बचत गटाचे फायदे

बचत गटाचे फायदे

 • बचत गटामुळे महिलांचे किंवा पुरुषांचे संघटन होऊन त्यांना पैशाचा वापर तसेच पैशाची गुंतवणूक कशी करायची याची माहिती मिळते.
 • एखाद्या वाईट परिस्थितीमध्ये अडचणीच्या काळात पैशासाठी साहुकाराकडून जास्त व्याज दराने कर्ज घेण्याची गरज भासत नाही साहुकाराकडून फसवणूक होत नाही.
 • बँक व्यवहाराचे ज्ञान होते.
 • एखाद्या कामासाठी आवश्यक पैशाची कमी व्याजदराने उपलब्धता होते.
 • बचत गटामुळे गटातील सदस्यांमध्ये एकमेकांना सहकार्य करण्याची भावना आणि एकमेकांमध्ये विश्वास निर्माण होतो.
 • बचत गटांमुळे महिलांना चूल व मूल या संकल्पनेतून बाहेर पडून नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळते.
 • महिलांचे जीवनमान सुधारण्यास मदत होते.
 • महिलांचा सामाजिक तसेच आर्थिक विकास होतो.
 • बचत गटामुळे शासनाद्वारे सुरु करण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवता येतो (उदा. मेहंदी कोर्स, केक बनविण्याचा कोर्स, MSCIT कोर्से, पार्लर कोर्से इत्यादी)
 • बचत गट हे व्यक्तींना एकत्र आणून विचार करायला माध्यम आहे. तसेच गटाच्या माध्यमातून सावकार आदी शोषक घटकांपासून दूर राहणे सहज शक्य होईल.
 • विविध व्यक्तींना एकत्र घेऊन परस्परांशी सुखदुःखांशी देवाण-घेवाण करणे शक्य होते.
 • बचत गटामुळे व्यक्तींना बचतीची तर सवय लागतेच तसेच परस्पर माध्यमातून गरजेनुसार एकमेकांना आर्थिक सहाय्य करून दैनंदिन अडचणी सोडविता येतात.
 • व्यक्तींना विविध प्रश्नांची जाणीव होते व प्रश्न सोडविण्यासाठी ते प्रयत्नशील राहतात.
 • एक व्यक्ती म्हणून जगताना स्वतःचे स्थान निर्माण करण्यासाठी स्वयंसहाय्यता गटाची भूमिका महत्वाची ठरते.
 • स्वयंसहाय्यता गट हे व्यक्तींना स्वावलंबनाचे, मानसिक, आर्थिक, वैचारिक व सामाजिक प्रगती साधण्याचे माध्यम आहे.
 • बचत गटामुळे माणसे एकत्र आल्यामुळे एकमेकांशी मोकळी चर्चा करण्याकरीता व्यासपीठ तयार होते.
 • विचारांची, अनुभवांची देवाण-घेवाण करण्याकरीता एक साधन निर्माण होते.
 • व्यक्तींमध्ये जाणीव, जागृती निर्माण होते.
 • बचतीची सवय लागते.
 • आत्मशक्तीची जाणीव तसेच आत्मसाक्षरतेची जाणीव होते.
 • व्यक्तींना बचतीसाठी प्रोत्साहन मिळते.
 • व्यक्ती स्वयंपूर्ण होतात..
 • व्यक्तींना लघु कर्ज उपलब्ध करून दिले जाते.
 • व्यक्तींना रोजगारासाठी नवीन संधी उपलब्ध होतात. [बचत गटाचे फायदे]

 • युवकांना स्वतःचा उद्योग सुरु करण्यासाठी राज्य सरकार देत आहे 1 लाखाचे कर्ज त्यासाठी वाचा थेट कर्ज योजना
 • स्वतःचा व्यवसाय सुरु करू इच्छिणाऱ्या नागरिकांना सरकार देत आहे 1 लाख रुपयांचे कर्ज त्यासाठी वाचा वसंतराव नाईक कर्ज योजना

सारांश

आम्ही आशा करतो कि आपल्याला बचत गटाचे फायदे याची सर्व माहिती मिळाली आहे तसेच तुमचे काही प्रश्न असल्यास आम्हाला कंमेंट्स किंवा ई-मेल द्वारे नक्की कळवा. [बचत गटाचे फायदे]