Vyavsayik Prashikshan Yojana

अंतर्गत तरुणांसाठी विविध कार्यक्रम राबविण्यात येतात. तरुणांनी दिवसेंदिवस कमी होत जाणाऱ्या नोकऱ्यांच्या मागे न जात एखादा स्वयंरोजगार करावा तसेच त्यांनी स्वतःच्या पायावर उभे रहावे यासाठी विविध प्रशिक्षण देण्यात येते तसेच स्वयंरोजगार सुरु करण्यासाठी वैयक्तिक 10,000/- रुपये अनुदान आणि आवश्यकतेनुसार व्यवसायांचे किट्स देखील देण्यात येतात.

राज्यात बहुतांश तरुण / तरुणी हे सुशिक्षित आहेत परंतु नोकऱ्यांची कमी उपलब्धता यामुळे त्यांना त्यांच्या शिक्षणानुसार नोकऱ्या उपलब्ध नाहीत त्यामुळे तरुण नोकरीसाठी वणवण फिरत असतो त्यामुळे तरुण/तरुणी यांनी व्यवसाय क्षेत्राकडे वळावे व स्वतःचा एखादा स्वरोजगार सुरु करावा या उद्देशाने व्यावसायिक प्रशिक्षण योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे.

योजनेचे नावव्यवसाय प्रशिक्षण योजना
लाभार्थीराज्यातील तरुण/तरुणी
लाभव्यवसाय प्रशिक्षण दिले जाते
उद्देश्यतरुणांना स्वतःच्या पायावर उभे करणे
नोंदणी पद्धतऑफलाईन

वाचकांना विनंती

आम्ही व्यावसायिक प्रशिक्षण योजना ची संपूर्ण माहिती या लेखात दिली आहे त्यामुळे तुम्ही हे आर्टिकल शेवट पर्यंत वाचा व या योजनेअंतर्गत लाभ मिळवा तसेच तुमच्या परिसरात जे तरुण/तरुणी असतील त्यांना या योजनेची माहिती अवश्य द्या किंवा आमचे हे आर्टिकल त्यांना शेयर करा जेणेकरून ते या योजनेच्या सहाय्याने स्वतःचा एखादा उद्योग सुरु करू शकतील.

Table Of Content

Vyavsayik Prashikshan Yojana चे उद्दिष्ट

  • राज्यातील तरुण-तरुणींना विविध व्यावसायिक प्रशिक्षण देऊन त्यांना स्वयंरोजगार सुरु करण्यास तसेच स्वतःच्या पायावर उभे राहण्यास मदत करणे हा या योजनेमागचा प्रमुख उद्देश आहे.
  • युवकांचे जीवनमान सुधारणे.
  • युवकांचा सामाजिक तसेच आर्थिक विकास करणे.
  • युवकांना स्वतःच उद्योग सुरु करण्यासाठी सशक्त व आत्मनिर्भर बनविणे.
  • युवकांना स्वतःचा लघु उद्योग सुरु करण्यासाठी पैशांसाठी कोणावर अवलंबून राहण्याची गरज भासू नये तसेच कोणाकडून कर्ज घेण्याची गरज भासू नये.
  • राज्यातील बेरोजगारी कमी करणे.
  • राज्यात रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध करणे. [Vyavsayik Prashikshan Yojana]
Vyavsayik Prashikshan

Vyavsayik Yojana चे वैशिष्ट्य

  • या योजनेअंतर्गत दिली जाणारी लाभाची राशी लाभार्थी युवकांच्या बँक खात्यात DBT च्या सहाय्याने जमा करण्यात येईल.
  • या योजनेअंतर्गत अर्ज करण्याची पद्धत सोपी ठेवण्यात आलेली आहे.
  • युवकांना स्वतःचा उद्योग सुरु करण्यासाठी राज्य सरकार देत आहे 1 लाखाचे कर्ज त्यासाठी वाचा थेट कर्ज योजना
  • राज्य सरकार चर्मकार बांधवांना विविध प्रकारचे व्यावसायिक प्रशिक्षण व उद्योग सुरु करण्यासाठी बिनव्याजी कर्ज देते आहे त्यासाठी वाचा चर्मकार समाज योजना

युवकांना विविध व्यावसायिक प्रशिक्षण योजना अंतर्गत दिले जाणारे आर्थिक सहाय्य

  • युवकांना स्वतःचा एखादा लघु उद्योग सुरु करण्यासाठी 10 हजारांचे आर्थिक सहाय्य दिले जाते.

युवकांना विविध व्यवसाय प्रशिक्षण योजना चे लाभार्थी

  • राज्यातील बेरोजगार युवक जे स्वतःचा एखादा उद्योग सुरु करण्यासाठी इच्छुक आहेत.

युवकांना विविध व्यावसायिक प्रशिक्षण योजना अंतर्गत होणारा फायदा

  • या योजनेअंतर्गत तरुण/तरुणींना विविध प्रकारच्या व्यवसायाचे प्रशिक्षण दिले जाते.
  • युवकांना स्वतःचा एखादा लघु उद्योग सुरु करण्यासाठी 10 हजारांचे आर्थिक सहाय्य दिले जाते.
  • 18 ते 45 वयोगटातील तरुण-तरुणींना मोफत प्रशिक्षण तसेच प्रशिक्षण काळात मासिक बस पास दिला जातो.
  • राज्यातील नागरिकांचे जीवनमान सुधारेल.
  • राज्यातील तरुण/तरुणींचा सामाजिक तसेच आर्थिक विकास होईल.
  • राज्यातील तरुण उद्योग सुरु करण्यासाठी सशक्त तसेच आत्मनिर्भर बनतील.
  • राज्यातील बेरोजगारी कमी होईल.
  • राज्यात रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील.
  • युवकांना स्वतःचा उद्योग सुरु करण्यासाठी पैशांसाठी कोणावर अवलंबून राहण्याची गरज भासणार नाहीत तसेच कोणाकडून कर्ज घेण्याची गरज भासणार नाही. [Vyavsayik Prashikshan Yojana]

व्यावसायिक प्रशिक्षण योजना अंतर्गत आवश्यक पात्रता

  • अर्जदार महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवाशी असणे आवश्यक आहे.

व्यवसाय प्रशिक्षण योजना चे नियम व अटी

  • अर्जदार पुणे महानगरपालिका हद्दीत किमान 3 वर्षे रहिवाशी असणे आवश्यक आहे.
  • अर्जदार मागासवर्गीय किंवा अपंग असणे आवश्यक आहे.
  • प्रशिक्षणासाठी अर्जदाराला आवश्यक ती अनामत रक्कम भरावी लागेल प्रशिक्षण अर्धवट सोडल्यास अथवा प्रशिक्षणात अनुत्तीर्ण झाल्यास किंवा प्रवेश देवूनही प्रवेश न घेतल्यास अनामत रक्कम जप्त करण्याचा पुणे महानगरपालिकेस अधिकार राहील.
  • अर्जदाराच्या कुटुंबाचे सर्व मार्गांनी मिळणारे वार्षिक उत्पन्न 1 लाखापेक्षा कमी असणे आवश्यक आहे.
  • एका प्रशिक्षणानंतर पूरक प्रशिक्षण एकापेक्षा जास्त विषयांचे करता येतील.
  • अटी व नियम यात बदल करण्याचा / अर्ज नाकारण्याचा अधिकार मा. मुख्य समाज विकास अधिकारी, स.वि.वि. पुणे महानगरपालिका यांचेकडे राहील. तसेच त्यांचा या विषयाबाबत निर्णय अंतिम राहील.
  • स्कॅन डॉक्युमेंट्स संलग्न करणे आवश्यक आहे.
  • प्रशिक्षण विषयासाठी आवश्यक असलेली शैक्षणिक अर्हता असणे आवश्यक.
  • दिनांक 01 मे 2001 नंतर जन्माला आलेल्या व ह्यात अपत्यामुळे कुटुंबाच्या अपत्यांची संख्या 2 पेक्षा जास्त झाल्यास लाभ घेता मिळणार नाही. [Vyavsayik Prashikshan Yojana]

युवकांना विविध व्यावसायिक प्रशिक्षण योजना अंतर्गत आवश्यक कागदपत्रे

  • कुटुंबाचे पुणे महानगरपालिका हद्दीत किमान ३ वर्षे वास्तव्य असल्याचा पुरावा म्हणून मागील ३ वर्षाचा मनपा टॅक्स पावती किंवा लाईट बिल किंवा टेलिफोन बिल (लॅण्डलाईन) किंवा झोपडी फोटो पास/झोपडी सेवा शुल्क पावती/भाडे करारनामा यांपैकी एक जोडणे आवश्यक.
  • रेशनिंग कार्डची साक्षांकित प्रत
  • अपत्य पडताळणीसाठी जोडणे आवश्यक.
  • वयाच्या पुराव्यासाठी जन्मदाखला / शाळेचा दाखला किंवा बोनाफाईड प्रमाणपत्र आवश्यक.
  • अर्जदार मागासवर्गीय असल्यास जातीचा दाखला जोडणे आवश्यक आहे.
  • अर्जदार अपंग असल्यास अपंगत्वाचा दाखला जोडणे आवश्यक राहील.
  • अर्जदाराने शेवटची परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे गुणप्रमाणपत्र जोडणे आवश्यक.
  • अर्जदाराच्या शिक्षणाचे प्रमाणपत्र.
  • झोपडपट्टीतील अर्जदारांनी शेजार समूह गटाचा उत्पन्नाचा दाखला जोडावा. व झोपडपट्टी व्यतिरिक्त राहत असलेल्या अर्जदारांनी मा. तहसीलदार, जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याकडील उत्पन्नाचा दाखला जोडणे आवश्यक
  • स्वतःचा व्यवसाय सुरु करू इच्छिणाऱ्या नागरिकांना सरकार देत आहे 1 लाख रुपयांचे कर्ज त्यासाठी वाचा वसंतराव नाईक कर्ज योजना

व्यावसायिक प्रशिक्षण योजना अंतर्गत अर्ज रद्द होण्याची कारणे

  • अर्जदार महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवाशी नसल्यास
  • अर्जात खोटी तसेच चुकीची माहिती भरल्यास
  • अर्जदार बँकेचा थकबाकीदार असल्यास
  • अर्जदार केंद्र सरकार किंवा राज्य शासनाच्या एखाद्या प्रशिक्षण योजनेअंतर्गत लाभ घेत असल्यास किंवा लाभ घेतला असल्यास. [Vyavsayik Prashikshan Yojana]

युवकांना विविध व्यावसायिक प्रशिक्षण योजना अंतर्गत ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत

  • वेबसाईटवर गेल्यावर नवीन नोंदणी वर क्लिक करावे व विचारलेली सर्व माहिती भरून स्वतःची नोंदणी करावी.
  • नोंदणी करून झाल्यावर आपली योजना जाणून घ्या Option वर क्लिक करावे.
  • व विचारलेली सर्व माहिती भरून आपली योजना जाणून घ्यावी व त्या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करावा.

युवकांना विविध व्यावसायिक प्रशिक्षण योजना अंतर्गत ऑफलाईन अर्ज करण्याची पद्धत

  • खालीलपैकी कोणत्याही ठिकाणी संपर्क साधून या योजनेचा अर्ज घ्या व अर्जात विचारलेली सर्व माहिती योग्य प्रकारे भरून आवश्यक अशा कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रति जोडून सदर अर्ज जमा करावा.
  • अर्ज जमा केल्यावर अर्ज जमा केल्याची पोच पावती घ्यावी. [Vyavsayik Prashikshan Yojana]
Telegram GroupJoin
अधिकृत वेबसाईटClick Here
पत्ता1. प्रभाग पातळीवरील समुह संघटिकांचे कार्यालय, पुणे
2. तुमच्या जवळील क्षेत्रिय कार्यालय
3. समाज विकास कार्यालय, एस.एम.
जोशी हॉल, दारुवाला पूल, रास्ता पेठ, पुणे
संपर्क020-25501281 / 82 / 83 / 84

सारांश

आम्ही आशा करतो कि आपल्याला व्यावसायिक प्रशिक्षण योजना ची सर्व माहिती प्राप्त झाली आहे तरीदेखील आपले या योजनेसंबंधी काही प्रश्न असल्यास मला ई-मेल किंवा कंमेंट्स च्या माध्यमातून जरूर कळवा आम्ही तुमच्या प्रश्नांची लवकरात लवकर उत्तरे देण्याचा प्रयत्न करू आणि जर तुम्हाला या योजनेची माहिती उपयुक्त वाटली असेल तर तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा जेणेकरून तुमचे मित्र देखील या योजनेचा लाभ घेऊ शकतील.