शरद पवार इन्स्पायर फेलोशिप 2023 : Sharad Pawar Nnspire Fellowship

Sharad Pawar Nnspire Fellowship | Sharad Pawar Nnspire Fellowship In Education | शरद पवार इन्स्पायर फेलोशिप इन एज्युकेशन | शरद पवार इन्स्पायर फेलोशिप | Sharad Pawar Nnspire Fellowship Apply Online | Sharad Pawar Nnspire Fellowship Status | Sharad Pawar Nnspire Fellowship Last Date

आपल्या राज्यात बहुतांश युवक स्वतःचे शिक्षा पूर्ण करण्यासाठी इच्छुक आहेत परंतु कुटुंबाची आर्थिक परिस्थिती कमजोर असल्याकारणामुळे त्यांना आपल्या कुटुंबाच्या गरज पूर्ण करणे शक्य नसते त्यामुळे ते आपल्या मुलांना उच्च शिक्षण देण्यास असमर्थ असतात. त्यामुळे राज्यातील बहुतांश विद्यार्थी त्यांचे उच्च शिक्षण पूर्ण करण्यापासून वंचित राहतात या सर्व गोष्टींचा विचार करून यशवंतराव चव्हाण सेंटर च्या वतीने यंदाच्या शरद पवार इनस्पायर फेलोशिपची (Sharad Pawar Inspire Fellowship) घोषणा करण्यात आली.

शरद पवार इन्स्पायर फेलोशिप

राज्यात कृषी, शिक्षण आणि साहित्य (Agriculture, Education and Literature) क्षेत्रात संशोधन करू इच्छिणाऱ्यांना या फेलोशिप च्या अंतर्गत आर्थिक सहाय्य करण्यात येईल.

ज्येष्ठ अणूशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली या फेलोशिपची सुरुवात करण्यात आली आहे. या फेलोशिप अंतर्गत शरद पवार इनस्पायर फेलोशिप इन ॲग्रीकल्चरसाठी ८०, शरद पवार इनस्पायर साहित्य फेलोशिपसाठी १० आणि शरद पवार इनस्पायर शिक्षण फेलोशिपसाठी ४० अशा एकूण १३० जणांची निवड केली जाणार आहे.

शिक्षण उद्यासाठी असते. उद्याचे सुजाण, सतर्क, सर्जनशील, कर्तबगार व सुसंस्कृत नागरिक घडविणे खऱ्या, उचित व उत्तम शिक्षणाकडून अपेक्षित असते. शिकावे कसे, शिकण्याचा आनंद कसा घ्यावा-द्यावा आणि आजन्म शिकत कसे राहावे हे शिकविते ते खरे शिक्षण, शिकता-शिकता जे उद्याची आव्हाने पेलायला सज्ज करते, उद्याच्या संधींचे सोने करायला शिकवते ते खरे शिक्षण,

एकविसाव्या शतकातील एकविसाव्या वर्षापासून शालेय शिक्षणाच्या मुलभूत पुनर्रचनेची यादृष्टीने नितांत आवश्यकता आहे. कारण विशेषत: गेल्या वर्षीपासून दैनंदिन जीवनाचे संदर्भ पार बदलून टाकणाऱ्या अनेक वेगवान महाप्रवाहांचा प्रभाव एकाच वेळी जगभर वाढू लागला आहे.

बदल घडवून आणणारे शेती, औद्योगिक क्रांती, इ. महाप्रवाह इतिहासात पूर्वीही येऊन गेले आहेत. परंतु त्यांचे जगभर परिणाम दिसायला शतके लागली. विद्युत उर्जेच्या महाप्रवाहाने जगाला कवेत घ्यायला, पृथ्वीवर ‘इलेक्ट्रिकल सिव्हिलायझेशन’ साकारायला शतक लागले. संगणक व माहिती तंत्रज्ञानाच्या महाप्रवाहाने जगावर अधिराज्य प्रस्थापित करायला अर्धशतक लागले. आताचे बदल घडविणारे महाप्रवाह मात्र कमालीचे वेगवान आहेत. त्यांचे परिणाम अनुभवास यायला आता पाच-दहा वर्षेही लागत नाहीत. त्यांच्या प्रचंड वेगापुढे मानवी समाजाची दमछाक होताना आपण पाहतो आहोत.

वेग, अधिक वेग आणि प्रचंड वेग हेच त्या महाप्रवाहांचे आणि त्यांनी प्रभावित केलेल्या मानवी जीवनाचे आता व्यवच्छेदक लक्षण बनले आहे. यातले काही महाप्रवाह अनिष्ट आहेत तर काही इष्ट. उदाहरणार्थ एकीकडे अनिष्ट हवामान बदल तर दुसरीकडे इष्ट ज्ञानक्रांती. हे महाप्रवाह दीर्घ काळ टिकून राहतील व वेगाने वाढत जातील अशी चिन्हे आहेत. या महाप्रवाहांमुळे मानव जातीपुढे व विशेषत: विद्यार्थ्यांपुढे जशी अनेक नवी आव्हाने उभी ठाकली आहेत तशाच नव्या संधीही निर्माण झाल्या आहेत. या आव्हानानांबद्दल, संधींबद्दल सविस्तर विवेचन ‘परिशिष्ट’मध्ये दिले आहे.

विशेष सूचना: आम्ही शरद पवार इन्स्पायर फेलोशिप ची संपूर्ण माहिती या लेखात दिली आहे त्यामुळे तुमची हा लेख शेवट पर्यंत वाचा व या योजनेचा लाभ मिळवा जर तुमच्या परिसरात असे कोणी शिक्षक असतील जे शरद पवार इन्स्पायर फेलोशिप चा लाभ घेऊ इच्छित असतील तर त्यांना या योजनेची माहिती अवश्य द्या किंवा आमची हि आर्टिकल त्यांना शेयर करा जेणेकरून ते या योजनेचा लाभ घेऊ शकतील.

योजनेचे नावशरद पवार इन्स्पायर फेलोशिप
राज्यमहाराष्ट्र
सुरुवात२०२१
लाभार्थीराज्यातील शिक्षक
लाभआर्थिक सहाय्य
उद्देश्यभविष्य काळातील नेतृत्व तयार करणे
अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन

शरद पवार इन्स्पायर फेलोशिप चा उद्देश

Sharad Pawar Nnspire Fellowship Purpose

 • महाराष्ट्रातील होतकरू, गुणवंत आणि नव्याने काही करू पाहणाऱ्या तरुण – तरुणींना संधीचे नवे अवकाश खुले करुन देण्याच्या उद्देशाने शरद पवार इन्स्पायर फेलोशिप ची सुरुवात करण्यात आली आहे.
 • भविष्य काळातील नेतृत्व तयार करणे हा या फेलोशिपमागील मुख्य उद्देश आहे.
 • राज्यातील विद्यार्थी स्वतःचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी सशक्त तसेच आत्मनिर्भर बनविणे
 • शरद पवार इन्स्पायर फेलोशिप च्या सहाय्याने राज्यातील विद्यार्थ्यांचा आर्थिक तसेच सामाजिक विकास करणे
 • राज्यातील विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी आर्थिक सहाय्यासाठी कोणावर अवलंबून राहण्याची गरज भासू नये तसेच त्यांना कोणाकडून जास्त व्याज दराने कर्ज घेण्याची वेळ येऊ नये या उद्देशाने शरद पवार इन्स्पायर फेलोशिप ची सुरुवात करण्यात आली आहे.

शरद पवार इन्स्पायर फेलोशिप ची वैशिष्ट्ये

Sharad Pawar Nnspire Fellowship For Education

 • यशवंतराव चव्हाण सेंटर च्या वतीने शरद पवार इनस्पायर फेलोशिपची ची सुरुवात करण्यात आली आहे.
 • राज्यातील गरीब परिवारातील विद्यार्थ्यांना स्वतःचे शिक्षा पूर्ण करता यावे या उद्देशाने यशवंतराव चव्हाण सेंटर च्या वतीने सुरु करण्यात आलेली एक महत्वाची अशी योजना आहे.
 • शरद पवार इन्स्पायर फेलोशिप अंतर्गत अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन करण्यात आली आहे त्यामुळे अर्जदार विद्यार्थी आपल्या घरी बसून स्वतःच्या मोबाईल च्या सहाय्याने या फेलोशिप साठी अर्ज करू शकतो त्यामुळे अर्जदार विद्यार्थ्याला अर्ज करण्यासाठी कोणत्याच कार्यालयाच्या फेऱ्या मारण्याची आवश्यकता भासणार नाही त्यामुळे अर्जदार विद्यार्थ्यांचा वेळ आणि पैसे दोघांची बचत होईल.
 • शरद पवार इन्स्पायर फेलोशिप अंतर्गत अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन केली गेली आहे त्यामुळे अर्जदार विद्यार्थी अर्ज केल्यापासून लाभ मिळेपर्यंत अर्जाची सर्व स्थिती वेळोवेळी जाणून घेऊ शकतो.
 • शरद पवार इन्स्पायर फेलोशिप अंतर्गत राज्यातील विद्यार्थ्यांचा सामाजिक तसेच आर्थिक विकास होण्यास मदत होईल.

महाराष्ट्र सरकारच्या विविध योजनांसाठी येथे क्लिक करा

शरद पवार इन्स्पायर फेलोशिप चे लाभार्थी

Sharad Pawar Nnspire Fellowship Beneficiary

महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थी शरद पवार इन्स्पायर फेलोशिप चा लाभ मिळवण्यास पात्र आहेत.

शरद पवार इन्स्पायर फेलोशिप चे लाभ

Sharad Pawar Nnspire Fellowship Benefits

 • शरद पवार इन्स्पायर फेलोशिप योजनेअंतर्गत राज्यातील पात्र विद्यार्थ्यांना त्याचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी आर्थिक सहाय्य करण्यात येईल.
 • शरद पवार इन्स्पायर फेलोशिप अंतर्गत विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी आर्थिक सहाय्य करण्यात येईल त्यामुळे राज्यातील विद्यार्थ्यांना स्वतःचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी कोणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता भासणार नाही आणि कोणाकडून कर्ज घ्यावे लागणार नाही.
 • शरद पवार इन्स्पायर फेलोशिप च्या सहाय्याने राज्यातील विद्यार्थी स्वतःचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी सशक्त व आत्मनिर्भर बनतील.
 • या योजनेच्या सहाय्याने राज्यातील कोणताच विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही.
 • राज्यातील गरीब कुटुंबांना त्यांच्या मुलांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी चिंता करण्याची गरज भासणार नाही.
 • शरद पवार इन्स्पायर फेलोशिप अंतर्गत मिळणारे आर्थिक सहाय्य लाभार्थ्यांच्या बँक खात्यात DBT च्या सहाय्याने जमा करण्यात येईल.
 • राज्यातील विद्यार्थी स्वावलंबी बनतील.
 • शरद पवार इन्स्पायर फेलोशिप च्या सहाय्याने विधार्थी स्वतःचे शिक्षण पूर्ण करून भविष्यात स्वतःसाठी एक चांगली नोकरी मिळवू शकतील आणि स्वतःचे आणि परिवाराचा सांभाळ करू शकतील.
 • राज्यात साक्षरतेचे प्रमाण वाढेल.
 • शरद पवार इन्स्पायर फेलोशिप अंतर्गत स्वतःचे शिक्षण पूर्ण करून एखादा उद्योग सुरु करू शकतील जेणेकरून बेरोजगार नागरिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील व राज्यातील बेरोजगारी कमी होऊन राज्याचा औद्योगिक विकास होईल.

शरद पवार इन्स्पायर फेलोशिप अंतर्गत अर्जदारांचे कार्यक्षेत्र

Sharad Pawar Nnspire Fellowship

महाराष्ट्रातील शाळांत व ज्युनिअर कॉलेजात कार्यरत असलेले शिक्षक

महाराष्ट्र सरकारच्या विविध योजनांसाठी येथे क्लिक करा

शरद पवार इन्स्पायर फेलोशिप  ची संख्या

Maharashtra Sharad Pawar Nnspire Fellowship

प्राथमिकमाध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षक
2020

शरद पवार इन्स्पायर फेलोशिप चा कालावधी

Sharad Pawar Nnspire Fellowship Maharashtra

एप्रिल २०२३ ते एप्रिल २०२४

शरद पवार इन्स्पायर फेलोशिप अंतर्गत मिळणारे आर्थिक सहाय्य

Sharad Pawar Nnspire Fellowship Marathi

निवड झालेल्या प्रत्येक शिक्षकास वार्षिक ६०,०००/- (रुपये साठ हजार फक्त). यातील रक्कम रुपये ४०,०००/- शिक्षकाना प्रत्यक्षात फेलोशिपमधील उपक्रमांसाठी लागणारी साधने, संभाव्य प्रवास, इत्यादीसाठी देण्यात येईल आणि उर्वरित रुपये २०,०००/- रक्कम ही कार्यशाळा आणि मार्गदर्शकांच्या मार्गदर्शनासाठी खर्च करण्यात येईल.

शरद पवार इन्स्पायर फेलोशिप अंतर्गत अर्ज प्रक्रियेचे वेळापत्रक

Sharad Pawar Nnspire Fellowship Time Table

अर्ज करण्याची अंतिम मुदत१२ ऑक्टोबर २०२२
अर्जाची छाननी आणि निवड प्रक्रिया१३ ऑक्टोबर ते ०३ नोव्हेंबर २०२२
निवड झालेल्या शिक्षकांची यादी जाहीर करणे११ नोव्हेंबर २०२२
फेलोशिप प्रदान सोहळा आणि नवीन फेलो व जूने फेलो
यांचा एकत्रित परिचय आणि संवाद
११ डिसेंबर २०२२
प्रथम कार्यशाळा२१, २२, २३ एप्रिल २०२३
प्रकल्पांना भेटी१५ ऑगस्ट ते ३० ऑगस्ट २०२३
द्वितीय कार्यशाळा१८,१९,२० नोव्हेंबर २०२३
तृतीय कार्यशाळा व प्रकल्प अहवालाचे सादरीकरण.२६, २७, २८ एप्रिल २०२४

शरद पवार इन्स्पायर फेलोशिप अंतर्गत निवड प्रक्रिया

Sharad Pawar Nnspire Fellowship

तज्ज्ञ समितीकडून अर्जांची छाननी पूर्ण करण्यात येईल व पात्रतेचे निकष अधिक गुणवत्तेने पूर्ण करणाऱ्या मोजक्याच शिक्षकांची तज्ज्ञांतर्फे (आवश्यकतेनुसार शाळाभेटीसह) प्रत्यक्ष/ दूरस्थ मुलाखतींसाठी निवड करण्यात येईल.मुलाखत शक्यतो इच्छुक शिक्षकांनी अर्जासोबत पाठविलेल्या टिपणावर आधारित असेल.मुलाखतीच्या गुणवत्तेच्या मूल्यमापनानुसार फेलोशिपसाठी वरील प्रमाणे ४० शिक्षकांची निवड करण्यात येईल. निवड झालेल्या शिक्षकांशी संपर्क साधून त्यांची फेलोशिप स्वीकारण्याविषयीची लेखी अनुमती घेण्यात येईल. आवश्यकतेनुसार त्यांच्या शाळेच्या मुख्याध्यापकांचीही सहसंमती घेण्यात येईल.

शरद पवार इन्स्पायर फेलोशिप अंतर्गत पूर्वतयारी

Sharad Pawar Nnspire Fellowship In Education

एप्रिल २०२३ ते एप्रिल २०२४ या कालावधीत खालील गोष्टी करण्यात येतील

निवड झालेल्या फेलोज् चे किमान ३ दिवसांचे प्रशिक्षण शिबीर, फेलोने हाती घ्यावायाच्या उपक्रमांचे सादरीकरण व चर्चेअंती निश्चिती,फेलोच्या नियोजित उपक्रमांचे व त्यांच्या मूल्यमापनाचे नियोजन, संसाधनांची जुळवाजुळव, सहभागी होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची निवड, पालकांची अनुमती, मासिक व अंतिम प्रकल्प-अहवालांची रूपरेषा, इ.

महाराष्ट्र सरकारच्या विविध योजनांसाठी येथे क्लिक करा

शरद पवार इन्स्पायर फेलोशिपमधील उपक्रमाचा कालावधी

Sharad Pawar Nnspire Fellowship

एप्रिल २०२३ ते एप्रिल २०२४. त्या कालावधीत फेलोज् नी वर निश्चित केलेले उपक्रम करून त्यांचे मासिक अहवाल सादर करणे अपेक्षित आहे. मे २०२४ मध्ये फेलोज् नी सविस्तर अहवाल लेखन करून संयोजकांकडे पाठविणे अपेक्षित आहे.

फेलोशिप सांगता शिबीर

Sharad Pawar Nnspire Fellowship

शेवटी एप्रिल २०२४ मध्ये ३ दिवसांचे सांगता शिबीर आयोजित करून त्यात सर्व फेलोज् चे त्यांच्या मार्गदर्शकांच्या उपस्थितीत सादरीकरण होईल व त्यावर इतर तज्ज्ञांबरोबर चर्चाही होतील. त्यात फेलोशिपनंतर शैक्षणिक परिवर्तनाच्या प्रयत्नांचे सातत्य राखण्याविषयी सूचन होईल. प्रशस्तीपत्रांचे वितरण व फेलोज् नी केलेल्या उपक्रमांचे फेलोशिप पोर्टलवर प्रकाशन करण्यात येईल. पुढे पोर्टलला योग्य ती प्रसिद्धी देऊन राज्यातील विशेषत: विद्यार्थी, पालक व शिक्षकांपर्यंत ते उपक्रम पोहोचविण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. या पोर्टलवर फेलोज् चे ब्लॉग्ज, इतर शिक्षकांचे प्रतिसाद, सूचना, प्रश्नांना उत्तरे, इ. सेवा सुरू करता येतील. उत्तरोत्तर या पोर्टलवर अशा उपक्रमांची महासूची तयार होईल व शैक्षणिक परिवर्तन करू इच्छिणाऱ्या शेकडो शिक्षकांना ती मार्गदर्शक व स्फूर्तीदायक ठरेल.

शरद पवार इन्स्पायर फेलोशिप ची पात्रता

Sharad Pawar Nnspire Fellowship Eligibility

अर्जदार विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असणे आवश्यक आहे.

शरद पवार इन्स्पायर फेलोशिप च्या अटी

Sharad Pawar Nnspire Fellowship Terms and Conditions

 • केवळ महाराष्ट्र राज्यातील शिक्षकांना शरद पवार इन्स्पायर फेलोशिप चा लाभ दिला जाईल.
 • महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील शिक्षकांना याचा लाभ घेता येणार नाही.
 • अर्जदार शिक्षकाचे वय 45 वर्षाच्या आत असणे आवश्यक आहे.
 • नियमित अध्यापन करत विद्यार्थ्यांच्या सहभागाने चालणारे व शैक्षणिक वर्षभर विकसित होत जातील असे अभ्यासक्रमेतर व वेळापत्रकेतर उपक्रम करत असलेले करू इच्छिणारे शिक्षक अर्ज करण्यासाठी पात्र समजण्यात येतील. तसेच २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात बदली न होणारे शिक्षकानी अर्ज करावा.
 • अर्जदार प्रस्तावित करत असलेला उपक्रम पूर्वीपासून राबवत असाल तर त्याचा तपशील (छायाचित्र, चित्रफित, परखड मूल्यमापन इ. अर्जासोबत जोडावे.
 • विषयनिहाय अभ्यासक्रमातील नेहमीच्या वेळापत्रकात समाविष्ट असलेले अध्ययन, अध्यापन, मूल्यमापनविषयक उपक्रम या फेलोशिपमध्ये अपेक्षित नाहीत, कृपया याची नोंद घ्यावी.

शरद पवार इन्स्पायर फेलोशिप अंतर्गत अर्ज करण्याची पद्धत

Sharad Pawar Nnspire Fellowship Online Registration

पहिले चरण

 • अर्जदाराला सर्वात प्रथम शरद पवार इन्स्पायर फेलोशिप च्या अधिकृत वेबसाईट वर जावे लागेल.
 • होम पेज वर Apply वर क्लिक करावे लागेल.
Sharad Pawar Nnspire Fellowship Home Page
 • आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला Education Fellowship वर क्लिक करायचे आहे.
Sharad Pawar Nnspire Fellowship Apply Now
 • आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला Register वर क्लिक करावे लागेल.
Sharad Pawar Nnspire Fellowship Register
 • आता तुमच्यासमोर एक Registration Form उघडेल त्यामध्ये विचारलेली सर्व माहिती भरायची आहे आणि नोंदणी करा वर क्लिक करायचे आहे.
Sharad Pawar Nnspire Fellowship Registration
 • अशा प्रकारे तुमचे रेजिस्ट्रेशन पूर्ण होईल.

दुसरे चरण

 • आता तुम्हाला तुमचा User ID आणि Password च्या सहाय्याने Login करायचे आहे.
 • आता तुमच्यासमोर शरद पवार इन्स्पायर फेलोशिप चा अर्ज उघडेल त्यामध्ये विचारलेली सर्व माहिती भरायची आहे व Submit बटनावर क्लिक करायचे आहे.
 • अशा प्रकारे तुमची अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.

महाराष्ट्र सरकारच्या विविध योजनांसाठी येथे क्लिक करा

Telegram GroupJoin
अधिकृत वेबसाईटClick Here
संपर्कक्षेत्र समन्वयक,
शिक्षण विकास मंच,
यशवंतराव चव्हाण सेंटर,
जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१
ई-मेल आयडीyashdeepkudale[at]gmail[dot]com
फोन नं91 93707 99791
022-22045460 / 022-22852345

सारांश

आशा करतो कि आपल्याला शरद पवार इन्स्पायर फेलोशिप ची संपूर्ण माहिती प्राप्त झाली आहे तरी देखील आपले शरद पवार इन्स्पायर फेलोशिप अंतर्गत काही प्रश्न असल्यास मला ई-मेल किंवा कंमेंट्स च्या माध्यमातून जरूर कळवा आम्ही तुमच्या प्रश्नांची लवकरात लवकर उत्तरे देण्याचा प्रयत्न करू आणि जर तुम्हाला या योजनेची माहिती उपयुक्त वाटली असेल तर तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा जेणेकरून तुमचे मित्र देखील या योजनेचा लाभ घेऊ शकतील.

Join Our WhatsApp Group!