Lek Ladki Yojana Marathi

राज्यातील मुलींना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्याच्या उद्देशाने सुरु करण्यात आलेली एक महत्वाची अशी एक योजना आहे.

आज देखील समाजात मुलींना मुलांपेक्षा कमी महत्व दिले जाते त्यामुळे मुलींची भ्रूणहत्या केली जाते तसेच मुलींच्या शिक्षणाला कमी महत्व दिले जाते व मुलींना कुटुंबाचे ओझे समजले जाते. त्यामुळे राज्यातील मुलींच्या या सर्व समस्यांचा विचार करून समाजात मुलींबद्दल असलेले नकारात्मक विचार बदलून ते सकारात्मक करण्याच्या दृष्टीने तसेच मुलींच्या सक्षमीकरणासाठी तसेच त्यांना शिक्षणासाठी सशक्त व आत्मनिर्भर बनविण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र शासनाने लेक लाडकी योजना सुरु करण्याचा एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

या योजनेअंतर्गत राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील प्रत्येक मुलीला 98 हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे. [Lek Ladki Yojana Marathi]

वाचकांना विनंती

आम्ही लेक लाडकी योजना ची संपूर्ण माहिती या लेखात दिली आहे त्यामुळे तुम्ही हा लेख शेवट पर्यंत वाचा व या योजनेचा लाभ मिळवा जर तुमच्या परिसरात आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील ज्या कोणी मुली असतील तर त्यांना या योजनेची माहिती अवश्य द्या किंवा आमचे हे आर्टिकल त्यांना शेयर करा जेणेकरून ते या योजनेचा लाभ घेऊ शकतील.

योजनेचे नावलेक लाडकी योजना
राज्यमहाराष्ट्र
विभागसामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग
लाभार्थीआर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील मुली
लाभ1,01,000/- रुपयांचे आर्थिक सहाय्य
उद्देश्यमुलींचा सामाजिक तसेच आर्थिक विकास करणे.
अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन / ऑफलाईन

लेक लाडकी योजना चे उद्दिष्ट

 • राज्यातील मुलीचे सक्षमीकरण करून त्यांना स्वावलंबी व आत्मनिर्भर करणे हा या योजनेचा उद्देश्य आहे.
 • लेक लाडकी योजना अंतर्गत राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील मुलींचा सामाजिक तसेच आर्थिक विकास करणे.
 • मुलींना सशक्त व आत्मनिर्भर बनविणे.
 • राज्यातील मुलींचा सर्वागीण विकास करणे.
 • मुली शिक्षणासाठी स्वतःच्या पायावर उभे करणे.
 • मुलींचे जीवनमान सुधारणे.
 • मुलींना समाजात मानाचे स्थान मिळवून देणे.
 • मुलींना स्वावलंबी बनविणे.
 • समाजात मुलींबद्दल असलेले नकारात्मक विचार बदलून मुलींबद्दल सकारात्मक विचार निर्माण करणे.
 • मुलींना आर्थिक दृष्ट्या बळकट करणे हे या योजनेमागचे प्रमुख उद्दिष्ट्य आहे.
 • मुलींना आर्थिक सहाय्य करून त्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देणे तसेच शिक्षणाची आवड निर्माण करणे.
 • मुलींना शिक्षणासाठी पैशांसाठी इतर कोणावर अवलंबून राहण्याची गरज भासू नये या उद्देशाने लेक लाडकी योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
 • आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबाला आपल्या मुलीच्या शिक्षणासाठी कोणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता भासू नये तसेच कोणाकडून जास्त व्याज दराने कर्ज घेण्याची गरज भासू नये या उद्देशाने या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे. [Lek Ladki Yojana Marathi]
Lek Ladki Yojana Marathi

लेक लाडकी योजना चे वैशिष्ट्य

 • महाराष्ट्र शासनाद्वारे सुरु करण्यात आलेली लेक लाडकी योजना एक महत्वाची अशी एक योजना आहे.
 • राज्यातील मुलींच्या जीवनात बदल घडवून आणण्यासाठी लेक लाडकी योजना महत्वपूर्ण ठरेल.
 • योजनेअंतर्गत राज्यातील मुलींची सामाजिक तसेच आर्थिक स्थिती उंचावण्यास मदत होईल.
 • या योजनेअंतर्गत अर्ज करण्याची पद्धत अत्यंत सोपी ठेवण्यात आलेली आहे जेणेकरून मुलींना कर्ज करताना कुठल्याच समस्येचा सामना करावा लागणार नाही.
 • मुलींचा आत्मविश्वास वाढण्यास तसेच तो उंचावण्यास मदत होईल.
 • आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबाला मुलीच्या शिक्षणाचा, पालनपोषणाचा आणि इतर खर्च करणे सोपे होणार आहे
 • राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील मुलींचे जीवनमान सुधारण्यासाठी तसेच त्यांना सशक्त व आत्मनिर्भर बनविण्यासाठी तसेच त्यांचा सामाजिक व आर्थिक विकास करण्यासाठी हि योजना महत्वाची ठरणार आहे.
 • या योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया ऑनलाईन ठेवण्यात आली आहे जेणेकरून अर्जदार पालकांना अर्ज करण्यासाठी कुठल्याच सरकारी कार्यालयाच्या फेऱ्या मारण्याची आवश्यकता भासणार नाही जेणेकरून त्यांचा वेळ आणि पैसा दोघांची बचत होईल.
 • योजनेअंतर्गत दिली जाणारी लाभाची रक्कम लाभार्थी मुलीच्या बँक खात्यात DBT च्या सहाय्याने जमा करण्यात येते. [Lek Ladki Yojana Marathi]
 • स्वतःचे घर बांधण्यासाठी राज्य सरकार देत आहे 2 लाखांचे आर्थिक सहाय्य त्यासाठी वाचा शबरी घरकुल योजना

लेक लाडकी योजना ची माहिती व योजनेअंतर्गत दिले जाणारे अर्थसहाय्य

टप्पारक्कम
मुलीच्या जन्मानंतर5,000/- रुपये
मुलगी इयत्ता 1ली मध्ये गेल्यावर6,000/- रुपये
मुलगी 6वी मध्ये गेल्यावर7,000/- रुपये
मुलगी 11वी मध्ये गेल्यावर8000/- रुपये
मुलगी 18 वर्षाची झाल्यावर75,000/- रुपये
एकूण लाभ राशी1,01,000/- रुपये

Lek Ladki Yojana Marathi चे लाभार्थी

 • आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील (पिवळा व केशरी रेशनकार्ड धारक) मुली लेक लाडकी योजना चा लाभ मिळवण्यासाठी पात्र आहेत.
Lek Ladki Yojana Marathi news

लेक लाडकी योजना चा लाभ

 • लेक लाडकी योजना अंतर्गत राज्यातील आर्थिक दृष्ट्या सर्व मुलींना 98 हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य करण्यात येते जेणेकरून मुली आपले शिक्षण पूर्ण करू शकतील.
 • या योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या आर्थिक सहाय्यामुळे मुली स्वतःचे शिक्षण पूर्ण करू शकतील व त्यांना शिक्षणासाठी पैशांसाठी कोणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता भासणार नाही तसेच कोणाकडून जास्त व्याज दराने कर्ज घेण्याची आवश्यकता भासणार नाही.
 • राज्यातील मुली या योजनेच्या सहाय्याने सशक्त व आत्मनिर्भर बनतील.
 • राज्यातील मुलींचा सामाजिक तसेच आर्थिक विकास होईल.
 • राज्यातील मुलींचे जीवनमान सुधारेल.
 • मुली स्वावलंबी बनतील
 • मुली शिक्षणासाठी स्वतःच्या पायावर उभ्या राहतील
 • राज्यात भ्रूणहत्या थांबेल.
 • समाजात मुलींबद्दल असलेले नाकारात्म विचार बदलतील व मुलींबद्दल सकारात्मक विचार निर्माण होईल.
 • मुलींचा आत्मविश्वास वाढेल.
 • मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळेल. [Lek Ladki Yojana Marathi]

लेक लाडकी योजना अंतर्गत आवश्यक पात्रता

 • अर्जदार मुलीचे कुटुंब महाराष्ट्र राज्यातील मूळ रहिवाशी असणे आवश्यक आहे.
 • विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण पूर्ण करता यावे यासाठी सरकार देत आहे 10 लाखांचे कर्ज त्यासाठी वाचा शैक्षणिक कर्ज योजना
 • मुलींना शारीरिक व मानसिक दृष्ट्या प्रबळ बनविण्यासाठी सरकार ने सुरु केली आहे किशोरी शक्ती योजना

लेक लाडकी योजना चे नियम व अटी

 • फक्त महाराष्ट्र राज्यातील मुलींनाच लेक लाडकी योजनेचा लाभ दिला जाईल.
 • महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील मुलींना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
 • फक्त पिवळे व केशरी रेशन कार्ड धारक कुटुंबातील मुलींनाच या योजनेचा लाभ दिला जाईल.
 • अर्जदार मुलीचे कुटुंब आर्थिक दृष्ट्या गरीब असणे आवश्यक आहे.
 • लाभार्थी बँक खाते महाराष्ट्र राज्यात असणे आवश्यक आहे.
 • फक्त मुलींनाच या योजनेचा लाभ दिला जाईल.
 • कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम 1 लाखापेक्षा जास्त नसावे.
 • मुलांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
 • पांढरे रेशनकार्ड असलेल्या कुटुंबातील मुलींना लेक लाडकी योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
 • अर्जदार मुलीला स्वतःच्या बँक खात्याचा तपशील देणे आवश्यक आहे तसेच कुटुंबातील इतर कोणाच्या बँक खात्याचा तपशील मान्य नसेल.
 • अर्जदार मुलीचे आई किंवा वडील किंवा कुटुंबातील इतर कोणी सदस्य सरकारी सेवेत कार्यरत असता कामा नये.
 • अर्जदार मुलीने या आधी केंद्र किंवा राज्य शासनाद्वारे सुरु एखाद्या योजनेचा लाभ घेतला असेल किंवा घेत असेल तर अशा परिस्थितीत त्या मुलीला लेक लाडकी योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
 • अर्जात खोटी माहिती भरून मुलगी लाभ मिळवत असेल आणि हि बाब शासनाच्या लक्षात आल्यास अशा मुलीला या योजनेमधून रद्द केले जाईल व कुटुंबाकडून लाभाची रक्कम वसूल करण्यात येईल.
 • पिवळ्या व केशरी शिधापत्रिकाधारक कुटुंबामध्ये दिनांक 1 एप्रिल 2023 रोजी वा त्यानंतर जन्माला येणाऱ्या एक अथवा दोन मुलींना लागू राहील. तसेच, एक मुलगा व एक मुलगी असल्यास मुलीला लागू राहील.
 • दिनांक 1 एप्रिल, 2023 पूर्वी एक मुलगी / मुलगा आहे व त्यानंतर जन्माला आलेल्या दुसऱ्या मुलीस किंवा जुळ्या मुलींना (स्वतंत्र) ही योजना अनुज्ञेय राहील. मात्र माता / पित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक राहील.
 • पहिल्या अपत्याच्या तिसऱ्या हप्त्यासाठी व दुसऱ्या अपत्याच्या दुसऱ्या हप्त्यासाठी अर्ज सादर करतेवेळी माता/पित्याने कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य राहील.
 • दुसऱ्या प्रसुतीच्या वेळी जुळी अपत्ये जन्माला आल्यास एक मुलगी किंवा दोन्ही मुलींना या योजनेचा लाभ अनुज्ञेय राहील. मात्र त्यानंतर माता / पित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक राहील. [Lek Ladki Yojana Marathi]
Lek Ladki Yojana Marathi

लेक लाडकी योजना अंतर्गत आवश्यक कागदपत्रे

 • मुलीचे आधार कार्ड
 • रेशन कार्ड
 • रहिवाशी दाखला
 • मुलीचे बॅक खाते पासबुक परंतु मुलीचे बँक खाते नसल्यास अशा परिस्थितीत तिच्या आईवडिलांचे बँक खात्याचा तपशील
 • मोबाईल नंबर
 • ई-मेल आयडी
 • पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड
 • पासपोर्ट साईज फोटो
 • जन्म प्रमाण पत्र
 • मतदान ओळखपत्र (शेवटच्या लाभाकरिता 18 वर्ष पूर्ण झाल्यांनतर मुलीचे मतदार यादीत नाव असल्याचा दाखला)
 • संबधित टप्प्यावरील लाभाकरिता शिक्षण घेत असल्याबाबतचा संबंधित शाळेचा दाखला (Bonafied)
 • कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र
 • अंतिम लाभाकरिता मुलीचा विवाह झालेला नसणे आवश्यक राहील, (अविवाहीत असल्याबाबत लाभार्थीचे स्वयं घोषणापत्र)

लेक लाडकी योजना अंतर्गत काही महत्वाच्या गोष्टी

 • सदर योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना विविध टप्प्यावर देण्यात येणारा लाभ थेट लाभार्थी हस्तांतरण (DBT) द्वारे देण्यात येईल. त्याकरिता महिला व बाल विकास विभाग स्तरावरून निश्चित करण्यात आलेल्या बँकेमध्ये आयुक्तालय स्तरावर खाते उघडण्यात येऊन त्यामधून पोर्टलप्रमाणे लाभार्थ्यांना लाभ अनुज्ञेय करण्याकरिता ग्रामीण क्षेत्राच्या बाबतीत जिल्हा कार्यक्रम अधिकारी (महिला व बाल विकास), जिल्हा परिषद यांना तर नागरी क्षेत्राच्या बाबतीत बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) यांना आवश्यक निधी वर्ग करण्यात येईल व ते थेट लाभार्थी हस्तांतरण (DBT) द्वारे लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करतील. त्याकरिता लाभार्थी व माता यांचे संयुक्त बँक खाते उघडणे अनिवार्य राहील. एखाद्या प्रकरणी मातेचा मृत्यू झालेला असल्यास लाभार्थी व पिता यांचे संयुक्त खाते उघडण्यात यावे. मात्र, अशा प्रकरणात अर्ज सादर करतांना मातेचे मृत्यू प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील. अनाथ मुलींना लाभ देताना विभागाच्या इतर योजनांचा लाभ ज्या पध्दतीने त्यांना देण्यात येतो, त्याप्रमाणे कार्यवाही करावी.
 • एखादे लाभार्थी कुटुंब या योजनेमधील एक अथवा काही टप्प्यांचा लाभ घेतल्यानंतर राज्यातील अन्य जिल्ह्यात स्थलांतरीत झाले असेल तर पुढील टप्प्यातील लाभ अनुज्ञेय होण्याकरिता त्यांनी स्थलांतर झालेल्या जिल्ह्यातील एकात्मिक बाल विकास सेवा योजनेतील अधिकारी यांचेकडे अर्ज सादर करावा. सदर अर्जाची संबंधित अधिका-यांनी छाननी करून पात्र ठरत असल्यास राज्य कक्षाकडे शिफ़ारस करावी व राज्य कक्षाकडून अंतिम निर्णय घेण्यात यावा. त्याचप्रमाणे एखादे लाभार्थी कुटुंब या योजनेमधील एक अथवा काही टप्प्यांचा लाभ घेतल्यानंतर राज्याबाहेर स्थलांतरित झाले असल्यास त्यांनी थेट राज्य कक्षाकडे अर्ज सादर करावा व राज्य कक्षाने याबाबत अंतिम निर्णय घ्यावा.
 • या योजनेतील लाभार्थ्यांची पोर्टलवर नोंदणी होऊन योजना सुरळीत कार्यान्वित राहण्याकरीता तसेच पोर्टलचे संचालन, अर्ज Digitized पध्दतीने जतन करणे, पोर्टल वेळोवेळी अद्ययावत करणे याकरिता एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालय स्तरावर कक्ष निर्माण करण्यास व त्यामध्ये 10 तांत्रिक मनुष्यबळाची नियुक्ती करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे. त्यानुसार विहित पध्दतीने तांत्रिक मनुष्यबळाची नियुक्ती करण्यात यावी.
 • सदर योजना सुरू झाल्यापासून 5 वर्षांनंतर योजनेचे मुल्यमापन करून योजना पुढे सुरू ठेवण्याबाबत अथवा सुधारणेसह राबविण्याबाबत निर्णय घेण्यात येईल.
 • दिनांक 1 एप्रिल 2023 अगोदर जन्मलेल्या मुलीस माझी कन्या भाग्यश्री (सुधारित) योजनेच्या अटी व शर्तीनुसार लाभ दिला जाईल. मात्र, त्याकरिता अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक 31 डिसेंबर 2023 राहील, तदनंतरचे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. [Lek Ladki Yojana Marathi]

लेक लाडकी योजना अंतर्गत अर्ज रद्द होण्याची कारणे

 • अर्जात खोटी माहिती भरल्यास अर्ज रद्द केला जाईल.
 • दोन वेळा अर्ज केल्यास एक अर्ज रद्द केला जाईल.
 • कुटुंबातील कोणी सदस्य सरकारी कार्यालयात कार्यरत असल्यास
 • कुटुंबाकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड नसल्यास
 • अर्जदार मुलीचे कुटुंब आर्थिक दृष्ट्या गरीब नसल्यास
 • मुलगी या आधी केंद्र सरकार किंवा राज्य शासनाद्वारे सुरु एखाद्या योजनेचा लाभ मिळवत असल्यास अशा परिस्थितीत अर्ज रद्द केला जाईल. [Lek Ladki Yojana Marathi]

लेक लाडकी योजना अंतर्गत अर्ज करण्याची पद्धत

पहिले चरण

 • अर्जदारास सर्वात प्रथम शासनाच्या अधिकृत वेबसाईट वर जावे लागेल.
 • होम पेज वर Registration वर क्लिक करावे लागेल.
 • आता तुमच्यासमोर एक रेजिस्ट्रेशन पेज उघडेल त्यामध्ये तुंम्हाला तुमचा मोबाईल नंबर तसेच पासवर्ड टाकून रेजिस्ट्रेशन करावे लागेल.
 • अशा प्रकारे तुमची रेजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण होईल.

दुसरे चरण

 • होम पेज वर लेक लाडकी योजनेवर क्लिक करावे लागेल.
 • आता तुमच्यासमोर लेक लाडकी योजनेचा अर्ज उघडेल त्यामध्ये विचारलेली सर्व माहिती भरावी लागेल.
 • सर्व माहिती भरून झाल्यावर तुम्हाला विचारलेली कागदपत्रे अपलोड करावी लागतील.
 • कागदपत्रे अपलोड करून झाल्यावर तुम्हाला Save बटनावर क्लिक करावे लागेल.
 • अशा प्रकारे तुमची या योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल. [Lek Ladki Yojana Marathi]

लेक लाडकी योजना अंतर्गत ऑफलाईन अर्ज करण्याची पद्धत

 • अर्जदाराला सर्वात प्रथम आपल्या क्षेत्रातील जिल्हा कार्यालयात महिला व बाल विकास विभागात जावे लागेल व लेक लाडकी योजनेचा अर्ज घ्यावा लागेल.
 • अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून सोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी लागतील.
 • भरलेला अर्ज सदर कार्यालयात जमा करावा लागेल.
 • अशा प्रकारे तुमची लेक लाडकी योजनेअंतर्गत ऑफलाईन अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.
 • स्वतःचे घर बांधण्यासाठी सरकार देत आहे 2.5 लाखाचे आर्थिक अनुदान त्यासाठी वाचा रमाई घरकुल योजना
 • सरकार ने मुलींच्या उज्वल भविष्यासाठी सुरु केली आहे एक महत्वपूर्ण अशी योजना त्यासाठी वाचा सुकन्या समृद्धी योजना
Telegram GroupJoin
लेक लाडकी योजना माहिती pdfClick Here
Lek Ladki Yojana Form PDFClick Here
लेक लाडकी योजना फॉर्म मराठीClick Here
लेक लाडकी योजना शासन निर्णयClick Here

सारांश

आशा करतो कि आपल्याला लेक लाडकी योजना ची सर्व माहिती प्राप्त झाली आहे तरी देखील आपले योजनेसंबंधी काही प्रश्न असल्यास मला ई-मेल किंवा कंमेंट्स च्या माध्यमातून जरूर कळवा आम्ही तुमच्या प्रश्नांची लवकरात लवकर उत्तरे देण्याचा प्रयत्न करू आणि जर तुम्हाला या योजनेची माहिती उपयुक्त वाटली असेल तर तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा जेणेकरून तुमचे मित्र देखील या योजनेचा लाभ घेऊ शकतील. [Lek Ladki Yojana Marathi]