बचत गटाचे नियम

आम्ही खाली बचत गटाचे नियम तसेच अटी व शर्ती यांची सविस्तर माहिती दिलेली आहे. त्यामुळे तुम्ही हा लेख शेवटपर्यंत वाचा.

बचत गटाचे नियम

  • गटाचे लेखा साहित्य व रेकॉर्ड, भरणा, मासीक अहवाल नियमीत असावा.
  • गटामध्ये अध्यक्ष/ सचिव यांचे अनुपस्थीतीत गटाचे क्रमवार सदस्यावर जबाबदारी राहिल. रेकॉर्ड सचिवांकडे असावे.
  • दरवर्षी क्रमवार सदस्याचे यादी नुसार अध्यक्ष व सचिव यांचे पदाची नियुक्ती करावी लागेल.
  • गटाचा आर्थीक हिशोब ठेवुन देवाण घेवाण करण्यात यावी.
  • गटाचे 6 महिण्याचे खाते पुस्तीका पडताळणी नुसार रजिष्टर नोंद प्रमाणपत्र गटाला देण्यात येईल.
  • गटाचे सदस्य बदलविण्याकरीता बँकेचे पत्र व ठरावाची प्रत महिला व बालकल्याण विभागाला देण्यात यावे.
  • गटातील सदस्यांनी अध्यक्ष / सचिव यांनी गटा संबंधीत सर्व कार्य स्वतः महिला सदस्यांमार्फत करावी. प्रतिनीधी मार्फत करु नये.
  • गटाचे ग्रुप फोटो सादर करणे आहेत.
  • एका वर्षात गटाचा व्यवहार15 लाख रुपयापेक्षा जास्त झाल्यास सदर व्यवहाराचे ऑडीट करावे कि नाही याविषयी परिस्थितीप्रमाणे वार्षिक बैठकीत सर्वानुमते निर्णय घेण्यात येईल.
  • सदर गटाच्या कामकाजाबद्दल जास्तीत जास्त माहिती इलेक्ट्रोनिक माध्यमातून देण्याचा प्रयत्न केला जाईल.
  • सभासद एकाच भागातील, वस्तीतील, गल्लीतील व एकमेकांना ओळखणारे असावेत.
  • सभासद गरीब व गरजू असावेत.
  • सभासदांचे खाते दर वर्षाच्या 01 जानेवारीला प्राप्त लाभासह अद्यावत करण्यात येईल व त्याबाबतची माहिती सभासदास वार्षिक स्लीप देऊन कळविण्यात येईल.
  • सभासदांनी आपले सभासद अर्ज, 3 पासपोर्ट फोटो ,बँक पासबुक XEROX, आधार कार्ड, PAN कार्ड, वारसा प्रमाणपत्र देणे बंधनकारक असेल.
  • सभासदांमध्ये सांमजस्य, आपुलकी, परस्पर विश्वास असावा व ते एकविचाराने वागणारे असावेत.
  • सभासदांमध्ये जातीभेद असू नयेत.
  • सभासद समान आर्थिक स्तरावरील असावेत.
  • गटांच्या बैठकीची तारीख व वेळ निश्चित असावीत.
  • गटांची बैठक फिरती व मध्यवर्ती ठिकाणी असावी.
  • गटाच्या बैठकीत सर्वांनी गोलाकार व एका पातळीत बसावेत.
  • गटाच्या बैठकीत सर्व सदस्य उपस्थित असावेत.
  • गटातील प्रत्येक सभासदाने प्रत्येक महिन्याला 1 हजार रुपये नियमितपणे महिन्याच्या 25 तारखेपर्यंत रोख अथवा बँक खात्यात जमा करावे. सदर बचतीची रक्कम सर्वानुमते ठराव घेऊन कमी अथवा जास्त करण्यात येईल.
  • गटाच्या गरजेनुसार बैठकीत गैरहजर राहणाऱ्या सभासदास दंड करण्यात यावा. गटांची बचत बैठकीमध्येच गोळा केली पाहिजे.
  • बचत वेळेवर न भरणाऱ्या सभासदास दंड केला पाहिजे.
  • सभासदांनी बहुमतांनी वेळोवेळी घेतलेले ठराव सर्व सभासदांना बंधनकारक असतील.
  • अध्यक्ष, खजिनदार, सचिव यांची निवड लोकशाही पध्दतीने व्हायला हवी. सभासदांसाठी अंतर्गत कर्ज देण्यापूर्वी व्याजदर हा सर्वानुमते व सहमतीने ठरविण्यात यावा.
  • कर्ज दिल्यानंतर परतफेडीसाठी समान हप्ते ठरवून सभासदास मुदत देण्यात यावी. समान 10 हप्यामध्ये परतफेडीची मर्यादा असावी.
  • गटाच्या खात्यावर अत्यावश्यक प्रसंगासाठी 50000/- कायमस्वरूपी जमा राहतील व अत्यावश्यक प्रसंगी या रक्कमेचा सर्वानुमते ठराव घेऊनच वापर करता येईल व पुढील महिन्यातील जमा होणाऱ्या रकमेतून सदर रक्कम स्थिर ठेवण्यात येईल.
  • कर्जासाठी जमिनदार हा गटातील सभासद असावा.
  • बचतगटामार्फत सामाजिक ,शैक्षणिक ,सांस्कृतिक उपक्रम सर्वानुमते राबविण्यात येतील.
  • कर्ज देत असताना अत्यावश्यक गरजेस प्रथम प्राधान्य देण्यात यावे.
  • कर्जाची परतफेड वेळेवर न केल्यास सभासदावर दंडात्मक कार्यवाही करण्यात यावी.
  • कर्जाचा व्याजदर हा द.सा.द.शे. 15% असेल. व्याजदर कमी अथवा वाढविण्याचे सर्वानुमते ठरविण्यात येईल. कर्जाचा धनादेश दिल्या दिनांकापासून 10 दिवसात परतफेड केल्यास कसल्याच प्रकारचे व्याज आकारले जाणार नाही. 10 दिवसाच्या नंतर व 1 महिन्याच्या आत परतफेड केल्यास पूर्ण महिन्याचे व्याज आकरण्यात येईल.
  • सभासद सज्ञान असणे आवश्यक आहे.
  • 60 वर्षावरील अल्पसंख्यांक व्यक्तींना सभासद होता येणार नाही.
  • कर्ज वसुलीची जबाबदारी सर्व सभासदांची राहील.
  • सभासदांनी एका आर्थिक वर्षांच्या आत गटाचा राजीनामा दिल्यास तर त्याला त्याची फक्त जमा रक्कम परत करण्यात येईल कसल्याही प्रकारचे व्याज अथवा लाभ मिळणार नाही.
  • सदस्याला स्वतः खाते बंद करायचे असेल तर त्याचे स्वतःकडे असलेली थकबाकी भरलेली पाहिजे.
  • हिशेब केल्यावर 1 महिन्यांचे आत त्याला त्याचा लाभांश देता येईल.
  • भविष्यात आवश्यकता भासल्यास विविध उद्योग पूर्तीसाठी बँकेमार्फत सर्वानुमते कर्ज घेण्यात येईल.
  • दुर्दैवाने एखाद्या सभासदाचा मृत्यू झाल्यास त्याने नामनिर्देशित केलेल्या वारसाला सभासदाच्या नावे जमा असलेली सर्व रक्कम नियमाप्रमाणे धनादेशाद्वारे अदा करण्यात येईल.
  • सभासद जास्त पैसे द्यावयाचे असेल तर हे विशेष सभेपुढे ठराव मांडून सर्वानुमते मंजुरी करीता सादर करण्यात येईल.
  • जर सभासद मरण पावला तर त्याने पूर्वी नोंदविलेल्या वारसदारास त्याची जमा रक्कम योग्य ते कागदपत्रे दाखल केल्यानंतर देण्यात येईल जर वारसदार अल्पसंख्यांक असेल तर नावात बदल करुन सदस्य होता येईल.
  • निरनिराळ्या शासकिय योजना मधून अनुदान मिळाल्यास स्वयंसहाय्यता गटाच्या नावाने बँकेत जमा करता येईल व त्यातील निधी सभासदांना कर्ज रूपाने लघु उदयोगाकरिता देता येईल.
  • सभासदाची मासिक ठेव व कर्जहप्ता दि 25 ते 30 तारखेच्या दरम्यान जमा नाही झाल्यास पुढील प्रतिदिवसासाठी 5 रुपयांप्रमाणे दंड भरावा लागेल.
  • गटातील कोणत्याही सभासदास कर्ज मागणी करता येईल . खात्यातील जमा रक्कमेपेक्षा जास्त कर्ज मागणी झाल्यास अवश्यकता व गरजेस प्राधान्य देऊन सर्वानुमते कर्ज वाटप करण्यात येईल. सुरुवातीस कर्जमर्यादा 25,000/- रुपये असेल यात वेळोवेळी सर्वानुमते ठराव घेऊन वाढ कारण्यात येईल.
  • पैसे ( रक्कम) सचिव किंवा सहयोगीने बँकेत जमा करता येईल.
  • अनावश्यक कामाकरीता बँकेतून पैसे काढता येणार नाही.
  • अध्यक्ष व सचिव व पदाधिका-यांवर सदस्यांचा विश्वास नसल्यास त्याऐवजी इतर सदस्यांना नेमता येईल त्याबाबत सभेत निर्णय घ्यावा.
  • 25,000/- रुपये पर्यंतच्या कर्जासाठी गटातील एक जामीनदार असणे आवश्यक आहे. कर्जाची परतफेड मुद्दल व व्याजाची गणना करून एकूण 10 हप्त्यात करावी लागेल व त्यामध्ये बदल करण्याचे अधिकार सर्वानुमते संचालक मंडळास रहातील.
  • अल्पसंख्यांक स्वयंसहाय्यता गटातील सदस्य सभेस तीनदा गैरहजर असल्यास सभासदत्व रद्द करता येईल.
  • अध्यक्ष व सचिव यांनी कर्ज घेतले त्यांनी त्यांचा हिशोब दर महिन्यांनी सभेपुढे सादर करावा.
  • बचतगटाची मासिक बैठक, वार्षिक बैठक,चहापाणी खर्च व वेळोवेळी लागणारी स्टेशनरी खर्च बचतगटाच्या रक्कमेतून करण्यात येईल.
  • कर्जवाटप एप्रिल महिन्यापासून सुरु करण्यात येईल.
  • राष्ट्रीयकृत बँकेत बचतगटाचे खाते उघडण्यासाठी गटाच्या नावाने PAN कार्ड काढून घेण्यात यावे. सदर खात्यावरील रक्कम कसल्याच प्रकारे रोखीने हस्तांतरित करण्यात येणार नाही सर्व व्यवहार ACCOUNT TRANSFER चेकद्वारे करण्यात येतील.
  • वरील नियम सर्व सभासदांना बंधनकारक असून कालपरत्वे आवशक्यते नुसार गटाच्या सर्वसाधारण बैठकीत बहुमताने ठराव घेऊन बदलता येतील.

महिला बचत गट नोंदणी अर्ज : येथे क्लिक करा

बचत गट ठराव नमुना PDF : येथे क्लिक करा

महिला बचत गट नावे : येथे क्लिक करा

शासनाच्या इतर योजना

सारांश

आम्ही आशा करतो कि तुम्हाला बचत गटाचे नियम ची सर्व माहिती मिळाली आहे तसेच तुमचे काही प्रश्न असल्यास आम्हाला कंमेंट्स किंवा ई-मेल द्वारे नक्की कळवा. [बचत गटाचे नियम]