ई-पीक पाहणी | E Pik Pahani

शासन निर्णयान्वये राज्यातील पिक पेरणीची माहिती भ्रमणध्वनीवरील अँप द्वारा गाव नमुना नंबर 12 मध्ये नोंदविण्यासाठी स्वतः शेतकऱ्यांनी उपलब्ध करून देण्याचा पथदर्शी कार्यक्रम राबविण्यात आला आहे व त्यासाठी कार्यपद्धती निश्चित करून देण्यात आली आहे. त्या अन्वये टाटा ट्रस्ट व महाराष्ट्र शासन यांच्यातील सामंजस्य करारान्वये टाटा ट्रस्टने ई पीक पाहणी हे मोबाईल अँप विकसित केले आहे.

मागील काही दशकात तलाठी यांचेकडील वाढलेल्या कामाचा बोजा विचारात घेता पिकांच्या नोंदी करण्यासाठी त्यांना आटोकाट परिश्रम करावे लागतात. तालाठयांच्या कामाचा बोजा कमी करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांच्या सहभागाने मोबाईल अँप च्या आधारे शेतकऱ्यांनी स्वतः पीक पेरणीची माहिती तलाठ्याकडे ऑनलाइन पाठविण्यासाठी ई पीक पाहणी प्रकल्प राबविण्यात आला आहे.

ई-पीक पाहणी हा महाराष्ट्र सरकारचा एक उपक्रम आहे ज्याद्वारे शेतकरी स्वतःच्या मोबाइल फोनवरून त्यांच्या पिकाची नोंद करू शकतात. यामुळे पारंपारिक पद्धतीपेक्षा पिकांची नोंदणी जलद आणि अधिक कार्यक्षम बनते.

E Pik Pahani
प्रकल्पाचे नावई पीक पाहणी
लाभार्थीराज्यातील शेतकरी
लाभपिकांच्या पेरणीची नोंदणी
उद्देश्यपिकाचे नुकसान झाल्यास त्वरित लाभ देणे शक्य
नोंदणी पद्धतअँप च्या सहाय्याने

ई पीक पाहणी चे मुख्य उद्दिष्ट

  • क्षेत्रीय स्तरावरुन पीक पेरणी अहवालाचा Real Time Crop Data संकलित होण्याच्या दृष्टीने तसेच सदर Data संकलित करताना पारदर्शकता आणणे.
  • पीक पेरणी अहवाल प्रक्रीयेत शेतकऱ्यांचा सहभाग वाढविणे.
  • पिकांची नोंदणी प्रक्रिया सुलभ आणि पारदर्शक बनवणे आहे.
E Pik Pahani

योजनेचे वैशिष्ट्य:

  • महाराष्ट्र राज्य शासनाच्या महसूल आणि कृषी विभागांनी संयुक्तरीत्या राज्यात ई पीक पाहणी कार्यक्रमाची अंमलबजावणी सुरू केली आहे.
  • महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना विविध योजना तसेच पिकांच्या नुकसानीची भरपाई लवकरात लवकर पोहचविण्याचा दृष्टीने सुरु करण्यात आलेली हि एक अत्यंत महत्वाची अशी योजना आहे.
  • ई पीक पाहणी कार्यक्रमाअंतर्गत राबविण्यात येणारी प्रक्रीया पारदर्शक असल्याने प्रत्येक शेतकऱ्याला यात सहभागी करून घेण्याचे प्रशासनाचे स्वप्न पूर्ण होईल.

प्रकल्प अंमलबजावणीचा कालावधी:

सर्वसाधारणपणे प्रत्येक हंगामातील सुरुवातीची 2 महिने शेतकरी आपल्या शेतातील पिकाची पीक पाहणी मोबाईल अँप द्वारे अपलोड करतील व त्यानंतरचा 1 महिना तलाठी व कृषी सहाय्यक हे 10% नमुना पडताळणी करतील आणि त्यानंतर तलाठी ई पीक पाहणी आज्ञावलीद्वारे पीक पाहणीलाअंतिम मान्यता देतील.

पिकांच्या समाविष्ट अवस्था:

  • पीक पेरणी नंतर दोन आठवड्यात वाढलेले पीक
  • पिकाची पूर्ण वाढलेली अवस्था
  • कापणी (हंगाम) पूर्वीची अवस्था

प्रकल्पाचे लाभार्थी:

  • महाराष्ट्र राज्यातील सर्व शेतकरी ई-पीक पाहणी प्रकल्पाचा लाभ मिळवण्यासाठी पात्र आहेत.

कार्यक्रमाचे फायदे:

  • उपयुक्तता: शेतकऱ्यांना देय असणाऱ्या कोणत्याही योजनेचा थेट लाभासाठी ई-पीक पाहणी प्रकल्पातील माहिती अंत्यत उपयुक्त ठरणार आहे.
  • लाभ देण्यास सोयीस्कर: कृषी विभागाच्या विशिष्ट पिकासाठी देय असणाऱ्या योजना जसे ठिबक/तुषार सिंचन योजना इत्यादीचे लाभ खातेधारकांना अचूकरित्या देणे सहज शक्य होणार आहे.
  • कामाचा बोजा कमी: तलाठ्यांचे काम सोपे होण्यास मदत होईल.
  • उत्पन्नाचा अचूक अंदाज काढणे शक्य: आधार भूत किंमतीवर धान/कापूस/हरभरा व तूर खरेदी इत्यादी योजनांसाठी देखील पीक निहाय लागवडीचे क्षेत्र व उत्पन्नाचा अचूक अंदाज काढणे शक्य होणार आहे.
  • विम्याचे दावे काढणे सोयीस्कर:: पीक विमा आणि पीक विम्याचे दावे जलद गतीने निकाली काढणे, पीक कर्ज वाटप, अचूक नुकसान भरपाई आणि नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास योग्य मदत यासाठी ई-पीक पाहणी कार्यक्रम लाभदायी आहे.

नोंदणी करण्याची शेवटची तारीख:

  • ए पीक पाहणी अंतर्गत अर्ज करण्याची तारीख शासनाद्वारे वेळोवेळी निर्धारित केली जाते जी प्रत्येक वर्षी वेगवेगळी असते.

ई पीक पाहणी ॲप चा फायदा:

  • मागील हंगामाची पीक पाहणी शक्य: ई पीक पाहणी ॲप मधील तलाठी स्तरावरील पिक पाहणी नोंदविताना मागील हंगामाची पीक पाहणी कायम ठेवण्याची सुविधा देण्यात आली आहे.
  • एकाच वेळेत अनेक नोंदी शक्य:: एका पेक्षा जास्त गट क्रमांक निवडून एकाच वेळेत नोंदविण्याची आणि एकाच प्रकारची कायम पड नोंदविताना सुविधा देण्यात आली आहे.
  • नुकसानीचा अंदाज मिळवणे शक्य: ई-पीक पाहणी ॲपमध्ये केलेल्या पीक नोंदणीच्या आधारे शेतकऱ्यांचे उत्पादन, शेत जमिनीची प्रतवारी, अतिवृष्टी किंवा दुष्काळ यामुळे झालेल्या नुकसानीचा अंदाज मिळवणे शक्य होईल.
  • कर्ज मिळवणे सुलभ: E Peek Pahani  नोंदणीच्या आधारे शेतकऱ्यांना पीक कर्ज Crop Loan मिळणे देखील सुलभ होणार आहे.
  • पीक विमा आणि पीक विम्याचे दावे निकाली काढणे, पीक कर्ज वाटप, अचूक नुकसान भरपाई आणि नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास योग्य मदत यासाठी ई-पीक तपासणी नोंदी आवश्यक असतील.
  • पारदर्शकता: नोंदणी प्रक्रिया ऑनलाइन असल्याने ती अधिक पारदर्शक बनते.
  • वेळेची बचत: पारंपारिक पद्धतीने पिकाची नोंद करण्यासाठी पुष्कळ कालावधी लागतो परंतु ई-पीक पाहणीमुळे वेळेची बचत होते.

शेतकऱ्यांकडून पिकांचे स्वयं नोंदणी करण्याबाबत मार्गदर्शक सूचना:

  • नोंदणी प्रक्रियेसाठी स्मार्ट मोबाईल (Android) द्वारे गुगल प्ले स्टोर वरून ॲप डाऊनलोड करून स्थापित (Install) करावा.
  • खातेदाराने ई पीक पाहणी अँप मध्ये मोबाईल क्रमांकाची नोंद करावी.
  • 7/12 मधील नावाप्रमाणे खातेदाराने त्यांच्या नावाची अचूक पणे नोंदणी करावी.
  • ज्या खातेदाराचे एकाच महसुली गावात एका पेक्षा अधिक खाते क्रमांक आहेत त्यांनी त्यांचे नाव नमूद केल्यास त्या गावातील त्यांचे सर्व खाते क्रमांक व त्याखालील सर्व भूमापन/गट क्रमांक मोबाईल स्क्रीन वर नोंदणीसाठी उपलब्ध दिसतील.
  • शेतकऱ्यांच्या नोंदणीकरिता त्यांचा खाते क्रमांक/भूमापन/गट क्रमांकाच्या माहितीसाठी संगणकीकृत 7/12 किंवा 8अ ची अद्ययावत प्रत सोबत ठेवावी.
  • सामायिक मालकीच्या जमिनीसाठी ज्याचे नाव गाव नकाशा नं. 7/12 मध्ये सामायिक खातेदार म्हणून नोंदले आहे ते सर्व सामायिक खातेदार त्यांच्या वहीवाटीत असलेल्या क्षेत्रातील पिकांची स्वतंत्रपणे नोंदणी करू शकतील.
  • अल्पवयीन खातेदाराच्या बाबतीत त्याचे पालक (अज्ञान पालक कर्ता) नोंदणी करू शकतील.
  • खातेदाराने पीक पाहणी ची माहिती शेतामध्ये उभे राहून करायची असून पीक पाहणी भरून झाल्यावर त्या पिकाचा अक्षांश रेखांशासह फोटो (GPS enabled ) व सर्व माहिती अपलोड करायची आहे. जर मोबाईल इंटरनेट सुविधेत अडचण येत असल्यास गावातील ज्या परिसरात इंटरनेट कनेक्शन मिळेल त्या ठिकाणी जावून पीक पाहणीची माहिती अपलोड करता येईल.
  • नोंदणीकृत मोबाईलवर आलेला चार अंकी संकेतांक (पासवर्ड) कायमस्वरूपी वैध राहून वापरता येईल.
  • एखाद्या शेतकऱ्याकडे स्वतःचा स्मार्टफोन नसेल तर सहजरीत्या उपलब्ध होणारा दुसरा टॅबलेट नोंदणीसाठी वापरू शकतात.
  • एका मोबाईल नंबरवरून एकूण 20 खातेदारांची नोंदणी करता येईल.

प्रकल्पाच्या अटी:

  • केवळ महाराष्ट्र राज्यातील शेतकरी ई पीक पाहणी प्रकल्पात सहभागी होऊ शकतात.
  • महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील शेतकरी प्रकल्पात सहभागी होऊ शकत नाहीत.
  • अँप च्या सहाय्यानेच पिकाची नोंदणी करण्यात येईल.

पिकाची ऑनलाईन नोंदणी करण्याची पद्धत:

  • शेतकऱ्याला सर्वात प्रथम आपल्या मोबाईल मधील Google Play Store यामध्ये जाऊन ई पीक पाहणी (E Peek Pahani) अँप सर्च करून ते डाउनलोड करायचे आहे.
E Pik Pahani

  • अँप डाउनलोड झाल्यावर त्याला ओपन करायचे आहे आणि तुमचा महसूल विभागाची निवड करायची आहे आणि पुढे जायचे आहे.
E Pik Pahani

  • आता तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे.
  • आता तुम्हाला तुमचा विभाग, जिल्हा, तालुका, गाव याची निवड करायची आहे आणि पुढे जायचे आहे.
E Pik Pahani

  • आता तुम्हाला तुमचे पहिले नाव/मधले नाव/आडनाव/खाते क्रमांक/गट क्रमांक यांपैकी एखादी माहिती भरून शोधा बटनावर क्लिक करायचे आहे. आता तुम्हाला खातेदाराची निवड करायची आहे.
E Pik Pahani

  • आता तुम्हाला तुमचे खाते निवडून पुढे जायचे आहे.
  • आता तुम्हाला पीक पेरणी ची माहिती भरायची आहे.
E Pik Pahani

  • आता तुम्हाला पिकांची निवड करायची आहे.
E Pik Pahani

  • आता तुम्हाला पिकांसाठी सिंचन साधन आणि प्रकार निवडायचा आहे.
E Pik Pahani

  • आता तुम्हाला तुमच्या पिकांचे फोटो अपलोड करायचे आहेत.
  • आता तुम्हाला तुमच्या पिकांचे अक्षांश रेखांश सहित उभ्या पिकाचे छायाचित्र अपलोड करायचे आहेत.
E Pik Pahani

  • अशा प्रकारे तुमची ई पीक पाहणी अंतर्गत पीक नोंदणी प्रक्रिया पूर्ण होईल.

तलाठी लॉगिन करण्याची पद्धत:

  • तलाठी ला सर्वात प्रथम स्वतःचा लॉगिन आयडी आणि पासवर्ड वापरून लॉगिन करायचं आहे.
E Pik Pahani

  • आता तुमच्यासमोर एक निवन पेज उघडेल त्यामध्ये ई पीक हा पर्याय निवडायचा आहे व गावाची निवड करून स्वीकारा बटनावर क्लिक करायचं आहे.
E Peek Pahani

  • आता तुम्हाला वर्ष,हंगाम निवडून मोबाईल अँप डेटा बटनावर क्लिक करायचं आहे.
  • आता तुमच्या समोर गावातील ज्या खातेदारांनी मोबाईल वरून पीक नोंदणी केली आहे त्यांची यादी दिसेल त्यामध्ये ज्या खातेदारांची पीक नोंदणी तपासायची आहे त्यासमोरील निवडा बटनावर क्लिक करा.
E Peek Pahani

  • आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये  निवडलेल्या शेतकऱ्याच्या खात्यावरील सर्व सर्व्हे नंबर दिसतील. प्रत्येक रेकॉर्ड वरील पीक त्याचे क्षेत्र, पड क्षेत्र आणि फोटो सर्व गोष्टी योग्य वाटत असतील तर ते रेकॉर्ड तलाठी सेव्ह करु शकतो. त्या पूर्वी ‘क्षेत्र पडताळणी बटन क्लिक करायचे आहे त्याखेरीज साठवा बटन क्लिक करता येणार नाही.
    एकदा रेकॉर्ड सेव्ह झाले कि ते पुन्हा दुरुस्त करता येणार नाही याची कृपया नोंद घ्यावी.
    तलाठ्याला एखादे रेकॉर्ड चुकीचे वाटले तर ते दुरुस्त करता येईल त्या करीता त्याने ‘दुरुस्ती’ चे बटन क्लिक करावे.
  • प्रत्येक रेकॉर्ड समोर फोटो उपलब्ध असेल तर छायचित्र कॉलम मध्ये Yes दिसेल, अन्यथा छायचित्र कॉलम मध्ये No दिसेल.
  • फोटो बघायचा असेल तर फाईल पहा वर क्लिक करा. जे रेकॉर्ड दुरुस्त करायचे ते निवडावे सुरुवातीला तलाठ्याने हंगाम निवडलेला असतो निवडलेल्या हंगामाचीच पिके यादीमध्ये दिसतात व त्यातीलाच रेकॉर्डस् दुरुस्त करता येतात परंतु मोबाईल ऍपद्वारे पिकाची माहिती भरताना शेतकऱ्याच्या हातुन चुकीचा हंगाम निवडला जाऊ शकतो. उदा. उस हे वर्षभर येणारे पीक असल्याने त्याची माहिती भरल्यानंतर तांदुळाची महिती भरताना शेतकऱ्याच्या कडून तांदुळाचा हंगाम खरीप च्या ऐवजी संपूर्ण वर्ष असा भरला जाऊ शकतो. हि चूक तलाठी ‘दुरुस्त’ करु शकतो. त्या करीता तलाठ्याने ‘दुरुस्ती’ चे बटन क्लिक करावे व ज्या रेकॉर्डमध्ये बदल हवा आहे ते निवडावे.
  • त्या नंतर ते रेकॉर्डची माहिती दिसेल, त्यामधील पिकांच्या क्षेत्राची, तसेच पड क्षेत्राची दुरुस्ती करता येईल आणि हंगाम चुकीचा निवडला गेला असेल तर तो योग्य निवडता येईल. पिकांची नावे बदलता येणार नाहीत. तसेच जलसिंचनाचे साधन बदलता येणार नाही.पिकांची नावे बदलता येणार नाहीत. तसेच जलसिंचनाचे साधन बदलता येणार नाही. दुरुस्ती केलेली माहिती समावेश बटन वर क्लिक करून से रेकॉर्ड तलाठी सेव्ह करु शकतो.
E Peek Pahani

  • त्या नंतर क्षेत्र पडताळणी बटन क्लिक करायचे आहे त्याखेरीज साठवा बटन क्लिक करता येणार नाही.एकदा रेकॉर्ड सेव्ह झाले कि ते पुन्हा दुरुस्त करता येणार नाही याची कृपया नोंद घ्यावी.
Telegram GroupJoin
E Pik Pahani AppDownload
ई पीक पाहणी डाऊनलोड कराDownload
E Pik Pahani Customer Care Number02025712712
E pik Pahani version 3 downloadDownload

महाराष्ट्र शासनाच्या योजना

महाज्योती फ्री टॅबलेट योजना
महिलांना रोजगारासाठी पिंक (गुलाबी) ई-रिक्षा योजना
लेक लाडकी योजना
आंतरजातीय विवाह योजना
अण्णासाहेब पाटील कर्ज योजना
महिलांसाठी महाराष्ट्र शासनाच्या विविध योजना
अपंग-अव्यंग व्यक्तीच्या विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी आर्थिक सहाय्याची योजना
आंतरजातीय विवाह अनुदान महाराष्ट्र शासन PDF
ई पीक पाहणी
ई पीक पाहणी नोंदणी
अहिल्यादेवी सिंचन विहीर योजना
दोन मुलींसाठी योजना
लहान मुलींसाठी योजना
रोजगार संगम योजना
बचत गटाचे फायदे
बचत गटाचे नियम
महिला बचत गट नावे
महिला बचत गट नोंदणी अर्ज
बचत गट ठराव नमुना PDF
पुरुष बचत गट नावे
शिवभोजन योजना
पिवळ्या रेशन कार्ड चे फायदे
ग्रामीण कुटीर उद्योग
चंदन कन्या योजना
शेतकरी योजना
बॅच बिल्ला काढण्याची पद्धत
जलयुक्त शिवार योजना
पारंपारिक वस्त्रोद्योग विणकरांना बक्षीस योजना
अण्णासाहेब पाटील महामंडळ कर्ज योजना कागदपत्रे
कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना
मिनी ट्रॅक्टर व त्यांची उपसाधने यांचा पुरवठा करणे ची योजना
राजे यशवंतराव होळकर महामेष योजना
विहीर अनुदान योजना
मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजना
महिला सन्मान योजना
महाराष्ट्र मुख्यमंत्री किसान योजना
निर्धूर चुल वाटप योजना
Baby Care Kit Yojana
महिला बचत गट समृद्धी कर्ज योजना
थेट कर्ज योजना
प्रधानमंत्री पीक विमा योजना
चर्मकार समाज योजना
गाय म्हैस शेळी मेंढी पालन अनुदान योजना
अटल बांबू समृद्धी योजना
महिला स्वयंसिद्धी व्याज परतावा योजना
मध केंद्र योजना
राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना
शौचालय अनुदान योजना
जिव्हाळा कर्ज योजना
डिजल पंप सब्सिडी योजना
मल्चिंग पेपर योजना
राष्ट्रीय वयोश्री योजना
खावटी अनुदान योजना
मुख्यमंत्री रोजगार निर्मिति योजना
शबरी घरकुल योजना
प्रधानमंत्री मुद्रा योजना
पंडित दिनदयाळ उपाध्याय स्वयंम योजना
वसंतराव नाईक कर्ज योजना
कृषी ड्रोन अनुदान योजना
बांधकाम कामगार योजना
संजय गांधी निराधार योजना
आचार्य बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजना
सायकल वाटप योजना
वीरभद्रकाली ताराराणी स्वयंसिद्धा योजना
प्रधानमंत्री स्वामित्व योजना
प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना
रुफटॉप सोलर योजना
श्रावणबाळ अनुदान योजना
सैनिक शाळेतील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता योजना 
गटई स्टॉल योजना
राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना
प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना
प्रधानमंत्री जीवन ज्योति बीमा योजना
गाय गोठा अनुदान योजना
डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना
शेळी मेंढी पालन योजना
ट्रॅक्टर अनुदान योजना
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना
सुकन्या समृद्धी योजना
प्रधानमंत्री मातृ वंदना योजना
किशोरी शक्ती योजना
माझी कन्या भाग्यश्री योजना
बाल संगोपन योजना
फ्री सिलाई मशीन योजना
पीएमसी महिला आणि बालकल्याण योजना
रमाई घरकुल योजना
महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजना
पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा
युवकांना विविध व्यावसायिक प्रशिक्षण योजना
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मोफत सायकल वाटप योजना
अपंग बस सवलत योजना
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना
मोटार वाहन चालक प्रशिक्षण योजना
कोरोना मृतांच्या नातेवाईकांना 50 हजारांची मदत
शैक्षणिक कर्ज योजना
आम आदमी विमा योजना
महाडीबीटी शिष्यवृत्ती
सावित्रीबाई फुले स्कॉलरशिप
पॅन कार्ड क्लब क्लेम करण्याची पद्धत
प्रधानमंत्री किसान हेल्पलाईन नंबर
पोस्ट ऑफिस ग्राम सुरक्षा योजना
दहीहंडी विमा योजना
शरद पवार इन्स्पायर फेलोशिप
विद्याधन स्कॉलरशिप
मेडले फार्मा शिष्यवृत्ती
इंडिया स्माइलिंग फाउंडेशनल शिष्यवृत्ती कार्यक्रम
मुख्यमंत्री अप्रेंटिसशिप योजना
एचडीएफसी लिमिटेड बढते कदम शिष्यवृत्ती
मर्क इंडिया चॅरिटेबल ट्रस्ट शिष्यवृत्ती कार्यक्रम
Join WhatsApp Group!