवण्यात येईल. सदर प्रशिक्षण कार्यक्रमाची अंमलबजावणी उद्योजकीय प्रशिक्षणात कार्यरत असणा-या राज्य पुरस्कृत संस्था – महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, तसेच राज्य स्तरीय संनियंत्रण समितीने मान्यता दिलेल्या, राज्यातील इतर नामवंत संस्था मार्फत आयोजित करण्यात येईल. [Mukhyamantri Rojgar Yojana]

CMEGP Documents List Marathi

 • आधार कार्ड
 • राशन कार्ड
 • रहिवाशी प्रमाणपत्र
 • डोमिसाईल प्रमाणपत्र
 • पॅन कार्ड
 • पासपोर्ट साईज फोटो
 • ई-मेल आयडी
 • मोबाईल नंबर
 • अर्जदार अपंग असल्यास तसे प्रमाणपत्र
 • जातीचा दाखला
 • बँकेचे पासबुक
 • शैक्षणिक प्रमाणपत्र
 • अर्जदाराने REDP / EDP / SDP किंवा कौशल्य विकास प्रशिक्षण घेतले असल्यास प्रमाणपत्र
 • अर्जदार जो व्यवसाय सुरु करणार आहे त्या व्यवसायाचा प्रकल्प अहवाल
 • हमीपत्र

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना अंतर्गत अर्ज रद्द होण्याची कारणे

 • अर्जदार महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवाशी नसल्यास अर्ज रद्द केला जाईल.
 • अर्जदाराचे वय 45 वर्षापेक्षा जास्त असल्यास अर्ज रद्द केला जाईल.
 • अर्जदार व्यक्तीने या पूर्वी केंद्र किंवा राज्य शासनाद्वारे सुरु एखाद्या योजनेअंतर्गत लाभ मिळवला असल्यास अर्ज रद्द केला जाईल.
 • अर्जदार व्यक्तीच्या कुटुंबातील व्यक्तीने या योजनेअंतर्गत लाभ मिळवला असल्यास अर्ज रद्द केला जाईल.
 • अंतिम तारखेनंतर आलेले अर्ज रद्द केले जातील. [Mukhyamantri Rojgar Yojana]

CMEGP Scheme अंतर्गत ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत

 • अर्जदाराला सर्वात प्रथम शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.
 • होम पेज वर Online Application Form for Individual वर क्लिक करावे लागेल.
Mukhyamantri Rojgar Yojana

 • आता तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल त्यामध्ये या योजनेचा अर्ज दिसेल त्यात विचारलेली सर्व माहित तुम्हाला भरावी लागेल तसेच आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतील.
 • विचारलेली सर्व माहित भरून झाल्यावर Save बटनावर क्लिक करावे लागेल.
Mukhyamantri Rojgar Yojana

 • अशा प्रकारे तुमची या योजनेअंतर्गत आवेदन प्रक्रिया पूर्ण होईल. [Mukhyamantri Rojgar Yojana]

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना महाराष्ट्र अंतर्गत ऑफलाईन अर्ज करण्याची पद्धत

ग्रामीण भागातील अर्जदाराला आपल्या क्षेत्राच्या जिल्हा कार्यालयात व शहरी भागातील अर्जदाराला आपल्या क्षेत्राच्या नगर परिषद कार्यालय जाऊन जिल्हा उद्योग केंद्र व खादी ग्रामोद्योग कार्यालय जाऊन मुख्यमंत्री रोजगार निर्मिति योजनेचा अर्ज घ्यावयाचा आहे आणि अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून सोबत आवश्यक अशी कागदपत्रे जोडायची आहेत व भरलेला अर्ज सादर कार्यालयात जमा करायचा आहे. [Mukhyamantri Rojgar Yojana]

योजनेची अधिकृत वेबसाईटClick Here
शासनाचा GRClick Here
संपर्क क्रमांकClick Here
Telegram GroupJoin
CMEGP Maharashtra Udyog List PDFClick Here
CMEGP Udyog ListClick Here
CMEGP Maharashtra Udyog List In MarathiClick Here
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम Online FormClick Here
Cmegp Scheme pdfClick Here
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना महाराष्ट्र pdfClick Here
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम pdfClick Here
CMEGP Full Form In Marathiमुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम

शासनाच्या इतर योजना

सारांश

आम्ही आशा करतो कि आपल्याला मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम ची सर्व माहिती प्राप्त झाली आहे तरी देखील आपले योजनेसंबंधी काही प्रश्न असल्यास मला ई-मेल किंवा कंमेंट्स च्या माध्यमातून जरूर कळवा आम्ही तुमच्या प्रश्नांची लवकरात लवकर उत्तरे देण्याचा प्रयत्न करू आणि जर तुम्हाला या योजनेची माहिती उपयुक्त वाटली असेल तर तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा जेणेकरून तुमचे मित्र देखील या योजनेचा लाभ घेऊ शकतील. [Mukhyamantri Rojgar Yojana]

20 thoughts on “Mukhyamantri Rojgar Yojana 2024 | नोंदणी सुरु”

  • तुम्ही तुमच्या cloth business साठी नक्की कर्ज मिळवू शकता त्यासाठी तुम्हाला शासनाच्या अधिकृत वेबसाईट वर जाऊन अर्ज करावा लागेल.

 1. नमस्कार मला वीट व्यवसाय सुरू करावयाचा आहे तर या व्यवसायासाठी मी अर्ज करू शकतो का कृपया रिप्लाय द्यावा.

  • तुम्ही तुमचा वीट व्यवसाय सुरु करण्यासाठी नक्कीच कर्ज मिळवू शकता त्यासाठी तुम्हाला अधिकृत वेबसाईट वर जाऊन अर्ज करावा लागेल.

 2. My name is Karan Krishna Sarvankar age 31 qualification S.S.C passed….I m photographer can i eligible for loan photography buisness?….how much loan start photography buisness? please help me….and more details

  • तुम्ही तुमच्या फोटोग्राफी व्यवसायासाठी या योजनेअंतर्गत नक्कीच कर्ज मिळवू शकता त्यासाठी तुम्हाला रीतसर अर्ज करावा लागले.

  • या योजनेअंतर्गत तुम्हाला तुमचा नवीन व्यवसाय सुरु करण्यासाठी जास्तीत जास्त 50 लाखांपर्यंत कर्ज दिले जाईल.

 3. Mi sushikshit abhiyanta ahe maze registration zale ahe mala business karyala loan bhetel ka

  • तुम्हाला तुमचा नवीन व्यवसाय सुरु करण्यासाठी या योजनेअंतर्गत नक्की कर्ज मिळेल.

 4. हॅलो सर,
  सर मला जेसीबी चा व्यवसाय करायचा तर त्यासाठी मला लोन भटेल का

  • तुम्हाला तुमचा व्यवसाय सुरु करण्यासाठी नक्की कर्ज मिळेल परंतु तुम्हाला त्यासाठी अर्ज करावा लागेल.

 5. अर्ज करून पण बँक लोन देत नाही त्यासाठी काय करावं लागेल , takkewari dili tr bank file manjur karat aahet

Comments are closed.