अपंग बस सवलत योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील पुणे महानगर पालिका क्षेत्रात वास्तवास असणाऱ्या कुटुंबातील अपंग व्यक्तींसाठी 1 वर्षासाठी पीएमपीएमएल बसेसचे मोफत पास दिले जातात. या पासेसची रक्कम पुणे महानगरपालिकेकडून पीएमपीएमलला दिली जाते.
महाराष्ट्र राज्यातील बहुतांश अपंग व्यक्तींना त्यांच्या दैनंदिन गरज पूर्ण करण्यासाठी विविध समस्यांचा सामना करावा लागतो. अपंग व्यक्तींना कोणी काम देत नाही त्यामुळे त्यांना पैशांसाठी दुसऱ्या व्यक्तीवर अवलंबून रहावे लागते. त्यामुळे अपंग व्यक्तींच्या या सर्व समस्यांचा विचार करून पुणे महानगर पालिकेने आपल्या शहरातील अपंग व्यक्तींना 1 वर्षासाठी पीएमपीएमएल बसेसचे मोफत पास देण्याचा विचार केला आहे.
योजनेचे नाव | अपंग बस सवलत |
राज्य | महाराष्ट्र |
विभाग | सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग |
लाभार्थी | राज्यातील अपंग व्यक्ती |
लाभ | 1 वर्षाचा मोफत बस पास |
उद्देश्य | राज्यातील अपंग व्यक्तींचे जीवनमान सुधारणे |
अर्ज करण्याची पद्धत | ऑफलाईन |
अपंग बस सवलत योजनेचे उद्दिष्ट
- अपंग व्यक्तींना त्याच्या दैनंदिन जीवनातील खर्चासाठी इतर कोणत्या व्यक्तीवर अवलंबून राहता येता कामा नये या उद्देशाने अपंग मोफत बस पास योजना सुरु करण्यात आली आहे.
- शहरातील अपंग व्यक्तीचे जीवनमान सुधारणे.
- अपंग व्यक्तींना सशक्त तसेच आत्मनिर्भर बनविणे.
अपंग बस सवलत योजनेचे वैशिष्ट्य
- पुणे महानगर पालिकेकडून अपंग मोफत बस पास योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
- शहरातील अपंग व्यक्तींसाठी सुरु करण्यात आलेली एक महत्वपूर्ण अशी योजना आहे.
- अपंग मोफत बस पास योजनेचे मुख्य वैशिष्ट्य हे आहे कि बस पास साठी अपंग व्यक्तींना काहीच रक्कम भरायची गरज लागत नाही.
- अपंग बस सवलत योजनेअंतर्गत पुरुषांसोबत महिलांना देखील या योजनेचा लाभ दिला जातो.
अपंग बस सवलत योजनेचे लाभार्थी
- पुणे शहरातील अपंग व्यक्ती अपंग मोफत बस पास योजनेचे लाभार्थी आहेत.
अपंग बस सवलत योजनेचा लाभ
- अपंग बस सवलत योजनेअंतर्गत लाभार्थी अपंग व्यक्तीला पीएमपीएमएल बसेसचे मोफत वार्षिक पासेस दिले जातात.
- सर्व वयोगटातील अपंग व्यक्तींना या योजनेचा लाभ घेता येईल.
- या योजनेच्या सहाय्याने शहरातील अपंग व्यक्तींचे जीवनमान सुधारेल.
अपंग बस सवलत योजनेसाठी आवश्यक पात्रता
- अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असणे आवश्यक आहे.
- अर्जदार पुणे महानगर पालिकेमध्ये वास्तव्यास असणे आवश्यक आहे.
अपंग बस सवलत योजनेचे नियम व अटी
- फक्त महाराष्ट्र राज्यातील अपंग व्यक्तींनाच अपंग बस सवलत योजनेचा लाभ दिला जातो.
- महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील अपंग व्यक्तींना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
- फक्त अपंग व्यक्तींनाच या योजनेचा लाभ दिला जातील.
- अर्जदार व्यक्ती पुणे महानगरपालिका हद्दीत किमान ३ वर्षे वास्तवास असणे आवश्यक
- दिनांक 01/05/2001 नंतर जन्माला आलेल्या व हयात अपत्यांमुळे कुटुंबाच्या अपत्यांची संख्या दोनपेक्षा जास्त झाल्यास योजनेचा लाभ मिळणार नाही.
- महाराष्ट्र राज्य शासनाने ठरवून दिलेल्या टक्केवारी नुसार ४०% किंवा त्यापेक्षा जास्त अपंगत्व (नि:समर्थ) असल्याचा दाखला आवश्यक
- तसेच शासन वेळोवेळी जे बदल सुचवतील त्या प्रमाणात नियम व अटीत बदल करण्यात येईल.
- अटी व नियम यांत बदल करण्याचा / अर्ज नाकारण्याचा अधिकार मा.महापालिका आयुक्त अथवा ते प्राधिकृत करतील त्या अधिकाऱ्यास राहील.
अपंग बस सवलत योजनेअंतर्गत आवश्यक कागदपत्रे
- कुटुंबाचे पुणे महानगरपालिका हद्दीत किमान 3 वर्षे वास्तव्य असल्याचा दाखला (रेशनिंग कार्डची साक्षांकित प्रत आवश्यक)
- तसेच ३ वर्षे वास्तव्य असलेल्या राहण्याचा पुरावा म्हणून गत ३ वर्षाचा मनपा टॅक्स पावती किंवा लाईट बिल किंवा टेलिफोन बिल (लॅण्डलाईन) किंवा झोपडी फोटो पास / झोपडी सेवा शुल्क पावती / भाडे करारनामा इ. जोडावे.
- सर्व वयोगटातील अपंग (नि:समर्थ) व्यक्ति (वयाचा पुरावा म्हणून जन्मदाखला / ससून जनरल हॉस्पिटलमधील वयाचा दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, मतदान यादीतील नाव अथवा मतदान ओळखपत्र यापैकी एक आवश्यक)
- अर्जदार अपंग असल्याचा दाखल जोडणे आवश्यक
- अर्जदाराच्या आधार कार्डची झेरॉक्स प्रत सादर करावी.
- पुणे महानगरपालिका अपंग स्मार्ट कार्ड असल्यास झेरॉक्स प्रत जोडणे आवश्यक.
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- स्कॅन डॉक्युमेंट्स संलग्न करणे आवश्यक आहे.
अपंग बस सवलत योजनेअंतर्गत अर्ज करण्याची पद्धत
- अर्जदाराला सर्वात प्रथम आपल्या क्षेत्रातील महानगर पालिका कार्यालयात जावे लागेल.
- कार्यालयात जाऊन अपंग बस सवलत योजनेचा अर्ज घ्यावा लागेल व अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून सोबत योग्य ती कागदपत्रे जोडावी लागतील व भरलेला अर्ज जमा करावा लागेल.
- अशा प्रकारे तुमची या योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.
Telegram Group 1 | Join |
Telegram Group 2 | Join |
Facebook Page 1 | Follow |
Facebook Page 2 | Follow |
अपंग बस सवलत योजना संपर्क पत्ता | पुणे महानगरपालिका मुख्य इमारत, मंगला थिएटरजवळ, शिवाजी नगर, पुणे- 411 005 |
Apang Mofat Bus Pass Yojana Contact Number | 020-25501000 020-25501130 1800-1030-222 |
Apang Mofat Bus Pass Yojana Email | info[At]punecorporation[Dot]org pmcdbthelp[At]gmail[Dot]com |
Apang Mofat Bus Pass Yojana Fax Number | 020-25501104 |
सर शेवटची तारीख काय आहे
या योजनेला शेवटची तारीख नाही आहे.