गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना

आज आपण महाराष्ट्र शासनाद्वारे राज्यातील शेतकऱ्यांना अपघात विमा सुरक्षा देण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या एका योजनेची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत ज्या योजनेचे नाव Gopinath Munde Apghat Vima Yojana आहे.

शेती व्यवसाय करताना अंगावर वीज पडणे, पूर इत्यादी नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे अपघात, सर्पदंश, विंचूदंश, विजेचा शॉक बसणे, रस्त्यावरील अपघात, वाहन अपघात, तसेच अन्य कारणामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचा अपघात होतो व त्यांना अपंगत्व येते किंवा त्यांचा मृत्यू ओढावतो परिणामी कुटुंबातील कर्त्या पुरुषाच्या अशा एकाएकी मृत्यूमुळे किंवा अपंगत्वामुळे कुटुंबावर आर्थिक परिस्थिती निर्माण होते तसेच त्यांचा उपजीविकेचा प्रश्न निर्माण होतो.

महाराष्ट्र राज्यातील बहुतांश शेतकरी हे दारिद्रय रेषेखाली स्वतःचे जीवन जगत असल्यामुळे त्यांना स्वतःचा तसेच कुटुंबातील सदस्यांचा विमा उतरवणे शक्य होत नाही आर्थिक परिस्थिती कमजोर असल्याकारणामुळे ते विम्याचा हफ्ता भरण्यासाठी असमर्थ असतात व अशा वेळी एखाद्या शेतकऱ्याचा शेतात काम करताना एखाद्या कारणामुळे अपघात झाल्यास त्याच्याजवळ इलाज करण्यासाठी पैसे नसल्याकारणामुळे आर्थिक संकटाला सामोरे जावे लागते व अपघातात मृत्यू झाल्यास कुटुंबाला जीवन जगण्यासाठी खूप साऱ्या आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते या सर्व गोष्टींचा विचार करून महाराष्ट्र शासनाने राज्यातील शेतकऱ्यांसाठी Gopinath Munde Shetkari Apghat Vima Yojana सुरु करण्याचा निर्णय घेतला.

शेतकरी व त्याच्या कुटुंबातील कोणताही 1 सदस्य त्यामध्ये आई, वडील, शेतकऱ्याची पती / पत्नी, मुलगा व अविवाहित मुलगी यापैकी कोणतीही एक व्यक्ती असे 10 ते 75 वर्षे वयोगटातील एकूण 2 जणांना या योजनेचा लाभ घेता येईल.

शेतात काम करताना किंवा शेती संबंधित इतर कामे करताना एखाद्या कारणामुळे शेतकऱ्याचा मृत्यू ओढवल्यास त्यांच्या कुटुंबांना आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देणे जेणेकरून त्या पैशाने शेतकऱ्याचे कुटुंब स्वतःचे जीवन जगू शकतील किंवा स्वतःचा एखादा लहू उद्योग सुरु करू शकतील हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. [गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना]

वाचकांना विनंती

आम्ही Gopinath Munde Vima Yojana ची संपूर्ण माहिती या लेखात दिली आहे त्यामुळे तुमची हा लेख शेवट पर्यंत वाचा व या योजनेचा लाभ मिळवा जर तुमच्या परिसरात जे कोणी शेतकरी असतील तर त्यांना या योजनेची माहिती अवश्य द्या किंवा आमचे हे आर्टिकल त्यांना शेयर करा जेणेकरून ते या योजनेचा लाभ घेऊ शकतील.

योजनेचे नावगोपीनाथ मुंडे अपघात विमा माहिती
कोणी सुरू केली  महाराष्ट्र शासन 
लाभार्थीराज्यातील शेतकरी 
उद्दिष्टशेतकऱ्यांना विमा प्रदान करणे
अर्ज करण्याची पद्धतऑफलाईन

Table Of Content

गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना चे उद्दिष्ट

 • शेती व्यवसाय करताना शेतकऱ्यांचा अपघात होतो परिणामी त्यांचा मृत्यू होतो किंवा त्यांना अपंगत्व येते परिणामी त्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येते या सर्व गोष्टींचा विचार करून अशा कुटुंबांना आर्थिक सहाय्य देण्याच्या उद्देशाने Gopinath Munde Yojana ची सुरुवात करण्यात आली आहे. जेणेकरून कुटुंबातील कर्त्या व्यक्तीचा मृत्यू ओढवल्यास किंवा अपंगत्व आल्यास कुटुंबावर उपासमारीची वेळ येणार नाही.
 • शेतकऱ्याला सामाजिक व आर्थिक दृष्ट्या मजबूत करण्याच्या उद्देशाने गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
 • राज्यातील शेतकऱ्यांना विमा संरक्षण देण्याच्या उद्देशाने या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
 • शेतकऱ्याचे जीवनमान सुधारण्यासाठी या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
 • राज्यातील शेतकऱ्यांना आत्मनिर्भर बनवण्याच्या उद्देशाने या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
 • शेतकऱ्याचा अपघात झाल्यास त्याला स्वतःच्या उपचारासाठी पैशांसाठी कोणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता भासू नये तसेच कोणाकडून कर्ज घेण्याची गरज भासू नये या उद्देशाने या योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे.
 • राज्यातील शेतकऱ्याचे भविष्य उज्वल बनविणे. [गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना]
गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा ची वैशिष्ट्ये

 • शेतकरी अपघात विमा योजना महाराष्ट्र सरकार कडून राज्यातील शेतकऱ्यांसाठी सुरु करण्यात आली आहे.
 • राज्यातील शेतकऱ्याचा अपघात झाल्यास त्याच्या निशुल्क उपचारासाठी सुरु करण्यात आलेली एक महत्वाची अशी एक योजना आहे.
 • या योजनेत आकारण्यात येणारी विम्याची रक्कम अत्यंत कमी आहे.
 • या योजनेअंतर्गत आकारण्यात येणारी विम्याची रक्कम 32.23 रुपये आहे जी शासनामार्फत दि ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनीत भरण्यात येते त्यामुळे शेतकऱ्याला विमा हप्त्याची रक्कम भरण्याची गरज नाही.
 • गोपीनाथ मुंडे अपघात योजना अंतर्गत अर्ज प्रक्रिया अत्यंत सोपी ठेवण्यात आलेली आहे जेणेकरून शेतकऱ्याला अर्ज करताना कोणत्याच अडचणींचा सामना करावा लागू नये.
 • या योजनेअंतर्गत मिळणारे आर्थिक सहाय्य DBT च्या साहाय्याने लाभार्थी कुटुंबाच्या बँक खात्यात जमा केले जाते.
 • महाराष्ट्र राज्यातील 10 ते 75 वर्षे वयोगटातील महसूल नोंदी नुसार विमा पॉलिसी लागू झालेल्या तारखेस खातेदार असलेला शेतकरी व त्याच्या कुटुंबातील विहितीधारक खातेदार म्हणुन नोंद नसलेले कोणताही 1 सदस्य त्यामध्ये आई वडील,लाभार्थीचे पती / पत्नी, मुलगा व अविवाहित मुलगी यापैकी कोणतीही 1 व्यक्ती असे 10 ते 75 वर्षे वयोगटातील एकूण दोन जणांना या योजनेचा लाभ घेता येईल.
 • Gopinath Munde Accident Yojana अंतर्गत राज्यातील शेतकऱ्याचे जीवनमान सुधारण्यास तसेच त्यांचा सामाजिक व आर्थिक विकास होण्यास व ते सशक्त व आत्मनिर्भर बनण्यास मदत होईल. [गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना]
 • राज्य सरकार देत आहे आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील प्रत्येक मुलीला 98 हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य त्यासाठी वाचा लेक लाडकी योजना
 • राज्य सरकार शेतकऱ्यांना विहीर खोदण्यासाठी देत आहे 4 लाखांचे अनुदान त्यासाठी वाचा विहीर अनुदान योजना

Gopinath Munde Apghat Yojana चे लाभार्थी

 • राज्यातील शेतकरी गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेचा लाभ मिळवण्यासाठी पात्र आहेत. [गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना]

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना अंतर्गत मिळणारा लाभ

 • एखाद्या शेतकऱ्याचा शेतीची कामे करताना अपघाती मृत्यू झाल्यास किंवा अपघातामुळे 2 डोळे अथवा 2 अवयव निकामी झाल्यास रुपये 2 लाख रक्कम नुकसान भरपाई देण्यात येते.
 • शेतीची कामे करताना अपघात झाल्यास अपघातामुळे 1 डोळा व 1 अवयव निकामी झाल्यास रुपये 1 लाख नुकसान भरपाई देण्यात येते.
अपघाताची बाबगोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना रक्कम
अपघाती मृत्यू2 लाख
अपघाती मृत्यू झाल्यास किंवा अपघातामुळे
2 डोळे अथवा 2 अवयव निकामी झाल्यास
2 लाख
अपघातामुळे 1 डोळा व 1 अवयव निकामी झाल्यास1 लाख

Gopinath Munde Shetkari Apghat Vima Yojana 2024 अंतर्गत शेतकऱ्यांना होणारा फायदा

 • शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत विम्याचा हफ्ता भरण्याची आवश्यकता नाही कारण महाराष्ट्र शासन विम्याची रक्कम स्वतः भरते.
 • या योजनेअंतर्गत राज्यातील शेतकरी आत्मनिर्भर बनतील.
 • शेतीची कामे करताना शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यास सरकार कडून 2 लाखांचे आर्थिक सहाय्य कुटुंबाला देण्यात येते त्यामुळे त्याच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येणार नाही.
 • शेतीची कामे करताना शेतकऱ्याला अपंगत्व आल्यास त्याला शासनाकडून 1 लाखांचे आर्थिक सहाय्य करण्यात येते त्यामुळे शेतकऱ्याला त्याच्या दैनंदिन गरजांसाठी कोणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता भासणार नाही.
 • या योजनेअंतर्गत राज्यातील शेतकरी आत्मनिर्भर बनतील.
 • सदर योजना कालावधीत संपुर्ण दिवसासाठी म्हणजेच विहित कालावधीतील प्रत्येक दिवसाच्या 24 तासांसाठी हि योजना लागू राहिल. या कालावधीत वहितीधारक खातेदार शेतकरी व शेतकऱ्यांचे कुटुंबातील वहितीधारक खातेदार म्हणून नोंद नसलेले कोणताही एक सदस्य यापैकी कोणत्याही व्यक्तिला केव्हांही अपघात झाला किंवा अपंगत्व आले तरीही ते योजनेअंतर्गत लाभासाठी पात्र राहतील. [गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना]

गोपीनाथ मुंडे अपघात योजना अंतर्गत अर्ज करण्यासाठी आवश्यक पात्रता

 • अर्जदार शेतकरी आणि त्याचे कुटुंब महाराष्ट्र राज्याचे मूळ निवासी असणे आवश्यक आहे.
 • महाराष्ट्र राज्यातील 10 ते 75 वयोगटातील महसूल नोंदी नुसार खातेदार असलेला शेतकरी व वहितीधारक खातेदार म्हणून नोंद नसलेला शेतकऱ्याच्या कुटुंबातील कोणताही 1 सदस्य. [गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना]
 • सरकार मल्चिंग पेपरच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांना देत आहे 50 टक्के अनुदान त्यासाठी वाचा मल्चिंग पेपर योजना
 • आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना सरकार देत आहे 3 लाखाची प्रोत्साहन राशी त्यासाठी वाचा आंतरजातीय विवाह योजना

gopinath munde accident yojana चे नियम व अटी

 • फक्त महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनाच या योजनेचा लाभ घेता येईल.
 • महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
 • फक्त शेतकऱ्यांनाच या योजनेचा लाभ घेता येईल.
 • अर्जदार शेतकऱ्याने शासनाच्या इतर कोणत्या अपघातग्रस्त योजनेचा लाभ घेतला असेल तर तो शेतकरी किंवा त्याच्या कुटुंबाला गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचा लाभ घेता येणार नाही.
 • गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराचे वय 18 ते 75 वर्ष दरम्यान असणे आवश्यक आहे.
 • शेतकऱ्याचे आधार कार्ड बँक खात्यासोबत लिंक असणे आवश्यक आहे.
 • गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेसाठी लाभ प्रदान करण्यासाठी कुटुंबाच्या व्याख्येमध्ये शेतकऱ्याचे ( आई-वडिल, शेतकऱ्याची पती-पत्नी, मुलगा व अविवाहित मुलगी, यापैकी कोणतीही एक व्यक्ती) यांचा समावेश ग्राह्य धरण्यात येईल.
 • सदर योजने अंतर्गत लाभास पात्र असलेल्या शेतकऱ्याने / शेतकऱ्याच्या कोणत्याही वारसदाराने शासनाच्या अन्य विभागांकडून अपघातग्रस्तांसाठी कार्यान्वित असलेल्या योजनेचा लाभ घेतला असल्यास सदर लाभार्थी या योजनेअंतर्गत लाभास पात्र ठरणार नाहीत. [गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना]

वारसदार

अपघातग्रस्ताचे निधन झाल्यास त्यांच्या कुंटुंबातील वारसदाराची निवड व सानुग्रह अनुदानाची रक्कम पुढील प्राथम्य क्रमानुसार अदा केली जाईल.

1) अपघातग्रस्त यांची पत्नी / अपघातग्रस्त स्त्रीचा पती
2) अपघातग्रस्ताची अविवाहित मुलगी
3) अपघातग्रस्ताची आई
4) अपघातग्रस्ताचा मुलगा
5) अपघातग्रस्ताचे वडिल
6) अपघातग्रस्ताची सुन
7) अन्य कायदेशीर वारसदार

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना अंतर्गत समाविष्ट अपघाती कारणे

खाली दिलेल्या वेगवेगळ्या कारणामुळे शेतकऱ्यांना अपंगत्व किंवा मृत्यू ओढवल्यास या योजनेअंतर्गत 2 लाखांपर्यंत आर्थिक मदत केली जाते तसेच अपघाताच्या स्वरूपानुसार विमा रक्कम मंजूर केली जाते.

 1. अंगावर वीज पडून मृत्यू होणे
 2. नैसर्गिक आपत्ती 
 3. पूर 
 4. सर्पदंश 
 5. विंचू दंश 
 6. वाहन अपघात
 7. रस्त्यावरील अपघात 
 8. विजेचा शॉक लागून मृत्यू 
 9. रेल्वे अपघात 
 10. पाण्यात बुडून मृत्यू 
 11. जंतुनाशके हाताळताना अथवा अन्य कारणामुळे विषबाधा
 12. खून
 13. उंचावरून पडून झालेला अपघात
 14. नक्षलवाद्यांकडून हत्या 
 15. हिंस्त्र जनावरांनी चावल्यामुळे मृत्यू किंवा जखमी होणे.
 16. दंगल

gopinath munde insurance scheme अंतर्गत शेतकऱ्यास खालील कारणासाठी लाभ घेता येणार नाही

 1. नैसर्गिक मृत्यू 
 2. विमा कालावधीपूर्वीचे अपंगत्व 
 3. आत्महत्येचा प्रयत्न
 4. आत्महत्या
 5. स्वतःला जाणीवपूर्वक जखमी करून घेणे
 6. गुन्हयाच्या उद्देशाने कायद्याचे उल्लंघन करताना झालेला अपघात
 7. अमली पदार्थाच्या सेवनामुळे झालेला अपघात
 8. भ्रमिष्टपणा
 9. बाळंतपणातील मृत्यू 
 10. शरीरांतर्गत रक्तस्त्राव
 11. मोटार शर्यतीतील अपघात
 12. युद्ध
 13. सैन्यातील नोकरी जवळच्या लाभार्थ्यांकडून / वारसाकडून खून

Gopinath Munde Apghat Vima Yojana अंतर्गत अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे

 • दावा अर्ज
  7/12
 • अर्जदाराचे राष्ट्रीयकृत बँकेत बचत खाते असणे आवश्यक
 • बँकेचे नाव
 • बचत खाते क्रमांक
 • शाखा
 • आय एफ एस सी कोड
 • शिधापत्रिका
 • एफ आय आर
 • एखादा अपघात झाल्यास प्रथम माहिती अहवाल किंवा पोलीस पाटील अहवाल
 • अकस्मात मृत्यूची खबर
 • इंनक्वेस्ट पंचनामा
 • वाहन चालविण्याचा वैध परवाना
 • मृत्यू दाखला
 • अपंगत्वाचा दाखला
 • घोषणापत्र
 • पासपोर्ट आकाराचा फोटो
 • वयाचा दाखला (जन्माचा दाखल किंवा शाळा सोडल्याचा दाखल)
 • अपघात घटनास्थळ पंचनामा
 • पोष्ठ मार्टेम रिपोर्ट
 • वारासदाराचे राष्ट्रीयकृत बँकेत बचत खाते असणे आवश्यक
 • कृषी अधिकारी पत्र
 • औषधोपचाराचे कागदपत्र
 • डिस्चार्ज कार्ड

Gopinath Munde Shetkari Apghat Vima Yojana अंतर्गत अपघाताच्या घटनेच्या स्वरूपानुसार पुराव्यादाखल सादर करावयाची कागदपत्रे

अपघाताचे स्वरूप आवश्यक कागदपत्रे
रस्ता रेल्वे अपघात इन्ववेस्ट पुंचनामा, पो्ट मॉटेम अहवाल,
विमा संरक्षित व्यक्ती वाहन चालविताना अपघात झाल्यास त्याचा मोटार वाहन परवाना
पाण्यामध्ये बुडून मृत्यू इन्ववेस्ट पुंचनामा, पो्ट मॉटेम अहवाल
बुडून बेपत्ता झाल्यास फक्त प्रथम माहिती अहवाल
व क्षतिपूर्ती बंधपत्र आवश्यक
जंतुनाशके किंवा
अन्य कारणामुळे विषबाधा
इन्ववेस्ट पुंचनामा, पो्ट मॉटेम अहवाल
रासायनिक विश्लेषण अहवाल (व्हिसेरा अहवाल)
विजेचा धक्का अपघातइन्ववेस्ट पुंचनामा, पो्ट मॉटेम अहवाल
वीज पडून मृत्यू इन्ववेस्ट पुंचनामा, पो्ट मॉटेम अहवाल
खूनइन्ववेस्ट पुंचनामा, पो्ट मॉटेम अहवाल
रासायनिक विश्लेषण अहवाल
(व्हिसेरा अहवाल), दोषारोप पत्र
उंचावरून पडून झालेला अपघातइन्ववेस्ट पुंचनामा, पो्ट मॉटेम अहवाल
पोलीस अंतिम अहवाल
सर्पदंश / विंचूदंश इन्ववेस्ट पुंचनामा, पो्ट मॉटेम अहवाल
वैद्यकीय उपचारापूर्वीच निधन झाल्याने पोस्ट मॉर्टेम झाले नसल्यास 
या अहवालातून सूट
मात्र वैद्यकीय अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र शासकीय आरोग्य केंद्र 
अधिकाऱ्याकडून प्रतिस्वाक्षरीत असणे आवश्यक.
माक्षलवाद्यांकडून झालेल्या हत्याइन्ववेस्ट पुंचनामा, पो्ट मॉटेम अहवाल
नक्षलवादी हत्येसंदर्भातील कार्यालयीन कागदपत्र
जनावरांच्या चावण्यामुळे रेबीज होऊन मृत्यू औषधोपचाराची कागदपत्रे 
जनावरांच्या हल्ल्यात / चावण्यामुळे
जखमी होऊन मृत्यू 
इन्ववेस्ट पुंचनामा, पो्ट मॉटेम अहवाल
जनावरांच्या हल्ल्यात मृत्यू होऊन शव न मिळणेक्षतिपूर्ती बंधपत्र आवश्यक
दंगलइन्ववेस्ट पुंचनामा, पो्ट मॉटेम अहवाल
दंगलीबाबतची कार्यालयीन कागदपत्रे
अन्य कोणतेही अपघातइन्ववेस्ट पुंचनामा, पो्ट मॉटेम अहवाल पोलीस अंतिम अहवाल 
अपंगत्वाच्या लाभाच्या पुराव्यासाठी
सादर करावयाची कागदपत्रे
1. अपंगत्व अथवा अवयव निकामी होण्याचे करणाबाबतचे
डॉक्टरांचे अंतिम प्रमाणपत्र अथवा दवाखान्याच्या नोंदी

2. प्राथमिक आरोग्य केंद्र / उपकेंद्र / जिल्हा शल्य चिकित्सक यांचे
प्रतिस्वाक्षरीसह कायम अपंगत्वाचे प्रमाणपत्र.

सूचना

 • वरील कागदपत्र मूळ किंवा राजपत्रित अधिकारी यांनी साक्षांकित केलेले अथवा स्वयंसाक्षांकीत असल्यास ग्राह्य धरण्यात येईल.
 • मृत्यूच्या कारणाची नोंद सक्षम प्राधिकाऱ्याने स्पष्ट केली असल्यास रासायनिक विश्लेषण अहवाल (व्हिसेरा अहवाल) या कागदपत्राची आवश्यकता राहणार नाही.
 • जेव्हा शेतकऱ्याचे अपघाताचे प्रकरण निदर्शनास येईल तेव्हा संबंधित अपघातग्रस्त शेतकरी / शेतकऱ्यांचे वारसदार यांनी सर्व निर्धारीत कागदपत्रांसह परिपुर्ण प्रस्ताव संबंधित तालुका कृषि अधिकारी यांचेकडे 30 दिवसाच्या आत सादर करावा. यासाठी कृषि विभागाच्या सर्व क्षेत्रिय अधिकारी / कर्मचारी संबंधिताना मार्गदर्शन करतील.
 • अपघातग्रस्त शेतकऱ्याबाबत प्राथमिक माहिती प्राप्त झाल्यानंतर सखोल चौकशी करण्यासाठी संबंधित महसूल अधिकारी, पोलिस अधिकारी, तालुका कृषि अधिकारी यांचे पथक प्रत्यक्ष भेट देऊन तपासणी करुन त्याबाबतचा अहवाल तहसीलदार यांना घटना झाल्यापासून 8 दिवसाच्या आत सादर करतील.
 • तालुका कृषि अधिकारी प्राप्त झालेल्या प्रस्तावांची योजनेच्या मार्गदर्शक सुचनेनुसार छाननी करुन मंजुर प्रस्ताव, नामंजुर प्रस्ताव कारणासहित व कागदपत्रांअभावी अपुर्ण प्रस्ताव या वर्गवारीनुसार संबंधित तहसिलदार यांचेकडे सादर करतील व मुळ प्रस्तांवांचे जतन तालुका कृषि अधिकारी स्तरावरच करण्यात येईल.
 • तहसिलदार यांचे अध्यक्षेतेखालील समितीच्या बैठकीमध्ये 30 दिवसाच्या आत संबंधित शेतकरी / शेतकरी कुंटूंबाच्या वारसदारांना लाभ देण्याबाबतचा निर्णय घेण्यात येवून संबंधित तालुका कृषि अधिकारी यांचेमार्फत संबंधित अपघातग्रस्त शेतकरी / वारसदारांच्या बँक खात्यात ECS व्दारे निधी अदा करण्यात येईल. [गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना]

gopinath munde vima yojana अंतर्गत महत्वाच्या बाबी

 • अपघातग्रस्त वाहन चालकाच्या चुकीमुळे शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्यास / अपंगत्व आल्यास दोषी वाहन चालक वगळता सर्व अपघातग्रस्त शेतकऱ्यांचे केवळ अपघात झाला या कारणास्तव प्रस्ताव मंजूर केला जाईल.
 • अपघाती मृत्यू संदर्भात दुर्घटना घडल्याचे सिद्ध झाल्यास अनावश्यक धोका पत्करला या कारणास्तव एकही प्रस्ताव नाकारता येणार नाही.
 • वाहन अपघातात वाहनचालक भरधाव वेगाने किंवा निष्काळजीपणाने गाडी चालवत होता या कारणास्तव प्रस्ताव नाकारता येणार नाही.
 • जर शेतकऱ्याचा मृत्यू वाहन अपघातामुळे झाला असेल व अपघातग्रस्त शेतकरी स्वत: वाहन चालवत असेल तर अशा प्रकरणी वाहन चालवण्याचा वैध परवाना सादर करणे आवश्यक राहील. [गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना]
 • अपघातग्रस्ताचे निधन झाल्यास त्यांच्या कुंटुंबियांस सानुग्रह अनुदानाची रक्कम पुढील प्राथम्य क्रमानुसार अदा केली जाईल.
  • अपघातग्रस्त यांची पत्नी / अपघातग्रस्त स्त्रीचा पती
  • अपघातग्रस्ताची अविवाहित मुलगी
  • अपघातग्रस्ताची आई
  • अपघातग्रस्ताचा मुलगा
  • अपघातग्रस्ताचे वडिल
  • अपघातग्रस्ताची सुन
  • अन्य कायदेशीर वारसदार
 • सरकार गटई कामगारांना देत आहे मोफत पत्र्याचे स्टॉल त्यासाठी वाचा गटई स्टॉल योजना
 • आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबांना सरकार देत आहे 4000/- रुपयांचे अर्थसहाय्य त्यासाठी वाचा खावटी अनुदान योजना
 • आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना सरकार देत आहे 3 लाखाची प्रोत्साहन राशी त्यासाठी वाचा आंतरजातीय विवाह योजना
 • शेतजमिनीवर तसेच शेताच्या बांधावर बांबू लागवडीकरिता सरकार शेतकऱ्यांना देत आहे 80 टक्के अनुदान त्यासाठी वाचा अटल बांबू समृद्धी योजना

Gopinath Munde Apghat Yojana अंतर्गत दावा सादर करण्याचा कालावधी

 • अपघात झालेल्या शेतकऱ्याचा दावा अर्ज विमा कालावधीत तसेच विमा कालावधी संपल्यानंतर देखील 90 दिवसांपर्यंत केव्हाही विमा कंपनीकडे सादर करता येतो. [गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना]

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा अंतर्गत अर्ज करण्याची पद्धत

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार शेतकऱ्याला सर्वात प्रथम आपल्या नजीकच्या जिल्हा कार्यालयात कृषी अधिकारी कार्यालयात जाऊन सदर योजनेचा अर्ज घ्यावा लागेलं आणि अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून सोबत योग्य ती कागदपत्रे जोडून सदर अर्ज जमा करावा
अशा प्रकारे या योजनेअंतर्गत अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्ण होईल.

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना अंतर्गत दावा अर्ज करण्याची पद्धत

एखाद्या शेतकऱ्याचा अपघात झाल्यानंतर सदर योजनेअंतर्गत दावा करण्यासाठी शेतकऱ्याला किंवा त्याच्या वारसाला नजीकच्या तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे अपघातानंतर 45 दिवसांच्या आत दावा अर्ज सादर करावा लागेल तसेच दावा अर्ज सोबत योग्य ती कागदपत्रे जोडावी लागतील.
अधिकाऱ्यांकडून सदर दाव्याची तपासणी करून लाभ दिला जाईल. [गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना]

Gopinath Munde Apghat Vima Yojana अंतर्गत अर्ज रद्द होण्याची कारणे

 • अर्जदार हा शेतकरी नसल्यास अर्ज रद्द केला जाईल.
 • अर्जदार शेतकऱ्याने शासनाच्या इतर कोणत्या अपघातग्रस्त योजनेचा लाभ घेतला असेल तर
 • अर्जदाराचे वय 18 ते 75 वर्ष दरम्यान नसल्यास
 • अर्जदार महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवाशी नसल्यास
शासनाची अधिकृत वेबसाईटClick Here
Gopinath Munde Shetkari Apghat Vima Yojana Form PDFClick Here
Gopinath Munde Shetkari Apghat Vima Yojana Helpline1800-233-3533
गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना GRClick Here
Telegram GroupJoin

सारांश

आशा करतो कि तुम्हाला गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना ची सर्व माहिती आपल्याला प्राप्त झाली आहे तरीदेखील आपले योजनेसंबंधी काही प्रश्न असल्यास मला ई-मेल किंवा कंमेंट्स च्या माध्यमातून जरूर कळवा आम्ही तुमच्या प्रश्नांची लवकरात लवकर उत्तरे देण्याचा प्रयत्न करू आणि जर तुम्हाला या योजनेची माहिती उपयुक्त वाटली असेल तर तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा जेणेकरून तुमचे मित्र देखील या योजनेचा लाभ घेऊ शकतील. [गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना]

28 thoughts on “गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना”

 1. हा विमा तरी किती दिवसांनी मिळतो.

  • तुम्ही योजनेसाठी पात्र ठरल्यास त्वरित तुमच्या बँक खात्यात सदर विम्याची रक्कम DBT द्वारे जमा केली जाते.

   • सर माझ्या आजीला सर्पदंश झाला होता पांच वर्षा पहिले यांना काही लाभ वगैरे मिळणार कि नाही सर काहि प्रोसेस असेल तर सांगा

    • जर तुम्ही शेतकरी असाल तर तुम्हाला या योजनेचा नक्की लाभ मिळू शकेल त्यासाठी तुम्हाला शासनाच्या अधिकृत वेबसाईट वर जाऊन अर्ज करावा लागेल. तुम्हाला अर्जासोबत डॉक्टरांनी केलेल्या उपचाराचे सर्टिफिकेट जोडावे लागेल.

 2. मी फाईल जमा करून एक वर्ष झाले आहे पुढे काय झाले आहे काहीच कळालं नाही अजून तरी फाईल चे स्टेटस कसे चेक करता येतील याबद्दल माहिती द्या

  • तुम्ही 1800-233-3533 या नंबर वर संपर्क करून आपला अर्ज क्रमांक सांगून आपल्या अर्जाची स्थिती जाणून घेऊ शकता.जर तुमचा अर्ज रद्द केला गेला असेल तर त्याचे कारण देखील जाणून घेऊ शकता.

 3. सर, शेती आईच्या नावे आहे मुलगा रस्ता अपघातात मयत झाला आहे लाभ भेटेल का.

  • हो नक्कीच हि योजना शेतकरी आणि परिवारातील सर्व सदस्यांसाठी लागू आहे.

 4. मृत्यू पावलेल्या वेक्ती जवळ driving licence नसेल तर from reject होणार का

  • वाहन चालवताना जवळ वाहन परवाना नसणे हा गुन्हा नाही परंतु वाहन चालवणाऱ्याने वाहन परवाना न काढता वाहन चालवणे हा गुन्हा आहे. जर अपघात झाला त्यावेळी चालकाकडे वाहन परवाना नसेल तर अर्ज रद्द होणार नाही परंतु त्या व्यक्तीने RTO मधून वाहन परवाना न काढताच वाहन चालवत असेल तर अर्ज रद्द होईल.

  • त्यासाठी नातवाचे नाव शेतकऱ्याच्या रेशन कार्ड वर असणे आवश्यक आहे.

 5. सर माझे आपंग सर्टीफिकेट काढले आहे ६६%आहे मला ऐकु येत नाही माझा आपघात झालेला नाही तर मीआपंगासाठीचा लाभ घेऊ शकतो का

  • गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना फक्त अपघातग्रस्त शेतकऱ्यांसाठीच लागू आहे.

 6. एकाच घरातील पती पत्नी वाहन अपघातात मृत्यू झाल्यास दोघांचा लाभ मिळेल का?

 7. पॅरालेसिस झालेला शेतकरी आहे तो असेल का पात्र या योजनेसाठी?

  • तुम्ही अर्ज करू शकता परंतु तुम्हाला लकवा झाला असल्याचा वैद्यकीय दाखला सोबत जोडावा लागेल.

 8. सर पाहुण्यांचा अपघातात मृत्यु झाला आहे. बहिणीने अर्ज केला आहे. पण अर्जाचा फॉलो अप कसा घ्यायचा ? अर्ज क्रमांक तर नाही माझ्याकडे पण 4 फाईल्स जमा केल्या आहेत कार्यालयात.

  • तुम्ही गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेच्या अधिकृत ई-मेल आयडी वर मेल करा.

  • तुमच्याकडे वैद्यकीय प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे.जर तुमच्याकडे या बाबत वैद्यकीय प्रमाणपत्र असेल तर तुमची अर्ज करू शकता.

  • तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज करून लाभ मिळवू शकता

 9. Good morning sir
  Sir maza mota bhau
  Cha concrate machine madhe Kam karat Astana right hand purn cut zala ahe.
  Pan company lord aslayamule company ne amchakadun sarve purave gheun distroy kele ahet
  Bhau adani aslay mule tayne all dacument company Madhe jama kele.ani 50,000 Rs Dele Ani matter close kela ahe
  Atta amcha javal civil hospital
  solapur che certificate ahe 80% handicap che
  Sir request ahe maza Bhau la madat betel ka
  Pls sir reply

  • जर तुमच्याकडे वैद्यकीय प्रमाणपत्र असेल तर तुमची गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत नक्की लाभ मिळवू शकता.

Comments are closed.