Kishori Shakti Yojana Maharashtra

या योजनेअंतर्गत 11 ते 18 वर्ष वयोगटातील ग्रामीण / आदिवासी आणि नागरी क्षेत्रातील मुलींना अंगणवाडी सेविकांच्या मदतीने पोषण आरोग्यविषयक दर्जा, स्वच्छता, अनौपचारिक शिक्षण प्रशिक्षण इत्यादी विषयांवर संपूर्ण माहिती दिली जाते.
मुलींना शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या प्रबळ बनविण्यासाठी महाराष्ट्र शासनाने किशोरी शक्ती योजनेची सुरुवात केली आहे.

राज्यातील बहुतांश कुटुंबे दारिद्रय रेषेखाली स्वतःचे जीवन जगत असतात त्यामुळे अशा कुटुंबांना आपल्या कुटुंबाच्या गरजा पूर्ण करणे शक्य नसते त्यामुळे ते आपल्या मुलींचे आरोग्य त्यांचे शिक्षण तसेच त्यांना योग्य आहार देण्यास असमर्थ असतात. या सर्व गोष्टींचा विचार करून महाराष्ट्र शासनाने राज्यातील मुलींच्या उज्वल भविष्यासाठी महाराष्ट्र किशोरी शक्ती योजना सुरु करण्याचा एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

योजनेचे नावकिशोरी शक्ति योजना महाराष्ट्र
राज्यमहाराष्ट्र
योजनेची सुरुवात15 मे 2004
विभागबाल कल्याण विभाग
योजनेचे लाभार्थीगरीब कुटुंबातील मुली
लाभमुलींना शारीरिक व मानसिक दृष्ट्या प्रबळ बनविणे
अर्ज करण्याची पद्धतऑफलाईन

किशोरी शक्ति योजना महाराष्ट्र चे उद्दिष्ट

  • 11 ते 18 वर्ष वयोगटातील किशोरवयीन मुलींचे पोषण व आरोग्यविषयक दर्जा सुधारणे.
  • किशोरवयीन मुलींना घरगुती तसेच व्यावसायिक प्रशिक्षण देऊन त्याना व्यवसायाच्या दृष्टीने सक्षम बनविणे.
  • किशोरवयीन मुलींना आरोग्य, पोषण, कुटुंब कल्याण, गृह व्यवस्थापन, बाल संगोपन, व्यक्तिगत व परिसर स्वच्छता इत्यादी विषयांचे शिक्षण देऊन त्यांना जागृत करणे व बालविवाहास प्रतिबंध करणे.
  • किशोरवयीन मुलींची निर्णयक्षमता वाढविण्याच्या दृष्टिकोनातून त्यांना शिक्षण देणे व त्यांचे जीवनमान सुधारणे.
Kishori Shakti Yojana Maharashtra

किशोरी शक्ति योजनेचे वैशिष्ट्य

  • या योजनेअंतर्गत किशोरवयीन मुलींना दिली जाणारी लाभाची राशी मुलींच्या बँक खात्यात DBT च्या सहाय्याने जमा करण्यात येते.
  • या योजनेमुळे मुलींचे मनोबळ वाढून त्यांना कोणावर अवलंबून रहायची वेळ येणार नाही.
  • या योजनेमुळे जीवनात येणाऱ्या अडचणींना सामोरे जाण्याची शक्ती मुलींमध्ये निर्माण होण्यास मदत होते.

किशोरी शक्ति योजनेनेअंतर्गत लाभार्थी मुलींची निवड

  • किशोरी शक्ती योजना महाराष्ट्र अंतर्गत प्रत्येक क्षेत्रातून 11 ते 18 वर्षे वयोगटातील एकूण 20 किशोरवयीन मुलींची 6 महिन्यांकरिता निवड करण्यात येते त्यापैकी 15 ते 18 वर्षे वयोगटातील किशोरवयीन मुलींची निवड दारिद्र रेषेखालील कुटुंब, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती या मधून केली जाते तसेच शाळा सोडलेल्या मुलींना विशेष प्राधान्य दिले जाते.
  • या वयोगटातील 3 मुलींना अंगणवाडी केंद्राशी संलग्न ठेवण्यात येते तसेच त्याना अंगणवाडीच्या प्रत्येक कार्यक्रमात सहभागी केले जाते.
  • ग्रामीण, आदिवासी आणि नागरिक प्रकल्पात सदर मुलींची निवड बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली केली जाते.
किशोरी शक्ति योजनेनेअंतर्गत मिळणारे लाभ
  • योजनेनेअंतर्गत निवड झालेल्या किशोरवयीन मुलींना आठवड्यातून एकदा लोहयुक्त गोळ्या (IFA Tablet) दिल्या जातात.
  • निवड झालेल्या किशोरवयीन मुलींना 6 महिन्यातून एकदा जंतनाशक गोळ्या (Deworming Tablets) दिल्या जातात.
  • निवड झालेल्या किशोरवयीन मुलीचे प्रत्येक महिन्याला नियमितपणे वजन घेण्यात येते.
  • निवड झालेल्या किशोरवयीन मुलींचे रक्त तपासून त्यात हिमोग्लोबिन ची मात्रा तपासली जाते.
  • निवड झालेल्या किशोरवयीन मुलींपैकी 15 ते 18 वर्षे वयोगटातील 3 मुलींचे बिट स्थरावर प्रशिक्षण घेण्यात येते व त्यांना योग्य शिक्षण आणि मार्गदर्शन करण्यात येते. या मुलींचे प्रशिक्षण घेऊन झाल्यावर त्यांच्या मार्फत अंगणवाडीच्या मदतीने त्या परिसरातील इतर किशोरवयीन मुलींना प्रशिक्षित करण्यात येते.
  • योजनेअंतर्गत निवड झालेल्या किशोरवयीन मुलींना आरोग्य, पोषण, शिक्षण, वयक्तिक स्वच्छता, परिसर स्वच्छता,सामुदायिक पोषण, मासिक पाळी त्यांचे विज्ञान, स्वच्छता, गैरसमज, गर्भावस्था मागील शरीर शास्त्र, गर्भनिरोधन, बालविवाहाचे परिणाम तसेच लैंगिक छळ झाल्यास कोणाची मदत घ्यावी त्यासाठी हेल्पलाईन चा उपयोग,एड्स नियंत्रण व त्यावर प्रतिबंध,स्त्री विषयक कायदे व हक्कांची माहिती, विवाह कायदा व त्यांची माहिती इत्यादी विषयांबाबत मार्गदर्शन करण्यात येते.यासाठी अंगणवाडी मधील पुस्तके व भिंती पत्रके याचा वापर करण्यात येतो.
  • किशोरवयीन मुलींना स्वावलंबी बनवून स्वतःच्या पायावर उभे राहता यावे यासाठी त्यांना मेहंदी काढणे, कचऱ्यातून कला, जैविक शेती, गांडूळ खत तयार करण्याचे प्रशिक्षण, अकाउंटिंग,केक बनविणे, घरगुती विजेच्या उपकरणांची दुरुस्थी इत्यादी प्रकारचे प्रशिक्षण या योजने मार्फत दिले जाते.
  • वारंवार मुलांना जन्म देण्याचे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम समजावून सांगणे.
  • हिरव्या पालेभाज्या खाण्याचे महत्व सांगणे.
  • ज्या मुलींनी स्वतःचे शालेय शिक्षण मध्येच सोडले आहे अशा मुलींना अंगणवाडी च्या मदतीने शिक्षणाचे महत्व समजवून पुन्हा शिक्षण पूर्ण करण्यासाठी प्रवृत्त केले जाते.
  • योजनेअंतर्गत किशोरवयीन मुलींना पूरक पोषण आहार देण्यात येतो.
  • योजनेअंतर्गत किशोरवयीन मुलींना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी 1 लाखापर्यंत खर्च करण्यात येतो.
  • योजनेअंतर्गत प्रत्येक किशोरवयीन मुलींचे किशोरी कार्ड तयार करण्यात येते जेणेकरून त्यांना या योजनेअंतर्गत शासनाकडून येणाऱ्या सर्व सुविधांचा लाभ घेता येईल.
  • मुलींना किशोरवयीन वयात योग्य प्रशिक्षण दिल्यामुळे 18 वर्षानंतर त्यांना स्वयंरोजगार दिला जातो.
किशोरी शक्ति योजनेसाठी आवश्यक पात्रता
  • अर्जदार मुलगी महाराष्ट्र राज्याची मूळ रहिवाशी असणे आवश्यक आहे.
किशोरी शक्ति योजनेचे नियम व अटी
  • फक्त महाराष्ट्र राज्यातील मुलींनाच या योजनेचा लाभ दिला जाईल.
  • महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील मुलींना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
  • फक्त गरीब, दारिद्र रेषेखालील,अनुसूचित जाती, जमाती प्रवर्गातील किशोरवयीन मुलींना या योजनेचा फायदा घेता येईल.
  • किशोरवयीन मुलींचे वय 11 ते 18 च्या दरम्यान असणे आवश्यक.
  • किशोरवयीन मुलींना या योजनेअंतर्गत फक्त 6 महिन्यांसाठी नियुक्त करण्यात येईल.
  • मुलीने जर आधी या योजनेअंतर्गत लाभ मिळवला असेल तर तिला पुन्हा या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
किशोरी शक्ति योजनेअंतर्गत आवश्यक कागदपत्रे
  • अर्जदार मुलीचे आधार कार्ड
  • अर्जदार मुलीचा जन्माचा दाखला
  • अर्जदार मुलीच्या कुटुंबाचे दारिद्र रेषेखालील कार्ड
  • मुलीचा शाळेचा दाखला
  • अर्जदार मुलीचे शालेय शिक्षण मार्कशीट
  • अर्जदार मुलीचे जातींचे प्रमाणपत्र
  • अर्जदार मुलीचे कुटुंब महाराष्ट्र राज्यात राहत असल्याचा दाखला
  • अर्जदार मुलीच्या कुटुंबाचे रेशन कार्ड
  • अर्जदार मुलीचे अलीकडच्या काळातील पासपोर्ट आकाराचा फोटो
  • वीजबिल
  • अर्जदार मुलीचे ई-मेल आयडी
  • अर्जदार मुलीचा मोबाईल नंबर
किशोरी शक्ति योजनेअंतर्गत अर्ज रद्द होण्याची प्रमुख कारणे खालीलप्रमाणे असू शकतात
  • अर्जदार मुलगी महाराष्ट्र राज्याची मूळ रहिवाशी नसल्यास अर्ज रद्द केला जाईल.
  • मुलीचे वय 11 वर्षापेक्षा कमी व 18 वर्षापेक्षा जास्त असल्यास अर्ज रद्द केला जाईल.
  • मुलीने या पूर्वी किशोरी शक्ती योजनेअंतर्गत लाभ मिळवला असल्यास अर्ज रद्द केला जाईल.
  • मुलगी गरीब, दारिद्र रेषेखालील,अनुसूचित जाती, जमाती प्रवर्गातील नसल्यास अर्ज रद्द केला जाईल.
  • अंतिम तारखेनंतर प्राप्त झालेले अर्ज रद्द केले जातील.
किशोरी शक्ति योजनेअंतर्गत अर्ज करण्याची पद्धत
  • या योजनेसाठी महाराष्ट्र तसेच केंद्र शासनाने कोणतीच ऑनलाईन सेवा उपलब्ध केली नाही आहे.
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक किशोरवयीन मुलींच्या पालकांनी आपल्या परिसरातील अंगणवाडीला भेट द्यावी व योजनेचा अर्ज घ्यावा व अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून योग्य त्या कागदपत्रांची झेरॉक्स प्रत जोडावी व सदर अर्ज अंगणवाडीत जमा करावा.
किशोरी शक्ति योजनेअंतर्गत निवड पद्धती
  • सदर अर्जाची व कागदपत्रांची तपासणी करून स्थानिक बालिका मंडळाद्वारे लाभार्थी मुलीची निवड करण्यात येते.
  • तसेच अंगणवाडीद्वारे अंगणवाडी सेविकांमार्फत प्रत्येक घरी जाऊन सर्वे केला जातो आणि या सर्वे दरम्यान लाभार्थी किशोरवयीन मुलींची निवड केली जाते.
Telegram Group 1Join
Telegram Group 2Join
Kishori Shakti Yojana GRयेथे क्लिक करा
Facebook PageFollow
Facebook PageFollow
Join WhatsApp Group!