Pradhan Mantri Suraksha Bima Yojana In Marathi

भारतातील गरीब आणि आर्थिक दृष्ट्या दुर्बल नागरिकांचा विचार करून C ची सुरुवात करण्यात आली.
या योजनेअंतर्गत देशातील नागरिकांचा विमा उतरवला जातो जेणेकरून त्यांचा अपघातात मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबाला आर्थिक सहाय्य करण्यात येते.

आपल्या देशात बहुतांश नागरिक दारिद्र्य रेषेखाली स्वतःचे जीवन जगत असतात आर्थिक स्थिती कमजोर असल्याकारणामुळे त्यांना आपल्या परिवाराच्या गरज पूर्ण करता येत नाहीत. आजच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येक नागरिकाचा विमा असणे आवश्यक आहे परंतु आर्थिक स्थिती कमजोर असल्याकारणामुळे तसेच विम्याचा प्रीमियम जास्त असल्याकारणामुळे विमा काढणे प्रत्येक नागरिकाला शक्य नसते. त्यामुळे तो विम्यापासून वंचित राहतो परिणामी अपघात झाल्यावर त्याला औषधोपचारासाठी आर्थिक सामना करावा लागतो.
एका सर्वेक्षणानुसार देशातील फक्त 20 टक्के जनतेकडे कोणत्या ना कोणत्या प्रकारचा विमा आहे परंतु 80 टक्के जनता ही विम्यापासून वंचित आहे त्यामुळे भारतातील विमा धारकांची संख्या वाढवण्याचा या योजनेअंतर्गत एक चांगला उद्देश आहे.
या योजनेअंतर्गत भारतातील प्रत्येक नागरिक महिना फक्त 1/- रुपये भरून 2 लाखांपर्यंत विम्याचा लाभ घेऊ शकतो.

या योजनेचा मुख्य उद्देश राज्यातील प्रत्येक नागरिकाला 1/- रुपयांत 2 लाखाचा विमा लाभ उपलब्ध करून देणे हा आहे जेणेकरून विमाधारकाचा अपघाती मृत्यू झाल्यास किंवा अपंगत्व आल्यास 2 लाखांपर्यंत आर्थिक सहाय्य दिले जाते. [Pradhan Mantri Suraksha Bima Yojana In Marathi]

वाचकांना विनंती

आम्ही प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना ची संपूर्ण माहिती या लेखात दिली आहे त्यामुळे तुमची हा लेख शेवट पर्यंत वाचा व या योजनेचा लाभ मिळवा जर तुमच्या परिसरात जे कोणी नागरिक त्यांना या योजनेची माहिती अवश्य द्या किंवा आमचे हे आर्टिकल त्यांना शेयर करा जेणेकरून ते या योजनेचा लाभ घेऊ शकतील.

योजनेचे नावPM Suraksha Bima Yojana In Marathi
लाभार्थीभारतीय रहिवासी
लाभविमा सुरक्षा
उद्देश्यनागरिकांना विमा सुरक्षा प्रदान करणे
अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन

Pradhan Mantri Suraksha Bima Yojana In Marathi चा उद्देश

 • देशातील नागरिकांना कमी दरात विमा सुरक्षा उपलब्ध करून देणे हे या योजनेचे प्रमुख उद्दिष्टय आहे.
 • योजने अंतर्गत देशातील नागरिकांना सशक्त व आत्मनिर्भर बनवणे.
 • देशातील नागरिकांचे जीवनमान सुधारणे
 • राज्यातील नागरिकांचा सामाजिक तसेच आर्थिक विकास करणे.
 • एखाद्या व्यक्तीचा अपघात झाल्यास त्यांच्या कुटूंबाला त्याच्या उपचारासाठी आर्थिक समस्येचा सामना करावा लागू नये तसेच कोणाकडून कर्ज घेण्याची आवश्यकता भासू नये या उद्देशाने या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
 • देशातील नागरिकांना विमा कवच उपलब्ध करून देणे. [Pradhan Mantri Suraksha Bima Yojana In Marathi]
Pradhan Mantri Suraksha Bima Yojana In Marathi

PM Suraksha Bima Yojana In Marathi चे वैशिष्ट्य

 • केंद्र शासनाद्वारे या योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे.
 • देशातील नागरिकांना कमी दरात विमा सुरक्षा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सुरु करण्यात आलेली एक महत्वाची अशी योजना आहे.
 • देशातील 16 ते 70 वर्षे वयोगटातील सर्व बचत खाते बँक धारक या योजनेला लाभ घेऊ शकतात.
 • या योजनेअंतर्गत दिली जाणारी लाभाची राशी लाभार्थ्यांच्या बँक खात्यात DBT च्या सहाय्याने जमा करण्यात येईल.
 • या योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया ऑनलाईन ठेवण्यात आलेली आहे त्यामुळे अर्जदार व्यक्ती घरी बसून आपल्या मोबाईल च्या सहाय्याने अर्ज करू शकतो त्यामुळे अर्जदारास कुठल्याच सरकारी कार्यालयाच्या फेऱ्या मारण्याची आवश्यकता भासणार नाही त्यामुळे अर्जदार नागरिकाचा वेळ आणि पैसे दोघांची बचत होईल.
 • कोणत्याही बँकेतून किंवा पोस्ट खात्यातून अथवा सार्वजनिक क्षेत्रातील विमा कंपनीच्या सहाय्याने या योजनेचा लाभ घेता येतो.
 • या योजनेअंतर्गत राज्यातील नागरिकांचा सामाजिक तसेच आर्थिक विकास होण्यास व त्यांचे जीवनमान सुधारण्यास व ते सशक्त व आत्मनिर्भर बनण्यासाठी मदत होईल. [Pradhan Mantri Suraksha Bima Yojana In Marathi]
 • स्वतःचे घर बांधण्यासाठी राज्य सरकार देत आहे 2 लाखांचे आर्थिक सहाय्य त्यासाठी वाचा शबरी घरकुल योजना
 • स्वतःचा व्यवसाय सुरु करू इच्छिणाऱ्या नागरिकांना सरकार देत आहे 1 लाख रुपयांचे कर्ज त्यासाठी वाचा वसंतराव नाईक कर्ज योजना

Pradhan Mantri Suraksha Bima Yojana Marathi चे ठळक मुद्दे

 • एखाद्या व्यक्तीची जर विविध बँकेत अनेक बचत खाते असतील तर अशी व्यक्ती कुठल्याही एका बचत खात्याद्वारे या योजनेचा लाभ घेऊ शकते.
 • लाभार्थ्यांच्या बचत खात्यातून या योजने अंतर्गत दरवर्षी 12/ रुपये वजा केली जाते.
 • ही योजना 1 वर्ष विमा संरक्षण देते त्यां नंतर लाभार्थ्यास या योजनेसाठी नूतनीकरण करावे लागते.
 • विमाधारकाचे वय 70 वर्ष पूर्ण झाल्यावर सदर विमा संरक्षण योजना संपुष्टात येते.
 • विमाधारकाच्या बचत खात्यात जर विमा हप्ता भरण्यासाठी पुरेशी रक्कम (12/- रुपये) नसेल तर सदर विमा योजना संपुष्टात येते.
 • विमाधारकाचे बचत खाते काही कारणामुळे बंद झाले असेल तर सदर विमा योजना संपुष्टात येते.
 • योजनेचा कालावधी दरवर्षी 1 जुन ते 31 मे असा आहे. [Pradhan Mantri Suraksha Bima Yojana In Marathi]

प्रधान मंत्री सुरक्षा बिमा योजना अंतर्गत दिला जाणारा लाभ खालील प्रमाणे आहे

विमाधारकाचा अपघाती मृत्यू झाल्यास

 • नैसर्गिक आपत्ती किंवा खुनामुळे विमाधारकाच्या मृत्यू झाल्यास रुपये 2 लाख रक्कम त्याच्या वारसाला दिली जाते.

विमाधारकाने स्थायी अपंगत्व आल्यास

 • अपघात किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे जर विमा धारकाच्या डोळ्यांची संपूर्ण आणि कधीही बरी न होणारी हानी म्हणजे कायमस्वरूपी हानी झाल्यास दोन्ही हात निकामी झाल्यास अथवा दोन्ही पाय निकामी झाल्यास/एक डोळा, एक हाथ, एक पाय कायमस्वरूपी निकामी झाल्यास रुपये 2 लाख प्रदान केले जातात

स्थायी आंशिक अपंगत्व आल्यास

 • एका डोळ्याची बरी न होणारी हानी झाल्यास एक हात किंवा एक पाय निकामी झाल्यास रुपये 1 लाख दिले जातात. विमा योजनेअंतर्गत जर विमा धारकाने आत्महत्येचा प्रयत्न केला आणि त्यास काही हानी झाली व त्याचा मृत्यू झाला तर अशा परिस्थितीत विम्याचा लाभ मिळणार नाही तसेच आत्महत्या करताना स्थायी अपंगत्व किंवा स्थायी आंशिक अपंगत्व आल्यास या योजनेअंतर्गत विमाधारकाला कोणताच फायदा मिळणार नाही. [Pradhan Mantri Suraksha Bima Yojana In Marathi]
Pradhan Mantri Suraksha Bima Yojana In Marathi

Pradhan Mantri Suraksha Bima Yojana Information In Marathi अंतर्गत आवश्यक पात्रता

 • अर्जदार व्यक्ती भारताचा नागरीक असणे आवश्यक आहे.
 • स्वतःचे घर बांधण्यासाठी सरकार देत आहे 2.5 लाखाचे आर्थिक अनुदान त्यासाठी वाचा रमाई घरकुल योजना
 • सरकार ने मुलींच्या उज्वल भविष्यासाठी सुरु केली आहे एक महत्वपूर्ण अशी योजना त्यासाठी वाचा सुकन्या समृद्धी योजना

Pm Bima Yojana Age Limit

 • या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी अर्जदाराचे वय 16 वर्ष ते 70 वर्ष असणे आवश्यक आहे त्यामुळे लाभार्थ्यांचे वय 70 वर्ष पूर्ण झाल्यावर त्याला या योजनेअंतर्गत लाभ दिला जाणार नाही.

प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना मराठी चे नियम व अटी

 • फक्त भारतीय नागरिकांनाच या योजनेचा लाभ दिला जाईल.
 • भारताच्या बाहेरील नागरिकांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
 • ज्या व्यक्तीचा विमा उतरवायचा आहे त्याच्याजवळ स्वतःचे आधार कार्ड असणे आवश्यक आहे.
 • या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांचे बँकेत बचत खाते असणे आवश्यक आहे.
 • विमाधारकाला त्याच्या बचत खात्यामधून विम्याची प्रीमियम रक्कम Auto Debit होण्यासाठी अर्जासोबत संमत्ती पत्र जोडणे आवश्यक आहे
 • बँक खाते बंद झाल्यास सदर योजनेचा लाभ घेता येणार नाही.
 • विम्याच्या पॉलिसी ची रक्कम 12/- रुपये वर्षातून एकदा 31 मे ला वजा करण्यात येईल.
 • विमा पॉलिसी ची रक्कम 12/- न भरल्यास विमा पॉलिसी चे नूतनीकरण करण्यात येणार नाही. [Pradhan Mantri Suraksha Bima Yojana In Marathi]

Pradhan Mantri Suraksha Bima Yojana Information In Marathi अंतर्गत आवश्यक कागदपत्रे

 • अर्जदाराचे आधार कार्ड
 • ओळखपत्र
 • बँकेत बचत खाते असणे आवश्यक
 • जन्माचा दाखला
 • उत्पन्नाचा दाखला
 • मोबाईल नंबर
 • पासपोर्ट आकाराचा फोटो

Pradhanmantri Suraksha Yojana अंतर्गत नोंदणी करण्याची पद्धत

 • प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला सरकारच्या अधिकृत वेबसाईट वर जाऊन सादर योजनेचा अर्ज डाउनलोड करावा लागेल किंवा तुम्हाला तुमच्या बचत खाता असलेल्या बँकेत जाऊन पंतप्रधान विमा योजनेचा अर्ज घ्यावा लागेल
 • त्यानंतर अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून योग्य ती कागदपत्रे जोडून सदर अर्ज बँकेत जमा करावा.
 • त्यानंतर त्या कागदपत्रांची तपासणी करून विम्याची रक्कम 12/- रुपये तुमच्या बँक खात्यातून वजा करेल व अशा प्रकारे तुमची विमा संरक्षण सुरू होईल.
 • तसेच तुम्ही पोस्ट खाते व सार्वजनिक क्षेत्रातील विमा कंपन्यांच्या माध्यमातून देखील सदर पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेचा लाभ घेऊ शकता.

पंतप्रधान विमा योजना अंतर्गत दावा करण्याची पद्धत

एखाद्या विमाधारकाचा नैसर्गिक अथवा अपघाती मृत्यू झाल्यास प्रथम Claim Form भरावा लागतो व विमाधारकाचा हॉस्पिटल मध्ये मृत्यू झाल्यास अर्जासोबत हॉस्पिटल ने दिलेले मृत्यू प्रमाणपत्र,औषधोपचाराची सर्व माहिती व कागदपत्रे जोडावी लागतात
जर विमाधारकाचा घरीच मृत्यू झाल्यास डॉक्टरांनी दिलेला मृत्यूचा दाखला Claim Form सोबत जोडणे आवश्यक आहे.
तसेच अपघात किंवा नैसर्गिक आपत्तीत विमाधारकाला स्थायी अपंगत्व आल्यास हॉस्पिटलचे Discharge Card आणि औषधोपचाराची सर्व माहिती सोबत जोडणे आवश्यक असेल.

Pm Bima Yojana Application Status बघण्यासाठी

 • सर्वात प्रथम तुम्हाला शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर जावं लागेल
 • आता तुमच्यासमोर चे होम पेज ओपन होईल त्याच्यावर अर्जाची स्थिती वर क्लिक करावे
 • त्यानंतर तुम्हाला तुमचा एप्लीकेशन नंबर टाकावा लागेल रीसर्च बटन वर क्लिक करावे लागेल
 • तुमच्या अर्जाची स्थिती तुम्हाला कॉम्पूटवर स्क्रीन वर दिसेल. [Pradhan Mantri Suraksha Bima Yojana In Marathi]

Pradhanmantri Suraksha Bima Yojana अंतर्गत लाभार्थी यादी बघण्याकरिता

 • सर्वात प्रथम तुम्हाला शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर जावं लागेल
 • तुमच्यासमोर चे होम पेज ओपन होईल त्याच्यावर  लाभार्थी यादी दिसेल त्याच्यावर क्लिक करावे.
 • आता तुमच्यासमोर जे पेज ओपन होईल त्याच्यावर तुम्हाला तुमचा जिल्हा.गांव/शहर हे निवडावे लागेल.
 • आता तुमच्यासमोर या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांची  यादी दिसेल.
 • स्वतःचा लघु उद्योग सुरु करण्यासाठी सरकार देत आहे 1 लाखाचे कमी व्याज दरात कर्ज त्यासाठी वाचा थेट कर्ज योजना
 • आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना सरकार देत आहे 3 लाखाची प्रोत्साहन राशी त्यासाठी वाचा आंतरजातीय विवाह योजना
Telegram GroupJoin
योजनेचा अर्जClick Here
अधिकृत वेबसाईटClick Here
दाव्यासाठी अर्जClick Here
संमती पत्र/घोषणा अर्जClick Here
राज्यानुसार टोल फ्री नंबरClick Here
महाराष्ट्र टोल फ्री क्रमांक1800-102-2636
राष्ट्रीय टोल फ्री क्रमांक1800-180-1111
1800-110-001

सारांश

आम्ही आशा करतो कि तुम्हाला प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना मराठी अंतर्गत सर्व माहिती प्राप्त झाली आहे तरीदेखील आपले योजनेसंबंधी काही प्रश्न असल्यास मला ई-मेल किंवा कंमेंट्स च्या माध्यमातून जरूर कळवा आम्ही तुमच्या प्रश्नांची लवकरात लवकर उत्तरे देण्याचा प्रयत्न करू आणि जर तुम्हाला या योजनेची माहिती उपयुक्त वाटली असेल तर तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा जेणेकरून तुमचे मित्र देखील या योजनेचा लाभ घेऊ शकतील. [Pradhan Mantri Suraksha Bima Yojana In Marathi]