राज्यातील बेरोजगार तरुणांना रोजगार तसेच उद्योग सुरु करण्याच्या उद्देशाने सुरु करण्यात आलेली योजना आहे.
राज्यात तरुण शिक्षण पूर्ण झाल्यावर खांद्यावर कुटुंबाची जबाबदारी घेऊन नोकरीच्या शोधात असतात परंतु नोकरीच्या कमी संधी उपलब्ध असल्याकारणामुळे तरुणांना सहजासहजी नोकरी उपलब्ध होत नाही त्यामुळे त्यांना नोकरी मिळवण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात तसेच तरुणांना नोकरीच्या शोधासाठी येण्याजाण्यासाठी तिकिटांसाठी तसेच अर्ज करण्यासाठी पैशाची आवश्यकता असते त्यामुळे तरुणांना राज्य शासनाकडून आर्थिक सहाय्य दिले जाते.
पोर्टल अंतर्गत तरुणांना मिळणारे लाभ
या पोर्टल वर बेरोजगार तरुणांना स्वतःची नोंदणी करावी लागते व त्यांना त्यांच्या आवडीनुसार तसेच कौशल्यानुसार रोजगार उपलब्ध करून दिले जातात. तरुणांना त्यांच्या आवडीच्या नोकरीसाठी Applya करावे लागते व त्या नंतर अर्जदार तरुणांची ऑनलाईन किंवा ऑफलाईन मुलाखत घेतली जाते. मुलाखतीमध्ये उत्तीर्ण झाल्यावर तरुणांना नोकरी मिळते.
तसेच पोर्टल वर तरुणांना त्यांच्या आवडीनुसार कौशल्य प्रशिक्षण दिले जाते त्यासाठी तरुणांना पोर्टल वर नोंदणी करावी लागते त्या नंतर तरुणांना त्यांच्या आवडीच्या कौशल्य प्रशिक्षणासाठी नोंदणी करावी लागते त्यानंतर तरुणांना 1 ते 3 महिन्याचे प्रशिक्षण दिले जाते. व प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर तरुणांना नोकरी मिळवून देण्यासाठी मदत केली जाते. तसेच कौशल्य प्रशिक्षण प्राप्त करून तरुण स्वतःचा एखादा छोटासा उद्योग देखील सुरु करू शकतो.
बेरोजगार तरुणांना नोकरी उपलब्ध व्हावी यासाठी रोजगार मेळाव्यांचे आयोजन केले जाते जेथे नियोक्ता कौशल्यानुसार तरुणांची निवड करतात ज्यामुळे तरुणांना नोकरी उपलब्ध होण्यास मदत होते.
जे तरुण स्वतःचा एखादा उद्योग सुरु करण्यासाठी इच्छुक आहेत अशा तरुणांना स्वतःचा उद्योग सुरु करता यावा यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत 10 लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून दिले जाते.
योजनेचे नाव | रोजगार संगम योजना महाराष्ट्र |
उद्दिष्ट | तरुणांना नोकरी उपलब्ध करून देणे |
लाभ | नोकरी ची सुवर्णसंधी |
लाभार्थी | राज्यातील बेरोजगार तरुण |
अर्ज कोठे करावा | अधिकृत वेबसाईटवर |
रोजगार संगम योजना महाराष्ट्र चे उद्दिष्ट
- राज्यातील तरुणांना बेरोजगारी भत्ता स्वरूपात आर्थिक सहाय्य देणे.
- बेरोजगार तरुणांना नोकरीच्या नवीन संधी उपलब्ध करून देणे.
- राज्यातील बेरोजगारी कमी करणे.
योजनेचे वैशिष्ट्य:
- योजनेअंतर्गत दिले जाणारे आर्थिक सहाय्य लाभार्थी तरुणाच्या बँक खात्यात जमा केली जाईल.
योजनेचे लाभार्थी:
- नोकरीच्या शोधात असलेले परंतु नोकरी ना मिळालेले राज्यातील बेरोजगार तरुण
योजनेअंतर्गत नोंदणी करण्यासाठी आवश्यक शुल्क:
- योजनेअंतर्गत नोंदणी करण्यासाठी अर्जदाराला कुठल्याच प्रकारचे शुल्क भरण्याची गरज नाही आहे.
योजनेचा फायदा:
- योजनेअंतर्गत मिळणाऱ्या आर्थिक सहाय्यामुळे तरुणांना नोकरीच्या शोधासाठी आवश्यक तिकिटांचे पैसे तसेच अर्ज भरणे यासाठी मदत होईल.
- राज्यातील बेरोजगारी थोड्या फार प्रमाणात कमी होईल.
- योजनेअंतर्गत मिळणाऱ्या आर्थिक सहाय्यामुळे तरुण स्वतःच्या दैनंदिन गरज पूर्ण करू शकतील.
- राज्यातील बेरोजगार तरुणांना नोकरी मिळवण्यासाठी एक सुवर्ण संधी उपलब्ध होईल.
- नियोक्ता (Employer) या पोर्टल वर नोंदणी करून स्वतःच्या कंपनीसाठी सहजरित्या आवश्यक तरुण मिळवू शकतील.
आवश्यक पात्रता व अटी
- अर्जदार तरुण महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवाशी असणे गरजेचे आहे
- अर्जदार तरुण बेरोजगार असणे आवश्यक आहे.
- तरुण शासकीय किंवा खाजगी नोकरी मध्ये कार्यरत असता कामा नये.
- अर्जदार तरुणांचे वय 18 ते 35 वर्ष दरम्यान असणे गरजेचे आहे.
आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- रहिवाशी दाखला
- जन्म प्रमाणपत्र
- मोबाईल क्रमांक
- ई-मेल आयडी
- पासपोर्ट आकाराचे फोटो
- बँक खात्याची माहिती
नवीन अर्जदार नोंदणी करण्याची पद्धत:
- अर्जदार तरुणाला अधिकृत पोर्टल वर जावे लागेल.
- होम पेज वर स्वतःची नवीन नोंदणी करावी लागेल.
रोजगार संगम योजना महाराष्ट्र Apply:
- अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्जदाराला लॉगिन करायचे आहे.
- लॉगिन केल्यावर तुमच्यासमोर अर्ज उघडेल त्यामध्ये विचारलेली सर्व माहिती भरून सोबत आवश्यक कागदपत्रे अपलोड करायची आहेत.
- आता तुमच्यासमोर उपलब्ध नोकरीची लिस्ट दिसेल त्यामध्ये तुमच्या कौशल्यानुसार तसेच आवडीनुसार नोकरी शोधायची आहे व Apply बटनावर क्लिक करायचे आहे.
- Apply केल्यानंतर काही दिवसात तुम्हाला तुमचा ई-मेल किंवा मोबाईल वर message करून मुलाखती ची तारीख कळविण्यात येईल.
- अर्जदाराला मुलाखतीच्या तारखेला जाऊन मुलाखत द्यावी लागेल.
- मुलाखतीमध्ये उत्तीर्ण झाल्यावर अर्जदाराची निवड करण्यात येईल.
Telegram Group | Click Here |
रोजगार संगम योजना फॉर्म | Click Here |
Rojgar Sangam Yojana Maharashtra Official Website | Click Here |
Rojgar Sangam Yojana Maharashtra Application Form | Click Here |