Yellow Ration Card Benefits In Maharashtra In Marathi

नमस्कार मित्रांनो आज आपण या लेखामध्ये पिवळ्या रेशन कार्ड चे फायदे जाणून घेणार आहोत. पिवळ्या रेशन कार्ड ला दारिद्र्य रेषेखालील कार्ड तसेच BPL (Below Poverty Linemr) कार्ड म्हणून देखील ओळखण्यात येते.

आज काल आपल्याला सरकारी कामामध्ये ओळखीचा पुरावा तसेच पत्त्याच्या पुराव्यासाठी आधार कार्ड मागितले जाते परंतु आधार कार्ड सुरु होण्यापूर्वी रेशन कार्ड ला खूप महत्व होते कारण रेशन कार्ड चा उपयोग फक्त रेशन दुकानातून धान्य घेण्यापुरताच मर्यादित नव्हता तर ओळखीचा पुरावा तसेच पत्त्याच्या पुराव्यासाठी रेशनकार्ड मागितले जायचे. आज सुद्धा रेशन कार्ड चे महत्व तसे कमी झालेले नाही कारण खूप ठिकाणी पुराव्यासाठी रेशन कार्ड मागितले जाते.

आपल्या राज्यात 3 प्रकारचे रेशन कार्ड उपलब्ध आहेत.

  • पांढरे रेशन कार्ड
  • केशरी रेशन कार्ड
  • पिवळे रेशन कार्ड
Yellow Ration Card Benefits In Maharashtra In Marathi

Yellow Ration Card Benefits In Maharashtra In Marathi 2024

1. रेशन दुकानात उपयोग

पिवळे रेशन कार्ड धारकांना अत्यंत कमी दरात रेशन दुकानात धान्य, तेल व साखर मिळते.

2. शिधा संबंधी योजना

राज्य शासनाद्वारे नागरिकांना विविध प्रकारच्या शिधा संबंधीच्या योजना सुरु करण्यात येतात त्यावेळेस रेशन कार्ड चा वापर होतो.

3. बँकेमध्ये रेशन कार्ड चा उपयोग

बँकेत नवीन खाते सुरु करताना किंवा KYC करताना पत्त्याचा पुरावा म्हणून शिधापत्रिकेच्या उपयोग होतो.

4. शाळा व महाविद्यालय

शाळेमध्ये तसेच महाविद्यालयामध्ये प्रवेश घेताना पत्त्याचा पुरावा म्हणून शिधापत्रिकेच्या उपयोग होतो.

5. आधार कार्ड काढताना

नवीन आधार कार्ड काढताना तसेच पत्त्यामध्ये बदल करताना रेशन कार्ड हा महत्वाचा पुरावा म्हणून मानला जातो.

6. मतदान कार्ड बनवताना

नवीन मतदान कार्ड बनवताना किंवा मतदान कार्ड मध्ये पत्त्यामध्ये बदल करताना रेशन कार्ड चा उपयोग महत्वाचा पुरावा म्हणून केला जातो.

7. पासपोर्ट बनविताना

पासपोर्ट बनविताना पत्त्याचा पुरावा तसेच नागरिकत्वाचा पुरावा म्हणून रेशन कार्ड चा उपयोग होतो.

8. शासनाच्या विविध योजना

राज्य शासन नागरिकांसाठी विविध योजनांची सुरुवात करत असते त्यामध्ये पिवळ्या रेशन कार्ड धारकांसाठी विविध योजना राबविण्यात येतात अशा वेळी रेशन कार्ड चा वापर केला जातो.

9. शासकीय रुग्णालयामध्ये रेशन कार्ड चा उपयोग

शासकीय रुग्णालयात केशरी तसेच पिवळ्या रेशन कार्ड धारकांना विविध प्रकारच्या उपचारांवर सवलती दिल्या गेल्या आहेत अशा वेळी नागरिकांना रेशन कार्ड चा उपयोग होतो.

10. उत्पन्नाचा दाखला म्हणून उपयोग

विविध शासकीय कामात तसेच योजनेमध्ये उत्पन्नाचा दाखला आवश्यक असतो अशावेळी पिवळे रेशन कार्ड (BPL) हे दारिद्र्य रेषेखालील कुटुंब आहे म्हणून महत्वाचा पुरावा मानला जातो.

11. गॅस कनेक्शन साठी उपयोग

नवीन गॅस कनेक्शन साठी रेशन कार्ड चा उपयोग होतो.

12. वाहन चालक परवाना बनवताना

वाहन चालक परवाना बनवताना पत्त्याचा पुरावा म्हणून रेशन कार्ड चा उपयोग होतो.

13. पॅन कार्ड काढताना

पॅन कार्ड बनवताना पत्त्याचा पुरावा म्हणून रेशन कार्ड चा उपयोग होतो.

  • स्वतःचे घर बांधण्यासाठी राज्य सरकार देत आहे 2 लाखांचे आर्थिक सहाय्य त्यासाठी वाचा शबरी घरकुल योजना
Telegram GroupJoin

सारांश

आम्ही आशा करतो कि तुम्हाला Yellow Ration Card Benefits In Maharashtra In Marathi माहिती प्राप्त झाली आहे तरीदेखील आपले काही प्रश्न असल्यास मला ई-मेल किंवा कंमेंट्स च्या माध्यमातून जरूर कळवा आम्ही तुमच्या प्रश्नांची लवकरात लवकर उत्तरे देण्याचा प्रयत्न करू आणि जर तुम्हाला या योजनेची माहिती उपयुक्त वाटली असेल तर तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा जेणेकरून तुमचे मित्र देखील या योजनेचा लाभ घेऊ शकतील.