Vastrodyog Vinkar Bakshish Yojana 2024 | नोंदणी सुरु

Vastrodyog Vinkar Bakshish Yojana: राज्याच्या वस्त्रोद्योगाच्या वाढीस चालना देण्यासाठी व वस्त्रोद्योगाला आवश्यक त्या उपाययोजनांना हातभार लावण्यासाठी महाराष्ट्र शासनाद्वारे पुढील 5 वर्षाच्या कालावधीसाठी एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण 2023 – 28 जाहिर केलेली एक महत्वाची अशी योजना आहे.

सदर योजनेअंतर्गत पारंपारिक वस्त्रोद्योग, अतिरिक्त प्रोत्साहने हातमाग विणकर समुदयांचा योगदानाचा सन्मान करण्यासाठी आणि सामाजिक व आर्थिक विकासात या क्षेत्राच्या योगदानावर प्रकाश टाकण्यासाठी महाराष्ट्रातील 5 पारंपारीक क्षेत्रांमधील सर्वोत्कृष्ट डिझाईनचा राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त सत्कार केला जाईल.

पहिल्या पुरस्कारासाठी 20,000/- रुपये, दुसऱ्या पुरस्कारासाठी 15,000/- रुपये, तिसऱ्या पुरस्कारासाठी 10,000/- रुपये,बक्षिस दिले जाईल. यामुळे हातमागाच्या कलेच्या वाणांचे संरक्षण होईल आणि याक्षेत्रामध्ये मोठया संधी उपलब्ध होतील. [Vastrodyog Vinkar Bakshish Yojana]

महाराष्ट्राच्या वस्त्रोद्योग क्षेत्राला प्राचीन काळापासून प्रदीर्घ इतिहास आहे. ही वस्त्रे कापूस, रेशीम, आणि लोकर यासह विविध प्रकारच्या सामुग्री पासून तयार केली जातात. उपजिवीकेचे संरक्षण सुनिश्चित करून पारंपारीक वस्त्रोद्योग विणकराना इतर रोजगारांकडे स्थलांतरीत होण्यापासून परावृत्त करण्याच्या दृष्टीने अतिरीक्त प्रोत्साहन देणे या धोरणाचे उदिष्ट आहे.

महाराष्ट्रातील खालील 5 वस्त्रांना पारंपारीक वाण म्हणून घोषीत करण्यात आलेले आहे.

 • पैठणी साडी
 • हिमरू शॉल
 • करवत काटी
 • घोंगडी
 • खण फॅब्रीक

राज्यातील पारंपारिक वस्त्रोद्योग विणकरांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देदेशाने सदर योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे.

राज्यातील पारंपारीक वस्त्रोद्योग विणकरांचा सन्मान करण्यासाठी आणि सामाजिक व आर्थिक विकासात या क्षेत्राच्या योगदानावर प्रकाश टाकण्यासाठी, पारंपारीक वस्त्रोद्योग विणकरांना बक्षीस योजना सुरु करण्यात आलेली आहे.

सदर योजनेअंतर्गत 5 पारंपारिक 1. पैठणी साडी 2. हिमरू शाल 3. करवत काटी साडी 4. घोंगडी 5. खण फॅब्रीक हया वस्त्रोद्योग क्षेत्रामधील सर्वोत्कृष्ट डिझाईन्सचा राष्ट्रीय हातमाग दिनानिमित सत्कार केला जाईल.
पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाला अनुक्रमे 20,000/- रुपये, 15,000/- रुपये आणि 10,000/- रुपये बक्षिस दिले जाईल.
सदर बक्षिसाची रक्कम पारंपारीक वस्त्रोद्योग विणकरांच्या बैंक खात्यामध्ये DBT प्रणालीद्वारे अदा करण्यात येईल. [Vastrodyog Vinkar Bakshish Yojana]

वाचकांना विनंती

आम्ही पारंपारिक वस्त्रोद्योग विणकरांना बक्षीस योजना ची संपूर्ण माहिती या लेखात दिली आहे त्यामुळे तुमची हा लेख शेवट पर्यंत वाचा व या योजनेचा लाभ मिळवा तसेच तुमच्या परिसरात जे कोणी विणकर असतील तर त्यांना या योजनेची माहिती अवश्य द्या किंवा आमचे हे आर्टिकल त्यांना शेयर करा जेणेकरून ते या योजनेचा लाभ घेऊ शकतील.

योजनेचे नावपारंपारिक वस्त्रोद्योग विणकरांना बक्षीस योजना
राज्यमहाराष्ट्र
विभागसहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग
योजनेची सुरुवात2023
लाभार्थीराज्यातील वस्त्रोद्योग विणकर
लाभ20 हजारांपर्यंत बक्षीस
उद्देश्यविणकरांना त्यांच्या पारंपारिक उद्योगाला चालना देणे.
अर्ज करण्याची पद्धतऑफलाईन

Table Of Content

Vastrodyog Vinkar Bakshish Yojana चे उद्दिष्ट

 • पारंपारिक वस्त्रोद्योग विणकरांना त्यांच्या पारंपारिक उद्योगाला चालना देणे.
 • पारंपारिक वस्त्रोद्योग विणकरांना त्यांच्या उद्योगाच्या विकासासाठी प्रोत्साहित करणे.
 • राज्यातील वस्त्रोद्योग विणकरांचा सामाजिक तसेच आर्थिक विकास करणे. [Vastrodyog Vinkar Bakshish Yojana]
Vastrodyog Vinkar Bakshish Yojana

पारंपारिक वस्त्रोद्योग विणकरांना बक्षीस योजना चे वैशिष्ट्य

 • राज्य स्तरीय पारंपारिक वस्त्रोद्योग कापड स्पर्धा वस्त्रोद्योग आयुक्तालयाच्या स्तरावर आयोजित करण्यात येईल.
 • सदर योजना सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाद्वारे राबविण्यात आली आहे.
 • योजनेअंतर्गत दिली जाणारी लाभाची रक्कम लाभार्थ्यांच्या बँक खात्यात DBT च्या सहाय्याने जमा करण्यात येईल. [Vastrodyog Vinkar Bakshish Yojana]
 • स्वतःचा लघु उद्योग सुरु करण्यासाठी सरकार देत आहे 1 लाखाचे कमी व्याज दरात कर्ज त्यासाठी वाचा थेट कर्ज योजना
 • स्वतःचा व्यवसाय सुरु करू इच्छिणाऱ्या नागरिकांना सरकार देत आहे 1 लाख रुपयांचे कर्ज त्यासाठी वाचा वसंतराव नाईक कर्ज योजना

पारंपारिक वस्त्रोद्योग विणकरांना बक्षीस योजना चे निकष खालील प्रमाणे राहतील

अ. पारंपारिक वस्त्राचे विणकाम करणारे सर्व विणकर, खाजगी / सहकारी संस्था / महामंडळ/महासंघाचे/स्वयंसेवी संस्था/गट सदर स्पर्धेत भाग घेवू शकतील.

ब. अर्जासोबत विणकाम करतानाचा विणकराचा जिओ टॅगींग फोटो सादर करणे गरजेचे राहील.

क. महाराष्ट्राचा रहिवासी असावा.

पारंपारिक वस्त्रोद्योग विणकरांना बक्षीस योजना अंतर्गत पुरस्कार निवड करण्याची कार्यपध्दती

i. स्पर्धेत ठेवण्यांत आलेल्या वाणांचा प्रकार पारंपारीक 5 वस्त्रापैकीच असावा.

ii. निवड समिती प्रत्येक पारंपारीक वाणातून पहिले, दूसरे व तिस-या बक्षिसासाठी वाणाची निवड करेल.

iii. निवड समितीतील प्रत्येक सदस्यास एका वाणास 10 पर्यत गुण देण्याचे अधिकार असतील.

iv. एकूण गुणांच्या आकडेवारीच्या आधारे पहिल्या, दूसऱ्या व तिसऱ्या क्रमांकाच्या बक्षिसासाठी निवड करण्यात येईल.

V. सारखे गुण आल्यास समिती निर्णयानुसार एक बक्षिस दोन स्पर्धकामध्ये विभागून देण्यात येईल.

vi. गुणाचे वाटप, कापडावरील नक्षिकाम (डिझाइन), त्याची अचूकता (करेक्टनेस), रंगसंगती, व कापडाची आकर्षकता यांच्या आधारे करण्यांत येईल. [Vastrodyog Vinkar Bakshish Yojana]

पारंपारिक वस्त्रोद्योग विणकरांना बक्षीस योजना चे लाभार्थी

 • राज्यातील वस्त्रोद्योग विणकर

पारंपारिक वस्त्रोद्योग विणकरांना बक्षीस योजना चा लाभ

योजनेअंतर्गत पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाला अनुक्रमे खालीलप्रमाणे लाभ दिला जाईल.

पहिला क्रमांक20,000/- रुपये
दुसरा क्रमांक15,000/- रुपये
तिसरा क्रमांक10,000/- रुपये

योजनेचा खर्च

पारंपारिक वस्त्रोद्योग विणकरांना बक्षीस योजना

 • विजेत्या पारंपारीक वस्त्रोद्योग विणकराला आयुक्त वस्त्रोद्योग यांचे मार्फत पुरस्काराची रक्कम व प्रशस्ती पत्राचे वाटप करण्यात येईल.
 • स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकाला प्रोत्साहन देण्यासाठी प्रमाणपत्र देण्यात येईल.

पारंपारिक वस्त्रोद्योग विणकरांना बक्षीस योजना अंतर्गत स्पर्धेसाठी स्पर्धकाची निवड करण्याकरिता समितीची रचना पुढील प्रमाणे राहिल

आयुक्त (वस्त्रोद्योग, महाराष्ट्र राज्य, नागपूरअध्यक्ष
वस्त्रनिर्माण तज्ञ किंवा सहायक आयुक्त (हातमाग)सदस्य सचिव
उपसंचालक, विणकर सेवा केंद्र नागपूर / मुंबईसदस्य
संचालक, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फैशन टेक्नॉलॉजी (NIFT) मुंबईसदस्य
अध्यक्ष / व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळ, नागपूरसदस्य
स्कूल ऑफ फॅशन टेक्नालॉजी नागपूर यांचे तज्ञ प्रतिनिधी
उ. जिल्हा माहीती अधिकारी, नागपूर
सदस्य

पारंपारिक वस्त्रोद्योग विणकरांना बक्षीस योजना चे फायदे

 • वस्त्रोद्योग विणकरांचा सामाजिक तसेच आर्थिक विकास होईल.
 • विणकर त्यांच्या पारंपारिक वस्त्रोगाच्या वाढीसाठी प्रोत्साहित होतील.
 • वस्त्रोद्योग विणकरांना त्यांच्या पारंपारिक उद्योगाला चालना मिळेल. [Vastrodyog Vinkar Bakshish Yojana]
 • स्वतःचे घर बांधण्यासाठी राज्य सरकार देत आहे 2 लाखांचे आर्थिक सहाय्य त्यासाठी वाचा शबरी घरकुल योजना
 • विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण पूर्ण करता यावे यासाठी सरकार देत आहे 10 लाखांचे कर्ज त्यासाठी वाचा शैक्षणिक कर्ज योजना

पारंपारिक वस्त्रोद्योग विणकरांना बक्षीस योजना चे नियम व अटी

 • अर्जदार महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवाशी असणे आवश्यक आहे.
 • अर्जदार विणकर असणे आवश्यक आहे.
 • स्पर्धेत ठेवण्यांत आलेल्या वाणांचा प्रकार पारंपारीक 5 वस्त्रापैकीच असावा. [Vastrodyog Vinkar Bakshish Yojana]

पारंपारिक वस्त्रोद्योग विणकरांना बक्षीस योजना अंतर्गत आवश्यक कागदपत्रे

 • आधार कार्ड
 • रहिवाशी दाखला
 • विणकर असल्याचे प्रमाणपत्र
 • ई-मेल आयडी
 • मोबाईल नंबर
 • पासपोर्ट आकाराचे फोटो

पारंपारिक वस्त्रोद्योग विणकरांना बक्षीस योजना अंतर्गत अर्ज करण्याची पद्धत

अर्जदाराला आपल्या क्षेत्रातील जिल्हा कार्यालयात / महानगर पालिका कार्यालयात सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागात जाऊन सदर योजनेचा अर्ज घ्यावा लागेल व अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून सोबत आवश्यक कागदपत्रे जोडून अर्ज जमा करावा लागेल. [Vastrodyog Vinkar Bakshish Yojana]

Telegram GroupClick Here
GRClick Here

सारांश

आम्ही आशा करतो कि आपल्याला पारंपारिक वस्त्रोद्योग विणकरांना बक्षीस योजना बद्दल सर्व माहिती प्राप्त झाली आहे तरी देखील आपले या योजनेसंबंधी काही प्रश्न असल्यास मला ई-मेल किंवा कमेंट्स च्या माध्यमातून जरूर कळवा आम्ही तुमच्या प्रश्नांची लवकरात लवकर उत्तरे देण्याचा प्रयत्न करू आणि जर तुम्हाला या योजनेची माहिती उपयुक्त वाटली असेल तर तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा जेणेकरून तुमचे मित्र देखील या योजनेचा लाभ घेऊ शकतील.