Mulching Paper Subsidy In Maharashtra

महाराष्ट्र शासन राज्यातील शेतकऱ्यांच्या विकासासाठी विविध सरकारी योजनांची सुरुवात करत असते.महाराष्ट्र शासन राज्यातील शेतकऱ्यांसाठी अशीच एक योजना घेऊन आली आहे ज्या योजनेचे नाव मल्चिंग पेपर योजना आहे. या योजनेअंतर्गत सरकार शेतकऱ्यांना मल्चिंग पेपर खरेदीसाठी 50 टक्के अनुदान देते.

अलीकडच्या काळात शेतात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढत चालला आहे परंतु राज्यात पुष्कळ शेतकरी दारिद्र रेषेखाली आपले जीवन जगत आहेत. आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्यामुळे शेतकरी अजून सुद्धा पारंपरिक पद्धतीने शेती करतात या सर्व गोष्टींचा विचार करून सरकार शेतकऱ्यांसाठी वेळोवेळी आर्थिक सहाय्य करत असते तसेच शेती उपयुक्त विविध यंत्रांच्या खरेदीसाठी अनुदान देत असते.

गेल्या अनेक वर्षांपासून शेतकरी शेतातील जमिनीचा ओलावा टिकवून ठेवण्यासाठी विविध उपाय योजनांचा वापर करत असतो तसेच शेतकऱ्यांना कीटकांचा प्रादुर्भाव तसेच नैसर्गिक आपत्ती सारख्या समस्यांना कायम तोंड द्यावे लागते.या सर्व गोष्टींपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी मल्चिंग पेपर चा वापर एक उपयुक्त पर्याय समजला जातो परंतु बाजारातून मल्चिंग पेपर विकत घेण्यासाठी बरेच पैसे मोजावे लागतात. आर्थिक अडचणीमुळे सर्वच शेतकरी त्यांच्या शेतामध्ये मल्चिंग पेपर वापरू शकत नाहीत. यासाठी सरकार ने मल्चिंग पेपर योजनेची सुरुवात केली आहे. मल्चिंग पेपर चे फायदे लक्षात घेता अलीकडच्या काळात याचे फायदे वाढले आहेत.

मल्चिंग पेपर योजनेचा मुख्य उद्देश राज्यातील शेतकऱ्यांना मल्चिंग पेपर खरेदीसाठी 50 टक्के अनुदान देऊन शेतीसाठी प्रोत्साहन देणे तसेच त्यांच्या पिकांचे होणारे नुकसान टाळून त्यांच्या आर्थिक उत्पन्नात भर देणे. [Mulching Paper Subsidy]

वाचकांना विनंती

आम्ही मल्चिंग पेपर योजनेची संपूर्ण माहिती या लेखात दिली आहे त्यामुळे तुमची हा लेख शेवट पर्यंत वाचा व या योजनेचा लाभ मिळवा जर तुमच्या परिसरात जे कोणी शेतकरी असतील जे मल्चिंग पेपर योजनेचा लाभ घेऊ इच्छित असतील तर त्यांना या योजनेची माहिती अवश्य द्या किंवा आमचे हे आर्टिकल त्यांना शेयर करा जेणेकरून ते या योजनेचा लाभ घेऊ शकतील.

योजनेचे नावमलचींग पेपर योजना
लाभार्थीराज्यातील शेतकरी
लाभ50 टक्के अनुदान देण्यात येते
मलचींग पेपर योजना हेल्पलाईन नंबर022-49150800
अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन / ऑफलाईन

Table Of Content

Mulching Paper Subsidy In Maharashtra चे उद्दिष्ट

  • गेल्या अनेक वर्षांपासून शेतकरी शेतातील जमिनीचा ओलावा टिकवून ठेवण्यासाठी विविध उपाय योजनांचा वापर करत असतो तसेच शेतकऱ्यांना कीटकांचा प्रादुर्भाव तसेच नैसर्गिक आपत्ती सारख्या समस्यांना कायम तोंड द्यावे लागते.या सर्व गोष्टींपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी मल्चिंग पेपर चा वापर एक उपयुक्त पर्याय समजला जातो त्यासाठी शेतकऱ्यांना अनुदान देण्याच्या उद्देशाने मल्चिंग पेपर योजनेची सुरुवात करण्यात आली.
  • मल्चिंग पेपर योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्याचे जीवनमान सुधारणे.
  • राज्यातील शेतकऱ्यांचा सामाजिक तसेच आर्थिक विकास करणे.
  • शेतकऱ्यांना सशक्त व आत्मनिर्भर बनविणे.
  • शेतकऱ्यांना शेतीसाठी प्रोत्साहित करणे.
  • शेतकऱ्यांना मल्चिंग पेपर साठी कोणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता पडू नये तसेच कोणाकडून कर्ज घेण्याची आवश्यकता भासू नये यासाठी मल्चिंग पेपर योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
  • शेतकऱ्याच्या पिकांचे रक्षण करून त्यांचा आर्थिक नफा करणे. [Mulching Paper Subsidy]
Mulching Paper Subsidy In Maharashtra

मल्चिंग पेपर योजना महाराष्ट्र चे वैशिष्ट्य

  • मल्चिंग पेपर योजना महाराष्ट्र शासनाकडून सुरु करण्यात आलेली शेतकऱ्यांसाठी एक महत्वपूर्ण योजना आहे. विशेष करून भाजीपाला लागवडीसाठी मल्चिंग पेपर चा वापर वाढत चालला आहे.
  • मल्चिंग पेपर योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया ऑनलाईन करण्यात आली आहे त्यामुळे शेतकरी घरी बसून ऑनलाईन अर्ज शकतील व त्यांना कुठल्याच सरकारी कार्यालयाच्या फेऱ्या मारण्याची आवश्यकता भासणार नाही त्यामुळे शेतकऱ्याचा वेळ आणि पैसे दोघांची बचत होईल.
  • मल्चिंग पेपर योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया ऑनलाईन करण्यात आली आहे त्यामुळे शेतकरी अर्ज केल्यापासून लाभ मिळेपर्यंत अर्जाची स्थिती पाहू शकतो.
  • या योजनेच्या सहाय्याने शेतकऱ्याचे जीवनमान सुधारण्यास तसेच त्यांचा सामाजिक व आर्थिक विकास होण्यास व राज्यातील शेतकरी सशक्त व आत्मनिर्भर बनण्यास मदत होईल.
  • मल्चिंग पेपर योजनेअंतर्गत अनुदानाची रक्कम लाभार्थी शेतकऱ्याच्या बँक खात्यात DBT च्या सहाय्याने जमा करण्यात येईल जेणेकरून या योजनेत पारदर्शकता बनून राहील.
  • राज्यातील शेतकरी शेती करण्यास प्रोत्साहित होतील. [Mulching Paper Subsidy]
  • राज्य सरकार शेतकऱ्यांना विहीर खोदण्यासाठी देत आहे 4 लाखांचे अनुदान त्यासाठी वाचा विहीर अनुदान योजना

मल्चिंग पेपर योजना अंतर्गत शेतकऱ्यांना मिळणारे अनुदान

  • सर्वसाधारण प्रती हेक्टर जागेसाठी मल्चिंग पेपर वापरासाठी 32000/- रुपये खर्च येतो व या योजनेअंतर्गत शासनाकडून 50 टक्के अनुदान देण्यात येते. या योजनेअंतर्गत जास्तीत जास्त 2 हेक्टर जागे,त मल्चिंग पेपर वापरासाठी अनुदान देण्यात येते.
  • डोंगराळ भागासाठी मल्चिंग पेपर वापरासाठी 36,800/- रुपये खर्च समजून 50 टक्के अनुदान देण्यात येते.

मल्चिंग पेपर अनुदान योजना अंतर्गत श्रेणीनुसार आरक्षण

  • अनुसूचित जातींना 16 टक्के आरक्षण
  • अनुसूचित जमातींना 8 टक्के आरक्षण
  • आदिवासी महिलांना 30 टक्के आरक्षण

पिकांप्रमाणे प्लास्टिक मल्चिंग पेपर चा वापर

बाजारात सध्या मल्चिंग पेपर वेगवेगळ्या रंगात आणि जाडीत उपलब्ध आहेत.ज्यांचा वापर वेगवेगळ्या पिकांसाठी वेगवेगळा वापरला जातो.

  • 3 ते 4 महिने कालावधी असलेल्या भाजीपाला, स्ट्राबेरी अशा पिकांना संरक्षण देण्यासाठी 25 मायक्रॉन जाडीचे यु.व्ही स्टॅबिलाइज्ड फिल्म चा पेपर गरजेचा आहे.
  • 11 ते 12 महिने कालावधी असलेल्या पपई अशा मध्यम कालावधी च्या पिकांना संरक्षण देण्यासाठी 50 मायक्रॉन जाडीचे यु.व्ही स्टॅबिलाइज्ड फिल्म चा पेपर गरजेचा आहे.
  • 11 ते 12 महिन्यांपेक्षा जास्त कालावधी च्या पिकांना संरक्षण देण्यासाठी 11/200 मायक्रॉन जाडीचे यु.व्ही स्टॅबिलाइज्ड फिल्म चा पेपर फायद्याचा ठरतो. [Mulching Paper Subsidy]

मल्चिंग पेपर अनुदान योजना चे लाभार्थी

  • वयक्तिक शेतकरी
  • शेतकरी समूह
  • शेतकरी उत्पादन कंपनी
  • बचत गट
  • सहकारी संस्था

मल्चिंग पेपर योजना महाराष्ट्र अंतर्गत शेतकऱ्यांना होणारा फायदा

मल्चिंग पेपरचे शेतीमध्ये अनेक फायदे आहेत त्यामुळे अनेक शेतकरी शेतीमध्ये मल्चिंग पेपरचा उपयोग करतांना दिसत आहेत. विशेषतः भाजीपाला पिकांसाठी मल्चिंग पेपरचा खूप मोठ्या प्रमाणत उपयोग केला जातो. जाणून घेऊया मल्चिंग पेपर चे फायदे

  • फळझाडे, भाजीपाला तसेच वेगवेगळ्या पिकांभोवती Plastic Mulching Paper चे आच्छादन केल्यामुळे पाण्याचा बाष्पीभवनामुळे होणारा ऱ्हास टाळता येतो.
  • पिकांभोवती Plastic Mulching Paper चे आच्छादन केल्यामुळे कीड-रोगराईपासून पिकांचे संरक्षण होते.
  • मल्चिंग पेपर च्या वापरामुळे पिकांच्या उत्पादनात वाढ होते.
  • मल्चिंग फिल्म जमिनीचे तापमान वाढते त्यामुळे जमिनीचे निर्जंतुकीकरण होण्यास मदत होते.
  • मल्चिंग पेपर च्या सहाय्याने जमिनीत होणाऱ्या पिकांस हानिकारक सूक्ष्मजीवांच्या वाढीस अटकाव केला जातो.
  • मल्चिंग पेपर च्या वापरामुळे पिकांचे नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान टाळता येते.
  • Mulching Paper च्या वापरल्यामुळे शेतामध्ये मल्चिंग पेपरखाली सूर्यकिरण पोचत नसल्याने झाडे आणि रोपट्यांच्या भोवती जास्त प्रमाणत तण होत नाही परिणामी शेतकऱ्यांचा खर्च वाचतो.
  • Mulching  Paper च्या प्रकाश परिवर्तनामुळे काही किडी दूर जातात.
  • आच्छादन पेपरच्या खाली सूक्ष्म वातावरण निर्मिती होते, ज्यात कार्बोन डायऑक्साइडचे प्रमाण अधिक असते.
  • पावसाच्या पाण्याने होणारी जमिनीची धूप थांबते.
  • राज्यातील शेतकऱ्याचे जीवनमान सुधारेल.
  • शेतकऱ्याचा सामाजिक व आर्थिक विकास होईल.
  • राज्यातील शेतकरी सशक्त व आत्मनिर्भर बनतील. [Mulching Paper Subsidy]
  • आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना सरकार देत आहे 3 लाखाची प्रोत्साहन राशी त्यासाठी वाचा आंतरजातीय विवाह योजना

प्लास्टिक मल्चिंग पेपर योजना अंतर्गत लाभ वितरण कार्यप्रणाली

अर्जदाराने शासनाच्या अधिकृत वेबसाईट वर जाऊन अर्ज केल्यानंतर किंवा ऑफलाईन पद्धतीने म्हणजेच स्वतः कृषी कार्यालयात जाऊन या योजनेअंतर्गत अर्ज केल्यानंतर
तालुका कृषी अधिकारी सदर अर्जाची आणि जोडलेल्या कागदपत्रांची पाहणी करतील व या योजनेसाठी पात्र ठरवतील.
तालुका कृषी अधिकारी यांच्याकडून पूर्व संमती मिळाल्यानंतर लाभार्थ्याने मल्चिंग पेपर ची खरेदी करावी.
त्यानंतर अनुदानाची रक्कम जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी स्तरावरून PFMS प्रणालीद्वारे लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते.

मल्चिंग पेपर योजना साठी आवश्यक पात्रता

  • महाराष्ट्र राज्यातील शेतकरी मलचिंग पेपर योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.

मल्चिंग पेपर योजना महाराष्ट्र चे नियम व अटी

  • फक्त महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांनाच या योजनेचा लाभ दिला जाईल.

राज्याच्या बाहेरील शेतकऱ्यांना मल्चिंग पेपर योजनेचा लाभ दिला जाणार नाही.

  • मल्चिंग पेपर योजनेअंतर्गत राज्य शासनाकडून 50 टक्के अनुदान दिले जाईल व उर्वरित 50 टक्के रक्कम लाभार्थ्याला स्वतःकडील अदा करणे आवश्यक आहे.
  • एका कुटुंबातील फक्त एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ दिला जाईल.
  • अर्जदार शेतकऱ्याने या पूर्वी केंद्र किंवा राज्य शासनाद्वारे सुरु एखाद्या योजनेअंतर्गत मुलचिंग पेपर साठी अनुदान मिळवले असता कामा नये.
  • अर्जदार व्यक्ती हा शेतकरी असणे आवश्यक आहे व त्याच्याजवळ शेतीयोग्य जमीन असणे आवश्यक आहे.
  • अर्जदार शेतकऱ्याकडे स्वतःच्या नावे बँकेत खाते असणे आवश्यक आहे.
  • लाभार्थी शेतकऱ्याला स्वतःच्या पैशाने मल्चिंग पेपर खरेदी करावा लागेल व योग्य कागदपत्रे जोडून अर्ज केल्यानंतरच अनुदानाची रक्कम त्याच्या बँक खात्यात जमा केली जाईल.
  • लाभार्थी शेतकऱ्याला योजनेअंतर्गत अनुदानावर मिळालेला मल्चिंग स्वतःच्या शेतात वापरणे बंधनकारक आहे. [Mulching Paper Subsidy]

मल्चिंग पेपर योजना महाराष्ट्र अंतर्गत आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • राशन कार्ड
  • रहिवासी दाखला
  • 7/12 8अ
  • बँकेचे पासबुक
  • मोबाईल नंबर
  • ई-मेल आयडी
  • पासपोर्ट साईज फोटो

मल्चिंग पेपर योजना महाराष्ट्र अंतर्गत ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत

  • अर्जदाराला सर्वात प्रथम शासनाच्या अधिकृत वेबसाईट वर जावे लागेल.
  • होम पेज वर आधार कार्ड किंवा तुमच्या Username ने लॉगिन करावे.
Malching Paper Yojana Home Page

  • आता तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन होईल त्यामध्ये अर्ज करा वर क्लिक करावे लागेल.
Malching Paper Yojana Apply

  • आता तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन होईल त्यात फलोत्पादन मध्ये बाबी निवड बटनावर क्लिक करावे लागेल.
Malching Paper Yojana Babi Nivda

  • आता तुमच्या समोर या योजनेचा अर्ज उघडेल त्यामध्ये सर्व माहिती भरून झाल्यावर जतन करा वर क्लिक करावे लागेल.
Malching Paper Yojana Application Form

  • अशा प्रकारे तुमची मल्चिंग पेपर योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल. [Mulching Paper Subsidy]

मल्चिंग पेपर योजना महाराष्ट्र अंतर्गत ऑफलाईन अर्ज करण्याची पद्धत

अर्जदाराला सर्वात प्रथम आपल्या जिल्हा कार्यालयात जाऊन संबंधित कृषी सहाय्यक, तालुका कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक मंडळ, कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा लागेल व मल्चिंग पेपर योजनेचा अर्ज घ्यावा लागेल.
अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून योग्य ती कागदपत्रे जोडून सदर अर्ज कार्यालयात जमा करावा लागेल.

Telegram GroupJoin
शासनाची अधिकृत वेबसाईटClick Here
हेल्पलाईन नंबर022-49150800
  • शेतजमिनीवर तसेच शेताच्या बांधावर बांबू लागवडीकरिता सरकार शेतकऱ्यांना देत आहे 80 टक्के अनुदान त्यासाठी वाचा अटल बांबू समृद्धी योजना
  • 7/12 वर ऑनलाईन पिकांची नोंद करण्यासाठी सरकार ने सुरु केली आहे एक नवीन योजना त्यासाठी वाचा ई पीक पाहणी
  • घराच्या छतावर सोलर बसविण्यासाठी सरकार देत आहे 40 टक्के अनुदान त्यासाठी वाचा रुफटॉप सोलर योजना

सारांश

आशा करतो कि मल्चिंग पेपर योजनेअंतर्गत आपल्याला सर्व माहिती प्राप्त झाली आहे तरी देखील आपले मल्चिंग पेपर योजनेसंबंधी काही प्रश्न असल्यास मला ई-मेल किंवा कंमेंट्स च्या माध्यमातून जरूर कळवा आम्ही तुमच्या प्रश्नांची लवकरात लवकर उत्तरे देण्याचा प्रयत्न करू आणि जर तुम्हाला या योजनेची माहिती उपयुक्त वाटली असेल तर तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा जेणेकरून तुमचे मित्र देखील या योजनेचा लाभ घेऊ शकतील. [Mulching Paper Subsidy]

5 thoughts on “Mulching Paper Subsidy In Maharashtra”

  1. Mulching paper kuthlya company cha ghyava lagel subsidy sathi. Maharashtra ani india made kiti company ahet asha. Ani tya kontya

    • तुम्ही तुमच्या क्षेत्रातील कृषी अवजारे पुरवठा करणाऱ्या दुकानातून तुमच्या पिकांना योग्य अशा २५/५०/१००/२०० मायक्रॉन जाडीचे यु.व्ही स्टॅबिलाइज्ड फिल्म चा पेपर खरेदी करू शकता.

    • कोटेशन ची किंमत टाकण्याचा पर्याय उपलब्ध नसेल तर तुम्हाला कोटेशन किंमत टाकायची काहीच गरज नाही.

      • pan question chi value taklyashivay application save hot nahi ahe please enter post question value asa massage yet ahe

Comments are closed.