महाराष्ट्र सरकार राज्यातील गर्भवती महिलांसाठी तसेच त्यांच्या नवजात बालकांसाठी विविध सरकारी योजना राबवित असते. आज आपण अशाच एका योजनेची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत ज्या योजनेचे नाव baby care kit Scheme maharashtra आहे
या योजनेअंतर्गत सरकारी रुग्णालय किंवा प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये पहिल्या प्रसूतीवेळी जन्माला येणाऱ्या नवजात बाळाला अंगणवाडी सेविकांच्या मदतीने बेबी केअर किट चा लाभ दिला जाणार आहे.
सरकारी रुग्णालयात महिलांनी प्रसूती करावी त्यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देश्यातून सदर योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे.
योजना सुरु करण्यामागचा हेतू:
- महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण तसेच शहरी भागातील महिलांनी त्यांची पहिली प्रसूती सरकारी रुग्णालय किंवा प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये करावी.
- नवजात जन्मलेल्या बाळाच्या सुरक्षेची काळजी घेणे.
- ग्रामीण भागातील महिलांचे तसेच बाळाच्या आरोग्याची काळजी घेणे.
- बालकाची तसेच आईचे मृत्युदर कमी करणे.
बाळाच्या देखभाल किट (Baby Care Kit) मध्ये काय असते?
- बाळाचे कपडे (लंगोट, सदरा)
- टॉवल
- थर्मामीटर
- मच्छरदाणी
- बाळाला लावायचे तेल
- प्लास्टिक चटई
- बाळाचा शॅम्पू
- थंडीपासून बचाव करण्यासाठी कांबळ
- नेल कटर
- खेळणी
- बाळाला हातमोजे आणि पायमोजे
- आईसाठी हात धुण्यासाठी लिक्विड
- झोपण्याची लहान गादी
- सर्व साहित्य ठेवण्यासाठी लहान बॅग
योजनेचे लाभार्थी:
- शासकीय रुग्णालय किंवा प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये जन्मलेले पहिले बाळ
योजनेची सुरुवात:
- 26 जानेवारी 2019
योजनेअंतर्गत आवश्यक पात्रता व अटी:
- अर्जदार महिला महाराष्ट्र राज्याची मूळ रहिवाशी असणे आवश्यक आहे.
- महिलेने सरकारी रुग्णालय किंवा प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये प्रसूती करणे आवश्यक आहे.
- लाभ मिळवण्यासाठी महिलेची पहिली प्रसुती असणे आवश्यक आहे.
- प्रसूती झाल्यावर 2 महिन्याच्या आत अर्ज करणे आवश्यक आहे.
अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे:
- आई वडिलांचे आधार कार्ड
- रेशन कार्ड झेरॉक्स
- आईच्या बँक खात्याचा तपशील
योजनेअंतर्गत Baby Care Kit मिळवण्याची पद्धत:
- महिलांना आपल्या क्षेत्रातील अंगणवाडी केंद्रात जाऊन या योजनेचा अर्ज घ्यावा लागेल.
- अर्जात विचारलेली सर्व माहीत भरून अर्ज अंगणवाडी सेविकांकडे जमा करावा लागेल.
- काही दिवसांत तुम्हाला Baby Care Kit चा लाभ दिला जाईल.
Baby Care Kit Yojana Maharashtra Apply Online:
योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध नाही आहे त्यामुळे अर्जदार महिलेला आपल्या क्षेत्रातील अंगणवाडी केंद्रात जाऊन ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल.
Telegram Group | Join |
बेबी केयर किट मागणी अर्ज pdf | Click Here |
कार्यालय पत्ता | आपल्या क्षेत्रातील अंगणवाडी केंद्र |