अहिल्यादेवी सिंचन विहीर योजना

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत राबविण्यात येणारी योजना आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्याला त्याच्या शेतात विहीर खोदण्यासाठी 4 लाखांचे अनुदान दिले जाते.

शेतकऱ्यांची शेती हि पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते पण पावसाची अनियमितता पाहता शेतकऱ्यांना पिकासाठी पाणी देणे शक्य होत नाही परिणामी पाण्याअभावी शेत पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते ते टाळण्यासाठी राज्य सरकारने अहिल्यादेवी सिंचन विहीर योजना सुरु करण्याचा महत्वाचा निर्णय घेतला जेणेकरून शेतकऱ्यांना शेत पिकासाठी कायमस्वरूपी पाण्याची उपलब्धता होईल व पाण्याअभावी शेत पिकांचे होणारे नुकसान टाळता येईल. [अहिल्यादेवी सिंचन विहीर योजना]

नवीन अपडेट

नवीन शासन निर्णयानुसार दोन विहीर मधील 150 फूट अंतराची अट रद्द करण्यात आलेली आहे.

योजनेचे नावअहिल्यादेवी सिंचन विहीर योजना
लाभार्थीशेतकरी
उद्दिष्टविहीर खोदण्यासाठी अनुदान देणे
अनुदान4 लाखाचे अनुदान
अर्ज करण्याची पद्धतऑफलाईन

अहिल्यादेवी सिंचन विहीर योजना चे उद्दिष्ट

  • शेतकऱ्यांना शेतात विहीर खोदण्यासाठी अनुदान उपलब्ध करून देणे.
  • शेतकऱ्यांना शेतात पाण्याची उपलब्धता करून देणे.
  • शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी प्रोत्साहित करणे. [अहिल्यादेवी सिंचन विहीर योजना]
अहिल्यादेवी सिंचन विहीर योजना

अहिल्यादेवी सिंचन विहीर योजना चे वैशिष्ट्य

  • शेतकऱ्यांना अत्यंत फायद्याची अशी हि योजना आहे.
  • योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया सोपी ठेवण्यात आलेली आहे.
  • शेतकऱ्यांचा सामाजिक विकास होण्यासाठी सदर योजना उपयुक्त ठरणार आहे. [अहिल्यादेवी सिंचन विहीर योजना]
  • युवकांना स्वतःचा उद्योग सुरु करण्यासाठी राज्य सरकार देत आहे 1 लाखाचे कर्ज त्यासाठी वाचा थेट कर्ज योजना
  • राज्य सरकार चर्मकार बांधवांना विविध प्रकारचे व्यावसायिक प्रशिक्षण व उद्योग सुरु करण्यासाठी बिनव्याजी कर्ज देते आहे त्यासाठी वाचा चर्मकार समाज योजना

अहिल्यादेवी सिंचन विहीर योजना चे लाभार्थी

  • महाराष्ट्र राज्यातील शेतकरी

अहिल्यादेवी सिंचन विहीर योजना चे लाभ

  • योजनेअंतर्गत विहीर खोदण्यासाठी 4 लाखांचे अनुदान उपलब्ध करून दिले जाते.

अहिल्यादेवी सिंचन विहीर योजना चे फायदे

  • शेतात कायमस्वरूपी पाण्याची उपलब्धता झाल्यामुळे शेतकरी सर्व प्रकारची शेती करतील.
  • शेती करण्यासाठी प्रोत्साहित होतील तसेच इतर नागरिक शेती क्षेत्राकडे आकर्षित होतील.
  • पिकांचे नुकसान होणार नाही.
  • शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारेल.
  • पाण्यासाठी पावसावर अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही. [अहिल्यादेवी सिंचन विहीर योजना]

अहिल्यादेवी सिंचन विहीर योजना अंतर्गत प्रवर्ग

  • अनुसूचित जाती
  • अनुसूचित जमाती
  • दारिद्र्य रेषेखालील कुटुंब
  • भूसुधार योजनेचे लाभार्थी
  • इंदिरा आवास योजनेचे लाभार्थी
  • अल्प भूधारक व सीमांत शेतकरी
  • परंपरागत वन निवासी

अहिल्यादेवी सिंचन विहीर योजना अंतर्गत प्राथमिकता

  • आत्महत्या कुटुंबातील सदस्य
  • दारिद्र्य रेषेखालील कुटुंब

अहिल्यादेवी सिंचन विहीर योजना अंतर्गत नियम व अटी

  • शेतकऱ्याकडे कमीत कमी २.६० हेक्टर शेतजमीन असणे आवश्यक आहे. त्या पेक्षा कमी जमीन असलेल्या शेतकऱ्यांचे अर्ज नाकारले जातील. परंतु 3 अर्जदारांची जमीन सलग असल्यास अशा परिस्थितीत ते सामूहिक विहिरीसाठी अर्ज करू शकतात.
  • जमीन शेतकऱ्याच्या नावावर असणे आवश्यक आहे. जर शेतजमीन दुसऱ्याच्या नावावर असेल तर त्या जमीन मालकाचे ना हरकत प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
  • अर्जदार शेतकऱ्याची जमीन विहीर खोदण्यासाठी तांत्रिकदृष्ट्या योग्य असणे आवश्यक राहील
  • अर्जदार शेतकऱ्याने या पूर्वी केंद्र किंवा राज्य शासनाच्या द्वारे सुरु एखाद्या योजनेअंतर्गत विहीर, शेततळे, सामुदायिक शेततळे अथवा भात खाचरासोबत तयार होणारी बोडी या घटकांचा शासकीय योजनांमधून लाभ मिळवला असल्यास अशा परिस्थिती पुन्हा त्या शेतकऱ्याला लाभ दिला जाणार नाही.
  • शेतकऱ्याच्या शेतात विहीर असता कामा नये.
  • ज्या जागी विहीर खोदायची आहे त्या ठिकाणापासून ५०० फुटाच्या आजूबाजूच्या परिसरात कोणतीही विहीर असता कामा नये.
  • शेतात विजेची सोय असणे आवश्यक आहे.
  • अर्जदाराच्या ७/१२ वर विहिरींची नोंद असता कामा नये.
  • अर्जदार शेतकऱ्याकडे जॉब कार्ड असणे आवश्यक आहे तसेच त्याने विहीर खोदण्याचे काम करून मजुरी घेणे आवश्यक आहे. [अहिल्यादेवी सिंचन विहीर योजना]
  • आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना सरकार देत आहे 3 लाखाची प्रोत्साहन राशी त्यासाठी वाचा आंतरजातीय विवाह योजना

अहिल्यादेवी सिंचन विहीर योजना अंतर्गत आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • रहिवाशी दाखला
  • उत्पनाचे प्रमाणपत्र
  • शपथपत्र
  • मोबाईल नंबर
  • ई-मेल आयडी
  • जमिनीचा ७/१२

अहिल्यादेवी सिंचन विहीर योजना अंतर्गत अर्ज करण्याची पद्धत

  • अर्जदार शेतकऱ्याला आपल्या क्षेत्रातील ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन अहिल्यादेवी सिंचन विहीर योजना साठी अर्ज करावा लागेल.
Telegram GroupClick Here
अहिल्यादेवी सिंचन विहीर योजना शासन निर्णयClick Here
अहिल्यादेवी सिंचन विहीर योजना अर्जClick Here
अहिल्यादेवी सिंचन विहीर योजना प्रस्तावClick Here

सारांश

आम्ही अहिल्यादेवी सिंचन विहीर योजना ची संपूर्ण माहिती वाचल्याबद्दल धन्यवाद आमची विनंती आहे कि तुमच्या परिसरात जे कोणी शेतकरी असतील तर त्यांना या योजनेची माहिती अवश्य द्या किंवा आमचे हे आर्टिकल त्यांना शेयर करा जेणेकरून ते देखील या योजनेअंतर्गत अर्ज करून नोकरी मिळवू शकतील. [अहिल्यादेवी सिंचन विहीर योजना]