मिनी ट्रॅक्टर योजना

राज्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या बचत गटांना 90% अनुदानावर मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने कल्टीव्हेटर किंवा रोटाव्हेटर व ट्रेलर यांचा पुरवठा करण्याकरिता मिनी ट्रॅक्टर योजना सुरु करण्यात आली आहे.
या योजनेअंतर्गत राज्यातील बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने खरेदी करण्याकरिता 3.15 लाखांची आर्थिक मदत करण्यात येते.

राज्यातील बहुतांश शेतकरी हे गरिबी रेषेखाली जीवन जगत असतात त्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती कमजोर असते. शेतीसाठी लागणारी बियाणे, खते तसेच इतर गोष्टींसाठी त्यांना पैशांची गरज असते त्यासाठी शेतकरी बँक, वित्त संस्था किंवा साहुकाराकडून कर्ज घेतात व पारंपरिक पद्धतीने शेती करतात. पारंपरिक पद्धतीने शेती करताना ती हाताने केली जाते त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांना खूप साऱ्या अडचणींना सामोरे जावे लागते तसेच पारंपरिक पद्धतीने शेती करताना खूप वेळ लागतो व शेतीची कामे मंद होतात. आजच्या आधुनिक दुनियेत शेतीच्या कामासाठी यंत्र सामग्रीचा वापर वाढला आहे ज्यामुळे शेतीची कामे कमी वेळात जळत गतीने केली जातात. परंतु पुष्कळ शेतकरी आर्थिक दृष्ट्या गरीब असल्याकारणामुळे त्यांना शेतीसाठी आवश्यक यंत्र सामग्री विकत घेणे शक्य नसते त्यामुळे ते पिढ्यान पिढ्या पारंपरिक पद्धतीने शेती करत असतात. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या या सर्व समस्यांचा विचार करून राज्य शासनाने समाज कल्याण मिनी ट्रॅक्टर योजना सुरु करण्याचा एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. [Mini Tractor Yojana]

वाचकांना विनंती

आम्ही मिनी ट्रॅक्टर योजना ची संपूर्ण माहिती या लेखात दिली आहे त्यामुळे तुमची हा लेख शेवट पर्यंत वाचा व या योजनेचा लाभ मिळवा तसेच तुमच्या परिसरात जे कोणी अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या बचत गटातील शेतकरी असतील तर त्यांना या योजनेची माहिती अवश्य द्या किंवा आमचे हे आर्टिकल त्यांना शेयर करा जेणेकरून ते या योजनेचा लाभ घेऊ शकतील.

योजनेचे नावमिनी ट्रॅक्टर योजना
लाभार्थीराज्यातील अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या
स्वयंसहाय्यता बचत गटातील शेतकरी
लाभ90 टक्के अनुदान (3.15 लाखांची आर्थिक मदत)
उद्देश्यमिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने कल्टीव्हेटर किंवा
रोटाव्हेटर व ट्रेलर खरेदी करण्यासाठी अर्थसहाय्य करणे
अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन/ऑफलाईन

Table Of Content

मिनी ट्रॅक्टर योजना चे उद्दिष्ट

  • राज्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या बचत गटांना 90% अनुदानावर मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने कल्टीव्हेटर किंवा रोटाव्हेटर व ट्रेलर यांचा पुरवठा करणे हा Mini Tractor Anudan Yojana Maharashtra चा मुख्य उद्देश आहे.
  • राज्यातील शेतकऱ्यांना शेतीसाठी उपयुक्त अशा यंत्र सामग्री च्या खरेदीसाठी पैशांसाठी कोणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता भासू नये तसेच कोणाकडून जास्त व्याज दराने पैसे घेण्याची आवश्यकता भासू नये या उद्देशाने या योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे. 
  • राज्यातील शेतकऱ्याचे जीवनमान सुधारणे
  • शेतकऱ्यांचा सामाजिक तसेच आर्थिक विकास करणे.
  • राज्यातील शेतकऱ्यांना सशक्त व आत्मनिर्भर बनविणे.
  • अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना उत्पन्नाचे साधन उपलब्ध व्हावे, त्यांचे राहणीमानात बदल व्हावा.
  • शेतकऱ्यांना शेतीसाठी प्रोत्साहन देणे तसेच राज्यातील इतर नागरिकांना शेती करण्यासाठी प्रेरित करणे.
  • शेतकऱ्यांचा वेळ आणि पैशांची बचत करणे.
  • राज्यातील शेतकऱ्यांचे भविष्य उज्वल बनविणे.
  • शेती क्षेत्रात आधुनिकीकरणाचा वापर वाढविणे.
  • शेतीची कामे जलद करणे. [Mini Tractor Yojana]
  • राज्य सरकार शेतकऱ्यांना विहीर खोदण्यासाठी देत आहे 4 लाखांचे अनुदान त्यासाठी वाचा विहीर अनुदान योजना

Mini Tractor Yojana चे वैशिष्ट्य

  • राज्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या बचत गटांना 90% अनुदानावर मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने कल्टीव्हेटर किंवा रोटाव्हेटर व ट्रेलर यांचा पुरवठा करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाद्वारे सुरु करण्यात आलेली महत्वपूर्ण अशी एक योजना आहे.
  • महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाद्वारे योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
  • राज्यातील शेतकऱ्याचे जीवनमान सुधारण्यास तसेच त्यांचा सामाजिक व आर्थिक विकास होण्यास तसेच ते सशक्त व आत्मनिर्भर बनण्यास सदर योजना महत्वपूर्ण ठरेल.
  • राज्यातील शेतकऱ्यांना शेतीसाठी प्रोत्साहन मिळण्यास सदर योजना महत्वपूर्ण ठरेल.
  • योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया ऑफलाईन व ऑनलाईन करण्यात आलेली आहे त्यामुळे अर्जदार घरी बसून या योजनेअंतर्गत अर्ज करू शकतो ज्यामुळे अर्जदाराला कोणत्याच शासकीय कार्यालयाच्या फेऱ्या मारण्याची आवश्यकता भासणार नाही त्यामुळे अर्जदार शेतकऱ्याचा वेळ आणि पैसे दोघांची बचत होईल.
  • या योजनेअंतर्गत राज्यातील बचत गटांना 3.15 लाखांची आर्थिक मदत करण्यात येते. [Mini Tractor Yojana]
Mini Tractor Yojana

मिनी ट्रॅक्टर योजना अंतर्गत मिळणारे अर्थसहाय्य

  • बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने खरेदी करण्याकरिता 3.15 लाखांची आर्थिक मदत करण्यात येते.

मिनी ट्रॅक्टर योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नांव

  • अनूसूचित जाती व नवबौध्द घटकांसाठी

मिनी ट्रॅक्टर योजना चे लाभार्थी

  • अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या बचत गटातील शेतकरी या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी पात्र आहेत. [Mini Tractor Yojana]

मिनी ट्रॅक्टर योजना अंतर्गत दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरुप

  • मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने (कल्टीव्हेटर किंवा रोटाव्हेटर व ट्रेलर)
  • सरकार मल्चिंग पेपरच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांना देत आहे 50 टक्के अनुदान त्यासाठी वाचा मल्चिंग पेपर योजना

Samaj Kalyan Tractor Yojana अंतर्गत खरेदी करण्यात येणारे मिनी ट्रॅक्टर व त्याच्या उपसाधनांच्या किमती पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात येत आहेत

साधनब्रँडकिंमत रुपये
मिनी ट्रॅक्टर – युवराज 215महिंद्रा अँड महिंद्रा2,43,692/- रुपये
1.5 टन नॉन टीपीग ट्रेलरमहिंद्रा अँड महिंद्रा53,916/- रुपये
0.8 मी. रोटा व्हेटरमहिंद्रा अँड महिंद्रा52,392/- रुपये
एकूण3,50,000/- रुपये

समाज कल्याण मिनी ट्रॅक्टर योजना अंतर्गत शेतकऱ्यांना होणारा फायदा

  • Samaj Kalyan Mini Tractor Yojana अंतर्गत राज्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या बचत गटांना 90% अनुदानावर मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने कल्टीव्हेटर किंवा रोटाव्हेटर व ट्रेलर यांचा पुरवठा केला जातो.
  • बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने खरेदी करण्याकरिता 3.15 लाखांची आर्थिक मदत केली जाते.
  • राज्यातील शेतकरी या योजनेअंतर्गत सशक्त व आत्मनिर्भर बनतील.
  • राज्यातील शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारेल.
  • राज्यातील शेतकऱ्यांचा सामाजिक व आर्थिक विकास होईल.
  • राज्यातील शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल.
  • राज्यातील नागरिक शेती करण्यासाठी प्रेरित होतील.
  • शेतीती आधुनिक यंत्रांच्या वापरामुळे शेतकऱ्यांना पारंपारिक पद्धतीने शेती करण्याची आवश्यकता भासणार नाही व यंत्र सामग्रीमुळे शेतीची कामे जलद गतीने केली जातील ज्यामुळे शेतकऱ्यांचा वेळ आणि पैसे दोघांची बचत होईल..
  • या योजनेच्या सहाय्याने शेतकऱ्याच्या उत्पन्नात वाढ होईल.
  • बचत गटास किमान 9 ते 18 अश्वशक्तीपेक्षा जादा अश्वशक्तीचा ट्रॅक्टर व त्याची उपसाधने खरेदी करण्यात येणार आहे. [Mini Tractor Yojana]

Mini Tractor Anudan Yojana अंतर्गत पात्रतेचे निकष

  • अनुसुचित जाती व नवबौध्द घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटातील सदस्य हे महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असावेत.
  • स्वयंसहाय्यता बचत गटातील किमान 80 टक्के सदस्य हे अनुसुचित जाती व नवबौध्द घटकांतील असावेत.
  • स्वयंसहाय्यता बचत गटाचे अध्यक्ष व सचिव अनुसूचित जाती वा नवबौध्द घटकांतील असावेत.
  • मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांच्या खरेदीची कमाल मर्यादा 3.50 लाख इतकी राहील. स्वयंसहाय्यता बचत गटांनी वरील कमाल मर्यादेच्या रक्कमेच्या किंवा प्रत्यक्ष साधनांच्या किंमतीच्या 10 टक्के स्वहिस्सा भरल्यानंतर प्रत्यक्ष किंमतीच्या 90 टक्के (कमाल 3.15 लाख) शासकीय अनुदान अनुज्ञेय राहील.
  • लाभार्थी स्वयंसहाय्यता बचत गटांनी या योजनेतंर्गत अनुज्ञेय असलेल्या किमान 9 ते 18 अश्वशक्तीपेक्षा जादा अशशक्तीचा ट्रॅक्टर व त्याची उपसाधने खरेदी करता येईल मात्र त्याची या योजनेतंर्गत अनुज्ञेय असलेल्या अनुदाना (3.15 लाख) पेक्षा जास्तची रक्कम संबंधित बचत गटाने स्वत: खर्च करावी.
  • स्वयंसहाय्यता बचत गटाने राष्ट्रीयकृत बँकेत बचत गटाच्या नावे बँक खाते उघडावे व सदरचे बँक खाते बचत गटाचे अध्यक्ष व सचिव यांचे आधार क्रमांकाशी संलग्न करावे.
  • संबंधित जिल्हयातील सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण हे जिल्हयातील इच्छुक स्वयंसहाय्यता बचत गटांकडून जाहिरातींद्वारे अर्ज मागवतील. उपलब्ध तरतुदीच्या अनुषंगाने अर्जदारांची संख्या जास्त असल्यास सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, यांनी पारदर्शक पध्दतीने (लॉटरी पध्दत) लाभार्थ्यांची निवड करावी. निवड करण्यात आलेल्या स्वयंसहाय्यता बचत गटांची नावे व पत्ते जिल्हा कार्यालयाच्या फलकांवरती लावण्यात यावीत व त्याची प्रत आयुक्त समाज कल्याण महाराष्ट्र राज्य पुणे यांचेकडे सादर करण्यात यावी.
  • निवड झालेल्या बचत गटाला निवड झाल्याचे लेखी कळविण्यात येईल. ज्या स्वयंसहाय्यतांना बचत गटांची निवड करण्यात आलेली आहे त्यांनी सदरहू यंत्र चालविण्याचे अधिकृत संस्थेकडून प्रशिक्षण घेणे व त्याचे प्रमाणपत्र सादर करावे लागेल.
  • निवड झालेल्या बचत गटांनी वर नमूद केलेल्या कार्यपध्दतीतील अनुक्रमांक 1 (उ) नुसार कार्यवाही झाल्यानंतर संबंधित जिल्हयाचे सहाय्यक आयुक्त सदरचे अनुदान बचत गटाच्या बँक खात्यामध्ये जमा करतील. तसेच सहाय्यक आयुक्त समाज कल्याण हे मूळ पावती (ओरीजनल रिसिट) आयुक्त समाज कल्याण/शासनाला सादर करतील.
  • बचत गटाने खरेदी केलेल्या मिनी ट्रॅक्टरच्या/ ट्रॅक्टरच्यादर्शनी भागावर महाराष्ट्र शासन, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या अनुसुचित जाती उपयोजनेंतर्गत अर्थसहाय्य असे ठळकपणे लिहिण्यात यावे.
  • प्रत्येक जिल्हयामध्ये किती स्वयंसहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांचे वाटप करावे याबाबत शासनाकडून स्वतंत्ररित्या कळविण्यात येईल.
  • समाज कल्याण मिनी ट्रॅक्टर योजना अंतर्गत स्वयंसहाय्यता बचत गटांना त्यांचे आर्थिक उत्पन्न वाढावे या हेतूने त्यांना देण्यात आलेला मिनी ट्रॅक्टर/ट्रॅक्टर व त्याची उपसाधने इतर शेतक-यांना भाडेतत्वावर देऊ शकेल मात्र कोणत्याही परिस्थितीत त्याला मिनी ट्रॅक्टर/ ट्रॅक्टर व त्याची उपसाधने विकता येणार नाही अथवा सावकार किंवा अन्य व्यक्तीकडे गहाण ठेवता येणार नाही. लाभार्थ्यांने मिनी ट्रॅक्टर/ट्रॅक्टर विकल्यास किंवा गहाण ठेवल्यास सदर व्यवहार बेकायदेशीर ठरवून स्वयंसहाय्यता बचत गटांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल. तसेच संबंधित स्वयंसहाय्यता बचत गटांकडून शासनाने मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांच्या खरेदीसाठी खर्च केलेली संपूर्ण रक्कम वसूल करण्यात येईल आणि संबंधित स्वयंसहाय्यता बचत गटांना शासनाच्या अन्य योजनांचे लाभ घेण्यास किमान 5 वर्षे अपात्र ठरविले जाईल. तशा आशयाचे हमी पत्र स्वयंसहाय्यता बचत गटांकडून घेण्यात यावे.
  • ज्या स्वयंसहाय्यता बचत गटांना या योजनेंतर्गत मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांचे वाटप करण्यात आले आहे. अशा स्वयंसहाय्यता बचत गटांनी किमान 10 वर्षे तो मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने उपयोगात आणावेत या हेतूने मिनी ट्रॅक्टर/ट्रॅक्टर व त्याची उपसाधने मिळाल्यापासून किमान 10 वर्षापर्यंत स्वत:हून दरवर्षी 10 मे पूर्वी संबंधित सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण यांना नोंदणीकृत डाकेने पत्र पाठवून त्याला देण्यात आलेला मिनी ट्रॅक्टर/ ट्रॅक्टर व त्याची उपसाधने विकला नसल्याचे किंवा गहाण ठेवला नसल्याचे प्रमाणपत्र सादर करावे.
  • ज्या लाभार्थ्यांना पावर ट्रिलरचा लाभ दिला आहे त्या लाभार्थ्यांना या योजनेचा पुन्हा लाभ घेता येणार नाही. [Mini Tractor Yojana]
  • आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबांना सरकार देत आहे 4000/- रुपयांचे अर्थसहाय्य त्यासाठी वाचा खावटी अनुदान योजना
  • आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना सरकार देत आहे 3 लाखाची प्रोत्साहन राशी त्यासाठी वाचा आंतरजातीय विवाह योजना
  • शेतजमिनीवर तसेच शेताच्या बांधावर बांबू लागवडीकरिता सरकार शेतकऱ्यांना देत आहे 80 टक्के अनुदान त्यासाठी वाचा अटल बांबू समृद्धी योजना

मिनी ट्रॅक्टर योजना चे नियम व अटी

  • अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असणे आवश्यक आहे.
  • केवळ महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनाच योजनेचा लाभ दिला जाईल.
  • महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
  • मिनी ट्रॅक्टर व त्यांची उपसाधने यांचा पुरवठा योजना चा लाभ मिळवण्यासाठी शेतकरी हा अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटातील सदस्य असणे आवश्यक आहे.
  • स्वयंसहाय्यता बचत गटातील किमान 80% सदस्य हे अनुसूचित जाती वा नवबौद्ध घटकातील असावेत तसेच अध्यक्ष, सचिव, अनुसूचित जाती प्रवर्गातील असावेत
  • ट्रॅक्टर व त्याच्या उप्साधानांच्या खरेदीवर 3.15 लाख शासकीय अनुदान अनुञेय राहील.
  • ठरवून दिलेल्या उद्दिष्टांपेक्षा आर्थिक अर्ज प्राप्त झाल्यास बचत गटांची निवड लॉटरी पद्धतीने करण्यात येईल.
  • मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांच्या खरेदीची कमाल मर्यादा 3.50 लाख (अक्षरी रक्कम रुपये तीन लाख पन्नास हजार फक्त.) इतकी राहील,
  • स्वयंसहाय्यता बचत गटांनी वरील कमाल मर्यादेच्या रक्कमेच्या 10% स्वहिस्सा भरल्यानंतर 90% (कमाल रु. 3.15 लाख) शासकीय अनुदान अनुज्ञेय राहिल.
  • या योजनेअंतर्गत ज्या बचत गटांना मिनी ट्रॅक्टर देण्यात येईल त्यांना मिनी ट्रॅक्टर हा विकता येणार नाही किंवा गहाण ठेवता येणार नाही. [Mini Tractor Yojana]

मिनी ट्रॅक्टर योजना अंतर्गत आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • राशन कार्ड
  • रहिवाशी दाखला
  • मोबाईल नंबर
  • ई-मेल आयडी
  • पासपोर्ट साईज फोटो
  • बँक खात्याचा तपशील
  • बचत गटाचे प्रमाण पत्र

मिनी ट्रॅक्टर योजना अंतर्गत अर्ज रद्द होण्याची मुख्य कारणे

  • अर्जदार महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवाशी नसल्यास अर्ज रद्द केला जाईल.
  • अर्जदार शेतकरी नसल्यास अर्ज रद्द केला जाईल.
  • अर्जदार शेतकऱ्याने या पूर्वी केंद्र किंवा राज्य शासनाद्वारे सुरु एखाद्या योजनेअंतर्गत ट्रॅक्टर खरेदीसाठी अनुदानाचा लाभ मिळवला असल्यास.
  • अर्जात खोटी तसेच चुकीची माहिती भरल्यास अर्ज रद्द केला जाईल.
  • अर्जदार शेतकरी हा अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटातील सदस्य नसल्यास. [Mini Tractor Yojana]

मिनी ट्रॅक्टर योजना अंतर्गत अर्ज करण्याची पद्धत

  • अर्जदाराला सर्वात प्रथम आपल्या क्षेत्रातील जिल्हा कार्यालयात जावे लागेल.
  • जिल्हा कार्यालयात समाज कल्याण विभागात सहाय्यक आयुक्तांच्या कार्यालयात जाऊन मिनी ट्रॅक्टर व त्यांची उपसाधने यांचा पुरवठा योजनेचा अर्ज घ्यावा लागेल.
  • अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून अर्जासोबत योग्य ती कागदपत्रे जोडावी लागतील व भरलेला अर्ज त्याच कार्यालयात जमा करावा.
  • अशा प्रकारे तुमची या योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल. [Mini Tractor Yojana]

Mini Tractor Yojana Maharashtra Online Apply

पहिले चरण

  • अर्जदाराला सर्वात प्रथम शासनाच्या अधिकृत वेबसाईट वर जावे लागेल.
  • होम पेज वर तुम्हाला सर्वात प्रथम स्वतःचे रेजिस्ट्रेशन करावे लागेल. त्यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज वर क्लिक करावे लागेल.
Mini Tractor Yojana

  • आता तुमच्यासमोर एक रेजिस्ट्रेशन अर्ज उघडेल त्यामध्ये तुम्हाला विचारलेली सर्व माहिती (Full Name,10 Digit Mobile Number (Without 0 or +91) AADHAR Card No,Email ID,बचत गटाचे नाव इत्यादी) भरावी लागेल.
Mini Tractor Yojana

  • अशा प्रकारे तुमची रेजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण होईल. [Mini Tractor Yojana]

दुसरे चरण

  • अर्जदाराला त्याचा ई-मेल आयडी आणि पासवर्ड टाकून लॉगिन करायचे आहे.
  • आता तुमच्यासमोर या योजनेचा अर्ज उघडेल त्यामध्ये विचारलेली सर्व माहिती भरून योग्य ती कागदपत्रे जोडावी लागतील व Submit बटनावर क्लिक करावे लागेल.
  • अशा प्रकारे तुमची या योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.
Telegram GroupJoin
मिनी ट्रॅक्टर व त्यांची उपसाधने यांचा पुरवठा योजनेची
अधिकृत वेबसाईट
Click Here
Mini Tractor Anudan Yojana Maharashtra
Contact Number
Click Here
  • 7/12 वर ऑनलाईन पिकांची नोंद करण्यासाठी सरकार ने सुरु केली आहे एक नवीन योजना त्यासाठी वाचा ई पीक पाहणी
  • स्वतःचा लघु उद्योग सुरु करण्यासाठी सरकार देत आहे 1 लाखाचे कमी व्याज दरात कर्ज त्यासाठी वाचा थेट कर्ज योजना
  • घराच्या छतावर सोलर बसविण्यासाठी सरकार देत आहे 40 टक्के अनुदान त्यासाठी वाचा रुफटॉप सोलर योजना

सारांश

आम्ही आशा करतो कि तुम्हाला मिनी ट्रॅक्टर योजना ची सर्व माहिती प्राप्त झाली आहे तरी देखील आपले योजनेअंतर्गत काही प्रश्न असल्यास मला ई-मेल किंवा कमेंट्स च्या माध्यमातून जरूर कळवा आम्ही तुमच्या प्रश्नांची लवकरात लवकर उत्तरे देण्याचा प्रयत्न करू आणि जर तुम्हाला या योजनेची माहिती उपयुक्त वाटली असेल तर तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा जेणेकरून तुमचे मित्र देखील या योजनेचा लाभ घेऊ शकतील. [Mini Tractor Yojana]