Jivhala Yojana Maharashtra

महाराष्ट्र शासन आपल्या राज्यातील नागरिकांसाठी विविध सरकारी योजनांची सुरुवात करत असते. त्या योजनांपैकीच एक योजना जिचे नाव जिव्हाळा कर्ज योजना आहे. 

महाराष्ट्र राज्यात शिक्षा भोगत असणारे लाखो कैदी आहेत परंतु त्यातील बहुतांश कैदी हे कौटुंबिक वादातून तसेच छोट्या छोट्या वादातून शिक्षा भोगत आहेत हे कैदी त्यांच्या कुटुंबातील एक कमावता व्यक्ती असल्यामुळे त्यांना कारागृहात टाकल्यामुळे त्यांच्या कुटुंबाची वाताहात होते व त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते जसे की त्यांच्या मुलांचा शिक्षणाचा खर्च, दवाखान्याचा खर्च तसेच दैनंदिन जीवनाचा खर्च व इतर समस्यांना तोंड द्यावे लागते.या सर्व गोष्टींचा विचार करून राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी 1 मे 2022 रोजी महाराष्ट्र दिनाच्या दिवशी  महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या सहाय्याने जिव्हाळा योजना सुरु करण्याचा एक महत्वपूर्ण निर्णय घेतला.

जिव्हाळा कर्ज योजना अंतर्गत राज्यातील दीर्घकाळ शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांच्या कुटुंबांना 7 टक्के व्याज दराने 50,000/- रुपयांचे कर्ज उपलब्ध करून देण्यात येते. जेणेकरून या कर्जाच्या सहाय्याने ते आपल्या दैनंदिन गरजा पूर्ण करू शकतील. 
जिव्हाळा योजना अंतर्गत मिळालेल्या कर्जाची तसेच व्याजाची परतफेड कैद्यांना कारागृहात कामाच्या मोबदल्यात मिळणाऱ्या उत्पन्नातून करण्यात येईल. 
लाभार्थी कैद्यांची बँक खाती राज्य बँकेत उघडण्यात येणार आहेत.त्यामध्ये कैद्यांचे उत्पन्न जमा करण्याची जबाबदारी कारागृहातील प्रशासनाची असून त्यातून कर्जाची परतफेड करून घेण्यात येईल. [Jivhala Yojana]

या योजनेचा मुख्य उद्देश राज्यात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांच्या कुटुंबांना त्यांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी कर्जाच्या स्वरूपात आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देणे आहे.

वाचकांना विनंती

आम्ही जिव्हाळा योजना ची संपूर्ण माहिती या लेखात दिली आहे त्यामुळे तुमची हा लेख शेवट पर्यंत वाचा व या योजनेचा लाभ मिळवा जर तुमच्या परिसरात जे कोणी शिक्षा भोगत असलेले कैद्यांची कुटुंबे असतील तर त्यांना या योजनेची माहिती अवश्य द्या किंवा आमची हि आर्टिकल त्यांना शेयर करा जेणेकरून ते या योजनेचा लाभ घेऊ शकतील.

योजनेचे नावजिव्हाळा योजना
विभागसमाज कल्याण विभाग
राज्यमहाराष्ट्र
योजनेची सुरुवात1 मे 2022
लाभार्थीदीर्घकाळ शिक्षा भोगत असलेले कैदी
लाभ50,000/- रुपयांचे कर्ज
उद्देश्यकैद्यांच्या कुटुंबांना आर्थिक सहाय्य करने

जिव्हाळा योजना चा उद्देश्य

  • कुटुंबातील कर्ता व्यक्ती कारागृहात शिक्षा भोगत असल्या कारणामुळे त्यांच्या कुटुंबांना दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी विविध समस्यांना सामोरे जावे लागते या सर्व गोष्टींचा विचार करून कैद्यांच्या कुटुंबांना आर्थिक सहाय्य करण्याच्या उद्देशाने जिव्हाळा योजना ची सुरुवात करण्यात आली आहे.
  • वर्षानुवर्षे विविध गुन्ह्यांसाठी शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांच्या कुटुंबांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे
  • कैद्यांच्या कुटुंबाचे जीवनमान सुधारणे.
  • कैद्यांच्या कुटुंबांचा सामाजिक तसेच आर्थिक विकास करणे.
  • कैद्यांच्या कुटुंबांना पैशांसाठी कोणावर अवलंबून राहण्याची गरज भासू नये तसेच कोणाकडून पैसे उधार घेण्याची गरज भासू नये. [Jivhala Yojana]
Jivhala Yojana

जिव्हाळा योजना चे वैशिष्ट्य

  • जिव्हाळा योजना महाराष्ट्र सरकार कडून राज्यातील शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांच्या कुटुंबांना आर्थिक सहाय्य करण्यासाठी सुरु करण्यात आलेली महत्वाची अशी एक योजना आहे.
  • कैद्यांची मानसिकता बदलण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करण्यासाठी जिव्हाळा कर्ज योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
  • प्रायोगिक तत्वावर या योजनेची सुरुवात येरवडा कारागृहातून करण्यात आली आहे.
  • जिव्हाळा योजना ची सुरुवात राज्यातील सर्व कारागृहात करण्यात आली आहे.
  • कैद्यांच्या कुटुंबांना आर्थिक सहाय्य करण्याच्या उद्देशाने सुरु करण्यात आलेली ही देशातील पहिलीच योजना आहे.
  • जिव्हाळा योजना च्या सहाय्याने कैद्यांमध्ये आपलेपणची भावना वाढण्यास मदत होईल.
  • या योजनेअंतर्गत दिले जाणारे कर्ज कैद्याच्या कुटुंबातील सदस्यांच्या बँक खात्यात DBT च्या सहाय्याने जमा करण्यात येईल. [Jivhala Yojana]
  • युवकांना स्वतःचा उद्योग सुरु करण्यासाठी राज्य सरकार देत आहे 1 लाखाचे कर्ज त्यासाठी वाचा थेट कर्ज योजना
  • राज्य सरकार देत आहे आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील प्रत्येक मुलीला 98 हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य त्यासाठी वाचा लेक लाडकी योजना
  • राज्य सरकार चर्मकार बांधवांना विविध प्रकारचे व्यावसायिक प्रशिक्षण व उद्योग सुरु करण्यासाठी बिनव्याजी कर्ज देते आहे त्यासाठी वाचा चर्मकार समाज योजना

जिव्हाला योजना चे लाभार्थी

  • जिव्हाळा योजना एखाद्या गुन्ह्यात दीर्घकाळ शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांसाठी सुरु करण्यात आली आहे.

जिव्हाळा योजना चे फायदे

  • जिव्हाळा कर्ज योजना अंतर्गत राज्यात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांच्या कुटुंबांना त्यांच्या मुलांचे शिक्षण, आरोग्य,दैनंदिन गरजांसाठी कमी व्याज दरात 50,000/- रुपयांचे कर्ज उपलब्ध करून देण्यात येते.
  • या योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या कर्जाला कोणत्याही प्रकारचे तारण अथवा जामीनदाराची आवश्यकता नाही.
  • जिव्हाळा योजना अंतर्गत कर्जासाठी कोणत्याही प्रकारचे प्रोसेसिंग शुल्क आकारले जाणार नाही.
  • कर्ज परतफेड रकमेच्या 1 टक्का निधी कैद्यांच्या कल्याण निधीला देण्यात येते. [Jivhala Yojana]

जिव्हाळा योजना अंतर्गत दिले जाणारे कर्ज

  • जिव्हाळा योजना अंतर्गत लाभार्थी कैद्यांच्या कुटुंबांना 50,000/- रुपयांचे कर्ज दिले जाते.

जिव्हाळा योजना अंतर्गत आकारण्यात येणारा व्याजदर

  • जिव्हाळा योजना अंतर्गत 7 टक्के व्याजदर आकारला जाईल.

Jivhala Yojana Maharashtra अंतर्गत आवश्यक पात्रता

  • शिक्षा भोगत असलेला कैदी महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे.
  • दीर्घकाळ शिक्षा भोगत असलेले कैदी जिव्हाळा कर्ज योजनेसाठी पात्र असतील.

जिव्हाळा योजना चे नियम व अटी

  • महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील कैद्यांना जिव्हाळा कर्ज योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
  • प्रथमच गुन्हा भोगत असलेल्या कैद्यांना या योजनेचा लाभ दिला जाईल.
  • लाभार्थ्याला देण्यात येणाऱ्या कर्ज रकमेवर 7 टक्के दराने व्याज आकारला जाईल.
  • कैद्यांना देण्यात येणाऱ्या कर्जाच्या परतफेडीची कोणतीही जबाबदारी राज्य शासनाची असणार नाही.
  • कैद्यांचे कारागृहातील उत्पन्न बघुनच जिव्हाळा कर्ज योजनेचा लाभ दिला जाईल.
  • दीर्घकाळ शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांनाच या योजनेचा लाभ दिला जाईल. [Jivhala Yojana]
  • सरकार गटई कामगारांना देत आहे मोफत पत्र्याचे स्टॉल त्यासाठी वाचा गटई स्टॉल योजना
  • आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबांना सरकार देत आहे 4000/- रुपयांचे अर्थसहाय्य त्यासाठी वाचा खावटी अनुदान योजना
  • आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना सरकार देत आहे 3 लाखाची प्रोत्साहन राशी त्यासाठी वाचा आंतरजातीय विवाह योजना

जिव्हाळा योजना अंतर्गत अर्ज रद्द होण्याची कारणे

  • कैदी महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवाशी नसल्यास अर्ज रद्द केला जाईल.
  • कैदी दीर्घकालीन शिक्षा भोगत नसल्यास अर्ज रद्द केला जाईल.
  • कैद्यांचे कारागृहात उत्पन्न नसेल तर अर्ज रद्द केला जाईल. [Jivhala Yojana]

जिव्हाळा योजना अंतर्गत अर्ज करण्याची पद्धत

जिव्हाळा योजना ही फक्त शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांच्या कुटुंबांसाठी सुरु करण्यात आली आहे.त्यामुळे कैद्यांच्या कुटुंबांना कारागृहाशी संपर्क साधावा लागेल आणि योजनेचा अर्ज घ्यावा लागेल आणि अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून योग्य ती कागदपत्रे जोडून सदर अर्ज कारागृहातील प्रशासनाकडे जमा करावा.

सारांश

आम्ही आशा करतो कि तुम्हाला योजना ची सर्व माहिती प्राप्त झाली आहे तरी देखील आपले या योजनेसंबंधी काही प्रश्न असल्यास आम्हाला ई-मेल किंवा कंमेंट्स च्या माध्यमातून जरूर कळवा आम्ही तुमच्या प्रश्नांची लवकरात लवकर उत्तरे देण्याचा प्रयत्न करू आणि जर तुम्हाला या योजनेची माहिती उपयुक्त वाटली असेल तर तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा जेणेकरून तुमचे मित्र देखील या योजनेचा लाभ घेऊ शकतील.