महाराष्ट्र शासन आपल्या राज्यातील महिलांच्या आरोग्यासाठी त्यांच्या उन्नतीसाठी तसेच त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सतत प्रयत्नशील असते आणि त्यासाठी राज्य सरकार वेळोवेळी विविध योजनांची सुरुवात करत असते आज आपण महाराष्ट्र अर्थसंकल्प 2023 मध्ये महिलांसाठी सुरु करण्यात आलेल्या अशाच एका योजनेची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत ज्या योजनेचे नाव महिला सन्मान योजना आहे.
महिला सन्मान योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील सर्व महिलांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बसेसच्या तिकीट दरात 50 टक्के सवलत देण्यात येणार आहे. ज्यामुळे महिला तिकिटांच्या 50 टक्के दरात राज्यात प्रवास करू शकतात.
महाराष्ट्र राज्याच्या सन 2023-24 च्या अर्थसंकल्पामध्ये सर्व महिलांना राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बस प्रवास भाडयामध्ये 50% सवलत घोषित केली आहे. सदर घोषणेच्या अनुषंगाने दि. 17 मार्च 2023 पासुन सर्व महिलांना राज्याच्या हद्दीपर्यंत राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बस प्रवास भाड्यामध्ये 50% सवलत अनुज्ञेय करण्यात येत आहे. सदर सवलतीची प्रतिपुर्ती शासनाकडुन करण्यात येणार आहे.
वाचकांसाठी महत्वाची सूचना
आम्ही महिला सन्मान योजनेची संपूर्ण माहिती या लेखात दिली आहे त्यामुळे कृपया करून तुम्ही हा लेख शेवट पर्यंत वाचा व या योजनेचा लाभ मिळवा तसेच तुमच्या परिसरातील सर्व महिलांना या योजनेची माहिती अवश्य द्या किंवा आमचे हे आर्टिकल त्यांना शेयर करा जेणेकरून ते या योजनेचा लाभ घेऊ शकतील आणि 50 टक्के सवलत मिळवून प्रवास करू शकतील.
योजनेचे नाव | Mahila Samman Yojana Scheme |
राज्य | महाराष्ट्र |
योजनेची सुरुवात | 17 मार्च 2023 |
विभाग | महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ |
लाभ | राज्यातील महिलांना एस ती च्या तिकीट दरात 50 टक्के सवलत दिली जाते. |
लाभार्थी | राज्यातील सर्व महिला |
उद्देश | महिलांचा सामाजिक तसेच आर्थिक विकास करणे |
अर्ज करण्याची पद्धत | अर्ज करण्याची आवश्यकता नाही |
महिला सन्मान योजनेचा उद्देश
- राज्यातील महिलांना तसेच सर्व नागरिकांना एस टी मधून प्रवास करण्यासाठी आकर्षित तसेच प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने महिला सन्मान योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
- राज्यातील महिलांचा सामाजिक व आर्थिक विकास करणे.
- महिलांना सशक्त व आत्मनिर्भर बनविणे.
- राज्यातील महिलांचे जीवनमान सुधारणे.
- राज्यातील महिलांना समाजात मनाचे स्थान मिळवून देणे.

महिला सन्मान योजनेचे वैशिष्टय
- महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाद्वारे महिला सन्मान योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
- राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसमध्ये तिकीट दरामध्ये 50 टक्के सवलत लागू करण्यात आली आहे
- महाराष्ट्र राज्यातील महिलांचा सामाजिक तसेच आर्थिक विकास करण्यासाठी तसेच त्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी तसेच त्यांना सशक्त व आत्मनिर्भर बनविण्यासाठी सदर योजना महत्वाची ठरणार आहे.
- या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी महिलांना कुठल्याच प्रकारचा अर्ज करण्याची आवश्यकता नाही त्यामुळे त्यांना कुठल्याच सरकारी कार्यालयाच्या फेऱ्या मारण्याची आवश्यकता भासणार नाही त्यामुळे त्यांचा वेळ आणि पैसे दोघांची बचत होईल.
- महिला सन्मान योजनेची महत्वाची बाब अशी आहे कि या योजनेचा लाभ राज्यातील सर्व जाती धर्मातील महिला घेऊ शकतात त्यासाठी त्यांना कुठल्याच प्रकारची प्रवर्गाची अट ठेवण्यात आली नाही आहे.
शासनाच्या इतर योजना
- राज्य सरकार देत आहे आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील प्रत्येक मुलीला 98 हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य त्यासाठी वाचा लेक लाडकी योजना
- राज्य सरकार महिलांना देत आहे मोफत शिलाई मशीन त्यासाठी वाचा फ्री सिलाई मशीन योजना
- सरकार एकाच योजनेतून महिलांना देत आहे खूप साऱ्या सुविधा त्यासाठी वाचा पीएमसी महिला आणि बालकल्याण योजना
- आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबांना सरकार देत आहे 4000/- रुपयांचे अर्थसहाय्य त्यासाठी वाचा खावटी अनुदान योजना
- आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना सरकार देत आहे 3 लाखाची प्रोत्साहन राशी त्यासाठी वाचा आंतरजातीय विवाह योजना
एसटीच्या खालील गाड्यांत महिलांना सवलत दिली जाणार आहे.
राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसेसमध्ये ( साधी बस, रातराणी, मिनी, निमआराम, विनावातानुकुलीत शयन-आसनी, शिवशाही (आसनी), शिवसेनेरी, शिवाई (साधी आणि वातानुकुलीत), अश्वमेध ) 50 टक्के सवलत लागू करण्यात आली आहे. तसेच भविष्यात पुढे ज्या नवीन गाड्या उपलब्ध होतील, त्यामध्ये देखील ही सवलत मिळणार आहे.
सर्व महिलांना सर्व प्रकारच्या बसेसमध्ये 50% सवलत अनुज्ञेय करणे बाबत निर्देश प्राप्त झाले. त्यानुसार पुढील प्रमाणे सुचना देण्यात येत आहे.
- सर्व महिलांना राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व प्रकारच्या [ साधी, मिडी /मिनी, निमआराम, विनावातानुकुलीत शयन आसनी, शिवशाही (आसनी), शिवनेरी, शिवाई (साधी व वातानुकुलीत ) इतर इत्यादी ] बसेसमध्ये 50% सवलत दि. 17/03/2023 पासुन अनुज्ञेय करण्यात येत आहे.
- सदरची सवलत ही भविष्यात राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यात नव्याने दाखल होणाऱ्या सर्व प्रकारच्या बसेस करिता देखील लागु राहील.
- सदर योजना ही ‘महिला सन्मान योजना या नावाने संबोधण्यात येत आहे.
- सदरची सवलत सर्व महिलांना महाराष्ट्र राज्याच्या हद्दी पर्यंत अनुज्ञेय आहे.
- सदर सवलत शहरी वाहतूकीस अनुज्ञेय नाही.
- ज्या महिलांनी राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसचे प्रवासाचे आगाऊ आरक्षण तिकीट (Advance Booking) घेतलेले आहे. अश्या महिलांना 50% सवलतीचा परतावा देण्यात येणार नाही.
- सवलत अनुज्ञेय केलेल्या दिनांक पुर्वीच्या आगाऊ आरक्षणावर केलेल्या प्रवासाचा परतावा देण्यात येणार नाही.
- सर्व महिलांना प्रवास भाड्यात 50% सवलत असली तरी या योजनेतील जे प्रवाशी संगणकीय आरक्षण सुविधेव्दारे, विंडो बुकींगव्दारे, ऑनलाईन, मोबाईल अँपद्वारे, संगणकीय आरक्षणाव्दारे तिकीट घेतील अशा प्रवाशांकडुन सेवा प्रकार निहाय लागु असलेला आरक्षण आकार वसुल करण्यात येईल.
- सर्व महिलांना प्रवास भाड्यात शासनाने 50% सवलत दिली असल्याने 50% प्रवास भाडे आकारले जाणार आहे. त्यामुळे प्रवास भाड्यातील अ.स. निधी व वातानुकुलित सेवांकरीता वस्तु व सेवाकरची
- रक्कम आकारण्यात येईल.
- 75 वर्षावरील महिलांसाठी अमृत जेष्ठ नागरिक’ योजनेच्या परिपत्रकीय सुचनेनुसार 100% सवलत अनुज्ञेय राहिल.
- 65 ते 75 या वयोगटातील महिलांना ‘महिला सन्मान योजना’ हीच सवलत अनुज्ञेय राहिल.
- 5 ते 12 या वयोगटातील मुलींना यापुर्वी प्रमाणेच 50% सवलत अनुज्ञेय राहिल.
महिला सन्मान योजनेचे लाभार्थी
- राज्यातील सर्व महिला महिला सन्मान योजनेचा लाभ मिळवण्यासाठी पात्र आहेत.
महिला सन्मान योजनेचा लाभ
- महिला सन्मान योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील सर्व महिलांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बसेसच्या तिकीट दरात 50 टक्के सवलत देण्यात येते.
- या योजनेअंतर्गत राज्यातील महिला सशक्त व आत्मनिर्भर बनतील.
- राज्यातील महिलांचा सामाजिक व आर्थिक विकास होईल.
- राज्यातील महिलांचे जीवनमान सुधारेल.
- राज्यातील महिला तसेच इतर प्रवाशी एस टी ने प्रवास करण्यासाठी आकर्षित होतील.
- ५० टक्के सवलत मिळवून महिला राज्यभर प्रवास करू शकतील.
शासनाच्या इतर योजना
- राज्य सरकार ग्रामीण भागातील कुटुंबांना देत आहे मोफत चूल त्यासाठी वाचा निर्धूर चुल वाटप योजना
- राज्य सरकार महिलांना व्यवसाय सुरु करण्यासाठी देत आहे कर्ज त्यासाठी वाचा महिला बचत गट समृद्धी कर्ज योजना
- स्वतःचा लघु उद्योग सुरु करण्यासाठी सरकार देत आहे 1 लाखाचे कमी व्याज दरात कर्ज त्यासाठी वाचा थेट कर्ज योजना
- शौचालय बांधण्यासाठी सरकार देत आहे आर्थिक अनुदान त्यासाठी वाचा शौचालय अनुदान योजना
- निराधार बालकांना सरकार देत आहे कौटुंबिक आधार त्यासाठी वाचा बाल संगोपन योजना
महिला सन्मान योजनेसाठी आवश्यक पात्रता
- महिला महाराष्ट्र राज्याची मूळ रहिवाशी असणे आवश्यक आहे.
महिला सन्मान योजनेच्या अटी व शर्ती
- फक्त महाराष्ट्र राज्यातील महिलांनाच या योजनेचा लाभ घेता येईल.
- महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
- या योजनेअंतर्गत महिलांना एस टी प्रवासासाठी 10 टक्के सवलत दिली जाणार नाही महिलांना तिकीटाची किमान 50 टक्के रक्कम भरणे आवश्यक आहे.
- फक्त 75 वर्षावरील महिलांनाच तिकीट दरात 100 टक्के सवलत देण्यात येईल.
- सदरची सवलत सर्व महिलांना महाराष्ट्र राज्याच्या हद्दी पर्यंत अनुज्ञेय राहील.
- महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील प्रवासासाठी सदर योजना लागू नाही.
- सदर सवलत शहरी वाहतुकीस अनुज्ञेय नाही.
महिला सम्मान योजना महाराष्ट्र आवश्यक कागदपत्रे
- सदर योजनेचा लाभ मिळवण्यासाठी महिलांना कुठल्याच कागदपत्रांची आवश्यकता नाही.
- 75 वर्षांवरील महिलांना त्यांचे आधार कार्ड किंवा जेष्ठ नागरिक कार्ड प्रवासादरम्यान सोबत ठेवणे आवश्यक आहे.
महिला सन्मान योजनेअंतर्गत विचारले जाणारे प्रश्न
महिला सन्मान योजना कोणत्या राज्यासाठी लागू आहे.?
महिला सन्मान योजना महाराष्ट्र राज्यासाठी लागू आहे.
महिला सन्मान योजनेचा लाभ काय आहे.?
या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व महिलांना सर्व प्रकारच्या एस टी बसेसमधून प्रवास करण्यासाठी तिकीट दरात 50 टक्के सवलत देण्यात येते.
महिला सन्मान योजनेचे लाभार्थी कोण आहेत.?
राज्यातील सर्व महिला महिला सन्मान योजनेचा लाभ मिळवण्यासाठी पात्र आहेत.
महिला सन्मान योजनेचा उद्देश काय आहे?
राज्यातील महिलांना तसेच इतर नागरिकांना एस टी मधून प्रवास करण्यासाठी आकर्षित करणे.
सारांश
आम्ही आशा करतो कि तुम्हाला महिला सन्मान योजनेची संपूर्ण माहिती मिळाली आहे तरी सुद्धा तुमचे महिला सन्मान योजनेसंबंधी काही प्रश्न असल्यास आम्हाला कंमेंट्स किंवा ई-मेल द्वारे नक्की कळवा आम्ही लवकरात लवकर २४ तासाच्या आत तुमच्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा नक्की प्रयत्न करू आणि आमचे हे आर्टिकल फेसबुक तसेच इतर सोशल मीडिया वर शेयर करा जेणेकरून सर्वांपर्यंत हि माहिती पोहचेल.