About Us

नमस्कार मित्रानो मी उमेश राहणार मुंबई माझं शिक्षण B.Com

मी एका प्रायव्हेट कंपनी मध्ये Linux Engineer या पदावर गेली 6 वर्षे नोकरी करतो आहे.

लहानपनापासूनच मला वाचनाची खुप आवड होती त्यामुळे मी माझ्या मोकळ्या वेळेत नव नवीन पुस्तकांचे वाचन करत असतो कारण माझं असं मत आहे की पुस्तके आपल्या ज्ञानाची गुरुकिल्ली आहे व पुस्तक वाचनामुळे आपल्या ज्ञानात नेहमीच भर पडते.

सर्वात आधी मी तुम्हाला सांगू इच्छितो की http://mrtba.org वेबसाईट बनवण्या मागचा माझा उद्देश काय आहे.

मी रोज सकाळी ऑफिस ला जायच्या आधी पेपर वाचतो कारण पेपर वाचनामुळे आपल्या भोवतालच्या घडणाऱ्या घडामोडी बद्दल आपल्याला माहिती मिळते.

एके दिवशी मी पेपर वाचताना असे आढळून आले की महाराष्ट्र शासन तसेच केंद्र सरकार आपल्या राज्यातील गरीब जनतेसाठी खुप साऱ्या योजना घेऊन येतात ज्या खुप फायद्याच्या असतात परंतु या योजनांची माहिती कुणालाच नसते कारण त्यांना या योजनांबद्दल सांगणार कोणीच नसत त्यामुळे नवनवीन योजना येतात व निघून जातात व त्यामुळे लोकं या योजनांपासून वंचित राहतात त्याना या योजनांचा फायदा घेता येत नाही.

ऑगस्ट मध्ये मी गणपती सणाला माझ्या गावी गेलो होतो तेव्हा सहजच माझ्या वाडीत तसेच माझ्या गावातल्या लोकांना महाराष्ट्र शासन ज्या योजना राबवतात त्या बद्दल विचारणा केली परंतु एकाला सुद्धा राज्य आणि केंद्र सरकारच्या योजनांबद्दल काहीच माहिती नव्हती.

म्हणुन मी सर्वाना केंद्र आणि राज्य शासनाच्या योजनांबद्दल सांगायला सुरवात केली परंतु प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन ह्या योजना सांगणे मला शक्य नव्हते.

त्यामुळे माझ्या मनात एक इच्छा निर्माण झाली की केंद्र आणि राज्य शासन ज्या नवनवीन योजना राबवतात त्या सर्वांपर्यंत पोहचल्या पाहिजेत त्यामुळे या सर्व गोष्टींचा विचार करून मी ही वेबसाईट बनवायचा निर्णय घेतला जेणेकरून माझ्या महाराष्ट्रातील जनतेला या योजनांबद्दल माहिती देता येईल.

आताच्या युगात सर्वांकडे मोबाईल उपलब्ध आहे त्यामुळे वेबसाईट च्या माध्यमातून मला सर्व घर घरात ही माहिती देता येईल.
तुम्ही सुद्धा या योजनांचा लाभ घ्या व तुमच्या भोवतालच्या लोकांना या योजनांबद्दल माहिती द्या व फेसबुक,व्हाट्सअप,इंस्टाग्राम,ट्विटर युट्युब वर शेअर करा जेणेकरून एखाद्या गरिबाला या योजनेअंतर्गत लाभ घेता येईल.

ही वेबसाईट बनवण्यामागचा माझा मुख्य उद्देश हाच आहे की माझ्या राज्यातील नागरिकांपर्यंत शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या सर्व योजनांची योग्य प्रकारे माहिती पोहचवावी आणि योजनांचा लाभ कसा घेता येईल त्यासाठी पात्रता काय आहे या सर्वांची माहिती त्याना या वेबसाईट च्या माध्यमातून उपलब्ध करून देणे आहे.

तुम्हांला जर एखाद्या महाराष्ट्र शासन किंवा केंद्र सरकार ने सुरु केलेल्या एखाद्या योजनेबद्दल माहिती असल्यास मला ई-मेल किंवा कंमेंट्स च्या माध्यमातून नक्की कळवा मी लवकरात त्या योजनेची सर्व माहिती ह्या वेबसाईट च्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करेन.