Mukhyamantri Saur Krushi Pump Yojana

राज्यातील ग्रामीण भागातील नागरिकांचा शेती हा पारंपारीक व्यवसाय आहे. ग्रामीण भागातील बहुतांश शेतकरी हे दारिद्र्य रेषेखाली स्वतःचे जीवन जगत असतात शेतकऱ्यांकडे शेती व्यतिरिक्त अन्य कोणतेच कमाईचे साधन नसल्या कारणामुळे त्यांची आर्थिक स्थिती कमजोर असते. त्यामुळे शेतकरी शेतीसाठी बँक, वित्तीय संस्था तसेच साहुकाराकडून जास्त व्याज दराने कर्ज घेतात व कष्ट करून शेती करतात. शेती करण्यासाठी पाण्याची मोठ्या प्रमाणात आवश्यकता असते त्यासाठी शेतकरी विहिर, बोअरवेल, नदी, नाले, कालवा यामधून डिझेल पंपाच्या सहाय्याने पाण्याचा उपसा करतात परंतु राज्यातील लोडशेडिंगमुळे विजेची अनियमितता निर्माण होते व त्यामुळे शेतकऱ्यांना शेती सिंचन करण्यासाठी समस्या निर्माण होते.

आज सुद्धा राज्याच्या ग्रामीण भागात काही ठिकाणी वीज उपलब्ध नाही व महाग डिझेल पंप आणि वाढत्या डिझेल च्या किमतीमुळे शेतकऱ्यांना खर्चाच्या दृष्टीने डिझेल पंप विकत घेणे परवडण्यासारखे नसते. परिणामी शेतकऱ्यांना पाण्याचा उपसा करण्यासाठी वीज उपलब्ध नसल्यामुळे त्यांच्या हाथा-तोंडाशी आलेल्या पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते व त्याचा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसतो. शेतकरी आधीच कर्ज घेऊन शेती करत असतो व पाण्याअभावी शेतीचे अशा प्रकारे नुकसान झाल्यामुळे त्यांना कर्ज फेडता येत नाही व त्यामुळे शेतकरी आत्महत्या करतात.

दिवसा लोडशेडिंग मुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी उपलब्ध होत नाही व रात्री विजेच्या उपलब्धतेमुळे शेतकऱ्यांना रात्री काळोखात शेती ला पाणी देण्यासाठी जावे लागते त्यामुळे रात्री जंगली जनावर शेकऱ्यांवर हल्ला करतात व त्यांना जखमी करतात तसेच साप, विंचू हे दंश करतात त्यामुळे शेतकऱ्यांना रात्री सिचन करताना विविध समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या या सर्व समस्यांचा विचार करून महाराष्ट्र सरकार ने शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना सुरु करण्याचा एक महत्वपूर्ण निर्णय घेतला. या योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात सौर पंप बसवण्यासाठी 95% अनुदान दिले जाते त्यामुळे या योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना स्वतःकडील फक्त 5% रक्कम भरावी लागते.

राज्यातील अनेक शेतकरी इलेक्ट्रिक पंपाने तसेच डिझेल पंपाने पिकांचे सिंचन करतात परंतु डिझेल पंप आणि विजेचे पंप पैशाच्या दृष्टीने खुप महाग असतात तसेच डिझेल पंपाला मोठ्या प्रमाणात डिझेल ची आवश्यकता असते व इलेक्ट्रिक पंपाला देखील मोठ्या प्रमाणात विजेची आवश्यकता असते. त्यामुळे डिझेल आणि इलेक्ट्रिक पंप शेतकऱ्यांना परवडण्यासारखे नसतात याउलट सौर पंप डिझेल आणि विद्युत पंपाच्या तुलनेत स्वस्त असतात तसेच सौर पंपाला डिझेल आणि विजेची आवश्यकता नसते त्यामुळे सौर पंप शेतकऱ्यांना परवडण्यासारखे असतात. त्यामुळे शेतकऱ्यांच्या या सर्व समस्यांचा विचार करून राज्य शासनाने मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना सुरु करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला.

मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना 1 लाख सौर पंपाचे टप्या टप्याने वाटप करण्यात येणार आहे.

सर्व कृषीपंप ग्राहकांना वीज पुरवठा करण्यासाठी 63 केव्हीए / 100 केव्हीए क्षमतेचे विद्युत रोहित्र उभारण्यात येतात व त्या रोहीत्रावरील लघुदाब वाहिनीद्वारे कृषीपंपाना वीज पुरवठा करण्यात येतो. लघुदाब वाहिनीची लांबी वाढल्याने कमी दाबाने वीज पुरवठा होणे, विद्युत पुरवठयामध्ये वारंवार बिघाड होऊन वीज पुरवठा खंडीत होणे, तांत्रिक वीज हानी वाढणे, रोहीत्र बिघाड होण्याच्या प्रमाणात वाढ, विद्युत अपघात, विद्युत चोरी या सारख्या समस्यांमुळे अखंडीत व शाश्वत वीज पुरवठा करण्याचे उद्दीष्ट साध्य होण्यास अडचणी निर्माण होतात.

याशिवाय, जेथे वीजेचे जाळे उपलब्ध नाही तेथे डिझेल इंधनाचा वापर करुनही कृषीपंप चालविले जातात. इंधनाची वाढलेली किंमत, आयातीवर होणारा खर्च, परकीय चलनात द्यावी लागणारी किंमत या बाबीही विचारात घेण्याजोग्या आहेत. याला पर्याय म्हणून राज्यात शेतकऱ्यांना कृषी वापरासाठी पारेषण विरहित सौर कृषीपंप उपलब्ध केल्यास वरील सर्व समस्यांवर मात करता येऊ शकते आणि त्याचे दृष्य स्वरुपातील फायदे पुढील काळात मिळतील, यासाठी राज्यात मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना महाराष्ट्र मोठया प्रमाणावर राबविण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला.

Mukhyamantri Saur Krushi Pump Yojana

महत्वाच्या गोष्टी

शेतकऱ्याला दिवसा सिंचन करणे शक्य व्हावे व राज्य शासनाची पारंपारिक पध्दतीने कृषीपंप जोडणीसाठी लागणाऱ्या खर्चात व राज्य शासनाद्वारे सबसीडीपोटी देण्यात येणाऱ्या अनुदानात बचतीचे उद्दिष्ट साध्य व्हावे याकरीता राज्यातील शेतकऱ्यांना कृषी वापरासाठी पारेषण विरहीत 1 लाख सौर कृषीपंप टप्याटप्यात उपलब्ध करुन देण्याच्या मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेस या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात आली

या योजनेअंतर्गत पुढील 3 वर्षांच्या कालावधीत टप्याटप्याने 1 लाख सौर कृषीपंप आस्थापित करण्यात येतील. पहिल्या टप्यात 25 हजार नग सौर कृषीपंप, दुसऱ्या टप्प्यात 50 हजार नग सौर कृषी पंप व तिसऱ्या टप्यात 25 हजार नग सौर कृषीपंप आस्थापित करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. [Mukhyamantri Saur Krushi Pump Yojana]

योजनेचे नावमुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना
लाभार्थीराज्यातील शेतकरी
लाभ95% सौर कृषिपंप अनुदान
उद्देश्यसौर पंप विकत घेण्यासाठी अनुदान उपलब्ध करून देणे
अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना चे उद्दिष्ट

  • शेतकऱ्याला सिंचन करणे शक्य व्हावे व राज्य शासनाची पारंपारिक पद्धतीने कृषीपंप जोडणीसाठी लागणाऱ्या खर्चाच्या बचतीचे उद्दिष्ट साध्य व्हावे याकरिता राज्यातील कृषी वापरासाठी पारेषण विरहित 1 लाख सौर कृषी पंप टप्प्याटप्प्यात उपलब्ध करुन देण्याकरिता राज्यात मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना सुरु करण्यात आली आहे.
  • राज्यातील शेतकऱ्यांची शेतात सिंचनासाठी लागणाऱ्या विजेच्या बिलापासून आणि डिझेल पंपासाठी लागणाऱ्या डिझेल खर्चापासून सुटका करने या योजनेचा उद्देश आहे.
  • शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्याच्या उद्देशाने या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
  • शेतकऱ्यांना सौर पंप विकत घेण्यासाठी अनुदान उपलब्ध करून देणे या योजनेचा उद्देश आहे.
  • डिझेल पंपामुळे होणारे वायू प्रदूषण कमी करने.
  • राज्यातील शेतकऱ्यांचा सामाजिक व आर्थिक विकास करने त्यांचे जीवनमान सुधारणे तसेच त्यांना सशक्त व आत्मनिर्भर बनविणे या योजनेचा उद्देश आहे.
  • शेतकऱ्यांना शेतीसाठी प्रोत्साहित करणे.
  • शासनावर विजेचा भार कमी करण्याच्या उद्देशाने या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
  • वीज अनुदानापासून कृषी सिंचन वेगळे करणे.
  • व्यावसायिक, औद्योगिक आणि घरगुती वीज ग्राहकांवरील सब्सिडीचा भार कमी करणे.
  • शेतकऱ्यांची वीज बिलातून मुक्तता करणे.
Mukhyamantri Saur Krushi Pump Yojana

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना चे वैशिष्ट्य

  • सदर योजनेच्या अंमलबजावणीची जबाबदारी महावितरण कंपनीवर टाकण्यात आली असून योजना यशस्वीरित्या राबविण्याच्या दृष्टीने व सौरपंप घेण्यासाठी अर्जदारांना प्रोत्साहित करण्याच्या दृष्टीने एक महत्वाचे पाऊल समजले जाते आहे.
  • राज्यातील शेतकऱ्यांना सौर पंप विकत घेण्यासाठी अनुदान उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सुरु करण्यात आलेली एक महत्वपूर्ण योजना आहे.
  • या योजनेला अटल सौर कृषिपंप योजना नावाने देखील ओळखले जाते.
  • लाभार्थी निवडीचे निकषात अतिदुर्गम भागातील शेतकऱ्यांचा प्राधान्य देण्यात येईल.
  • राज्यातील शेकऱ्यांचे जीवनमान सुधारण्यास तसेच त्यांचा सामाजिक आणि आर्थिक विकास होण्यासाठी व त्यांना सशक्त व आत्मनिर्भर बनवण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजना फायद्याची ठरणार आहे.
  • योजनेत लाभार्थी निवडीची प्रक्रिया कमी अवधीत पूर्ण होण्याच्या दृष्टीने जिल्हास्तरीय समिती रद्द करुन लाभार्थ्यांची निवड करण्याकरिता महावितरणद्वारे ऑनलाईन पोर्टल तयार करण्यात आलेले आहे, ज्यामध्ये अर्जदाराला विहित नमुन्यातील अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे अपलोड करण्याची सुविधा असेल. त्यामुळे अर्जदार घरी बसुन मोबाईल च्या सहाय्याने अर्ज करू शकतात त्यामुळे अर्जदाराला सरकारी कार्यालयाच्या फेऱ्या मारण्याची आवश्यकता भासणार नाही व त्यामुळे शेतकऱ्यांचा वेळ आणि पैसा दोघांची बचत होईल.
  • या योजनेअंतर्गत अनुदानाची रक्कम लाभार्थी शेतकऱ्याच्या बँक खात्यात DBT च्या सहाय्याने जमा करण्यात येईल.

Mukhyamantri Saur Krushi Pump Yojana चे लाभार्थी

  • महाराष्ट्र राज्यातील डिझेल पंप वापरणारे शेतकरी
  • राज्यातील पारंपारिक ऊर्जेद्वारे विद्युतीकरण न झालेले शेतकरी
  • दुर्गम व आदिवासी भागातील शेतकरी
  • महाराष्ट्र शासनाच्या सिंचन योजनेअंतर्गत लाभ घेतलेले शेतकरी
  • वैयक्तिक किंवा सामुदायिक शेततळे, नदी / विहिर / बोअरवेल यांचे शेजारील शेतजमीनधारक शेतकरी या योजनेत पात्र राहतील.
  • यापुर्वी शासनाच्या कुठल्याही योजनेद्वारे कृषीपंपाचा लाभ न घेतलेले शेतकरी
  • वन विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र मिळत नसल्याने अद्याप विदयुतीकरण न झालेल्या गावातील शेतकरी
  • धडक सिंचन योजना अंतर्गत लाभ घेतलेले शेतकरी
  • महावितरणकडे विदयुत जोडणीसाठी पैसे भरुन प्रलंबित असलेले शेतकरीअर्जदार

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना महाराष्ट्र अंतर्गत लाभार्थी निवडीचे निकष

  • सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी ज्या शेतकऱ्यांकडे शाश्वत जलस्त्रोत उपलब्ध आहे, असे सर्व शेतकरी पात्र राहतील. मात्र अशा शेतकऱ्यांकडे पारंपारिक पध्दतीने विद्युत जोडणी झालेली नसणे आवश्यक आहे.
  • 5 एकरापर्यंत शेतजमीन धारक शेतकऱ्यास 3 अश्वशक्ती क्षमते पर्यंतचे सौर कृषी पंप व 5 एकरापेक्षा जास्त शेतजमीन धारक शेतकऱ्यास 5 अश्वशक्ती क्षमतेचा सौर कृषी पंप देय राहील.
  • राज्यातील पारंपरिक ऊर्जेव्दारे विद्युतीकरण न झालेले शेतकरी,विद्युतीकरणासाठी वन विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र मिळत नसलेले शेतकरी, महावितरण कंपनीकडे विद्युत जोडणीसाठी पैसे भरूनही प्रलंबित असणाऱ्या ग्राहकांपैकी/शेतकऱ्यांपैकी, ज्यांना नजीकच्या काळात विद्युत जोडणी मिळणे शक्य नाही असे शेतकरी, अतिदुर्गम भागतील शेतकरी, महाराष्ट्र शासनाच्या धडक सिंचन योजने अंतर्गत लाभ घेतलेले शेतकरी यांना सदर योजने अंतर्गत प्राधान्य राहील.
  • वैयक्तिक किंवा सामुदायिक शेततळे, बारमाही वाहणारी नदी/नाले यांच्या शेजारील शेतजमीन धारक शेतकरी सुध्दा या योजनेसाठी पात्र राहतील.
  • सदर योजनेंतर्गत सौर कृषी पंपासाठी सर्वसाधारण गटाच्या लाभार्थ्यांकडून 10 टक्के व अनुसूचित जातीच्या व अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांकरीता 5 टक्के लाभार्थी हिस्सा म्हणून भरणे लाभार्थ्यास आवश्यक राहील.

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना अंतर्गत

  • या योजनेंतर्गत सर्वसाधारण लाभार्थ्यांकरीता सौर कृषीपंपाच्या केंद्रीय आधारभूत किंमतीच्या 10 टक्के, अनुसूचित जाती/जमातीच्या लाभार्थ्यांचा 5 टक्के हिस्सा राहील.

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना अंतर्गत शेतकऱ्यांना होणारा फायदा

  • मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना सौर पंप विकत घेण्यासाठी 95% अनुदान दिले जाते.
  • ज्या शेतकऱ्यांकडे 5 एकर पेक्षा जास्त शेतजमीन आहे त्यांना 3 HP सौर पंप आणि मोठी शेतजमीन असलेल्या शेतकऱ्यांना 5 HP सौर पंप उपलब्ध करून दिले जातात.
  • मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेअंतर्गत राज्य शासनाद्वारे 3 टप्यात 1 लाख सौर पंप उपलब्ध करून देण्याचा निर्धार केला गेला आहे त्यात पहिल्या टप्यात 25 हजार सौर पंप व दुसऱ्या टप्यात 50 हजार सौर पंप आणि तिसऱ्या टप्यात 25 हजार सौर पंपाचे वाटप करण्यात येणार आहे.
  • मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेच्या सहाय्याने शासनावरील विजेचा अतिरिक्त भार कमी होईल.
  • या योजनेअंतर्गत शेतातील जुने डिझेल पंप बदलून त्या जागी नवीन सौर पंप बसवण्यात येणार आहेत त्यामुळे राज्यातील प्रदूषण कमी होण्यास मदत होईल.
  • मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेअंतर्गत शेतकऱ्यांची वीज व डिझेल च्या बिलातून सुटका होईल.
  • शेतकऱ्यांची वीज लोडशेडिंग पासून सुटका होईल.
  • मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेअंतर्गत मिळणाऱ्या  सौर पंपाच्या सहाय्याने शेतकऱ्यांना दिवसा शेती सिंचन करणे शक्य होईल.
  • लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या सौर कृषी पंपासोबत दोन एलईडी डीसी बल्ब, एक डीसी पंखा व एक मोबाईल चार्जिंग सॉकेट समाविष्ट करण्यात आलेले आहे.
  • डिझेल पंपाच्या तुलनेत सौर पंपाचा शून्य परिचलन खर्च येतो.
  • सौर पंपाच्या उपयोगामुळे पर्यावरणाला याचा काहीच धोका निर्माण होणार नाही.
  • या योजनेच्या सहाय्याने औद्योगिक, वाणिज्यिक व घरगुती वीज ग्राहकांवरील क्रास सबसिडीचा बोजा कमी होईल.
  • सौर कृषीपंपासोबत 2 डि.सी. एल.ई.डी बल्ब, मोबाईल चार्जिंग व बॅटरी चार्जिंगची सुविधा (बॅटरी लाभार्थांनी घ्यावी) यांचा समावेश करण्यात येईल.
  • शेतात सौर पंप बसवल्यामुळे शेतकऱ्यांना डिझेल व विजेच्या खर्चिक पंपा पासून तसेच त्यांना लागणाऱ्या विजेच्या बिलापासून व डिझेल पासून सुटका मिळेल व शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होईल.

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना अंतर्गत वर्गवारी निहाय लाभार्थी हिस्सा

वर्गवारीलाभार्थी हिस्सा3 HP
लाभार्थी हिस्सा
5 HP
लाभार्थी हिस्सा
7.5 HP
लाभार्थी हिस्सा
सर्वसाधारण10%16560/- रुपये24710/- रुपये33455/- रुपये
अनुसूचित जाती5%8280/- रुपये12355/- रुपये16728/- रुपये
अनुसूचित जमाती5%8282/- रुपये12355/- रुपये16728/- रुपये

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना चे भौतिक उद्दिष्टांचे वाटप व आर्थिक भार खालीलप्रमाणे आहे

पंपाचा प्रकारसर्वसाधारण
गटाचे
लाभार्थी
अनुसूचित
जातीचे
लाभार्थी
अनुसूचित
जमातीचे
लाभार्थी
एकूण नगपंपाची
आधारभूत
किंमत
(रुपये)
आर्थिक भार
(रुपये कोटीत)
3HPDC49287385846250255000159,375
5HPAC29574433503750325000121,875
5HPDC118261772140215000385000577,500
एकूण197112953233625000858,75

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना अंतर्गत आवश्यक पात्रता

  • अर्जदार शेतकरी महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवाशी असणे आवश्यक आहे.
  • पाण्याचा खात्रीशीर स्रोत असलेले शेतकरी मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेचा लाभ मिळवण्यासाठी पात्र आहेत.
  • धडक सिंचन योजनेचे लाभार्थी शेतकरी

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना चे नियम व अटी

  • फक्त महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांनाच मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेचा लाभ दिला जाईल.
  • महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
  • फक्त शेतकऱ्यांनाच या योजनेचा लाभ दिला जाईल.
  • राज्यातील ज्या शेजाऱ्यांच्या शेतात आधीच वीज जोडणी केली गेली आहे त्यांना मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
  • एका शेतात फक्त एकदाच या योजनेचा लाभ दिला जाईल.
  • सौर कृषीपंप आस्थापित झाल्यानंतर तो संबंधित लाभार्थ्यांस हस्तांतरीत करण्यात येईल. त्यानंतर त्याची दैनंदिन सुरक्षितता करण्याची जबाबदारी संबंधित लाभार्थीची राहील
  • योजनेची अंमलबजावणी करतांना अर्जदार शेतकऱ्याच्या शेतात बोर वेल, विहिर, नदी इ. शाश्वत पाण्याचा स्त्रोत आहे याची महावितरणद्वारे खात्री करुनच अशा अर्जदाराचाही विचार केला जाईल.
  • जर शेतकऱ्याने केंद्र व राज्य शासनाद्वारे सुरु एखाद्या अन्य योजनेअंतर्गत सौर पंपाचा लाभ मिळवला असेल तर त्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
  • शेत जमिनीत सह हिस्सेदार असल्यास त्यांचे ना हरकत प्रमाण पत्र
  • सदर योजनेअंतर्गत सौर कृषीपंपासाठी सर्वसाधारण गटाच्या लाभार्थ्यांकडून 10 टक्के व अनुसूचित जातीच्या / अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांकरिता 5 टक्के लाभार्थी हिस्सा म्हणून लाभार्थ्यास भरणे आवश्यक आहे.
  • सदर योजनेअंतर्गत सौर कृषीपंपासाठी सर्वसाधारण गटाच्या लाभार्थ्यांकडून 10 टक्के व अनुसूचित जातीच्या / अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांकरिता 5 टक्के लाभार्थी हिस्सा म्हणून लाभार्थ्यास भरणे आवश्यक आहे.
  • अर्जदार शेतकऱ्याच्या शेतात विहिर किंवा कूपनलीका यापैकी जलस्त्रोत असणे आवश्यक आहे.
  • अद्यावत भूजल अंदाज अहवालानुसार अतिशोषित, शोषीत आणि अंशतः शोषीत क्षेत्रामधील (गावांमधील) विहीरींमध्ये व कूपनलीकांमध्ये नवीन सौर पंप देणे अनुज्ञेय असणार नाही.
  • अद्यावत भूजल अंदाज अहवालानुसार ज्या सुरक्षीत पाणालोट क्षेत्रांची उपशाची स्थिती (stage of extraction) 60 टक्के पेक्षा कमी आहे, अशा क्षेत्रातील गावांमधील विहीरींमध्ये व कूपनलीकांमध्ये नवीन सौर पंप देण्यास पात्र असतील
  • खडकाचे क्षेत्रात खोदल्या जाणाऱ्या विंधन विहीरी हे शाश्वत सिंचनाचे साधन नसल्यामुळे विंधन विहीरींमध्ये (Bore Well), नवीन सौर पंप देणे अनुज्ञेय आसणार नाही. मात्र गाळाचे क्षेत्रामध्ये खोदल्या जाणा-या कूप नलिका हे शाश्वत सिंचनाचे साधन असल्यामुळे सुरक्षीत क्षेत्रामधील कूपनलीकांमध्ये (Tube Well) नवीन सौर पंप देणे अनुज्ञेय असणार आहे.
  • कोणत्याही वर्गवारीतील क्षेत्रामध्ये 60 मी. पेक्षा जास्त खोल असलेल्या विहीरींमध्ये अथवा कपनलिकेमध्ये नवीन सौर पंप देण्यास पात्र नाही.

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना अंतर्गत आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • राशन कार्ड
  • निवास प्रमाण पत्र
  • पासपोर्ट साईज फोटो
  • मोबाईल नंबर
  • ई-मेल आयडी
  • बँक खात्याचा तपशील
  • शेतीची कागदपत्रे

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना अंतर्गत अर्ज रद्द होण्याची कारणे

  • अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी नसल्यास अर्ज रद्द होईल.
  • अर्जदार शेतकऱ्याच्या शेतात वीज जोडणी असल्यास अर्ज रद्द करण्यात येईल.
  • अर्जदार शेतकऱ्याने केंद्र व राज्य शासनाद्वारे सुरु एखाद्या अन्य योजनेअंतर्गत सौर पंपाचा लाभ मिळवला असेल तर त्याचा अर्ज रद्द करण्यात येईल.
  • अर्जदार शेतकऱ्याच्या शेतात आधीपासून सौर पंप उपलब्ध असल्यास

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना अंतर्गत ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत

Mukhyamantri Saur Krushi Pump Yojana

  • होम पेज वर अर्ज करा मध्ये तुमच्या आवश्यकतेनुसार (3/5/7 अश्वशक्ती) सौर पंपाची निवास करायची आहे.
  • आता तुमच्यासमोर या योजनेचा अर्ज उघडेल त्यात विचारलेली सर्व माहिती भरून योग्य ती कागदपत्रे जोडायची आहेत व Submit बटन वर क्लिक करायचं आहे.
  • अशा प्रकारे तुमची मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजना अंतर्गत अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना अर्ज स्थिती जाणून घेण्याची पद्धत

  • अर्जदाराला सर्वात प्रथम शासनाच्या अधिकृत वेबसाईट वर जावे लागेल.
  • होमी पेज वर अर्जाची स्थिती मध्ये अर्जाची सद्यस्थिती वर क्लिक करावे लागेल.
  • आता तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल त्यामध्ये तुम्हाला अर्ज क्रमांक टाकून शोधा बटनावर क्लिक करावे लागेल.
Mukhyamantri Saur Krushi Pump Yojana

  • आता तुम्हाला तुमच्या स्क्रीन वर तुमच्या अर्जाची सर्व स्थिती दिसेल. [Mukhyamantri Saur Krushi Pump Yojana]

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना अंतर्गत देयकाची रक्कम भरणा करण्याची पद्धत

  • अर्जदाराला सर्वात प्रथम शासनाच्या अधिकृत वेबसाईट वर जावे लागेल.
  • होमी पेज वर अर्जाची स्थिती मध्ये देयकाची रक्कम भरणा करा वर क्लिक करावे लागेल.
  • आता तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल त्यामध्ये तुम्हाला अर्ज क्रमांक टाकून शोधा बटनावर क्लिक करावे लागेल.
Mukhyamantri Saur Krushi Pump Yojana

  • आता एक नवीन पेज ओपन होईल त्यामध्ये तुम्हाला तुम्हाला भरणा करायचा आहे.

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना अंतर्गत पुरवठादाराची यादी बघण्याची पद्धत

  • अर्जदाराला सर्वात प्रथम शासनाच्या अधिकृत वेबसाईट वर जावे लागेल.
  • होमी पेज वर अर्जाची स्थिती मध्ये पुरवठादार यादी मध्ये सूचिबद्ध केलेल्या पुरवठादाराची यादी वर क्लिक करावे लागेल.
  • आता तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल त्यामध्ये तुम्हाला तुमच्या क्षेत्राची माहिती निवडायची आहे.
  • सर्व माहिती भरून झाल्यावर शोधा बटनावर क्लिक करायचं आहे.
Mukhyamantri Saur Krushi Pump Yojana

  • आता तुमच्या स्क्रीन वर तुमच्या क्षेत्रातील पुरवठादारांची यादी दिसेल.
Telegram GroupJoin
मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजना पोर्टलClick Here
मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजना संपर्क पत्ताहॉंगकॉंग बँक बिल्डींग,
एम. जी. रोड, फोर्ट,
मुंबई – 400 001
संपर्क1800-212-3435
1800-233-3435
मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना अर्ज 2023Click Here

महाराष्ट्र शासनाच्या इतर योजना

आंतरजातीय विवाह अनुदान महाराष्ट्र शासन PDF
ई पीक पाहणी
ई पीक पाहणी नोंदणी
महाज्योती फ्री टॅबलेट योजना
अहिल्यादेवी सिंचन विहीर योजना
दोन मुलींसाठी योजना
लहान मुलींसाठी योजना
रोजगार संगम योजना
बचत गटाचे फायदे
बचत गटाचे नियम
महिला बचत गट नावे
महिला बचत गट नोंदणी अर्ज
बचत गट ठराव नमुना PDF
पुरुष बचत गट नावे
शिवभोजन योजना
पिवळ्या रेशन कार्ड चे फायदे
ग्रामीण कुटीर उद्योग
चंदन कन्या योजना
शेतकरी योजना
बॅच बिल्ला काढण्याची पद्धत
जलयुक्त शिवार योजना
पारंपारिक वस्त्रोद्योग विणकरांना बक्षीस योजना
अण्णासाहेब पाटील कर्ज योजना
अण्णासाहेब पाटील महामंडळ कर्ज योजना कागदपत्रे
लेक लाडकी योजना
कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना
मिनी ट्रॅक्टर व त्यांची उपसाधने यांचा पुरवठा करणे ची योजना
राजे यशवंतराव होळकर महामेष योजना
विहीर अनुदान योजना
मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजना
महिला सन्मान योजना
महाराष्ट्र मुख्यमंत्री किसान योजना
निर्धूर चुल वाटप योजना
Baby Care Kit Yojana
महिला बचत गट समृद्धी कर्ज योजना
थेट कर्ज योजना
प्रधानमंत्री पीक विमा योजना
चर्मकार समाज योजना
गाय म्हैस शेळी मेंढी पालन अनुदान योजना
अटल बांबू समृद्धी योजना
महिला स्वयंसिद्धी व्याज परतावा योजना
मध केंद्र योजना
राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना
शौचालय अनुदान योजना
जिव्हाळा कर्ज योजना
डिजल पंप सब्सिडी योजना
मल्चिंग पेपर योजना
राष्ट्रीय वयोश्री योजना
खावटी अनुदान योजना
मुख्यमंत्री रोजगार निर्मिति योजना
शबरी घरकुल योजना
प्रधानमंत्री मुद्रा योजना
पंडित दिनदयाळ उपाध्याय स्वयंम योजना
वसंतराव नाईक कर्ज योजना
कृषी ड्रोन अनुदान योजना
बांधकाम कामगार योजना
संजय गांधी निराधार योजना
आचार्य बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजना
सायकल वाटप योजना
वीरभद्रकाली ताराराणी स्वयंसिद्धा योजना
प्रधानमंत्री स्वामित्व योजना
प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना
रुफटॉप सोलर योजना
श्रावणबाळ अनुदान योजना
सैनिक शाळेतील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता योजना 
गटई स्टॉल योजना
राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना
प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना
प्रधानमंत्री जीवन ज्योति बीमा योजना
गाय गोठा अनुदान योजना
डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना
शेळी मेंढी पालन योजना
ट्रॅक्टर अनुदान योजना
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना
सुकन्या समृद्धी योजना
प्रधानमंत्री मातृ वंदना योजना
किशोरी शक्ती योजना
माझी कन्या भाग्यश्री योजना
बाल संगोपन योजना
फ्री सिलाई मशीन योजना
पीएमसी महिला आणि बालकल्याण योजना
रमाई घरकुल योजना
महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजना
पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा
युवकांना विविध व्यावसायिक प्रशिक्षण योजना
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मोफत सायकल वाटप योजना
अपंग बस सवलत योजना
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना
आंतरजातीय विवाह योजना
मोटार वाहन चालक प्रशिक्षण योजना
कोरोना मृतांच्या नातेवाईकांना 50 हजारांची मदत
शैक्षणिक कर्ज योजना
आम आदमी विमा योजना
महाडीबीटी शिष्यवृत्ती
सावित्रीबाई फुले स्कॉलरशिप
पॅन कार्ड क्लब क्लेम करण्याची पद्धत
प्रधानमंत्री किसान हेल्पलाईन नंबर
पोस्ट ऑफिस ग्राम सुरक्षा योजना
दहीहंडी विमा योजना
शरद पवार इन्स्पायर फेलोशिप
विद्याधन स्कॉलरशिप
मेडले फार्मा शिष्यवृत्ती
इंडिया स्माइलिंग फाउंडेशनल शिष्यवृत्ती कार्यक्रम
मुख्यमंत्री अप्रेंटिसशिप योजना
एचडीएफसी लिमिटेड बढते कदम शिष्यवृत्ती
मर्क इंडिया चॅरिटेबल ट्रस्ट शिष्यवृत्ती कार्यक्रम
Join WhatsApp Group!