राज्यातील दारिद्रयरेषेखालील (पिवळी शिधापत्रिका धारक) आणि दारिद्रयरेषेवरील (केशरी शिधापत्रिका धारक) कुटुंबांना अधिक चांगल्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हाव्यात या हेतूने महाराष्ट्र राज्य सरकारने महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना सुरू केली आहे. आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबांना अधिक दर्जेदार वैद्यकीय सेवा प्राप्त होण्याच्या दृष्टीने हि अत्यंत उपयुक्त अशी योजना आहे.
एकत्रित आयुष्मान भारत- प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना
महात्मा फुले जन आरोग्य योजनेविषयी – महाराष्ट्र शासनाने महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना(पूर्वीची राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना) 2 जुलै 2012 पासून प्रायोगिक तत्त्वावर आठ जिल्ह्यांमध्ये सुरू केली आणि नंतर ही योजना 21 नोव्हेंबर 2013 पासून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये विस्तारित करण्यात आली. सदर महत्त्वाकांक्षी योजना सुरुवातीला कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबांसाठी सुरू करण्यात आली आणि नंतर वेळोवेळी इतर लाभार्थी गट त्यामध्ये समाविष्ट करण्यात आले.
आयुष्मान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजना दि.23 सप्टेंबर,2018 पासून भारत सरकारव्दारे लागू करण्यात आली. या योजनेत समाविष्ट केलेली कुटुंबे अनुक्रमे ग्रामीण आणि शहरी भागांसाठी सामाजिक-आर्थिक जातनिहाय जनगणना 2011 च्या वंचित आणि व्यावसायिक निकषांवर आधारित होती. ही योजना 2018 ते 2020 या दरम्यान महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेसोबत एकत्रितपणे राबविण्यात आली.सदर योजनेकरिता येणाऱ्या खर्चामध्ये भारत सरकार आणि महाराष्ट्र शासन यांचा हिस्सा 60:40 च्या प्रमाणात आहे.
वरीलप्रमाणे राबविण्यात येत असलेल्या एकत्रित योजनेत शासनाने दि.26 फेब्रुवारी,2019 च्या शासन निर्णयान्वये सुधारणा केल्या. त्यानुसार योजनेत महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेमध्ये 996 उपचारांकरिता प्रति कुटुंब प्रति वर्ष रु.1.50 लक्ष रकमेचे विमा संरक्षण पुरविले जात होते. तसेच आयुष्मान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेमधून 1209 उपचारांसाठी प्रति कुटुंब प्रति वर्ष रु.5.00 लक्ष रकमेचे आरोग्य संरक्षण लागू होते. सदर योजना दि.1.04.2020 ते दि.30.06.2024 या कालावधीत राबविण्यात आली.
दरम्यान महाराष्ट्र सरकारने दि.28 जुलै 2023 रोजीच्या शासन निर्णयाद्वारे राज्यातील सर्व कुटुंबांसाठी महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना लागू करण्याचा निर्णय घेतला आणि चालू योजनेची व्याप्ती वाढवली. त्यानुसार दि.1 जुलै 2024 पासून विस्तारित कार्यक्षेत्रासह एकात्मिक योजना राबविण्यात येत आहे. या योजनेत महाराष्ट्रातील सर्व लोकसंख्या समाविष्ट आहे. ही योजना अंगीकृत रुग्णालयांद्वारे रुग्णालयात दाखल होणे आवश्यक असलेल्या व्दितीय आणि तृतीय प्रकारच्या आजारांसाठी रुग्णालयात दाखल होण्यापासून ते घरी सुट्टी होईपर्यंत रोखरहित दर्जेदार वैद्यकीय सेवा प्रदान करते. ही योजना पूर्णपणे हमी तत्त्वावर राबविण्यात येत आहे.
महात्मा फुले जन आरोग्य योजना (MJPJAY) ही महाराष्ट्र सरकारची प्रमुख आरोग्य विमा योजना आहे. ही योजना सरकारी आणि खाजगी क्षेत्रातील सेवा प्रदात्यांच्या नेटवर्कद्वारे ओळखल्या जाणार्या आजारांसाठी रोखरहित सेवा पुरवते.
ही योजना महाराष्ट्र शासनाची एक आरोग्य विमा योजना आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थी कुटुंबाला दरवर्षी 5 लाख रुपयांपर्यंत विमा संरक्षण दिले जाते तसेच गंभीर आजारासाठी प्रतिवर्षी 3 लाख रुपये विमा संरक्षण दिले जात होते परंतु मंत्रिमंडळाच्या निर्णयामध्ये या योजनेअंतर्गत आता 5 लाख रुपयांपर्यंत विमा संरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
महात्मा फुले जन आरोग्य योजना चे आधीचे नाव राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना असे होते जी 2 जुलै 2012 पासून 8 जिल्ह्यांमध्ये सुरू करण्यात आली होती आणि नंतर 21 नोव्हेंबर 2013 पासून ती महाराष्ट्रातील 28 जिल्ह्यांमध्ये विस्तारित करण्यात आली. आता हि योजना महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यात सुरु करण्यात आलेली आहे.
या योजनेचा मुख्य उद्देश महाराष्ट्र राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब जनतेला गंभीर आजारावरील उपचार तसेच गंभीर आजारावर शस्त्रक्रिया उपचारासाठी निशुल्क उपचार व गुणवत्तापूर्ण आरोग्य सुविधा पुरविणे हा आहे.
नवीन अपडेट
पूर्वी या योजनेअंतर्गत नागरिकांना 3 लाखांपर्यंत विमा संरक्षण दिले जात होते व या योजनेचा लाभ फक्त पिवळे रेशनकार्ड धारकांनाच दिला जायचा परंतु नवीन मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयानुसार आता या योजनेअंतर्गत नागरिकांना 5 लाखांपर्यंत विमा संरक्षण दिले जाईल व सर्व प्रकारच्या शिधापत्रक धारकांना या योजनेचा लाभ दिला जाईल.
योजनेचे नाव | Mahatma Phule Yojana |
लाभार्थी | महाराष्ट्र राज्यातील नागरिक |
लाभ | आरोग्य सुविधा |
योजनेचा उद्देश | गरिबांना आरोग्य सुविधा प्रदान करणे |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचे उद्दिष्ट
- महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब जनतेला गंभीर आजारावरील उपचार तसेच गंभीर आजारावर शस्त्रक्रिया उपचारासाठी निशुल्क उपचार व गुणवत्तापूर्ण आरोग्य सुविधा पुरविणे.
- विविध शस्त्रक्रिया आणि उपचारांसाठी हॉस्पिटलायझेशन तसेच आवश्यक असलेल्या आपत्तीजनक आजारांसाठी लाभार्थ्यांना कॅशलेस दर्जेदार वैद्यकीय सेवा प्रदान करणे.
- गंभीर आजारांवरील उपचारासाठी नागरिकांना सशक्त व आत्मनिर्भर बनविणे.
- नागरिकांना उत्तम आरोग्य उपलब्ध करून देणे.

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचे वैशिष्ट्य
- महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाद्वारे राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब जनतेला गंभीर आजारावरील उपचार तसेच गंभीर आजारावर शस्त्रक्रिया उपचारासाठी निशुल्क उपचार व गुणवत्तापूर्ण आरोग्य सुविधा देण्याच्या उद्देशाने सुरु करण्यात आलेली हि महत्वाची अशी एक योजना आहे.
- महाराष्ट्र शासनाच्या वतीने लाभार्थ्यास संपूर्ण आरोग्य सहाय्य दिले जाते.
- राज्यातील नागरिकांना आरोग्य सुविधा पुरवल्या जातात.
- योजनेअंतर्गत राज्यातील नागरिकांना रुग्णालयांमधील उपचारासाठी आर्थिक सहाय्य केले जाते.
- या योजनेअंतर्गत किडनी ट्रांसप्लांटेशन साठी 5 लाख रुपये आणि कुटुंबाच्या उपचारासाठी 5 लाख रुपयांची आर्थिक मदत केली जाते.
- प्लास्टिक सर्जरी, हृदयरोग, मोतिबिंदू, कॅन्सर ऑपरेशन सोबत ढोपरांचे प्रत्यारोपण, डेंग्यू स्वाइन फ्लू, मलेरिया पीडियाट्रिक सर्जरी, सिकल सेल एनीमिया इत्यादी आजारावर उपचार केले जातात.
- नागरिकांना निशुल्क उपचार सुविधा दिली जाते.
- योजनेअंतर्गत सर्व जाती धर्मातील नागरिकांना लाभ दिला जातो.
- योजनेची ठळक वैशिष्ट्ये
- महाराष्ट्रातील सर्व नागरिकांसाठी आरोग्य संरक्षण
- अंगीकृत रुग्णालयांमध्ये रोख रक्कम रहीत व्दितीय व तृतीय प्रकारचे उपचार
- प्रति वर्ष रु. 5 लाखांचे आरोग्य संरक्षण कुटुंबातील एक किंवा सर्व सदस्य वापरू शकतात.
- रुग्णालयात दाखल होणे आवश्यक असलेल्या ३४ विशेष सेवांतर्गत शस्त्रक्रिया/उपचारांच्या वैद्यकीय सेवा
- योजनेत असलेले सर्व आजार पहिल्या दिवसापासून समाविष्ट आहेत.
- महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेतील लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही शासकीय/खाजगी अंगीकृत रुग्णालयांमध्ये उपचार घेऊ शकतात.
- प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ देशभरात कोणत्याही राज्यातील अंगीकृत रुग्णालयात घेता येतो.
- योजनेसाठी समर्पित कॉल सेंटर जेथे लाभार्थी योजनेची माहिती मिळवू शकतात आणि योजनेअंतर्गत सेवांबद्दल तक्रार करू शकतात
- योजना पूर्णपणे कागदविरहीत व संगणक प्रणालीव्दारे राबविली जाते.
- लाभार्थ्यांना मदत आणि सहाय्य पुरविण्याठी प्रत्येक अंगीकृत रुग्णालयामध्ये आरोग्यमित्र नियुक्त केले आहेत.
- आपत्कालीन परिस्थितीत दूरध्वनी किंवा ईमेलद्वारे सूचना देऊन रुग्ण उपचार घेऊ शकतात.
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत विम्याचा हप्ता प्रदान पद्धत
- लाभार्थी कुटुंबासाठी असणारा विम्याचा हप्ता राज्य आरोग्य हमी सोसायटी मार्फत नॅशनल इन्शुरन्स कंपनीस अदा करण्यात येतो.
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचे लाभार्थी
- अन्न नागरी पुरवठा विभागाकडून वितरित करण्यात आलेल्या पिवळे रेशन कार्ड धारक,अंत्योदय रेशन कार्ड धारक,अन्नपूर्णा योजनेअंतर्गत लाभार्थी तसेच केशरी कार्डधारक कुटुंबे (वार्षिक उत्पन्न 1 लाखांपर्यंत) तसेच महाराष्ट्र सरकार द्वारे महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांसाठी जारी केलेली कुटुंबे. या योजनेसाठी लाभार्थी आहेत.
- औरंगाबाद व अमरावती विभागातील सर्व जिल्हे तसेच नागपूर विभागातील वर्धा या जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी शुभ्र शिधापत्रिका धारक शेतकरी कुटुंबे या योजनेसाठी लाभार्थी आहेत.
- शासकीय आश्रम शाळेतील विद्यार्थी या योजनेसाठी लाभार्थी आहेत.
- शासकीय महिला आश्रमातील महिला.
- शासकीय अनाथ आश्रमातील मुले.
- शासकीय वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिक
- माहिती व जनसंपर्क पत्रकार व त्यांची कुटुंबे
- कामगार विभागाने निश्चित केलेले बांधकाम व इतर बांधकाम कामगार व त्यांची मुले या योजनेसाठी लाभार्थी आहेत
- प्रधानमंत्री जन आरोग्य योजना 2011 च्या सामाजिक आर्थिक जातनिहाय जन-गणनेतील (SECC 2011) ग्रामीण व शहरी भागांसाठी ठरवलेल्या निकषानुसार कुटुंबे या योजनेचे लाभार्थी आहेत
- नैसर्गिक आपत्तीला बळी पडलेले शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात
- ज्येष्ठ नागरिक
- अपंग नागरिक
- Freedom Fighter
- Ex-Service man
- Marine Fisher
प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत लाभार्थी
समाविष्ट कुटुंबे अनुक्रमे ग्रामीण आणि शहरी भागांसाठी सामाजिक-आर्थिक जात जनगणना 2011 (SECC 2011) च्या स्वयंचलित समावेश, वंचितता आणि व्यावसायिक निकषांवर आधारित आहेत. राज्यात 83.72 लाख कुटुंबे आहेत. हा डेटा गोठवला आहे त्यामुळे अतिरिक्त कुटुंबे जोडली जाऊ शकत नाहीत. तथापि, विद्यमान कुटुंबांमध्ये नवीन सदस्य जोडले जाऊ शकतात.
शहरी
शहरी भागासाठी 11 व्यावसायिक निकष ओळखले जातात रॅग पिकर्स, भिकारी, घरगुती कामगार, रस्त्यावर विक्रेते, मोची, फेरीवाले, बांधकाम कामगार, प्लंबर, गवंडी, पेंटर्स, वेल्डर, सफाई कामगार स्वच्छता कामगार, माळी, गृहस्थ कामगार, कारागीर, हस्तकला. कामगार, शिंपी, वाहतूक कामगार, ड्रायव्हर, कंडक्टर, मदतनीस, रिक्षाचालक, दुकानातील कामगार, सहाय्यक, शिपाई, परिचर, वेटर, इलेक्ट्रिशियन, मेकॅनिक, असेंबलर, दुरुस्ती कामगार, वॉशर-मेन, चौकीदार.
ग्रामीण
ग्रामीण भागासाठी ग्रामीण निकष D1 ते D7 पर्यंत आहेत ज्यात कच्च्या भिंत आणि कच्च्या छप्पर असलेली एकच खोली असलेली कुटुंबे, 16 ते 59 वयोगटातील कोणताही प्रौढ सदस्य नाही, 16 ते 59 वयोगटातील प्रौढ सदस्य नसलेले कुटुंब, अपंग सदस्य आणि सक्षम शारीरिक प्रौढ सदस्य नाही, अनुसूचित जाती/जमाती कुटुंबे, भूमिहीन कुटुंबे ज्यांच्या उत्पन्नाचा मोठा हिस्सा अंगमेहनतीतून मिळतो. आपोआप समाविष्ट केलेल्या श्रेणीमध्ये निवारा नसलेली कुटुंबे, निराधार-भिक्षेवर जगणारी, हाताने सफाई कामगार कुटुंबे, आदिम आदिवासी गट आणि कायदेशीररित्या मुक्त झालेल्या बंधपत्रित कामगारांचा समावेश होतो.
आयुष्मान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (गट-अ) |
सामाजिक, आर्थिक आणि जातनिहाय जनगणना, 2011 (SECC) मध्ये नोंदविलेली कुटुंबे |
राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा (NFSA) मधील समाविष्ट अंत्योदय अन्न योजना (AAY) आणि प्राधान्य गटातील (PHH) कुटुंबे |
महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना
गट | लाभार्थ्यांचा तपशील |
गट अ | पिवळी, केशरी, अंत्योदय अन्न योजना व अन्नपुर्णा शिधापत्रिकाधारक कुटुंबे |
गट ब | शुभ्र शिधापत्रिकाधारक शेतकरी कुटुंबे कोणत्याही प्रकारची शिधापत्रिका नसलेली परंतु महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्रधारक असलेली कुटुंबे |
गट क | शासकीय/शासनमान्य अनाथाश्रमातील मुले, शासकीय/शासनमान्य आश्रमशाळेतील विद्यार्थी, शासकीय/शासनमान्य महिला आश्रमातील महिला, शासकीय/शासनमान्य वृध्दाश्रमातील जेष्ठ नागरिक माहिती व जनसंपर्क कार्यालयाकडील निकषानुसार पत्रकार व त्यांचेवर अवलंबित असलेले कुटुंबातील सदस्य महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील नोंदणी जिवित बांधकाम कामगार व त्यांची कुटुंबे (महाराष्ट्र राज्यातील बाहेरील रहीवासी असलेले) |
गट ड | महाराष्ट्रातील कोणत्याही रस्त्यावर अपघातग्रस्त् झालेला महाराष्ट्र/भारताबाहेरील रुग्ण |
गट इ | महाराष्ट्र- कर्नाटक सीमेवरील बेळगाव, कारवार, कलबुर्गी आणि बिदर जिल्ह्यांतील 865 गावांतील खाली नमूद केलेली शिधापत्रिकाधारक कुटुंबे १) अंत्योदय अन्न योजना (AAY) २)प्राधान्य गट (PHH) ३) अन्नपूर्णा योजना |
पात्रता आणि ओळख
पप्रधानमंत्री जन आरोग्य योजना (गट अ) | आयुष्मान कार्ड व व वैध फोटो ओळखपत्र |
महात्मा फुले योजना (गट अ) | आयुष्मान कार्ड किंवा शिधापत्रिका (पिवळी, अंत्योदय अन्न योजना, अन्नपुर्णा, केशरी) व वैध फोटो ओळखपत्र |
महात्मा फुले योजना (गट ब) | आयुष्मान कार्ड किंवा शुभ्र शिधापत्रिका. शुभ्र शिधापत्रिका नसल्यास, स्वयं-घोषणापत्रासह अधिवास प्रमाणपत्र किंवा तहसीलदार प्रमाणपत्र आणि वैध फोटो ओळखपत्र शासकीय/निमशासकीय कर्मचारी असल्यास, स्वयं-घोषणापत्रासह शुभ्र शिधापत्रिका आणि वैध फोटो ओळखपत्र |
महात्मा फुले योजना (गट क) | आयुष्मान कार्ड किंवा संबंधित संस्थेने निर्गमित केलेले वैध ओळखपत्र आणि वैध फोटो ओळखपत्र |
महात्मा फुले योजना (गट ड) | अपघातग्रस्त व्यक्तीचा रुग्णालयातील जिओ टॅगींग फोटो, रस्ते अपघात झाल्याचे रुग्णालयाने पोलीसांना कळविल्याचे पत्र तसेच रुग्णाचा आधार कार्ड किंवा मतदार कार्ड किंवा पॅन कार्ड किंवा पासपोर्ट यापैकी कोणतेही फोटो ओळखपत्र |
महात्मा फुले योजना (गट इ) | कर्नाटक शासनातील समक्ष प्राधिकाऱ्याने निर्गमित केलेली अंत्योदय अन्न योजना (AAY) शिधापत्रिका, प्राधान्य गट (PHH) शिधापत्रिका, अन्नपूर्णा योजना शिधापत्रिका, विहीत नमुन्यातील स्वयं-घोषणापत्र आणि वैध फोटो ओळखपत्र |
लाभार्थी कुटुंबांची संख्या: एकत्रित योजनेंतर्गत राज्यातील सुमारे 2.72 कोटी कुटुंबे (12.50 कोटी लोकसंख्या) समाविष्ट आहेत.
वार्षिक आरोग्य कव्हरेज:
- अ ते इ गट° साठी (ड वगळून) – दोन्ही योजनांसाठी रु. 5 लाख प्रति कुटुंब प्रति वर्ष
- ड गट° करिता – रु.1 लाख प्रति व्यक्ती प्रति वर्ष.
वैद्यकीय लाभ:
- अ ते इ गट° साठी (ड वगळून) – 34 विशेष सेवांतर्गत 1356 आरोग्य उपचार पॅकेज
- ड गट° करिता – रस्ता अपघात रुग्णांसाठी 184 आरोग्य उपचार पॅकेज
शासकीय रुग्णालयांसाठी राखीव उपचार: दोन्ही योजनांसाठी 119 आरोग्य उपचार पॅकेज (¨अ ते इ गट° साठी)
शस्त्रक्रिया पश्चात पाठपुरावा सेवा: दोन्ही योजनांसाठी 262 आरोग्य उपचार पॅकेज (¨अ ते इ गट° साठी)
उपचारांचा समावेश: अंगीकृत रुग्णालयांना दिल्या जाणाऱ्या पॅकेजच्या दरामध्ये सर्वसाधारण वॉर्डमधील खाटाचे शुल्क, परिचारिका शुल्क, विशेषज्ञ, भूलतज्ञ व वैद्यकीय अधिकारी यांचे शुल्क, तपासणी शुल्क, भुल, ऑक्सीजन, ऑपरेशन थिअटर व अतिदक्षता शुल्क, शस्त्रक्रियेसाठी लागणाऱ्या साहित्याची किंमत, औषधे व द्रव्ये, कृत्रिम अवयवाची किंमत, रक्त संक्रमणाचे दर (राज्य शासनाच्या धोरणानुसार रक्त पुरविणे), इन्प्लॉट, एक्स-रे व निदान चाचण्या, आंतररुग्णास भोजन, डिस्पोजेबल व कन्झुमेबल, राज्य परिवहनाच्या दरानुसार किंवा रेल्वेच्या व्दितीय श्रेणी भाडे यानुसार वाहतुक खर्च (रुग्णालय ते रुग्णाचे निवासापर्यंत) या खर्चाचा समावेश आहे. पॅकेज दरामध्ये रुग्ण रुग्णालयात दाखल झाल्यापासून ते घरी जाईपर्यंतच्या तसेच उपचारादरम्यान काही गुंतागुंत झाल्यास त्यासह संपुर्ण खर्चाचा अंतर्भाव असून लाभार्थ्यास सर्व सेवा नि:शुल्क पुरवावयाची आहे. जर रुग्णाचा मृत्यू झाला तर रुग्णाचा मृतदेह रुग्णालयातून घरापर्यंत घेऊन जाण्याचा खर्च पॅकेजमध्ये समाविष्ट आहे.
हमी तत्वावर दावे प्रदान: एकत्रित योजना हमी तत्त्वावर राबविण्यात येत आहे. याचाच अर्थ योजनेंतर्गत उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या खर्चापोटीचे अंगीकृत रुग्णालयांमध्ये दावे थेट राज्य आरोग्य हमी सोसायटीकडून संबंधित अंगीकृत रुग्णालयांना प्रदान करण्यात येत आहे. त्यानुसार योजनेतील गट-अ, ब, क व इ या गटातील लाभार्थ्यांचे प्रति कुटुंब प्रति वर्ष रु.5 लक्ष रकमेचे व गट-ड मधील रस्ते अपघातग्रस्तांचे रु.1 लाख प्रति व्यक्ती प्रति वर्ष रकमेचे दावे संबंधित अंगीकृत रुग्णालयांना प्रदान करण्याची कार्यवाही राज्य आरोग्य हमी सोसायटीकडून करण्यात येते.
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा फायदा
- लाभार्थी कुटुंबाला प्रतिवर्षी रुपये 5 लाखापर्यंत विमा संरक्षण उपलब्ध करून दिले जाते.
- मूत्रपिंड प्रत्यारोपण व इतर गंभीर उपचार व शस्त्रक्रियांसाठी लाभार्थी कुटुंबाला प्रतिवर्षी रुपये 5 लाखांपर्यंत विमा संरक्षण दिले जाते.
- लाभार्थी कुटुंबातील कोणत्याही एका व्यक्तीला किंवा त्या कुटुंबातील अनेक व्यक्तींना या योजनेअंतर्गत विमा संरक्षण दिले जाते.
- ही योजना पूर्णपणे संगणकीकृत असून या योजने अंतर्गत समाविष्ट रुग्णालयातून लाभार्थ्यास सर्व शिधापत्रिकेच्या aआधारे विमा संरक्षण दिले जाते.
- आत्महत्याग्रस्त 14 जिल्ह्यातील शुभ्र शिधापत्रिका शेतकऱ्यांना त्यांच्याजवळील 7/12 उतारा व फोटो ओळखपत्राच्या आधारे विमा संरक्षण केले जाते.
- लाभार्थ्यास वैद्यकीय सेवांमध्ये रुग्णालयांमधून देण्यात येणारा उपचार तसेच रोगाचे निदान व एखाद्या आजारासाठी आवश्यक औषधोपचार, भोजन तसेच एक वेळचा परतीचा प्रवास खर्च दिला जातो.
- महात्मा ज्योतिबा फुले योजना अंतर्गत रुग्णांना रुग्णालयातून मुक्त केल्यावर 10 दिवसांपर्यंत च्या लागणाऱ्या सेवांसाठी विमा संरक्षण दिले जाते.
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत समाविष्ट आजार यादी
- सर्वसाधारण शस्त्रक्रिया
- कान नाक व घसा शस्त्रक्रिया
- नेत्रा रोग शस्त्रक्रिया
- स्त्रीरोग प्रसूतिशास्त्र
- अस्थीरोग शस्त्रक्रिया व प्रक्रिया
- पोट व जठर शस्त्रक्रिया
- कार्डियाक आणि कार्डिऑथोरासिक सर्जरी
- बालरोग शस्त्रक्रिया
- प्रजनन व मूत्ररोग शस्त्रक्रिया
- मज्जातंतू विकृती शास्त्र
- कर्करोग शस्त्रक्रिया
- वैद्यकीय कर्करोग उपचार
- रेडिओथेरपी कर्करोग
- त्वचाप्रत्यारोपण शस्त्रक्रिया
- जळीत
- पॉलिट्रामा
- प्रोस्थेसिस
- जोखिमी देखभाल
- जनरल मेडिसिन
- संसर्गजन्य रोग
- बालरोग्य वैद्यकीय व्यवस्थापन
- हृदय रोग
- नेफरोलॉजी
- न्यूरोलॉजी
- पल्मोनोलॉजी
- चर्मरोग चिकित्सा
- रोमेटोलॉजी
- इंडोक्रायनोलॉजी
- मेडिकल गेस्ट्रोलॉजी
- इंटर वेन्शनल रेडिओलॉजी
MJPJAY Surgery List In Marathi:
- General Surgery
- Opthamology Surgery
- ENT Surgery
- Gynecology and Obstetrics Surgery
- Surgical Gastroenterology
- Orthopedic Surgery and Procedures
- Cardiac and Cardiothoracic Surgery
- Genitourinary System
- Pediatric Surgery
- Surgical Oncology
- Neurosurgery
- Medical Oncology
- Plastic Surgery
- Radiation Oncology
- Burns
- Prostheses
- Polytrauma
- Critical Care
- Infectious Disease
- General Medicine
- Pediatrics Medical Management
- Nephrology
- Cardiology
- Neurology
- Dermatology
- Pulmonology
- Rheumatology
- Gastroenterology
- Endocrinology
- Interventional Radiology
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत समाविष्ट रुग्णालये
या योजनेमध्ये 30 पेक्षा अधिक खाटा असणाऱ्या शासकीय, निम शासकीय, खाजगी तसेच धर्मादाय संस्थेच्या रुग्णालयांची निवड काही निकषांना अधीन राहून करण्यात आली आहे.
लाभार्थी त्याच्या इच्छेनुसार राज्यातील कोणत्याही अंगीकृत रुग्णालयातून मोफत उपचार घेऊ शकतो.
या योजनेमध्ये खासगी आणि शासकीय 973 रुग्णालये समाविष्ट आहेत.
खालील रुग्णालयांमार्फत योजनेचा लाभ घेता येईल.:
महात्मा ज्योतिबा जन आरोग्य योजनेअंतर्गत समाविष्ट रुग्णालयांची यादी | येथे क्लिक करा |
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत आवश्यक पात्रता
- अर्जदार महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवाशी असणे आवश्यक आहे.
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचे नियम व अटी
- फक्त महाराष्ट्र राज्यातील नागरिकांनाच या योजनेचा लाभ दिला जाईल.
- महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील नागरिकांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
- आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबांना या योजनेचा लाभ घेता येईल.
- कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2 लाखाच्या आत असणे आवश्यक आहे.
- महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यातील गरीब कुटुंब ज्यांच्याजवळ पिवळे, केशरी, अंत्योदय, अन्नपूर्णा रेशन कार्ड आहे असे या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
- अर्जदार नागरिकांकडे वैध शिधापत्रिका असणे आवश्यक आहे.
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत आवश्यक कागदपत्रे
- लाभार्थ्याला महाराष्ट्र राज्याचा रहिवासी पुरावा देणे आवश्यक आहे.
- लाभार्थ्याकडे पिवळे, केशरी, अन्नपूर्णा, अंत्योदय यापैकी एक शिधापत्रिका असणे आवश्यक आहे.
- आधार कार्ड
- मोबाईल क्रमांक
- कुटुंबाचा 1 लाखाच्या आत उत्पन्नाचा दाखला
- पासपोर्ट आकाराचे 3 फोटो
- जन्माचा दाखला (शाळा सोडल्याचा दाखला)
- पॅन कार्ड
- ड्रायव्हिंग लायसन्स
- मतदान ओळखपत्र
- राष्ट्रीयकृत बँकेत बचत खाते
- अपंग असल्यास प्रमाणपत्र आवश्यक
- लाभार्थी जेष्ठ नागरीक असल्यास जेष्ठ नागरिक प्रमाणपत्र.
- लाभार्थी Freedom Fighter असल्यास कार्ड आवश्यक.
- लाभार्थी ex-service man असल्यास कार्ड आवश्यक
- लाभार्थी Marine Fisher असल्यास शासनाने दिलेले कार्ड आवश्यक
- राजीव गांधी हेल्थ कार्ड.
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेची कार्यपद्धती
- ज्या व्यक्तीला एखादा आजार आहे त्याला एखाद्या शासकीय रुग्णालयात त्या रोगासंबंधी तपासणी करणे आवश्यक आहे.
- आधाराची तपासणी केल्यावर त्या आजाराचे निदान करण्यासाठी लागणाऱ्या एकूण खर्चाचा तपशील डॉक्टरांकडून घेणे आवश्यक आहे.
- सदर खर्चाचा तपशील महात्मा ज्योतिबा ज्योतिबा फुले जन योजनेअंतर्गत आरोग्य मित्रांच्या सहाय्याने ऑनलाईन अर्ज करते वेळी भरला जातो.
- यामध्ये आजाराचा खर्च, हॉस्पिटलचा खर्च, डॉक्टरचा खर्च, प्रवासभाडे, औषधे या सर्व खर्चाची नोंदणी ऑनलाईन पद्धतीने वेबसाईटवर केली जाते.
- त्यानंतर आजारी व्यक्तीचा इलाज केला जातो.
- या योजनेअंतर्गत आजाराचे निदान मोफत केले जाते.
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत दावा अर्ज रद्द होण्याची मुख्य कारणे
- अर्जदार महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवाशी नसल्यास
- अर्जदाराने अर्जात खोटी माहिती भरल्यास
- अर्जदाराने शासनाद्वारे सुरु एखाद्या योजनेअंतर्गत आरोग्य सुविधा प्राप्त केल्यास
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत नाव नोंदणी करण्याची पद्धत
- महात्मा फुले जन आरोग्य योजना अंतर्गत नोंदणी करण्यासाठी आपल्याला जवळच्या पोस्ट ऑफिस कार्यालयात जावे लागेल व या योजनेचा अर्ज घ्यावा लागेल.
- अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून सोबत आवश्यकता कागदपत्रे जोडावी लागतील.
- नोंदणी झाल्यावर तुम्हाला महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे कार्ड दिले जाईल.
- जेव्हा तुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील एखाद्या सदस्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले जातील तेव्हा सदर कार्ड तुम्हाला या योजनेच्या आरोग्य सेवकांना दाखवावे लागेल.
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत ऑनलाईन दावा अर्ज करण्याची पद्धत
- अर्जदाराला सर्वात प्रथम शासनाच्या अधिकृत वेबसाईट वर जावे लागेल.
- होम पेज वर ऑनलाईन विनंती वर क्लिक करावे लागेल.

- आता तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल त्यामध्ये Fresh Application वर क्लिक करायचे आहे.

- आता तुच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल त्यात विचारलेली सर्व माहिती (Hospital Basic Information,Expertise & Infrastructure,Diagnotic & Facilities,Speciality & Medical Services) भरायची आहे आणि Submit Application Form बटनावर क्लिक करायचं आहे.

- अशा प्रकारे तुमचा महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत दावा अर्ज पूर्ण होईल.
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत दावा करण्याची पद्धत
- महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना अंतर्गत समाविष्ट प्रत्येक रुग्णालयांमध्ये महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचे आरोग्य सेवक उपलब्ध असतात.
- या योजनेअंतर्गत रुग्णांना कोणत्याही प्रकारचा दावा करण्याची गरज नाही कारण केला जाणारा दावा हा महात्मा ज्योतिबा फुले योजनेतील आरोग्य सेवकांमार्फत केले जातात.
- रुग्णांची रुग्णालयातुन सुट्टी केल्यानंतर १० दिवसांनी आवश्यक कागदपत्रासह दावे अंगीकृत रुग्णालयाद्वारे संगणक प्रणालीवर अपलोड केले जातात.
- अपलोड करण्यात आलेले दावे तपासणीसाठी टीपीए कडे येतात.
- सादर करण्यात आलेल्या दाव्यांना मंजुरी देण्यात येते जर काही आवश्यक कागदपत्रे सादर केली गेली नसल्यास दावे प्रलंबित ठेवून रुग्णांलयांना आवश्यक कागदपत्रे सादर करण्यास सांगितले जाते.
- मंजूर करण्यात आलेल्या दाव्यांचे प्रदान विमा कंपनीद्वारे अंगीकृत रुग्णालयांना १५ दिवसांमध्ये करण्यात येते.
Telegram Group 1 | Join |
Telegram Group 2 | Join |
Facebook Page 1 | Follow |
Facebook Page 2 | Follow |
शासनाची अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
महात्मा फुले जन आरोग्य योजना टोल फ्री नंबर | 1800-233-2200 155388 |
योजनेअंतर्गत समाविष्ट रुग्णालयांची यादी | येथे क्लिक करा |
Enrollment Guidelines | येथे क्लिक करा |
List of Id Proofs | येथे क्लिक करा |
Mandatory Investigation | येथे क्लिक करा |
महात्मा फुले जन आरोग्य योजना आजार यादी pdf | येथे क्लिक करा |
Majhe aadhiche card Rajiv gandhi jivandayi aarogya yojneche aahe tari te Mahatma jyotiravfule yojnet transfer jhale ahe ka
या योजनेचे फक्त नाव बदलले आहे त्यामुळे तुम्ही जुन्या कार्डवर दाखवून सुद्धा महात्मा ज्योतिबा फुले योजनेचा लाभ घेऊ शकता.
या योजनेत एकदा लाभ घेतला असेल तर पुढील वर्षी पुन्हा उपचारांसाठी मदत होऊ शकेल का? रिन्युअल कसे करायचे? काही लिंक आहे का?
तुम्ही प्रत्येक वर्षी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचार घेऊ शकता.या योजनेसाठी कार्ड नूतनीकरणाची अजिबात आवश्यकता नाही.
योजना कशी काढावी
आपल्याला सर्वात प्रथम आपल्या क्षेत्रातील सरकारी हॉस्पिटल मध्ये जावे लागेल हॉस्पिटल मध्य महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचे ऑफिस असते त्या ऑफिस मध्ये तुम्हाला जावे लागेल.तिथे तुमचे विनामूल्य आरोग्य कार्ड बनविले जाईल.
आम्हला बनवायचे आहे तर कागदपत्र काय काय लागतील
तुम्हाला तुमच्या क्षेत्रातील सरकारी इस्पितळात जावे लागेल तिथे महात्मा ज्योती फुले जन आरोग्य केंद्रात जावे लागेल.तिथे इ मित्र तुमचा अर्ज भरतील त्यासाठी तुम्हाला आधार कार्ड, रेशन कार्ड, रहिवाशी दाखला,बँकेचा तपशील,जन्माचा दाखला (शाळा सोडल्याचा दाखला), वीज बिल इत्यादी कागदपत्रांची आवश्यकता असेल,
माझ्या मुलीला Scoloissis चा त्रास आहे तर तिचा उपचार मोफत होईल का कारण त्याचे काही वेगळी पॅकेजेस आहेत का असेल तर मला कळवा
तुम्ही महात्मा ज्योतिबा फुले योजना अंतर्गत नक्की लाभ मिळवू शकता परंतु तुम्हाला शासनाने ठरवून दिलेल्या रुग्णालयांमध्येच उपचार घ्यावा लागले. शासनाने ठरवून दिलेल्या रुग्णालया व्यतिरिक्त इतर रुग्नालयात तुम्ही उपचार घेतल्यास या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
Help please
Aarogya mitra baramati phone number????
तुम्हाला तुमच्या नजीकच्या शासकीय रुग्णालयात जावे लागेल.कारण आरोग्य मित्र शासकीय रुग्णालयात उपलब्ध असतात.
My wife is suffering from Ankologing Spondilaits. Can she get treatments under Mahtma Jyotiba Phule Jan Arogya scheme ?
Yes You Can