Kutir Udyog List In Marathi

कुटीर उद्योग हा घरातून केला जाणारा कमी गुंतवणूक असलेला एक छोटा उद्योग आहे या उद्योगामध्ये काम करणारे सदस्य हे एकाच कुटुंबातील सदस्य असतात त्यामुळे कामगारांची संख्या ही कमी असते तसेच या उद्योगात विजेचा उपयोग केला जात नाही त्यामुळे हा उद्योग हाताच्या शक्तीने चालवली जाणारी अवजारे वापरून केला जातो तसेच या उद्योगात काही वेळा जनावरांचा वापर करून देखील केला जातो जसे तेल पाडण्यासाठी रहाट फिरवण्यासाठी जनावरांचा वापर केला जातो

कुटीर उद्योगांमध्ये उत्पादनासाठी आवश्यक कच्चामाल हा स्थानिक बाजारपेठेत सहज उपलब्ध असतो, या कच्च्या मालावर प्रक्रिया करून वस्तू तयार केले जातात व आपल्याच गावात किंवा आजूबाजूच्या गावातील ग्राहकांसाठी हे उत्पादन केले जाते. तसेच कुटीर उद्योगात बनविल्या जाणाऱ्या वस्तू ह्या स्थानिक बाजारपेठेत विकल्या जातात.

ग्रामीण भागात नोकरीच्या जास्त संधी उपलब्ध नाहीत त्यामुळे बहुतांश कुटुंबे ही कुटीर उद्योग सुरु करण्यासाठी उत्सुक असतात व त्यामुळे ते कुटीर उद्योग सुरु करतात त्यामुळे ग्रामीण भागातून सुरु केल्या जाणारे व्यवसाय खालीलप्रमाणे आहेत.

कुटीर उद्योगांमध्ये साहित्यिक, कला, हस्तशिल्प, गायन, तंत्रज्ञान, असे अनेक प्रकारचे उद्योग आहेत. या उद्योगामध्ये व्यक्ती आपल्या कौशल्यानुसार काम करून स्वतंत्रपणे उत्पादन करू शकतो. [Kutir Udyog List In Marathi]

Kutir Udyog List In Marathi

Kutir Udyog List In Marathi

  • कुंभारकाम
  • सुतारकाम
  • लोहारकाम
  • तेलघाण्या
  • चर्मोद्योग
  • काथ्याकाम
  • वनस्पति-तेले गाळणे व शुद्धीकरण उद्योग
  • सोनारकाम
  • चर्मकाम
  • लाकडाचे व हस्तिदंती नक्षीकाम व कोरीव काम
  • पितळी भांड्यांचे कारखाने
  • खडीकाम व रंगकाम
  • खेळणी
  • रेशमी वस्त्रे तसेच पैठण्या तयार करणे
  • हातमाग
  • बुरूडकाम
  • वेतकाम
  • बांबूकाम
  • मधमाशापालन
  • विड्या वळणे
  • घोंगड्या विणणे
  • गुळ तयार करणे
  • चर्म व चर्मवस्तुउद्योग व पादत्राणे तयार करणे
  • तांदूळ कुटणे, भात सडणे, धान्ये व डाळी ह्यांचे पीठ करणे
  • विटा तयार करणे
  • हातमागाची वस्त्रे, काश्मिरी शाली, गालिचे, रेशमी वस्त्रे
  • हस्तिदंती व लाकडी नक्षीकाम
  • सोन्याचे दागिने
  • जरीचे काम
  • तांब्यापितळेची भांडी तयार करणे
  • कापड वस्त्रउद्योग
  • यंत्रमाग
  • हस्तव्यवसाय
  • झाडू तयार करणे
  • धान्य दळून पीठ तयार करणे
  • फुल व हार विक्रीचे उद्योग
  • दुध, दही, लोणी उद्योग
  • हाताने सुत काढणे किंवा कापड विणणे
  • टोपल्या तयार करणे
  • रेशमचा धागा बनवणे
  • हातमागांवर कापड विणणे गालिचे बनविणे
  • काचेच्या बांगड्या बनविणे
  • खेळणी बनविणे
  • कापड रंगविणे आणि छपाई काम
  • विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण पूर्ण करता यावे यासाठी सरकार देत आहे 10 लाखांचे कर्ज त्यासाठी वाचा शैक्षणिक कर्ज योजना
  • मुलींना शारीरिक व मानसिक दृष्ट्या प्रबळ बनविण्यासाठी सरकार ने सुरु केली आहे किशोरी शक्ती योजना

कुटीर उद्योग सुरु करण्याचा फायदा

  • अत्यंत कमी भांडवलात कुटीर उद्योग सुरु करता येतो.
  • कमी कामगारांत हा उद्योग सुरु करता येतो या उद्योगात जास्त करून कुटुंबातील सदस्य काम करतात.
  • कुटीर उद्योगात बनविल्या जाणाऱ्या वस्तू स्थानिक बाजारपेठेत सहज विकता येतात.
  • कुटीर उद्योगात विजेची आवश्यकता नसते.
  • कुटीर उद्योग सुरु करण्यामुळे रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतात.
  • कुटीर उद्योग हा घरातून केला जाणारा व्यवसाय आहे त्यामुळे बोकारीसाठी घरापासून दूर शहरात जाण्याची गरज भासत नाही.
  • कुटीर उद्योगामुळे ग्रामीण भागांतील लोकांना रोजगाराची संधी मिळते आणि त्यांची आत्मनिर्भरता वाढते. [Kutir Udyog List In Marathi]
Telegram GroupJoin
Kutir Udyog Government SchemeClick Here

सारांश

आम्ही आशा करतो कि तुम्हाला ग्रामीण कुटीर उद्योगाची सर्व माहिती प्राप्त झाली आहे तरीदेखील आपले काही प्रश्न असल्यास मला ई-मेल किंवा कंमेंट्स च्या माध्यमातून जरूर कळवा आम्ही तुमच्या प्रश्नांची लवकरात लवकर उत्तरे देण्याचा प्रयत्न करू आणि जर तुम्हाला या योजनेची माहिती उपयुक्त वाटली असेल तर तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा जेणेकरून तुमचे मित्र देखील या योजनेचा लाभ घेऊ शकतील. [Kutir Udyog List In Marathi]