महाराष्ट्र शासन मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या आर्थिक,सामाजिक आणि शैक्षणिक विकासासाठी नवनवीन योजना राबवत असते. मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या मनात देशाबद्दल प्रेम निर्माण व्हावे व सैन्य भरती होण्याचे स्वप्न त्यांच्या मनात निर्माण व्हावे,विद्यार्थ्यांमध्ये शिस्त लागावी विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढावा,विद्यार्थ्यांचे शौर्य वाढावे,नेतृत्व करण्याची कला त्यांच्या अंगी यावी,विद्यार्थ्यांची देशभक्ती वाढावी तसेच मागासवर्गीय विद्यार्थ्यांना राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये प्रवेश मिळावा व त्यांच्या अंगी असलेल्या गुणांची जोपासना करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने सैनिक शाळेतील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता ही योजना सुरु केली आहे
महाराष्ट्र शासनाने ही योजना महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती,भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी सुरू केली आहे
सैनिक शाळेतील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता योजना चे स्वरुप:
- सैनिक शाळेमध्ये इयत्ता 5 वी च्या वर्गातील आदिवासी विद्यार्थ्यांसाठी एक अतिरिक्त तुकडी बसविण्यात येते म्हणजे 5 वी च्या वर्गा मध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यासोबत आदिवासी विद्यार्थ्यांना बसवले जाते व एकत्र शिकवले जाते.
- विद्यार्थ्यांना वसतीगृहात लागणारा निर्वाह खर्च भागविण्यासाठी शासनाकडून अनुदान उपलब्ध करून दिले जाते.
- सैनिक शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना या योजनेअंतर्गत गणवेश,साबण,दंतमंजन, शैक्षणिक वस्तू इत्यादी सुविधा उपलब्ध करुन दिल्या जातात.
योजनेच्या अटी व शर्ती:
अनुसूचित जाती
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थी 5वी ते 10वी पर्यंतच्या वर्गात शिक्षण घेत असणे आवश्यक.
- विद्यार्थी अनुसूचित जाती व नवबौद्ध या प्रवर्गातील असणे आवश्यक आहे.
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त नसावे.
अनुसूचित जमाती
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थी 5वी ते 10वी पर्यंतच्या वर्गात शिकत असणे आवश्यक आहे.
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थी अनुसूचित जमाती या प्रवर्गातील असावा.
- विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न भारत सरकार शालांत परिक्षोत्तर शिष्यवृत्तीसाठी निर्धारित केलेल्या उत्पन्न मर्यादित असणे आवश्यक.
विमुक्त जाती,भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग:
- या प्रवर्गातील विद्यार्थी 5वी ते 10वी पर्यंतच्या वर्गात शिक्षण घेत असावा.
- विद्यार्थी हा विमुक्त जाती,भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील असावा.
- विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न 1 लाखाच्या आत असणे आवश्यक
योजनेअंतर्गत दिला जाणारा लाभ:
नाशिक, पुणे, सातारा येथील सैनिक शाळांमध्ये शिकणाऱ्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नवबौद्ध, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग विद्यार्थ्यांची शिक्षण फी, परीक्षा फी, भोजन, निवास, कपडे, घोडेस्वार इत्यांदीवर होणारा संपूर्ण खर्च शासनाकडून विद्यार्थ्यांना दिला जातो.
योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे:
- विद्यार्थ्याकडे तो ज्या जातीच्या प्रवर्गातील आहे त्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे
- विद्यार्थ्यांकडे त्याच्या कुटुंबाचा वार्षिक उत्पन्नाचा दाखला असणे आवश्यक आहे.
- विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक तसा पुरावा आवश्यक.
- विद्यार्थ्यांचे आधार कार्ड
- रेशन कार्ड
- पासपोर्ट आकाराचे फोटो
- लाभार्थी विद्यार्थी शासनाच्या इतर कोणत्याही शैक्षणिक योजनांचा लाभ घेत नसल्याचे घोषणापत्र
योजनेतर्गत अर्ज करण्याची पद्धत:
या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून आवश्यक ती कागदपत्रे सोबत जोडावी लागतील
शासनाची अधिकृत वेबसाईट | Click Here |
संपर्क स्थळ | या योजने संबंधित काही अडचणी व समस्या असल्यास जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त समाजकल्याण तसेच संबंधित सैनिक शाळेचे मुख्याध्यापक प्राचार्य यांच्याशी संपर्क साधावा. |
Telegram Group 1 | Join |
Telegram Group 2 | Join |
Facebook Page 1 | Follow |
Facebook Page 2 | Follow |