सायकल वाटप योजना महाराष्ट्र

महाराष्ट्र सरकार आपल्या राज्यातील शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विविध सरकारी योजनांची सुरुवात करत असते.त्या योजनांपैकीच एक योजना जिचे नाव सायकल वाटप योजना आहे.या योजनेअंतर्गत राज्यातील दुर्गम भागातील शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना सायकल घेण्यासाठी आर्थिक सहाय्य केले जाते.

महाराष्ट्रात अति दुर्गम भागात जेथे सुयोग्य रस्ते नाहीत तसेच वाहतुकीची पुरेशी साधने नाहीत अशा भागात विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी तसेच शाळेतून घरी परत येण्यासाठी खूप परिश्रम घ्यावे लागतात त्यांना उन्हातून मैलो न मैल चालत जावे लागते त्यामुळे त्यांना शाळेत जायला व परत यायला पुष्कळ वेळ लागतो त्यामुळे पुष्कळ विद्यार्थी आपले शालेय शिक्षण सोडून देतात व ते शिक्षणापासून वंचित राहतात. राज्यातील ग्रामीण भागात आज सुद्धा पुष्कळ कुटुंबे हि दारिद्र्य रेषेखाली आपले जीवन जगत असतात त्यामुळे ते आपल्या कुटुंबाच्या गरज पूर्ण करण्यासाठी असमर्थ असतात त्यामुळे आपल्या मुलांना सायकल घेण्यासाठी त्यांच्याजवळ पुरेसे पैसे नसतात या सर्व गोष्टींचा विचार करून महाराष्ट्र शासनाने राज्यातील ज्या ग्रामीण भागात विद्यार्थ्यांचे घर आणि शाळा या मधील अंतर 5 किलोमीटर आहे अशा शालेय मुलींना सायकल खरेदीसाठी आर्थिक सहायता करण्याचा निर्णय घेतला आहे.

या योजनेचा मुख्य उद्देश राज्यातील दुर्गम भागातील मुलींना शाळेत जाण्यासाठी मोफत सायकल वाटप करणे जेणेकरून मुली शाळेत जाण्यासाठी प्रोत्साहित होतील.

वाचकांना विनंती

आम्ही सायकल वाटप योजनेची संपूर्ण माहिती या लेखात दिली आहे त्यामुळे तुमची हा लेख शेवट पर्यंत वाचा व या योजनेचा लाभ मिळवा जर तुमच्या परिसरात असे कोणी विद्यार्थीं असतील जे सायकल वाटप योजनेचा लाभ घेऊ इच्छित असतील तर त्यांना या योजनेची माहिती अवश्य द्या किंवा आमची हि आर्टिकल त्यांना शेयर करा जेणेकरून ते या योजनेचा लाभ घेऊ शकतील.

योजनेचे नावCycle Vatap Yojana Maharashtra
विभागनियोजन विभाग
राज्यमहाराष्ट्र राज्य
उद्देशमुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहित करणे
लाभार्थीग्रामीण भागातील गरजू विद्यार्थिनी
लाभ5,000/- रुपये आर्थिक सहायता
अर्ज करण्याची पद्धतअर्ज करण्याची पद्धत

सायकल अनुदान योजना महाराष्ट्र ची उद्दिष्ट्ये

  1. महाराष्ट्र राज्यातील गरजू मुलींना घरातून शाळेत व शाळेतून घरी येण्यासाठी सायकल वाटप करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश्य आहे जेणेकरून मुलींना शिक्षणासाठी मैलोनमैल पायी चालत जाण्याची गरज भासणार नाही.
  2. राज्यातील मुलींना सशक्त व आत्मनिर्भर बनवणे.
  3. मुलींचा सामाजिक व आर्थिक विकास करणे.
  4. मुलींचे जीवनमान सुधारणे
  5. मुलींना शाळेत जाण्यासाठी प्रोत्साहित करणे.
  6. आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबाला आपल्या मुलीला सायकल विकत घेण्यासाठी पैशांसाठी कोणावर अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही तसेच कोणाकडून पैसे उधार घेण्याची आवश्यकता भासणार नाही.
  7. सायकल च्या वापरामुळे मुलींना मैलोनमैल चालत जाण्याची आवश्यकता भासणार नाही व त्यामुळे मुलींच्या महत्वपूर्ण वेळेची बचत होईल.
cycle vatap yojana Maharashtra

सायकल वाटप योजनेची वैशिष्ट्ये

  • सायकल वाटप योजना महाराष्ट्र शासनाकडून सुरु करण्यात आलेली योजना आहे
  • गरजू मुलींना इयत्ता 8वी ते 12वी पर्यंतचा शालेय शिक्षणाच्या कोणत्याही टप्प्यात सायकल खरेदी करण्याची स्वतंत्रता राहील.
  • मुलीच्या कुटुंबाला सायकल घेण्यासाठी कोणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता भासणार नाही किंवा कोणाकडून कर्ज घेण्याची आवश्यकता भासणार नाही.
  • या योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया अत्यंत सोपी ठेवण्यात आली आहे त्यामुळे मुलींना या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी कोणत्याही सरकारी कार्यालयाच्या फेऱ्या मारण्याची आवश्यकता भासणार नाही.
  • सायकल वाटप योजनेअंतर्गत मिळणारी लाभाची राशी DBT च्या सहाय्याने लाभार्थी मुलीच्या बँक खात्यात जमा केली जाते.
  • योजनेअंतर्गत मिळणाऱ्या आर्थिक सहाय्याने मुली सायकल खरेदी करून स्वतःचे शिक्षण पूर्ण करू शकतील व भविष्यात चांगली नोकरी मिळवू शकतील किंवा स्वतःचा स्वरोजगार स्थापित करून राज्यातील इतर बेरोजगार नागरिकांना नोकरीच्या संधी उपलब्ध करू शकतील.
  • या योजनेअंतर्गत राज्यातील मुली आत्मनिर्भर बनतील.
  • राज्य सरकार देत आहे आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील प्रत्येक मुलीला 98 हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य त्यासाठी वाचा लेक लाडकी योजना

सायकल वाटप योजनेचे फायदे

  • सायकल वाटप योजनेअंतर्गत लाभार्थी मुलींना महाराष्ट्र शासनाकडून सायकल खरेदी करण्यासाठी 5,000/- रुपयांची आर्थिक मदत केली जाईल त्यामुळे कुटुंबाला आपल्या मुलींसाठी सायकल विकत घेण्यासाठी पैशांसाठी कोणावर अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही व कोणाकडून पैसे उधार घेण्याची गरज देखील भासणार नाही.
  • या योजनेच्या सहाय्याने मुलींना शाळेत जाण्यासाठी प्रोत्साहन मिळेल व त्या आपले शिक्षण पूर्ण करू शकतील.
  • या योजनेच्या सहाय्याने मुलींना घरातून शाळेत व शाळेतून घरी येणासाठी पायी चालत जाण्याची गरज लागणार नाही.
  • या योजनेमुळे मुलींच्या वेळेची बचत होईल
  • मुलींना स्वतःचे शिक्षण पूर्ण करण्यास मदत होईल
  • या योजनेअंतर्गत मिळणारी आर्थिक मदत लाभार्थी मुलींच्या बँक खात्यात DBT च्या सहाय्याने जमा केली जाईल.
  • या योजनेअंतर्गत मुलींचे जीवनमान सुधारेल.
  • मुलींचा सामाजिक व आर्थिक विकास होईल.
  • राज्यातील मुली सशक्त व आत्मनिर्भर बनतील.

सायकल वाटप योजनेसाठी आवश्यक पात्रता

  • अर्जदार विद्यार्थिनी महाराष्ट्र राज्याची मूळ रहिवाशी असणे आवश्यक आहे
  • विद्यार्थिनी इयत्ता ८वी ते १२वी वर्गात शिकत असणे आवश्यक आहे

सायकल वाटप योजनेच्या अटी

  • सायकल वाटप योजनेचा लाभ केवळ इयत्ता 8वी ते 12वीत शिकणाऱ्या मुलींना देण्यात येईल
  • या योजनेचा लाभ घ्यायचा असल्यास मुलीच्या शाळेचे घरापासून अंतर 5 किलोमीटर किंवा त्यापेक्षा जास्त असणे आवश्यक आहे
  • सायकल वाटप योजनेअंतर्गत फक्त 5,000/- रुपयांची आर्थिक मदत केली जाईल व त्या वरील सायकलच्या खरेदीसाठी लाभार्थी मुलीस स्वतः जवळची रक्कम भरावी लागेल
  • महाराष्ट्राच्या बाहेरील मुलींना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही
  • लाभार्थी मुलीला इयत्ता 8वी ते 12वी या 4 वर्षांमध्ये सायकल खरेदीसाठी एकदाच अनुदान देय राहील
  • गरजू मुलींना सायकल वाटप करताना जी गावे/वाड्या/तांडे/पाडे हे डोंगराळ व अतिदुर्गम भागात आहेत जिथे जाण्यासाठी योग्य रस्ते नाहीत तथा वाहतुकीची पुरेशी साधने नाहीत/व्यवस्था उपलब्ध नाही अशा ठिकाणी राहणाऱ्या गरजू मुलींना प्राधान्य देण्यात येईल
  • सायकल वाटप योजनेअंतर्गत फक्त मुलींनाच या योजनेचा लाभ दिला जाईल
  • मुलांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
  • सायकल च्या देखभालीचा खर्च लाभार्थ्यास स्वतः करावा लागेल शासनाकडून यासाठी कोणतेच आर्थिक आर्थिक सहकार्य दिले जाणार नाही.

सायकल वाटप योजनेअंतर्गत समाविष्ट शाळा

  • शासकीय शाळा
  • जिल्हा परिषद शाळा
  • शासकीय अनुदानित शाळा
  • तसेच ज्या अनुदानित व शासकीय आश्रमशाळेतील मुलींना डे स्कॉलर प्रवेश दिला जातो व ज्यांना दररोज घरापासून ये जा करावी लागते अशा शाळेच्या मुलींना हि योजना लागू करण्यात येईल
  • सरकार ने मुलींच्या उज्वल भविष्यासाठी सुरु केली आहे एक महत्वपूर्ण अशी योजना त्यासाठी वाचा सुकन्या समृद्धी योजना

सायकल वाटप योजनेअंतर्गत अनुदान उपलब्ध करण्याचे टप्पे

  • पहिला टप्यात गरजू मुलींच्या राष्ट्रीयकृत बँक खात्यात डी.बी.टी. (Direct Benefit Transfer) द्वारे 3500/- रुपये आगाऊ रक्कम जमा करण्यात येईल.
  • दुसऱ्या टप्प्यात लाभार्थी मुलींनी सायकल खरेदी केल्यानंतर सायकल खरेदीची पावती व इतर कागदपत्रे सादर केल्यानंतर त्यांना उर्वरित 1500/- रुपये थेट अदा करण्यात येईल.

सायकल वाटप योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • राशन कार्ड
  • निवास प्रमाण पत्र
  • पासपोर्ट साईज फोटो
  • मोबाईल नंबर
  • ई-मेल आयडी
  • बँक खाते
  • विद्यार्थिनी इयत्ता ८वी ते १२वी मध्ये शिकत असल्याचे शाळेचे प्रमाणपत्र
  • सायकल खरेदी पावती

सायकल वाटप योजनेसाठी अर्ज करण्याची पद्धत

या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी गरजू विद्यार्थिनीं ना स्वतःच्या शाळेत जाऊन शालेच्या ऑफिसमधून किंवा प्राचार्यांकडून या योजनेचा अर्ज घ्यावा लागेल आणि अर्जात विचारलेली सर्व माहिती आणि आवश्यक कागदपत्रे जोडून सदर अर्ज शाळेत जमा करावा.

किंवा

अर्जदार विद्यार्थिनीला स्वतःच्या जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन नियोजन विभागाला भेट द्यावी लागेल आणि या योजनेचा अर्ज घ्यावा लागेल आणि अर्जात विचारलेली सर्व माहिती आणि आवश्यक कागदपत्रे जोडून अर्ज सदर कार्यालयात जमा करावा
अशा प्रकारे आपल्याला या योजनेचा लाभ घेता येईल.

Telegram GroupJoin
योजनेचा शासन निर्णययेथे क्लिक करा

शासनाच्या इतर योजना

सारांश

आशा करतो कि बांधकाम कामगार योजने अंतर्गत आपल्याला सर्व माहिती प्राप्त झाली आहे तरीदेखील आपले सायकल वाटप योजने संबंधी काही प्रश्न असल्यास मला ई-मेल किंवा कंमेंट्स च्या माध्यमातून जरूर कळवा आम्ही तुमच्या प्रश्नांची लवकरात लवकर उत्तरे देण्याचा प्रयत्न करू आणि जर तुम्हाला या योजनेची माहिती उपयुक्त वाटली असेल तर तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा जेणेकरून तुमचे मित्र देखील या योजनेचा लाभ घेऊ शकतील.

2 thoughts on “सायकल वाटप योजना महाराष्ट्र”

Comments are closed.