आपल्या देशातील बहुतांश लोकसंख्या ही गरीब व दारिद्य्र रेषेखालील आहे त्यामुळे विमा काढणे व त्याचा प्रीमियम भरणे प्रत्येक नागरिकांना परवडण्यासारखे नसते त्यामुळे देशातील बहुतांश लोकांचा विमा काढलेला नसतो ह्या सर्व बाबी लक्षात घेऊन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मे 2015 रोजी देशातील प्रत्येक गरीब नागरिकांना कमी पैशात विमा संरक्षण देण्यासाठी प्रधानमंत्री जीवन ज्योति विमा योजनेची सुरुवात केली.
या योजनेचा लाभ देशातील गरिबांना घेता येईल या उद्देशाने या योजनेची सुरुवात केली गेली ही योजना देशातील गरीब / दारिद्र रेषेखालील लोकांसाठी एक महत्त्वाची विमा योजना आहे या योजनेअंतर्गत वर्षाला केवळ 330/- रुपये भरून 2 लाखाचे विमा संरक्षण दिला जाणार आहे
या योजनेअंतर्गत लाभार्थी सरकारी किंवा खासगी कंपनीच्या माध्यमातून स्वतःचा विमा उतरवू शकतो या योजनेत सहभागी झालेल्या 18 ते 55 वर्षाच्या व्यक्तीचा कोणत्याही कारणामुळे मृत्यू झाल्यास त्या व्यक्तीच्या वारसांना 2 लाख रुपये दिले जातात
एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबातील लोकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो कारण मृत व्यक्तीने कोणत्याच प्रकारचा भविष्य विमा काढलेला नसतो या सर्वाचा विचार करून भारत सरकारने देशातील लोकांच्या भविष्याचा विचार करून प्रत्येकाला परवडेल अशी एक विमा योजनेची सुरुवात केली आहे ज्याचा लाभ देशातील कोणतीही व्यक्ती घेऊ शकते. जे व्यक्ती त्यांच्या मृत्यूनंतर परिवाराला एखादी आर्थिक मदत देऊ इच्छितात त्यांच्यासाठी ही एक उपयुक्त योजना आहे.
योजनेचे नाव | Pradhanmantri Jeevan Jyoti Bima Yojana |
योजनेची सुरुवात | 2015 |
राज्य | महाराष्ट्र |
लाभार्थी | देशातील नागरिक |
लाभ | आर्थिक सहाय्य |
योजनेचा उद्देश | देशातील गरीब लोकांना विमा संरक्षण देणे |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
प्रधानमंत्री जीवन ज्योति बीमा योजनेचा उद्देश
- देशातील नागरिकांना विमा संरक्षण देण्याच्या उद्देशाने या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
- कुटुंबातील कमावत्या व्यक्तीच्या एकाएकी मृत्यूने कुटुंबावर उपासमारीची वेळ येऊ नये व त्यांना आर्थिक सहाय्य मिळावे या उद्देशाने प्रधानमंत्री जीवन ज्योति विमा योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
- या योजनेअंतर्गत देशातील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबाला 2 लाखाचे विमा संरक्षण देण्यात येते. जेणेकरून त्यांना औषध उपचारासाठी पैशांसाठी कोणावर अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही.
प्रधानमंत्री जीवन ज्योति बीमा योजनेची वैशिष्ट्ये
- केंद्र सरकार द्वारे या योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे.
- प्रधानमंत्री जीवन ज्योति विमा योजना वयाच्या 55 वर्षापर्यंत विमा संरक्षण देते
- कोणत्याही कारणामुळे विमाधारकाच्या मृत्यू झाल्यास त्याच्या वारसाला 2 लाखांची रक्कम दिली जाते.
- 18 ते 55 वर्षे वयोगटातील नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
- देशातील नागरिक अत्यंत कमी पैशात या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
- या योजनेचे वार्षिक प्रीमियम फक्त 330/- रुपये आहे.
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांना कोणत्याही शारीरिक तपासणीची आवश्यकता नाही.
प्रधानमंत्री जीवन ज्योति विमा योजना लाभार्थी
- देशातील सर्व जाती धर्माचे नागरिक प्रधानमंत्री जीवन ज्योति विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र आहेत.
प्रधानमंत्री जीवन ज्योति विमा योजनेचे लाभ
- या योजनेअंतर्गत वर्षाला केवळ 330/- रुपये भरून या योजनेचा लाभ घेता येईल.
- या योजनेअंतर्गत विमाधारकाच्या कोणत्याही कारणामुळे मृत्यू झाल्यास त्या मृत व्यक्तीच्या वारसांना 2 लाख रुपये दिले जातात.
- प्रधानमंत्री जीवन ज्योति विमा योजनेचा कालावधी 1 जून पासून सुरु होतो व 31 मे पर्यंत वैदय मानला जातो.
- प्रधानमंत्री जीवन ज्योति विमा योजना ही देशातील प्रत्येक गरीब नागरिकांना कमी पैशात विमा संरक्षण देणारी एक महत्त्वपूर्ण योजना आहे.
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रत्येक वर्षी नूतनीकरण करावे लागते.
- या योजनेत सहभागी झाल्यापासून 45 दिवसांपर्यंत विमाधारकाला दावा करता येत नाही त्यानंतर दावा करता येतो.
प्रधानमंत्री जीवन ज्योति बीमा योजनेसाठी आवश्यक पात्रता
- अर्जदार व्यक्ती भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे.
प्रधानमंत्री जीवन ज्योति बीमा योजनेचे नियम व अटी
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी विमाधारकास प्रतिवर्षी 330/- रुपये हप्ता भरावा लागेल.
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांचे वय 18 ते 55 वर्षे दरम्यान असणे बंधनकारक आहे.
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांचे बँकेत बचत खाते असणे आवश्यक आहे.
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याला आपल्या बँक खात्यात Auto Debit Option Enable करणे आवश्यक आहे जेणेकरून विम्याच्या हप्त्याची रक्कम आपोआप बँक खात्यातून वजा केली जाईल.
- विमा धारकास स्वतःच्या बँक खात्यात विम्याचा हप्ता जाईल एवढी रक्कम ठेवणे आवश्यक आहे.
- ही विमा योजना फक्त वयाच्या 18 व्या वर्षापासून वयाच्या 55 वर्षापर्यंत विमा संरक्षण देते 55 वर्षानंतर लाभार्थ्याला विम्याचा लाभ घेता येणार नाही.
- प्रधानमंत्री जीवन ज्योति बीमा योजना फक्त भारतातील रहिवाशांना लागू राहील.
- विमाधारकाचा मृत्यू झाल्यास त्याच्या नॉमिनी / उत्तराधिकारी यांनी त्या विमाधारकाचे मृत्यू प्रमाणपत्र व दाव्याचा अर्ज भरून संबंधित बँकेत जमा करावा. प्रक्रिया पूर्ण झाल्यावरच विम्याची रक्कम नॉमिनी / उत्तराधिकारी व्यक्तीच्या बँक खात्यात जमा केली जाईल.
- प्रधानमंत्री जीवन ज्योती बीमा योजना ही फक्त एक मदतीची विमा पॉलिसी आहे त्यामुळे या योजनेअंतर्गत फक्त मृत्यूचा समावेश आहे.
- विमाधारकाचा अपघात झाल्यास शरीराचा एखादा अवयव निकामी झाल्यास / अपंगत्व आल्यास या योजनेअंतर्गत विमाधारकास कोणतीच मदत दिली जाणार नाही.
- या योजनेअंतर्गत Maturity Benefit किंवा Surrender Value वगैरे काही मिळत नाही.
- 1 वर्षाचे विमा संरक्षण असणारी ही एक आयुर्विमा योजना आहे त्यामुळे दर वर्षी या विमा योजनेचे नुतनीकरण करणे आवश्यक आहे.
- जर एखाद्या व्यक्तीचे एका पेक्षा अधिक बँकेत बचत खाते असल्यास त्याला कुठल्याही एका बँक खात्याच्या सहाय्याने या योजनेचा लाभ घेता येईल.
प्रधानमंत्री जीवन ज्योति बीमा योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
- लाभार्थ्यांचे आधार कार्ड
- मतदान ओळखपत्र
- पॅन कार्ड
- राष्ट्रीयकृत बँकेत बचत खाते
- बँकेतील बचत खाते आधार कार्ड सोबत लिंक असणे आवश्यक
- मोबाईल नंबर
- अलीकडच्या काळातील पासपोर्ट आकाराचे फोटो
- रेशन कार्ड
- वीज बिल
- जन्माचा दाखला
- ई-मेल
- बँकेचा IFSC Code
प्रधानमंत्री जीवन ज्योति विमा योजना कोणत्या कारणामुळे समाप्त होऊ शकते
- जे बँक खाते या योजनेअंतर्गत जोडले गेले आहे ते काही कारणामुळे बंद झाल्यास विमाधारकाला योजनेचा लाभ घेता येणार नाही.
- जे बँक खाते या योजनेअंतर्गत जोडले गेलेले आहेत त्यात विम्याचा हप्ता भरण्यासाठी पुरेशी रक्कम नसल्यास विमाधारकाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
- लाभार्थ्याचे वय 55 वर्षे पूर्ण झाल्यास त्याला या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
- प्रधानमंत्री जीवन ज्योति विमा योजनेशिवाय लाभार्थ्यांचा अन्य कोणताच आरोग्य विमा असता कामा नये तसे आढळल्यास लाभार्थ्याला या योजनेतून रद्द करण्यात येईल.
प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना वयोमर्यादा
- प्रधानमंत्री जीवन ज्योती योजनेचा लाभ फक्त 18 वर्ष ते 55 वर्ष दरम्यान घेता येतो.
प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना अंतर्गत दिले जाणारे विमा संरक्षण
- प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना अंतर्गत विमा धारकाच्या मृत्यूनंतर त्यांच्या वारसदारास 2 लाखाचे आर्थिक सहाय्य दिले जाते.
प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना दावा अर्ज करताना आवश्यक माहिती
- पॉलिसी क्रमांक
- बँकेचे पूर्ण नाव व पत्ता
- मृत सदस्याचे पूर्ण नाव
- मृत सदस्याचा बचत खात्याचा क्रमांक
- मृत व्यक्तीचा आधार क्रमांक
- सदस्याने योजनेत प्रवेश केला ती तारीख
- सदस्याचा मृत्यू झाला ती तारीख
- मृत्यूचे कारण
- वारसदाराचे नाव
- वारसदाराचं नातं
- वारसदाराचा पत्ता
- वारसदाराचा मोबईल क्रमांक
- वारसदाराचा आधार क्रमांक
- वारसदाराचा बचत खात्याचा तपशील
प्रधानमंत्री जीवन ज्योति बीमा योजनेअंतर्गत अर्ज करण्याची पद्धत
- सर्वात प्रथम आपणास शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर जाव लागेल व तेथून या योजनेचा अर्ज डाऊनलोड करावा लागेल.
- अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून त्यासोबत आवश्यक अशा सर्व कागदपत्रांची झेरॉक्स प्रत जोडावी व सदर भरलेला अर्ज आपले ज्या बँकेत / पोस्ट ऑफिस मध्ये बचत खाते आहे त्या ठिकाणी अर्ज द्यावा.
- आपल्या अर्जाची तपासणी करून बँक / पोस्ट खात्यातून ३३०/- रुपये वजा केले जातील आणि आपण अशा प्रकारे या योजनेचा लाभ घेऊ शकता.
Telegram Group | Join |
शासनाची अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
प्रधानमंत्री जीवन ज्योति बिमा योजनेचा अर्ज | येथे क्लिक करा |
प्रधानमंत्री जीवन ज्योति बिमा योजना संमतीपत्र | येथे क्लिक करा |
प्रधानमंत्री जीवन ज्योति बिमा योजना दावा अर्ज | येथे क्लिक करा |
प्रधानमंत्री जीवन ज्योति बिमा योजना नियम | येथे क्लिक करा |
धानमंत्री जीवन ज्योति बिमा योजना राज्यांनुसार टोल फ्री क्रमांक | येथे क्लिक करा |
टोल फ्री क्रमांक महाराष्ट्र | 1800-102-2636 |
Pradhanmantri Jeevan Jyoti Bima Yojana Helpline Number | 1800-180-1111 / 1800-110-001 |
S.No. | State | Bank Name | Toll Free Number |
1 | Andhra Pradesh | Andhra Bank | 1800-425-8525 |
2 | Andman & Nicobar Island | State Bank of India | 1800-345-4545 |
3 | Arunachal Pradesh | State Bank of India | 1800-345-3616 |
4 | Assam | State Bank of India | 1800-345-3756 |
5 | Bihar | State Bank of India | 1800-345-6195 |
6 | Chandigarh | Punjab National Bank | 1800-180-1111 |
7 | Chhattisgarh | State Bank of India | 1800-233-4358 |
8 | Dadra & Nagar Haveli | Dena Bank | 1800-225-885 |
9 | Daman & Diu | Dena Bank | 1800-225-885 |
10 | Delhi | Oriental Bank of Commerce | 1800-1800-124 |
11 | Goa | State Bank of India | 1800-2333-202 |
12 | Gujarat | Dena Bank | 1800-225-885 |
13 | Haryana | Punjab National Bank | 1800-180-1111 |
14 | Himanchal Pradesh | UCO Bank | 1800-180-8053 |
15 | Jharkhand | Bank of India | 1800-345-6576 |
16 | Karnataka | Syndicate Bank-SLBC | 1800-4259-7777 |
17 | Kerala | Canara Bank | 1800-425-11222 |
18 | Lakshadweep | Syndicate Bank | 1800-4259-7777 |
19 | Madhya Pradesh | Central Bank of India | 1800-233-4035 |
20 | Maharashtra | Bank of Maharashtra | 1800-102-2636 |
21 | Manipur | State Bank of India | 1800-345-3858 |
22 | Meghalya | State Bank of India | 1800 – 345 – 3658 |
23 | Mizoram | State Bank of India | 1800-345-3660 |
24 | Nagaland | State Bank of India | 1800-345-3708 |
25 | Odisha | UCO Bank | 1800-345-6551 |
26 | Puducherry | Indian Bank | 1800-4250-0000 |
27 | Punjab | Punjab National Bank | 1800-180-1111 |
28 | Rajasthan | Bank of Baroda | 1800-180-6546 |
29 | Sikkim | State Bank of India | 1800-345-3256 |
30 | Telangana | State Bank of Hyderabad | 1800-425-8933 |
31 | Tamil Nadu | Indian Overseas Bank | 1800-425-4415 |
1800-102-4455 | |||
32 | Uttar Pradesh | Bank of Baroda | 1800-223-344 |
33 | Uttrakhand | State Bank of India | 1800-180-4167 |
34 | West Bengal and Tripura | United Bank of India | 1800-345-3343 |