शिवभोजन योजना माहिती 2024

शिवभोजन योजना माहिती: शिवभोजन थाळी योजना राज्यातील गरीब व गरजू व्यक्तींना स्वस्त दरात एक वेळचे भोजन उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सुरु करण्यात आलेली महत्वाची अशी एक योजना आहे. सुरवातीला हि योजना प्रत्येक जिल्ह्याच्या मुख्यालयी सुरु करण्यात आली त्यानंतर योजनेला मिळणारा चांगला प्रतिसाद पाहून हि योजना संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्यात आली.

शिवभोजन योजना राज्यात स्वस्त दरात शासकीय अनुदान प्राप्त भोजनालयातून भोजन उपलब्ध करून देण्याची योजना म्हणून ओळखण्यात येते.

राज्यातील बहुतांश नागरिक हे आर्थिक दृष्ट्या गरीब आहेत त्यांना योग्य प्रकारचा रोजगार उपलब्ध नाही तसेच त्यांना कमी दरात काम करावे लागते तसेच वाढत्या महागाईमुळे त्यांना दोन वेळचे जीवन मिळवणे कठीण होते तसेच मजूर, रस्त्यावरील बेघर नागरिक, बाहेरगावातील विद्यार्थी यांना जेवण मिळवण्यासाठी खूप हाल अपेष्टा सहन कराव्या लागतात त्यामुळे अशा व्यक्तींचा विचार करून राज्य शासनाने राज्यात शिव भोजन थाळी योजना सुरु करण्याचा निर्णय घेतला.

राज्यात भोजनालय चालविण्यासाठी सद्य:स्थितीत सुरू असलेल्या खानावळ, NGO, महिला बचतगट, भोजनालय, रेस्टॉरंट अथवा मेस यापैकी सदर योजना राबविण्यास सक्षम असलेल्या भोजनालयाची त्या-त्या स्तरावर निवड करण्यात येते. तसेच ज्या-ज्या ठिकाणी गरीब किंवा मजूर लोकांची वर्दळ जास्त आहे अशा ठिकाणी (उदा. जिल्हा रुग्णालये, बस स्थानके, रेल्वे स्थानक परिसर, बाजारपेठा, शासकीय कार्यालये इत्यादी) सदर थाळीची विक्री केली जाते. [शिवभोजन योजना माहिती]

Shiv Bhojan Thali List

शिव भोजन थाळीमध्ये समाविष्ट गोष्टी खालीलप्रमाणे आहेत

चपात्या2
भात1 मूद
भाजी1 वाटी
वरण1 वाटी

Shiv Bhojan Thali Price

 • शिवभोजन थाळी योजना अंतर्गत दिल्या जाणाऱ्या जेवणाच्या थाळीची किंमत १०/- रुपये प्रति थाळी आकारण्यात येते.

Shiv Bhojan Thali TimeTtable

 • शिव भोजनालय दुपारी 12 ते 2 या कालावधीत कार्यरत राहील.
योजनेचे नावशिवभोजन योजना
राज्यमहाराष्ट्र
विभागअन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग,
महाराष्ट्र शासन
कोणी सुरु केलीमहाराष्ट्र शासन
योजनेची सुरुवात26 जानेवारी 2020
लाभार्थीराज्यातील गरीब नागरिक
उद्देश्यगरिबांना कमी दरात भोजन उपलब्ध करून देणे

वाचकांना विनंती

आम्ही शिव भोजन योजना माहिती या लेखात दिली आहे त्यामुळे तुमची हा लेख शेवट पर्यंत वाचा व या योजनेचा लाभ मिळवा जर तुमच्या परिसरात जे कोणी आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबे असतील तर त्यांना या योजनेची माहिती अवश्य द्या किंवा आमचे हे आर्टिकल त्यांना शेयर करा जेणेकरून ते या योजनेचा लाभ घेऊ शकतील. [शिवभोजन योजना माहिती]

शिवभोजन थाळी योजना चा उद्देश

 • राज्यातील गरीब नागरिक, मजूर, बेघर, गरीब विद्यार्थी, कष्टकरी प्रत्येकाला कमी दरात भोजन उपलब्ध व्हावे.
 • महिला बचत गटांना रोजगार उपलब्ध व्हावा.
 • महिला बचत गटांना रोजगार उपलब्ध व्हावा.
shiv bhojan yojana

शिवभोजन योजना ची कार्यपद्धती

सदर थाळीची किंमत शहरी भागामध्ये प्रतिथाळी 50/- रुपये व ग्रामीण भागामध्ये 35/- रुपये इतकी आहे. समितीने पात्र ठरविलेल्या खानावळ, NGO, महिला बचतगट, भोजनालय, रेस्टॉरंट अथवा मेस यांना प्रति ग्राहकांकडून प्राप्त झालेल्या 10/- रुपये एवढ्या रकमेव्यतिरिक्त उर्वरित रक्कम अनुदान म्हणून या विभागाकडून थेट जिल्हाधिकाऱ्यांना तसेच मुंबई-ठाणे शिधावाटप क्षेत्रासंबंधित अनुदान नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा यांना देण्यात येते व त्यांच्यामार्फत संबंधितांना वितरित करण्यात येते. [शिवभोजन योजना माहिती]

 • स्वतःचे घर बांधण्यासाठी राज्य सरकार देत आहे 2 लाखांचे आर्थिक सहाय्य त्यासाठी वाचा शबरी घरकुल योजना
 • स्वतःचा व्यवसाय सुरु करू इच्छिणाऱ्या नागरिकांना सरकार देत आहे 1 लाख रुपयांचे कर्ज त्यासाठी वाचा वसंतराव नाईक कर्ज योजना

शिवभोजन थाळी योजना राबविण्यासाठी पुढील अटी व शर्ती राहतील

 • सुरुवातीला प्रायोगिक तत्वावर राज्यात प्रत्येक जिल्ह्याच्या मुख्यालयी व महानगरपालिका क्षेत्रात किमान १ भोजनालय सुरु करण्यात येईल.
 • सुरवातीला कमी थाळी (१० थाळी) सुरु करण्यात येतील त्यानंतर नागरिकाचा प्रतिसाद पाहून थाळ्यांची संख्या वाढविण्यात येईल.
 • सदर भोजनालय वर्दळीच्या ठिकाणी असेल. ही भोजनालये दुपारी 12 ते 2 या कालावधीत कार्यरत राहतील.
 • सदर भोजनालयात दुपारी 12 ते 2 या कालावधीत या योजनेच्या लाभार्थ्यांसाठी राखीव जागा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी संबंधित भोजनालय चालकाची असेल. यासाठी भोजनालय चालविण्यासाठी सदर मालकाकडे स्वत:ची पर्याप्त जागा असावी.
 • भोजनालयात एका वेळी किमान २५ व्यक्तींची जेवणासाठी बसण्याची व्यवस्था असेल. एका भोजनालयात किमान ७५ आणि कमाल १५० थाळी भोजन उपलब्ध होईल.
 • सदर भोजनालयात बाहेरचे जेवण घेऊन येण्यास व भोजनालयातील जेवण बाहेर घेऊन जाण्यास मनाई असेल.
 • शासकीय कर्मचाऱ्यांना तसेच ज्या ठिकाणी ही योजना राबविण्यात येईल तेथील आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांना सदर भोजनालयात सवलतीच्या दराने जेवणास सक्त मनाई असेल.
 • कोणत्याही परिस्थितीत शिळे अथवा खराब झालेले अन्न ग्राहकांना पुरविण्यात येणार नाही याची दक्षता घेण्याची जबाबदारी संबंधित संस्थेची राहील. कोणत्याही ग्राहकास सदर अन्नाचे सेवन केल्यामुळे विषबाधा होणार नाही याची दक्षता भोजनालय चालकाने घ्यावी.
 • प्रत्येक भोजनालयातील अन्नाचा दर्जा योग्य असल्याबाबत अन्न व औषध प्रशासनाकडून वेळोवेळी तपासणी करुन घेऊन त्या प्रशासनाने दिलेले प्रमाणपत्र दर्शनी भागावर लावण्याची जबाबदारी भोजनालय चालकाची राहील. [शिवभोजन योजना माहिती]

शिवभोजन  केंद्रावर पुढील बाबींची दक्षता घेण्यात यावी

 • शिवभोजन थाळीचे खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी शक्यतोवर स्वतंत्र किचनची व्यवस्था करावी. किचनमध्ये अन्न पदार्थ तयार करताना स्वच्छतेचे सर्व निकष पाळले जावेत.
 • अन्न पदार्थ तयार करण्यासाठी वापरात आणावयाची भांडी आवश्यकतेनुसार स्टेनलेस स्टीलची असावीत.
 • अन्न पदार्थ तयार करणारे कर्मचारी, त्यांच्या हाताची स्वच्छता, कपडयाची स्वच्छता याबाबत दक्षता घेतील.
 • तयार केलेले अन्न पदार्थ स्वच्छ केलेल्या स्टेनलेस स्टीलच्या भांड्यात साठविले जावीत.
 • शिळे अन्न पदार्थ वापरले जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी. तयार केलेले खाद्यपदार्थ दुषित होणार नाहीत अशा प्रकारे झाकुन ठेवण्याची व्यवस्था करण्यात यावी. आवश्यकतेनुसार फ्रिजचा वापर करावा.
 • पिण्यासाठी तसेच अन्न पदार्थ तयार करण्यासाठी फिल्टर्ड/ पिण्यायोग्य (Potable Water) पाण्याचा वापर करावा.
 • हात धुण्यासाठी वॉश बेसिनची व्यवस्था करावी तेथे साबण व निर्जंतुक करण्याची द्रावण ठेवावे.
 • महत्वाच्या कार्यपद्धतीसाठी उदा:- भोजन बनविण्याच्या क्रिया, , खाद्यपदार्थाची साठवणून, अन्न पदार्थाचे वितरण कार्यप्रणालीसाठी Standard Operation Procedure (SOP) वापरण्यात यावी.
 • शिवभोजन घेणाऱ्यांसाठी स्वच्छ टेबल/खुर्चाची व्यवस्था असावी.
 • या केंद्रातून स्वच्छ, पोषक व पदार्थाची गुणवत्ता राखून ताजे भोजन दिले जाईल.
 • एकाच लाभार्थ्यांकडून एकापेक्षा जास्त वेळा थाळी घेतली जावू नये, याची दक्षता घेतली जावी.
 • एका शिवभोजन केंद्रावर जास्त गर्दी होण्याची शक्यता असून गोंधळ निर्माण होण्याची शक्यता आहे यास्तव प्रत्येक भोजनालयाच्या ठिकाणी आवश्यकतेनुसार स्थानिक पोलिसांमार्फत योग्य ती काळजी घेण्यात यावी. [शिवभोजन योजना माहिती]

अनियमितता आढळून येणाऱ्या शिवभोजन केंद्रावर अनियमिततेचे स्वरुप विचारात घेऊन जिल्हाधिकारी / नियंत्रक शिधावाटप संचालक, नागरी पुरवठा यांचे स्तरावर खालीलप्रमाणे कारवाई करण्यात येईल.

अ) सौम्य स्वरुपाची अनियमितता उदा. शिवभोजन केंद्र वेळेत सुरु न करणे, शिवभोजन केंद्राचा फलक न लावणे, अभिप्राय नोंदवही न ठेवणे, शिवभोजन केंद्रामध्ये पुरेशी स्वच्छता नसणे अशा स्वरुपाच्या अनियमितता आढळून आल्यास संबंधित केंद्रास कारणे दाखवा नोटिस देण्यात यावी. अशा बाबी दुबार आढळल्यास गंभीर स्वरुपाची अनियमितता गृहित धरुन दंड आकारण्यात यावा. त्यानंतरही सुधारणा न झाल्यास सदर शिवभोजन केंद्र बंद करण्यात येईल.

आ) गंभीर स्वरूपाची अनियमितता उदा. पूर्व कल्पना न देता शिवभोजन केंद्र बंद ठेवणे, शिवभोजन निकषाप्रमाणे भोजन न देणे, CCTV कार्यान्वित नसणे, CCTV चा डेटा उपलब्ध करून न देणेअशा स्वरुपाच्या अनियमितता आढळल्यास किमान एक दिवसाची प्रतिदिन थाळीसंख्येची पूर्ण रक्कम किंवा रु.५०००/- यापैकी जी रक्कम जास्त असेल ती दंड म्हणून आकारण्यात यावी. यानंतरही पुढील तपासणीमध्ये अशा प्रकारची गंभीर स्वरुपाची अनियमितता आढळल्यास सदर शिवभोजन केंद्र बंद करण्यात येईल.

इ) अतिगंभीर स्वरुपाची अनियमितता उदा. शिळे/निकृष्ट दर्जाचे भोजन देणे, दुबार फोटो अपलोड करणे, शिवभोजन केंद्र अन्य व्यक्तीमार्फत चालविणे अशा स्वरुपाच्या अनियमितता आढळून आल्यास शिवभोजन केंद्र तात्काळ निलंबित करून सदर केंद्राची मंजूरी रद्द करण्याची कारवाई करण्यात येईल.

ई) वर नमूद केलेल्या अनियमिततेव्यतिरिक्त अन्य काही अनियमितता आढळून आल्यास अनियमिततेचे स्वरुप व त्याप्रकरणी करावयाची कारवाई याबाबत संबंधित जिल्हाधिकारी / नियंत्रक शिधावाटप यांच्या स्तरावर निर्णय घेण्यात येईल. [शिवभोजन योजना माहिती]

 • स्वतःचे घर बांधण्यासाठी सरकार देत आहे 2.5 लाखाचे आर्थिक अनुदान त्यासाठी वाचा रमाई घरकुल योजना
Telegram GroupJoin
शिव भोजन योजना शासन निर्णय pdfClick Here
Shiv Bhojan Yojana Gr pdfClick Here

सारांश

आम्ही आशा करतो कि तुम्हाला शिवभोजन योजना ची सर्व माहिती आपल्याला प्राप्त झाली आहे तरीदेखील आपले योजनेसंबंधी काही प्रश्न असल्यास मला ई-मेल किंवा कंमेंट्स च्या माध्यमातून जरूर कळवा आम्ही तुमच्या प्रश्नांची लवकरात लवकर उत्तरे देण्याचा प्रयत्न करू आणि जर तुम्हाला या योजनेची माहिती उपयुक्त वाटली असेल तर तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा जेणेकरून तुमचे मित्र देखील या योजनेचा लाभ घेऊ शकतील. [शिवभोजन योजना माहिती]