राज्यात आज सुद्धा बहुतांश कुटुंबे हे दारिद्र्य रेषेखाली जीवन जगत असतात त्यामुळे ते आपल्या कुटुंबाच्या गरज पूर्ण करण्यासाठी असमर्थ असतात. आर्थिक स्थिती कमजोर असल्याकारणामुळे ग्रामीण भागातील कुटुंबे वैयक्तिक शौचालय बांधण्यासाठी असमर्थ असतात त्यामुळे ते उघड्यावर शौचास बसतात त्यामुळे परिसरात दुर्गंधी व रोगराई पसरते व आजारास बसली पडतात. या सर्व गोष्टींचा विचार करून केंद्र सरकार ने महाराष्ट्र शौचालय अनुदान योजना सुरु करण्याचा एक महत्वपूर्ण निर्णय घेतला.
शौचालय अनुदान योजना अंतर्गत राज्यातील गरीब तसेच आर्थिक दृष्ट्या कमजोर कुटुंबे जे वैयक्तिक शौचालय बांधण्यास इच्छुक आहेत परंतु आर्थिक स्थिती कमजोर असल्यामुळे ते वैयक्तिक संडास बांधण्यास असमर्थ असतात अशा कुटुंबांना शौचालय अनुदान योजनेच्या सहाय्याने वैयक्तिक शौचालय बांधण्यासाठी अनुदान देण्यात येते.
या योजनेअंतर्गत वैयक्तिक शौचालय बांधण्यासाठी 12000/- रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्यात येते. तसेच देण्यात येणारी अनुदान राशी 2 टप्प्यात देण्यात येते.
शौचालय अनुदान योजना केंद्र आणि राज्य सरकार च्या विद्यमाने राबविण्यात येते यात केंद्र सरकार चा 75% म्हणजेच 9000/- रुपये आणि राज्य शासनाचा 25% म्हणजेच 3000/- रुपये वाटा असतो.
योजनेचे नाव | शौचालय अनुदान योजना महाराष्ट्र |
विभाग | सामाजिक सुरक्षा विभाग |
राज्य | महाराष्ट्र |
कोणी सुरु केली | केंद्र सरकार |
लाभार्थी | राज्यातील गरीब कुटुंबे |
लाभ | 12000/- रुपयांचे आर्थिक सहाय्य |
उद्देश्य | शौचालय बांधण्यासाठी अर्थसहाय्य करणे |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन/ऑफलाईन |
शौचालय अनुदान योजना महाराष्ट्र चे उद्दिष्ट
- शौचालय अनुदान योजना महाराष्ट्र च्या सहाय्याने राज्यात स्वच्छता निर्माण करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश्य आहे.
- या योजनेच्या सहाय्याने राज्यातील ग्रामीण भागातील कुटुंबाचे राहणीमान सुधारणे हे या योजनेचे मुख्य उद्देश्य आहे.
- ग्रामीण भागातील व्यक्तींना खुल्यावर शौचास बसता येऊ नये या उद्देशाने या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
- ग्रामीण भागात ज्या कुटुंबांजवळ स्वतःचे वयक्तिक शौचालय नाही अशा कुटुंबाना शौचालय बांधण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
- ग्रामीण भागातील लोकांना स्वच्छतेचे महत्व पटवून देणे, जनजागृती करणे तसेच उघड्यावर मलविसर्जन करण्यास प्रतीबंध करणे या उद्देशाने राबविण्यात येणारी हि एक महत्वपूर्ण योजना आहे.
- या योजनेचा मुख्य उद्देश देशात उघड्यावर मलविसर्जन करण्यास प्रतीबंध करून स्वच्छता निर्माण करणे व ग्रामीण भागातील कुटुंबाचे राहणीमान सुधारणे.
योजनेचे वैशिष्ट्य:
- महाराष्ट्र शौचालय अनुदान योजना ची सुरुवात केंद्र आणि राज्य सरकार यांच्या सहाय्याने सुरु करण्यात आली आहे.
- ग्रामीण भागातील जी कुटुंबे शौचालय बांधण्यास इच्छुक आहेत अशा कुटुंबांना या योजनेअंतर्गत लाभ देण्यात येईल.
- या योजनेअंतर्गत देण्यात येणारी आर्थिक मदत 2 टप्प्यात देण्यात येते.
- या योजनेअंतर्गत अर्ज करून सर्व जाती धर्माचे व्यक्ती लाभ घेऊ शकतात.
- स्वच्छ भारत मिशन ला प्रोत्साहन देण्यासाठी या योजनेची शुरुवात करण्यात आली आहे.
- या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या लाभाची रकम लाभार्थी व्यक्तीच्या बँक खात्यात DBT च्या सहाय्याने जमा करण्यात येते.
- शौचालय अनुदान योजना च्या सहाय्याने खुल्यावर सौचास बसण्याची प्रथा बंद होण्यास मदत होईल.
- योजनेअंतर्गत ग्रामीण तसेच शहरी भागात स्वच्छतेला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
- ग्रामीण भागातील कुटुंबांना वयक्तिक शौचालय बांधकाम करण्यासाठी केंद्र सरकारद्वारे स्वच्छ भारत मिशन अंतर्गत अनुदान देणारी हि एक महत्वपूर्ण योजना आहे.
- शौचालय अनुदान योजना महाराष्ट्र हि केंद्र तसेच राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येते.
योजनेचा फायदा:
- शौचालय अनुदान योजना महाराष्ट्र अंतर्गत राज्यातील आर्थिक दृष्ट्या कमजोर कुटुंबांना वैयक्तिक शौचालय बांधण्यास 12000 /- रुपयांचे आर्थिक सहाय्य करण्यात येते.
- या योजनेच्या सहाय्याने गावात रोगराई होणार नाही.
- या योजनेच्या सहाय्याने ग्रामीण भागातील गरीब कुटुंबांना स्वतःचा वैयक्तिक शौचालय बांधण्यास मदत होईल.
- या योजनेच्या सहाय्याने ग्रामीण भागातील नागरिकांना खुल्यावर शौचास बसण्याची आवश्यकता भासणार नाही.
- या योजनेच्या सहाय्याने परिसरात रोगराई तसेच दुर्गंधी पसरणार नाही.
- लोकांची आजारपणापासून मुक्तता होईल.
- राज्याचा सर्वांगीण विकास होईल.
- या योजनेच्या सहाय्याने महिलांना खुल्यावर सौचास बसण्याची वेळ येणार नाही.
योजनेचे लाभार्थी:
- दारिद्र्य रेषेखालील कुटुंबे
- अनुसूचित जाती
- अनुसूचित जमाती कुटुंबे
- लहान व अत्यल्प भूधारक शेतकरी
- घरकुल असेलेले भूमिहीन मजूर
- शारीरिक दृष्ट्या अपंग व्यक्ती असलेली कुटुंबे
- कुटुंबातील प्रमुख स्त्रिया
योजनेअंतर्गत आवश्यक पात्रता:
- अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असणे आवश्यक आहे.
- ग्रामीण भागातील गरीब कुटुंबे या योजनेसाठी पात्र आहे.
- दारिद्रय रेषेखालील कुटुंबे या योजनेसाठी पात्र आहेत.
योजनेचे नियम व अटी:
- अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असणे आवश्यक आहे
- ज्या कुटुंबांनी या आधी केंद्र किंवा राज्य शासनाद्वारे सुरु करण्यात आलेल्या शौचालय अनुदान योजनेचा लाभ घेतला असेल तर अशा कुटुंबांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
- ज्या कुटुंबांनी आपल्या घरात शौचालय बांधले असतील त्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
योजनेअंतर्गत अर्ज रद्द होण्याची कारणे:
- अर्जदाराने अर्जात सर्व माहिती न भरल्यास अर्ज रद्द केला जाईल.
- अर्जात चुकीची माहिती भरल्यास अर्ज रद्द केला जाईल.
- अर्जात चुकीची बँक खाता नंबर भरल्यास अनुदान राशी बँकेत जमा होणार नाही.
- अर्जदाराने दुसऱ्या कोणाचा बँक खाता तपशील अर्जात नमूद केल्यास अनुदान रकम बँकेत जमा केली जाणार नाही.
- बँकेचा IFSC Code चुकीचा टाकल्यास अनुदान राशी बँकेत जमा केली जाणार नाही.
आवश्यक कागदपत्रे:
- आधार कार्ड
- बीपीएल रेशन कार्ड
- उत्पन्नाचा दाखला
- मोबाईल नंबर
- ई-मेल आयडी
- पासपोर्ट साईज फोटो
- बँक खात्याचा तपशील
योजनेअंतर्गत अर्ज करण्याची पद्धत:
- अर्जदाराला सर्वात प्रथम शासनाच्या अधिकृत वेबसाईट वर जावे लागेल.
- अर्जदाराला सर्वात प्रथम स्वतःचे रेजिस्ट्रेशन करावे लागेल.त्यासाठी अर्जदाराला स्वतःचा मोबाईल नंबर.स्वतःचे नाव,पत्ता,राज्य,कॅप्टचा कोड टाकून Submit बटनावर क्लिक करावे लागेल.
- रेजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यावर तुम्हाला Login Id आणि Password टाकून Sign In करायचं आहे.
- Login केल्यावर तुम्हाला तुमचा जुना पासवर्ड बदलण्याचे option येईल.आता तुम्हाला जुना पासवर्ड बदलून नवीन पासवर्ड ठेवायचा आहे.
- आता तुमच्या समोर नवीन पेज ओपन होईल त्यात तुम्हाला New Application पर्यायावर क्लिक करायचं आहे.
- आता तुमच्यासमोर या योजनेचा अर्ज उघडेल त्यामध्ये विचारलेली सर्व माहिती वयक्तिक माहिती, पत्ता तसेच तुमच्या बँक खात्याची माहिती इत्यादी योग्य प्रकारे भरायची आहे.सर्व माहिती भरून झाल्यावर Apply बटनावर क्लिक करायचं आहे.
- अशा प्रकारे तुमची या योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.
योजनेअंतर्गत अर्जाची स्थिती बघण्याची पद्धत:
- आपल्याला सर्वात प्रथम शासनाच्या अधिकृत वेबसाईट वर जायचे आहे.
- होम पेज वर गेल्यावर login बटनावर क्लिक करून Login करायचे आहे.
- आता तुमच्या समोर एक पेज ओपन होईल त्यात View Application बटनावर क्लिक करायचं आहे
- आता तुमच्या अर्जाची स्थिती तुमच्या स्क्रीन वर दिसेल.
योजनेअंतर्गत ऑफलाईन अर्ज करण्याची पद्धत:
- अर्जदाराला सर्वात प्रथम आपल्या नजीकच्या ग्रामपंचायत कार्यालयात जावे लागेल व शौचालय अनुदान योजनेचा अर्ज घ्यावा लागेल.
- अर्जात विचारलेली सर्व माहिती योग्य प्रकारे भरून सोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी लागतील व सदर अर्ज जमा करावा लागेल.
- ग्रामपंचायतीद्वारे तुमच्या अर्जाची तसेच कागदपत्रांची छाननी करून तुम्ही पात्र असल्यास तुम्हाला या योजनेचा लाभ दिला जाईल.
Telegram Group | Join |
सरकार ची आधिकारीक वेबसाईट | Click Here |
support-nbamis[at]nic[.]in |