कृषी ड्रोन अनुदान योजना महाराष्ट्र 2024

केंद्र सरकार देशातील शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवित असते त्या योजनांपैकी एक योजना कृषी ड्रोन अनुदान योजना आहे या योजनेअंतर्गत देशातील सर्व पात्र शेतकऱ्यांना त्यांच्या शेत फवारणीसाठी उपयुक्त अशा ड्रोन खरेदीसाठी अनुदान उपलब्ध करून दिले जाते जेणेकरून त्यांना शेतात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करता येईल व शेतीची फवारणी ची कामे जलद गतीने करता येतील.

देशातील शेतकरी पीक संरक्षणासाठी शेतात फवारणी करतात त्यासाठी ते पाठीवरच्या पंपाचा वापर करतात तसेच फवारणी करताना शेतकऱ्यांजवळ कीटकनाशकांपासून संरक्षणासाठी काहीच सुविधा उपलब्ध नसतात त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांना त्वचेचे आजार होतात काहींना विषबाधा होते व त्यामधील काही शेतकऱ्यांना दुर्दैवाने मृत्यू देखील होतो.

या सर्व गोष्टींचा विचार करून केंद्र शासनाने शेत फवारणीसाठी ड्रोन उपलब्ध करून देण्याचा विचार केला आहे त्यासाठी ड्रोन खरेदीसाठी अनुदान देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना कृषी क्षेत्रात आधुनिक साधनांचा उपयोग करता यावा तसेच कृषी क्षेत्रात ड्रोन द्वारे फवारणीच्या वापरात वाढ व्हावी या उद्देशाने कृषी ड्रोन अनुदान योजना राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे

योजनेचे नावकृषी ड्रोन अनुदान योजना
राज्यमहाराष्ट्र
साल2023
विभागकृषी विभाग
लाभार्थीमहाराष्ट्र राज्यातील शेतकरी
लाभ5 लाखाचे अनुदान
उद्देशकृषी ड्रोन खरेदी करण्यासाठी अनुदान उपलब्ध करून देणे.
अर्ज करण्याची पद्धतऑफलाईन

कृषी ड्रोन अनुदान योजनेचे उद्दिष्ट

  1. कृषी ड्रोन अनुदान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना शेत फवारणीसाठी ड्रोन उपलब्ध करून देऊन शेतात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे हा या योजनेमागचा मुख्य उद्देश्य आहे.
  2. ड्रोन च्या साहाय्याने शेतात फवारणी केल्यामुळे पारंपरिक पद्धतीने करण्यात येणाऱ्या फवारणी पासून शेतकऱ्यांचे संरक्षण करणे व होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण टाळणे.
  3. शेतकऱ्यांना शेतात फवारणीसाठी ड्रोन खरेदी करण्यासाठी आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू नये तसेच कोणावर अवलंबून राहता येऊ नये व कोणाकडून कर्ज काढण्याची आवश्यकता भासू नये हा उद्देश्य समोर ठेवून कृषी ड्रोन अनुदान योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
  4. शेतात आधुनिक यंत्रांचा वापर करणे.
  5. कृषी कार्य जलद गतीने करणे.
krushi drone anudan yojana

कृषी ड्रोन अनुदान योजनेचे वैशिष्टये

  • कृषी ड्रोन अनुदान योजना संपूर्ण देशात सुरु करण्यात आली आहे त्यामुळे देशातील सर्व शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतील.
  • ग्रामीण भागातील सुशिक्षित बेरोजगार व कृषी पदवीधरांनाही ड्रोन च्या माध्यमातून रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्याचा होत असलेला प्रयत्न हे या योजनेचे मुख्य वैशिष्ट्ये आहे
  • या योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया अत्यंत सोपी ठेवण्यात आलेली आहे जेणेकरून अर्ज करताना शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागणार नाही.
  • कृषी ड्रोन अनुदान योजनेअंतर्गत मिळणारी लाभाची राशी शेतकऱ्याच्या बँक खात्यात DBT च्या सहाय्याने जमा करण्यात येईल जेणेकरून या योजनेमध्ये पारदर्शकता बनली राहील.

कृषी ड्रोन द्वारे फवारणीचे प्रात्यक्षिक हे खालील संस्थेद्वारे राबविले जाणार आहे

  • कृषी विज्ञान केंद्रे
  • शेतकरी उत्पादन संस्था
  • कृषी विद्यापीठ
  • भारतीय कृषी संशोधन परिषद संस्था
  • कृषी यंत्रे व अवजारे तपासणी संस्था

कृषी ड्रोन अनुदान योजनेचे लाभार्थी

  • राज्यातील सर्व शेतकरी कृषी ड्रोन अनुदान योजनेचा लाभ मिळवण्यासाठी पात्र आहेत.

कृषी ड्रोन अनुदान योजनेचे लाभ

  • या योजनेअंतर्गत कृषी पदवीधरांना 5 लाखांपर्यंत अनुदान मिळणार आहे
  • इयत्ता 10वी उत्तीर्ण व रिमोट तंत्राचे प्रशिक्षण असलेल्या ग्रामीण भागातील कोणत्याही युवकाला 4 लाखांपर्यंत अनुदान मिळणार आहे.
  • कृषी ड्रोन अनुदान योजनेच्या माध्यमातून शेती विषयक विविध कामे केली जाऊ शकतील
  • ड्रोन भाडेतत्वावर देऊन रोजगार निर्मिती करता येणं शक्य होईल.
  • राज्यातील शेतकऱ्यांना शेतात फवारणीसाठी कृषी ड्रोन खरेदी करण्यासाठी पैशांसाठी कोणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता भासणार नाही तसेच कोणाकडून कर्ज घेण्याची देखील आवश्यकता भासणार नाही.
  • ड्रोन मुळे फवारणीची कामे जलद गतीने करता येतील.
  • ड्रोनद्वारे पिकांवर औषधे आणि खतांची अधिक चांगल्या प्रकारे फवारणी करता येईल, ज्यामुळे उत्पादनात वाढ होईल आणि पिकांचे नुकसान कमी होईल.
  • ड्रोनचा वापर पिकांचे निरीक्षण आणि जमिनीचे सर्वेक्षण करण्यासाठीही केला जाऊ शकेल ज्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीचे अधिक चांगले व्यवस्थापन करण्यास मदत होईल.

कृषी ड्रोन अनुदान योजनेअंतर्गत अनुदानाची रक्कम खालीलप्रमाणे

  • विद्यापीठे व सरकारी संस्था – 100 टक्के अनुदान (10 लाखांपर्यंत)
  • शेतकरी उत्पादक संस्था – 75 टक्के अनुदान (7 लाख 50000/- रुपये अनुदान)
  • शेतकरी उत्पादक संस्थांनी ड्रोन भाड्याने घेतल्यास (प्रति हेक्टरी 6000/- रुपये अनुदान)
  • संस्थांनी कृषी ड्रोन चे प्रात्यक्षिक राबविल्यास – 3000/- रुपये अनुदान
  • अवजारे सेवा सुविधा केंद्रांना ड्रोन खरेदी करताना – 50 टक्के अनुदान (5 लाखांपर्यंत)
  • कृषी पदवीधारकाने अवजारे सेवा केंद्र सुरु केल्यास – 5 लाखांपर्यंत अनुदान
विद्यापीठे व सरकारी संस्था100 टक्के अनुदान (10 लाखांपर्यंत)
शेतकरी उत्पादक संस्था 75 टक्के अनुदान
(7 लाख 50000/- रुपये अनुदान)
शेतकरी उत्पादक संस्थांनी ड्रोन भाड्याने घेतल्यास(प्रति हेक्टरी 6000/- रुपये अनुदान)
संस्थांनी कृषी ड्रोन चे प्रात्यक्षिक राबविल्यास3000/- रुपये अनुदान
अवजारे सेवा सुविधा केंद्रांना ड्रोन खरेदी करताना50 टक्के अनुदान (5 लाखांपर्यंत)
कृषी पदवीधारकाने अवजारे सेवा केंद्र सुरु केल्यास5 लाखांपर्यंत अनुदान

कृषी ड्रोन अनुदान योजनेची पात्रता

  • अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असणे आवश्यक आहे
  • कृषी विज्ञान केंद्रे,शेतकरी उत्पादन संस्था, कृषी विद्यापीठ, भारतीय कृषी संशोधन परिषद संस्था, कृषी यंत्रे व अवजारे तपासणी संस्था इत्यादी या योजनेसाठी पात्र असतील

कृषी ड्रोन अनुदान योजनेच्या अटी

  • फक्त महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ दिला जातील.
  • अर्जदार कृषी पदवीधारक असल्यास कृषी पदवी सादर करणे आवश्यक
  • अर्जदाराने या आधी केंद्र किंवा सरकार द्वारे सुरु एखाद्या योजनेअंतर्गत ड्रोन अनुदानाचा लाभ घेतला असेल तर अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
  • अर्जदार शेतकरी सरकारी नोकर नसावा.
  • एका घरातील फक्त एकाच व्यक्तीस कृषी ड्रोन अनुदान योजनेचा लाभ दिला जाईल.
  • कृषी ड्रोन अनुदान योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी शेतकऱ्याकडे स्वतःची शेतजमीन असणे आवश्यक आहे.
  • अर्जदार शेतकऱ्याचे आधारकार्ड बँक खात्याशी लिंक असणे आवश्यक आहे.

कृषी ड्रोन अनुदान योजनेअंतर्गत अर्जदारास खालील प्रकारे अटी मान्य असणे आवश्यक आहे

  1. ड्रोन ची खरेदी किमतीची पुर्ण रक्कम भरुन खुल्या बाजारातुन ड्रोन व इतर उपकरणे ची खरेदी करण्यास संस्था तयार आहे.
  2. ड्रोन आधारित सेवा सुविधा केंद्र स्थापनेकरीता बॉन्ड पेपरवर हमीपत्र सादर करणे बंधनकारक आहे, याची मला जाणीव आहे.
  3. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी ठरवून दिलेल्या माफक भाडेतत्वावर ड्रोन आधारित सेवा सुविधा केंद्र सेवा-सुविधा पुरविण्यास आमची तयारी आहे.
  4. अनुदानाची रक्कम माझे आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट जमा केली जाईल याची मला कल्पना आहे, त्याकरीता मी माझे बँक खाते आधार क्रमांकाशी जोडलेले आहे.
  5. मी ड्रोन व इतर उपकरणे खुल्या बाजारातुन माझ्या पसंतीने खरेदी करणार असल्याने ड्रोन व इतर उपकरणे गुणवत्तेची सर्वस्वी जबाबदारी माझी राहील याची मला जाणीव आहे.
  6. तसेच यापुर्वी मी उपरोक्त प्रस्तावासाठी किंवा त्याच्या काही भागासाठी कोणत्याही शासकीय/निमशासकीय यंत्रणेकडून अनुदान/आर्थिक मदत घेतलेली नाही.
  7. ड्रोन व इतर उपकरणे खरेदीकरीता पुर्वसंमती मिळाल्यानंतर एक महिन्याच्या कालावधीत औजारे/यंत्रांची खुल्या बाजारातुन खरेदी करणे आवश्यक आहे, अन्यथा प्रदान केलेली पुर्वसंमती रद्द होईल, याची मला जाणीव आहे.
  8. मला ड्रोन व इतर उपकरणे खरेदीकरीता पुर्वसंमती मिळाल्यानंतर ड्रोन व इतर उपकरणे खुल्या बाजारातुन खरेदी करताना संस्थेच्या बॅन्क खात्यातुन इलेक्ट्रॉनिक पध्दतीने(आर.टी.जी.एस. ईत्यादी)/धनादेश/धनाकर्षाद्वारे विक्रेत्यास रक्कम अदा करणे बंधनकारक आहे, याची मला जाणीव आहे
  9. ड्रोन आधारित सेवा सुविधा केंद्र -सेवा-सुविधा पुरविण्यासाठी आवश्यक अनुभव, प्रशिक्षीत, अनुभवी व पुरेसे मनुष्यबळ असणे, यंत्रसामुग्री व उपकरणे सुरक्षीत व सुस्थितीत ठेवण्यासाठी आवश्यक जागा व शेडची व्यवस्था असणे बंधनकारक राहील. सर्व यंत्रसामुग्री व उपकरणे संबंधीतांनी माफक भाडे तत्वावर उपलब्ध करुन त्यांच्या सेवा शेतक-यांना वेळोवेळी पुरविणे बंधनकारक राहील.
  10. संस्थेने ड्रोन आधारित सेवा सुविधा केंद्र सेवा-सुविधा शेतक-यांना पुरविल्याबाबत आवश्यक अभिलेख ठेवणे व त्याचा नियमीत अहवाल सादर करणे बंधनकारक राहील. तसेच, याबाबत तपासणीच्या वेळी सर्व यंत्रसामुग्री/उपकरणे व अभिलेख सादर करणे बंधनकारक राहील.
  11. सदर कार्यक्रमांतर्गत पुरविण्यात येणा-या यंत्रसामग्री व उपकरणे यांची नियमीत देखभाल व दुरुस्ती करण्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधीत लाभधारक संस्थेची राहील, संबंधीत सेवा-सुविधा केंद्रे व्यवस्थित चालविणे व वेळोवेळी त्यात सुधारणा करण्याची तयारी असणे आवश्यक राहील,
  12. Ministry of Civil Aviation ,CIB&RC यांचेकडील मार्गदर्शक सूचना प्रमाणे कार्यवाही करणे बंधनकारक राहील
  13. केंद्र शासनाच्या कृषी विभागाच्या SOP प्रमाणे कार्यवाही करणे आवश्यक राहील.

कृषी ड्रोन अनुदान योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड/फोटो असलेल्या ओळखपत्राची स्वयंसाक्षांकित प्रत
  • राशन कार्ड
  • रहिवाशी प्रमाणपत्र
  • ईमेल आयडी
  • मोबाईल नंबर
  • पासपोर्ट साईज फोटो
  • बँक पासबुकाच्या पहिल्या पृष्ठाची छायांकित प्रत / रद्द केलेला धनादेश
  • खरेदी करावयाच्या ड्रोन चे कोटेशन/विक्रेत्याची संपूर्ण माहिती
  • संस्थेचे नोंदणी प्रमाणपत्र
  • अधिकृत रिमोट पायलट ट्रैनिंग संस्थेकडील प्रशिक्षण घेतलेल्या रिमोट पायलट परवाना धारक चालकाचे नाव व तपशील
  • कृषी पदवी
  • संस्थेचे नोंदणी प्रमाणपत्र
  • संस्थेशी संबंधीत व्यक्तीच्या बॅन्क खात्यात अनुदान जमा करण्यास संस्थेने प्राधीकृत केले असल्यास प्राधीकृत केल्याचे पत्र.
  • अधिकृत रिमोट पायलट ट्रेनिंग संस्थेकडील प्रशिक्षण घेतलेल्या रिमोट पायलट परवाना धारक चालकाचे नाव व तपशील (कागदपत्रे जोडण्यात यावी)
  • अर्जदार संस्था असल्यास संस्थेचा पुरावा
  • स्वयं घोषणापत्र
  • पूर्व संमतीपत्र

कृषी ड्रोन अनुदान योजनेसाठी अर्ज करण्याची पद्धत

  • अर्जदारास सर्वात प्रथम आपल्या जिला कार्यालयात कृषी विभागात जावे लागेल.
  • कार्यालयातून कृषी ड्रोन अनुदान योजनेचा अर्ज घ्यावा लागेल.
  • अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून आवश्यक ती कागदपत्रे जोडावी लागतील व सदर अर्ज जमा करावा लागेल.
  • अशा प्रकारे तुमची या योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.

महाराष्ट्र शासनाच्या इतर योजना

आंतरजातीय विवाह अनुदान महाराष्ट्र शासन PDF
ई पीक पाहणी
ई पीक पाहणी नोंदणी
महाज्योती फ्री टॅबलेट योजना
अहिल्यादेवी सिंचन विहीर योजना
दोन मुलींसाठी योजना
लहान मुलींसाठी योजना
रोजगार संगम योजना
बचत गटाचे फायदे
बचत गटाचे नियम
महिला बचत गट नावे
महिला बचत गट नोंदणी अर्ज
बचत गट ठराव नमुना PDF
पुरुष बचत गट नावे
शिवभोजन योजना
पिवळ्या रेशन कार्ड चे फायदे
ग्रामीण कुटीर उद्योग
चंदन कन्या योजना
शेतकरी योजना
बॅच बिल्ला काढण्याची पद्धत
जलयुक्त शिवार योजना
पारंपारिक वस्त्रोद्योग विणकरांना बक्षीस योजना
अण्णासाहेब पाटील कर्ज योजना
अण्णासाहेब पाटील महामंडळ कर्ज योजना कागदपत्रे
लेक लाडकी योजना
कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना
मिनी ट्रॅक्टर व त्यांची उपसाधने यांचा पुरवठा करणे ची योजना
राजे यशवंतराव होळकर महामेष योजना
विहीर अनुदान योजना
मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजना
महिला सन्मान योजना
महाराष्ट्र मुख्यमंत्री किसान योजना
निर्धूर चुल वाटप योजना
Baby Care Kit Yojana
महिला बचत गट समृद्धी कर्ज योजना
थेट कर्ज योजना
प्रधानमंत्री पीक विमा योजना
चर्मकार समाज योजना
गाय म्हैस शेळी मेंढी पालन अनुदान योजना
अटल बांबू समृद्धी योजना
महिला स्वयंसिद्धी व्याज परतावा योजना
मध केंद्र योजना
राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना
शौचालय अनुदान योजना
जिव्हाळा कर्ज योजना
डिजल पंप सब्सिडी योजना
मल्चिंग पेपर योजना
राष्ट्रीय वयोश्री योजना
खावटी अनुदान योजना
मुख्यमंत्री रोजगार निर्मिति योजना
शबरी घरकुल योजना
प्रधानमंत्री मुद्रा योजना
पंडित दिनदयाळ उपाध्याय स्वयंम योजना
वसंतराव नाईक कर्ज योजना
कृषी ड्रोन अनुदान योजना
बांधकाम कामगार योजना
संजय गांधी निराधार योजना
आचार्य बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजना
सायकल वाटप योजना
वीरभद्रकाली ताराराणी स्वयंसिद्धा योजना
प्रधानमंत्री स्वामित्व योजना
प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना
रुफटॉप सोलर योजना
श्रावणबाळ अनुदान योजना
सैनिक शाळेतील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता योजना 
गटई स्टॉल योजना
राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना
प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना
प्रधानमंत्री जीवन ज्योति बीमा योजना
गाय गोठा अनुदान योजना
डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना
शेळी मेंढी पालन योजना
ट्रॅक्टर अनुदान योजना
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना
सुकन्या समृद्धी योजना
प्रधानमंत्री मातृ वंदना योजना
किशोरी शक्ती योजना
माझी कन्या भाग्यश्री योजना
बाल संगोपन योजना
फ्री सिलाई मशीन योजना
पीएमसी महिला आणि बालकल्याण योजना
रमाई घरकुल योजना
महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजना
पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा
युवकांना विविध व्यावसायिक प्रशिक्षण योजना
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मोफत सायकल वाटप योजना
अपंग बस सवलत योजना
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना
आंतरजातीय विवाह योजना
मोटार वाहन चालक प्रशिक्षण योजना
कोरोना मृतांच्या नातेवाईकांना 50 हजारांची मदत
शैक्षणिक कर्ज योजना
आम आदमी विमा योजना
महाडीबीटी शिष्यवृत्ती
सावित्रीबाई फुले स्कॉलरशिप
पॅन कार्ड क्लब क्लेम करण्याची पद्धत
प्रधानमंत्री किसान हेल्पलाईन नंबर
पोस्ट ऑफिस ग्राम सुरक्षा योजना
दहीहंडी विमा योजना
शरद पवार इन्स्पायर फेलोशिप
विद्याधन स्कॉलरशिप
मेडले फार्मा शिष्यवृत्ती
इंडिया स्माइलिंग फाउंडेशनल शिष्यवृत्ती कार्यक्रम
मुख्यमंत्री अप्रेंटिसशिप योजना
एचडीएफसी लिमिटेड बढते कदम शिष्यवृत्ती
मर्क इंडिया चॅरिटेबल ट्रस्ट शिष्यवृत्ती कार्यक्रम

Join WhatsApp Group!