Free Cycle Scheme In Maharashtra

राज्यातील ग्रामीण भागातील महाविद्यालयीन शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना सायकल खरेदीसाठी अनुदान उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सुरु करण्यात आलेली महत्वपूर्ण अशी एक योजना आहे.

राज्यातील खेडेगावात आज सुद्धा पक्के रस्ते नाही तसेच येण्याजाण्यासाठी पुरेशी वाहतुकीची साधने देखील उपलब्ध नाहीत त्यामुळे अशा खेडेगावातील विद्यार्थ्यांना त्यांच्या घरापासून विद्यालयात जाण्यासाठी मैलो दूर उन्हातून पायी चालत जावे लागते त्यामुळे त्यांचा बहुतांश वेळ विद्यालयात येण्या-जाण्यासाठी खर्च होतो तसेच राज्यातील बहुतांश कुटुंबे हि गरिबी रेषेखाली स्वतःचे जीवन जगत असतात त्यामुळे ते आपल्या मुलांच्या गरज पूर्ण करण्यासाठी असमर्थ असतात त्यामुळे त्यांना आपल्या मुलांसाठी सायकल घेणे शक्य नसते त्यामुळे राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांच्या या सर्व समस्यांचा विचार करून राज्य शासनाने विद्यालयीन मुलांना सायकल देण्यासाठी राजमाता जिजाऊ मोफत सायकल वाटप योजना ची सुरुवात केली.

या योजनेअंतर्गत ज्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे घरापासून महाविद्यालयीन अंतर 2 कि.मी. असेल अशा विद्यार्थ्यांना मोफत सायकली दिल्या जातात. [Free Cycle Scheme In Maharashtra]

Free Cycle Scheme In Maharashtra

वाचकांना विनंती

आम्ही मोफत सायकल वाटप योजना ची संपूर्ण माहिती या लेखात दिली आहे त्यामुळे तुम्ही हा लेख शेवट पर्यंत वाचा व या योजनेचा लाभ मिळवा जर तुमच्या परिसरात असे कोणी विद्यार्थी असतील ज्यांचे विद्यालय घरापासून दूर आहे तर त्यांना या योजनेची माहिती अवश्य द्या किंवा आमचे हे आर्टिकल त्यांना शेयर करा जेणेकरून ते या योजनेचा लाभ घेऊ शकतील.

योजनेचे नाव मोफत सायकल वाटप योजना
राज्यमहाराष्ट्र
विभागपुणे समाज विकास विभाग
लाभार्थीराज्यातील विद्यार्थी
योजनेचा लाभ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मोफत सायकल वाटप
अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन/ऑफलाईन

मोफत सायकल वाटप योजना सुरु करण्यामागचा मुख्य उद्देश

 • मोफत सायकल वाटप योजना च्या माध्यमातून महाविद्यालयीन विध्यार्थ्यांना महाविद्यालयात जाण्यासाठी होणाऱ्या गैरसोयीचे समाधान करणे.
 • महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सायकल घेण्यासाठी अर्थसहाय्य करणे.
 • विद्यार्थ्यांना आपले शिक्षण पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहित करणे.
 • राज्यातील विद्यार्थ्यांचे जीवनमान सुधारणे.
 • योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सामाजिक व आर्थिक विकास करणे.
 • या योजनेचा मुख्य उद्देश राज्यातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहित करणे आहे.
 • राज्यातील विद्यार्थ्यांना सशक्त तसेच आत्मनिर्भर बनविणे.
 • विद्यार्थ्यांना सायकल विकत घेण्यासाठी पैशांसाठी कोणावर अवलंबून राहण्याची गरज भासू नये तसेच कोणाकडून पैसे उधार घेण्याची गरज भासू नये या उद्देशाने या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे. [Free Cycle Scheme In Maharashtra]
Free Cycle Scheme In Maharashtra

मोफत सायकल वाटप योजना चे वैशिष्ट्य

 • महाराष्ट्र शासनाकडून विद्यार्थ्यांसाठी सुरु करण्यात आलेली हि एक महत्वाची योजना आहे.
 • या योजनेमुळे विद्यार्थ्यांचा विद्यालयात येण्या जाण्याचा वेळ वाचेल जो वेळ ते अभ्यासात वापरू शकतील.
 • या योजनेच्या लाभाची रक्कम लाभार्थी विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात DBT च्या माध्यमातून जमा करण्यात येते.
 • या योजनेअंतर्गत अर्ज करण्याची प्रक्रिया सोपी ठेवण्यात आली आली त्यामुळे अर्जदार विद्यार्थी आपल्या मोबाईल च्या सहाय्याने या योजनेसाठी अर्ज करू शकतात त्यामुळे त्यांना कोणत्याच सरकारी कार्यालयाच्या फेऱ्या मारण्याची गरज भासणार नाही यामुळे विद्यार्थ्यांचा वेळ आणि पैसा यांची बचत होईल. [Free Cycle Scheme In Maharashtra]
 • विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण पूर्ण करता यावे यासाठी सरकार देत आहे 10 लाखांचे कर्ज त्यासाठी वाचा शैक्षणिक कर्ज योजना

Free Cycle Scheme In Maharashtra चे लाभार्थी

 • राज्यातील ज्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे घरापासून महाविद्यालयीन अंतर 2 कि.मी. असेल असे विद्यार्थी या योजनेचे लाभार्थी आहेत.

मोफत सायकल वाटप योजना अंतर्गत विद्यार्थ्यांना होणारा फायदा

 • या योजनेअंतर्गत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मोफत सायकलींचे वाटप करण्यात येते.
 • या योजनेच्या सहाय्याने विद्यार्थ्यांना आपल्या विद्यालयात जाण्यासाठी मैलो अंतर पायी चालत जाण्याची आवश्यकता भासणार नाही.त्यामुळे त्यांचा पैसे आणि वेळ यांची बचत होईल.
 • विद्यार्थ्यांना तासंतास बस ची वाट बघण्याची आवश्यकता भासणार नाही.
 • या योजनेअंतर्गत विद्याथी आत्मनिर्भर बनतील
 • या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होईल.
 • या योजनेच्या सहाय्याने विद्यार्थी आपल्या अडचणी दूर करून आपली शिक्षा पूर्ण करू शकतील.
 • विद्यार्थ्यांच्या कुटुंबाला सायकल घेण्यासाठी कोणाकडून कर्ज घेण्याची आवश्यकता भासणार नाही.
 • विद्यार्थ्यांना आपले शिक्षण सोडण्याची आवश्यकता भासणार नाही
 • या योजनेअंतर्गत विद्यार्थी आपले शिक्षण पूर्ण करून स्वतःसाठी चांगली नौकरी मिळवू शकतील तसेच स्वतःचा स्वरोजगार स्थापित करून राज्यातील इतर बेरोजगारांसाठी रोजगार निर्माण करू शकतील. [Free Cycle Scheme In Maharashtra]

मोफत सायकल वाटप योजना महाराष्ट्र अंतर्गत आवश्यक पात्रता

 • अर्जदार विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवाशी असणे आवश्यक आहे.

मोफत सायकल वाटप योजना चे नियम व अटी

 • अर्जदार विद्यार्थ्यांचे कुटुंब पुणे महानगरपालिका हद्दीत किमान 3 वर्षे वास्तव्यास असणे आवश्यक आहे.
 • मागील उत्तीर्ण परीक्षेमध्ये 50% पेक्षा जास्त गुण असावेत.
 • विद्यार्थ्याच्या राहत्या घरापासून महाविद्यालयाचे किमान अंतर 2 किलोमीटर पेक्षा जास्त असणे आवश्यक.
 • दिनांक 01 मे 2001 नंतर जन्माला आलेल्या व ह्यात अपत्यामुळे कुटुंबाच्या अपत्यांची संख्या 2 पेक्षा जास्त झाल्यास लाभ घेता मिळणार नाही.
 • कुटुंबाचे सर्व मार्गांनी मिळणारे वार्षिक उत्पन्न 1 लाखापेक्षा कमी असावे.
 • स्कॅन डॉक्युमेंट्स संलग्न कारने आवश्यक आहे.
 • अटी व नियम यांत बदल करण्याचा/अर्ज नाकारण्याचा अधिकार मा. उप आयुक्त, स.वि.वि. पुणे महानगरपालिका यांचेकडे राहील. तसेच त्यांचा या विषयाबाबत निर्णय अंतिम राहील. [Free Cycle Scheme In Maharashtra]

मोफत सायकल वाटप योजना अंतर्गत आवश्यक कागदपत्रे

 • कुटुंबाचे पुणे महानगरपालिका हद्दीत किमान 3 वर्षे वास्तव्य असल्याचा पुरावा म्हणून मागील 3 वर्षाचा मनपा टॅक्स पावती किंवा लाईट बिल किंवा टेलिफोन बिल (दूरध्वनी) किंवा झोपडी फोटो पास / झोपडी सेवा शुल्क पावती / भाडे करारनामा यांपैकी एक जोडणे आवश्यक.
 • रेशनिंग कार्डची साक्षांकित प्रत
 • अर्जदाराचे पासपोर्ट आकाराचे फोटो
 • अपत्य पडताळणीसाठी जोडणे आवश्यक.
 • वयाच्या पुराव्यासाठी जन्मदाखला / शाळेचा दाखला किंवा बोनाफाईड प्रमाणपत्र आवश्यक.
 • मागासवर्गीय असल्यास जातीचा दाखला जोडणे आवश्यक आहे.
 • मागील वर्षाची गुणप्रमाणपत्र जोडणे आवश्यक.
 • झोपडपट्टीतील अर्जदारांनी शेजार समूह गटाचा उत्पन्नाचा दाखला जोडावा. व झोपडपट्टी व्यतिरिक्त राहत असलेल्या अर्जदारांनी मा. तहसीलदार, जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याकडील उत्पन्नाचा दाखला जोडणे आवश्यक.
 • अर्जदाराचे आधार कार्ड
 • अर्जदाराचे राष्ट्रयीकृत बँकेत बचत खाते असणे आवशयक

मोफत सायकल वाटप योजना अंतर्गत अर्ज रद्द होण्याची कारणे

 • अर्जदार विद्यार्थी नसल्यास अर्ज रद्द केला जाईल.
 • अर्जदार विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवाशी नसल्यास
 • विद्यार्थ्याने या पूर्वी एखाद्या योजनेअंतर्गत सायकलीचा लाभ मिळवला असल्यास
 • अर्जदार विद्यार्थ्यांचे महाविद्यालय आणि घर यांमधील अंतर्गत 2 किलोमीटर पेक्षा जास्त नसल्यास
 • विद्यार्थी आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील नसल्यास
 • विद्यार्थ्याने अर्जात खोटी तसेच चुकीची माहिती भरल्यास अर्ज रद्द केला जाईल. [Free Cycle Scheme In Maharashtra]
 • सरकार ने मुलींच्या उज्वल भविष्यासाठी सुरु केली आहे एक महत्वपूर्ण अशी योजना त्यासाठी वाचा सुकन्या समृद्धी योजना

मोफत सायकल वाटप योजना अंतर्गत ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत

 • अजदाराला सर्वात प्रथम शासनाच्या अधिकृत वेबसाईट वर जावे लागेल
 • होम पेज वर नवीन नोंदणी पर्यायावर क्लिक करावे लागेल.
Free Cycle Scheme In Maharashtra

 • आता तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल त्यात विचारलेली सर्व माहिती भरून जतन करा बटनावर क्लिक करून स्वतःचे रेजिस्ट्रेशन पूर्ण करायचे आहे.
Free Cycle Scheme In Maharashtra

 • आता तुम्हाला योजना पर्यायावर क्लिक करून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी मोफत सायकल योजना वर क्लिक करा.
 • आता तुमच्यासमोर या योजनेचं अर्ज उघडेल त्यात विचारलेली सर्व माहिती भरून योग्य ती कागदपत्रे जोडून submit बटनावर क्लिक करायचे आहे.
 • अशा प्रकारे तुमची या योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल. [Free Cycle Scheme In Maharashtra]

राजमाता जिजाऊ सायकल वाटप योजना अंतर्गत ऑफलाईन अर्ज करण्याची पद्धत

खालीलपैकी कोणत्याही ठिकाणी संपर्क साधून या योजनेचा अर्ज घ्या व अर्जात विचारलेली सर्व माहिती योग्य प्रकारे भरून आवश्यक अशा कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रति जोडून सदर अर्ज जमा करावा.

Telegram GoupJoin
शासनाची अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
पत्तापुणे महानगरपालिका मुख्य इमारत,
मंगला थिएटरजवळ,
शिवाजी नगर, पुणे- 411 005
दूरध्वनी020-25501000
020-255011130
1800-1030-222
ई-मेल आयडीinfo[At]punecorporation[Dot]org

सारांश

आम्ही आशा करतो कि मोफत सायकल वाटप योजना अंतर्गत आपल्याला सर्व माहिती प्राप्त झाली आहे तरीदेखील आपले या योजनेसंबंधी काही प्रश्न असल्यास मला ई-मेल किंवा कंमेंट्स च्या माध्यमातून जरूर कळवा आम्ही तुमच्या प्रश्नांची लवकरात लवकर उत्तरे देण्याचा प्रयत्न करू आणि जर तुम्हाला या योजनेची माहिती उपयुक्त वाटली असेल तर तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा जेणेकरून तुमचे मित्र देखील या योजनेचा लाभ घेऊ शकतील.