आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजना

पत्रकारांना निवृत्तीवेतन देण्यासंदर्भातील मागणी,विविध पत्रकार संघटना,लोकप्रतिनिधी,विधानमंडळ सदस्य यांच्याकडून शासनाकडून वारंवार करण्यात येत होती.प्रसिद्धी माध्यमे व पत्रकार हा भारतीय लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे.राज्य शासन सर्वसामान्य नागरिकांसाठी ज्या लोकोपयोगी योजना जाहीर करते त्याची व्यापक प्रचार व प्रसिद्धीचे कामकाज माध्यमे व त्यामध्ये काम करणारे पत्रकार निरपेक्ष भावनेने करीत असतात त्यामुळे अशा घटकाला सामाजिक सुरक्षा सुविधा देण्याचा विचार करून जेष्ठ पत्रकारांप्रती आदरभाव,कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी व त्यांच्या वृद्धावस्थेत त्यांची हेळसांड होऊ नये यासाठी तसेच त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून आचार्य बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील जेष्ठ पत्रकारांना दरमहा 11000/- रुपये इतके अर्थसहाय्य्य देण्यात येईल.

या योजनेअंतर्गत 2018-2019 मध्ये रुपये 15 कोटी तसेच 2021-2022 मध्ये रुपये 10 कोटी असे एकूण रुपये 35 कोटी इतकी रक्कम मुंबईतील इंडियन बँक या राष्ट्रीयकृत बँकेत मुदत ठेव स्वरूपात गुंतविण्यात आलेली आहे.
पत्रकारांना आर्थिक सहाय्य्य करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या “शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी पत्रकार कल्याण निधी” या योजनेच्या विश्वस्त मंडळामार्फत जेष्ठ पत्रकारांसाठी आचार्य बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजना राबविण्यात आली आहे

महाराष्ट्र राज्यातील जेष्ठ पत्रकारांना त्यांच्या वृद्धावस्थेत त्यांची हेळसांड होऊ नये यासाठी दरमहा आर्थिक सहाय्य्य करणे हा आचार्य बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजनेचा मुख्य उद्देश्य आहे. [आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजना]

वाचकांना विनंती

आम्ही आचार्य बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजनेची संपूर्ण माहिती या लेखात दिली आहे त्यामुळे तुमची हा लेख शेवट पर्यंत वाचा व या योजनेचा लाभ मिळवा जर तुमच्या परिसरात असे कोणी पत्रकार असतील जे आचार्य बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजनेचा लाभ घेऊ इच्छित असतील तर त्यांना या योजनेची माहिती अवश्य द्या किंवा आमची हि आर्टिकल त्यांना शेयर करा जेणेकरून ते या योजनेचा लाभ घेऊ शकतील.

योजनेचे नावआचार्य बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजना
लाभार्थीमहाराष्ट्र राज्यातील जेष्ठ पत्रकार
लाभदरमहा 11000/- रुपये अर्थसहाय्य्य
योजनेची घोषणा02 फेब्रुवारी 2019
अर्ज करण्याची पद्धतऑफलाईन

Table Of Content

आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजना चे उद्दिष्ट

  • महाराष्ट्र राज्यातील जेष्ठ पत्रकारांना त्यांच्या वृद्धावस्थेत त्यांची हेळसांड होऊ नये यासाठी दरमहा आर्थिक सहाय्य्य करणे हा आचार्य बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजनेचा मुख्य उद्देश्य आहे.
  • या योजनेअंतर्गत पत्रकारांचे जीवनमान सुधारणे हा या योजनेचा मुख्य उद्देश्य आहे.
  • पत्रकारांना सशक्त तसेच आत्मनिर्भर बनविणे.
  • पत्रकारांचे सामाजिक तसेच आर्थिक विकास करणे.
  • पत्रकारांना वृद्धावस्थेत दैनंदिन गरजांसाठी पैशांसाठी कोणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता भासू नये. [आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजना]
v

आचार्य बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजनेची वैशिष्ट्ये

  • आचार्य बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजना महाराष्ट्र राज्यासाठी सुरु करण्यात आली आहे
  • जेष्ठ पत्रकारांसाठी पेन्शन योजनेचे काम करणार आहे.
  • योजनेचा लाभ महाराष्ट्र राज्यातील सर्व पात्र जेष्ठ पत्रकार घेऊ शकतात.
  • योजनेअंतर्गत मिळणारी लाभाची राशी लाभार्थ्यांच्या बँक खात्यात DBT च्या सहाय्याने जमा केली जाते.
  • या योजनेअंतर्गत अर्ज करण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी ठेवण्यात आली आहे त्यामुळे अर्जदाराला शासनाच्या कार्यालयात फेऱ्या मारण्याची आवश्यकता भासणार नाही त्यामुळे अर्जदारांचा वेळ आणि पैसे दोघांची बचत होईल.
  • वृद्धपकाळात जेष्ठ पत्रकारांना दैनंदिन जीवनासाठी लागणाऱ्या पैशांसाठी सशक्त व आत्मनिर्भर बनविण्यासाठी सदर योजना महत्वपूर्ण ठरणार आहे. [आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजना]
  • सरकार गटई कामगारांना देत आहे मोफत पत्र्याचे स्टॉल त्यासाठी वाचा गटई स्टॉल योजना
  • आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबांना सरकार देत आहे 4000/- रुपयांचे अर्थसहाय्य त्यासाठी वाचा खावटी अनुदान योजना
  • आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना सरकार देत आहे 3 लाखाची प्रोत्साहन राशी त्यासाठी वाचा आंतरजातीय विवाह योजना

आचार्य बाळशास्त्री जांभेकर योजना अंतर्गत दिले जाणारे आर्थिक सहाय्य

  • योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना दरमहा 11,000/- रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्यात येईल.

आचार्य बाळशास्त्री जांभेकर योजना चे लाभार्थी

  • महाराष्ट्र राज्यातील जेष्ठ पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजनेचे लाभार्थी आहेत.

आचार्य बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजनेचे लाभ

  • जेष्ठ पत्रकारांना उतारवयात सन्मानपूर्वक जीवन जगता येईल.
  • योजनेच्या सहाय्याने पत्रकार सशक्त व आत्मनिर्भर बनतील.
  • पत्रकारांचे जीवनमान सुधारेल.
  • राज्यातील जेष्ठ पत्रकारांचा सामाजिक तसेच आर्थिक विकास होईल.
  • पत्रकारांना वृद्धापकाळ त्यांच्या दैनंदिन गरजांसाठी लागणाऱ्या पैशांसाठी कोणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता भासणार नाही.
  • पत्रकारांचा सामाजिक तसेच आर्थिक विकास होईल. [आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजना]

आचार्य बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजनेची पात्रता

  • जेष्ठ पत्रकार महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असणे आवश्यक आहे.

आचार्य बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजनेच्या अटी व शर्ती

  • योजनेअंतर्गत वृत्तपत्र आणि इतर वृत्तप्रसार माध्यम यांचे संपादक 30 वर्षे म्हणून काम केलेले व वय वर्षे 60 पूर्ण झालेले पत्रकार पात्र असतील
  • किमान सलग 30 वर्षे श्रमिक पत्रकार / छायाचित्रकार म्हणून सेवा करून सेवानिवृत्त झालेले व किमान 60 वर्ष वय पूर्ण झालेले पत्रकार / छायाचित्रकार या योजनेसाठी पात्र असतील.
  • किमान सलग 30 वर्षे स्वतंत्र व्यवसायाची पत्रकार / छायाचित्रकार म्हणून पत्रकारिता / छायाचित्रकार म्हणून पत्रकारिता करून निवृत्त झालेले व किमान 60 वर्षे वय पूर्ण झालेले स्वतंत्र व्यवसायाची पत्रकार / छायाचित्रकार पात्र असतील.
  • किमान सलग 10 वर्षे अधिस्वीकृतीधारक असलेले पत्रकार व वयाची 60 वर्षे पूर्ण झालेला असावा.
  • अधिस्वीकृतीधारक नसलेल्या पत्रकारांच्या बाबतीत अधिस्वीकृतीपत्रिकेसाठी असलेले निकष पूर्ण करीत असेलेले पत्रकार यांचा योजनेसाठी विचार करण्यात येईल याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार समितीला असेल.
  • ज्या पत्रकारांना ईपीएफ (EPF ) योजना (कर्मचारी भविष्य निर्वाह निधी) व्यतिरिक्त इतर कोणत्याही स्रोतातून निवृत्ती वेतन किंवा निवृत्ती वेतनविषयक लाभ मिळालेले / मिळत नसेल अशा पत्रकारांसाठीच जेष्ठ पत्रकार सन्मान योजना लागू राहील.
  • जेष्ठ पत्रकार कि ज्यांची उपजीविका केवळ पत्रकारितेवर अवलंबून आहे आणि अन्य कोणत्याही नोकरी व्यवसाय यामध्ये नाही / नव्हते असे जेष्ठ पत्रकार.
  • गंभीर गुन्ह्यामध्ये दोषसिध्दी होऊन शिक्षा झालेली आहे अशा पत्रकारांना या योजनेचा लाभ देण्यात येणार नाही.
  • या योजनेसाठी जेष्ठ पत्रकार ज्या प्रसार ज्या प्रसार माध्यमामध्ये पत्रकारिता करून निवृत्त झाले त्या प्रसार माध्यमातील संबंधित वृत्तपत्रे नियमित असावे.वृत्तवाहिनी असल्यास ती अधिकृत व सक्षम प्राधिकाऱ्याकडे नोंदणीकृत असावी.
  • या योजनेसाठी लाभ घेऊ इच्छिणारा पत्रकार आयकर भरणारा नसावा.
  • सादर सन्मान योजनेअंतर्गत आर्थिक मदतीची रक्कम लाभार्थी हयात असेपर्यंतच मिळेल लाभार्थी पत्रकाराच्या मृत्यूपश्चात सदर सन्मान योजनेचा लाभ त्याच्या कुटुंबीयास देय असणार नाही.
  • Acharya Balshastri Jambhekar Sanman Yojana अधिस्वीकृतीधारक पत्रकाराने वयाची 60 वर्षे पूर्ण झाल्यानंतरच्या पुढील महिन्यापासून लागू करण्यात येईल. [आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजना]

आचार्य बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

  • आचार्य बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजनेचा अर्ज
  • वयाचा दाखला (शाळा सोडल्याचा दाखला / जन्माचा दाखला)
  • आधार कार्ड
  • राशन कार्ड
  • पॅन कार्डची साक्षांकित प्रत
  • शैक्षणिक माहितीच्या प्रमाणपत्राची साक्षांकित प्रत
  • राष्ट्रीयकृत बँकेचा तपशील
  • अनुभवाचा पुरावा (ज्या ज्या माध्यमात काम केले आहे तेथील आदेश)
  • माध्यमामध्ये काम करताना मिळालेल्या वेतनाचा / मानधनाचा पुरावा.
  • कुटुंबाचा वार्षिक उत्पन्नाचा दाखला (सक्षम प्राधिकाऱ्यांनी दिलेला)
  • अर्जातील माहिती खरी असल्याबाबत विहित नमुन्यातील प्रतिज्ञापत्र
  • स्वतःचे घर बांधण्यासाठी सरकार देत आहे 2.5 लाखाचे आर्थिक अनुदान त्यासाठी वाचा रमाई घरकुल योजना
  • स्वतःचे घर बांधण्यासाठी राज्य सरकार देत आहे 2 लाखांचे आर्थिक सहाय्य त्यासाठी वाचा शबरी घरकुल योजना

आचार्य बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजनेअंतर्गत अर्ज रद्द होण्याची कारणे

  • अर्जदार व्यक्ती महाराष्ट्र राज्यातील रहिवाशी नसल्यास अर्ज रद्द करण्यात येईल.
  • अर्जदार व्यक्ती पत्रकार नसल्यास अर्ज रद्द केला जाईल.
  • अर्जदाराने अर्जात खोटी माहिती भरल्यास
  • एकाच वेळी दोन वेळा अर्ज केल्यास एक अर्ज रद्द केला जाईल.
  • अर्जदार व्यक्ती केंद्र किंवा राज्य शासनाद्वारे सुरु एखाद्या योजनेअंतर्गत दरमहा मानधनाचा लाभ घेत असल्यास अर्ज रद्द केला जाईल.
  • अर्जदाराकडे 30 वर्षाचा पत्रकारितेचा अनुभव नसल्यास अर्ज रद्द केला जाईल.
  • अर्जदार व्यक्तीने त्यांचे वय 60 वर्ष पूर्ण होण्याअगोदर अर्ज केल्यास अर्ज रद्द केला जाईल. [आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजना]

आचार्य बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजनेसाठी अर्ज करण्याची पद्धत

  • सर्वप्रथम अर्जदाराला या योजनेचा अर्ज डाऊनलोड करावा लागेल
  • या योजनेसाठी जेष्ठ पत्रकाराने आचार्य बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजनेमधून लाभ मिळवण्यासाठी संबंधित जिल्हा माहिती अधिकारी / उपसंचालक (विभागीय माहिती कार्यालय) / उपसंचालक (वृत्त), मुंबई यांच्याकडे आवश्यक त्या कागदपत्रांसह अर्ज सदर करावा.
  • अर्ज माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातील महासंचालक,(माहिती व जनसंपर्क) यांच्या अध्यक्षतेखालील समितीकडून तपासण्यात येईल व लाभार्थ्यांची निवड करण्यात येईल.
Telegram GroupJoin
आचार्य बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजना अर्जडाउनलोड
आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजना लाभार्थी यादीयेथे क्लिक करा
कार्यालय पत्तामाहिती व जनसंपर्क महासंचालनालय
तळमजला, मंत्रालय, महाराष्ट्र शासन,
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक,
मुंबई- 400 032
दूरध्वनी क्रमांक(022) 22024050
शासन निर्णययेथे क्लिक करा

सारांश

आम्ही आशा करतो कि आपल्याला आचार्य बाळशास्त्री जांभेकर योजना ची सर्व माहिती प्राप्त झाली आहे तरीदेखील आपले योजनेसंबंधी संबंधी काही प्रश्न असल्यास मला ई-मेल किंवा कंमेंट्स च्या माध्यमातून जरूर कळवा आम्ही तुमच्या प्रश्नांची लवकरात लवकर उत्तरे देण्याचा प्रयत्न करू आणि जर तुम्हाला या योजनेची माहिती उपयुक्त वाटली असेल तर तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा जेणेकरून तुमचे मित्र देखील या योजनेचा लाभ घेऊ शकतील.