चंदन कन्या योजना महाराष्ट्र

महाराष्ट्र शासनाद्वारे राज्यातील शेतकऱ्यांच्या मुलींना आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सुरु करण्यात आलेली महत्वाची अशी योजना आहे. शेताच्या बांधावरती 20 चंदनाच्या झाडांची लागवड करून त्यांचा 12 वर्षे सांभाळ केल्यावर मुलीच्या शिक्षणासाठी, लग्नासाठी एकरकमी 15 ते 20 लाखांचे आर्थिक सहाय्य दिले जाते.

चंदन कन्या योजना अंतर्गत ज्या शेतकऱ्यांच्या कुटुंबात मुलगी आहे अशा शेतकऱ्यांना त्यांच्या शेताच्या बांधावर लागवड करण्यासाठी मोफत 20 चंदनाच्या झाडांचे वाटप करण्यात येते. तसेच चंदन लागवडीसाठी मोफत मार्गदर्शन सुद्धा दिले जाते शिवाय लागवडीनंतर 1 वर्षाने चंदन झाडाची नोंद सातबारावर घेण्यासाठी मोफत मदत दिली जाते. तसेच चंदन झाडांची वाढ झाल्यानंतर त्याची तोडणी व वाहतूक परवाना काढण्यासाठी मोफत मदत केली जाते. शिवाय महाराष्ट्र  ग्रोव्हर फार्मर्स प्रोड्युसर कंपनी मार्फत चंदनाच्या झाडांना सर्वोच्च बाजार भाव विक्री करण्यासाठी मदत देखील केली जाते.

राज्यात बहुतांश शेतकरी हे आर्थिक दृष्ट्या गरीब आहेत त्यांची आर्थिक स्थिती कमजोर असल्याकारणामुळे ते आपल्या मुलींना शिक्षण देण्यासाठी असमर्थ असतात त्यामुळे मुली स्वतःचे शिक्षण पूर्ण करण्यापासून वंचित राहतात व त्यामुळे मुलींचा सामाजिक विकास होत नाही. त्यामुळे आर्थिक दृष्ट्या गरीब शेतकरी व त्यांच्या मुलींच्या या सर्व समस्यांचा विचार करून शासनाने चंदन कन्या योजना सुरु करण्याचा महत्वाचा निर्णय घेतला. [Chandan Kanya Yojana]

वाचकांना विनंती

आम्ही चंदन कन्या योजना ची संपूर्ण माहिती या लेखात दिली आहे त्यामुळे तुमची हा लेख शेवट पर्यंत वाचा व या योजनेचा लाभ मिळवा जर तुमच्या परिसरात जे कोणी शेतकरी असतील तर त्यांना या योजनेची माहिती अवश्य द्या किंवा आमचे हे आर्टिकल त्यांना शेयर करा जेणेकरून ते या योजनेचा लाभ घेऊ शकतील.

Chandan Kanya Yojana Maharashtra चा उद्देश

 • राज्यातील शेतकऱ्यांचा आर्थिक विकास करणे
 • शेतकऱ्याच्या मुलींना शिक्षणासाठी तसेच विवाहासाठी आर्थिक सहाय्य करणे
 • शेतकऱ्यांच्या कुटुंबातील मुलींना त्यांचे शिक्षण पूर्ण करता यावे.
Chandan Kanya Yojana

चंदन कन्या योजना अंतर्गत शेतकऱ्यांना दिला जाणारा लाभ

 • शेताच्या बांधावरती 20 चंदनाच्या झाडांची लागवड करून त्यांचा 12 वर्षे सांभाळ केल्यावर मुलीच्या शिक्षणासाठी, लग्नासाठी एकरकमी 15 ते 20 लाखांचे आर्थिक सहाय्य दिले जाते.

चंदनकन्या योजना अंतर्गत सहभाग शुल्क

 • चंदनकन्या योजना अंतर्गत सहभाग शुल्क १५००/- रुपये आहे
 • विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण पूर्ण करता यावे यासाठी सरकार देत आहे 10 लाखांचे कर्ज त्यासाठी वाचा शैक्षणिक कर्ज योजना
 • मुलींना शारीरिक व मानसिक दृष्ट्या प्रबळ बनविण्यासाठी सरकार ने सुरु केली आहे किशोरी शक्ती योजना

चंदन कन्या योजना महाराष्ट्र अंतर्गत शेतकऱ्यांना होणारा फायदा

 • शेतकऱ्यांना आर्थिक विकास होईल.
 • शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारेल.
 • या योजनेच्या सहाय्याने शेतकऱ्याच्या मुली स्वतःचे शिक्षण पूर्ण करू शकतील.

चंदन कन्या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या सुविधा

१) मुलीच्या नांवे लागवडीसाठी २० चंदन झाडे तालुकास्तरावर रोपे मिळतील.
२) चंदन लागवडीसाठी मोफत मार्गदर्शन.
३) चंदन झाडांसोबत होस्ट म्हणून लागवडीसाठी २० सरुची झाडे मोफत मिळतील.
४) लागवडीनंतर १ वर्षाने चंदन झाडाची नोंद ७/१२ वर नोंद घेण्यासाठी मोफत मदत.
५) चंदन झाडांची वाढ झाल्यानंतर त्याचा तोडणी व वाहतुक परवाना काढण्यासाठी मोफत मदत.
६) चंदन झाडांची महाराष्ट्र सँडल ग्रोवर फार्मर्स् प्रोड्युसर कंपनी मार्फत सर्वोच्च बाजार भावान विक्री करण्यासाठी मोफत मदत. किमान १०० शेतकरी नोंद असलेल्या तालुक्यात तालुकास्तरावर रोपे मिळतील. सरुची रोपे योजने व्यतिरिक्त अतिरिक्त मोफत देण्यात येत आहे. त्यामुळे ती उपलब्धतेनुसारच देण्यात येतील. [Chandan Kanya Yojana]

चंदन कन्या योजना अंतर्गत आवश्यक पात्रता अटी

 • अर्जदार हा शेतकरी असणे आवश्यक आहे तसेच त्याच्याजवळ शेतजमीन असणे आवश्यक आहे.
 • अर्जदार महाराष्ट्र राज्याच्या मूळ रहिवाशी असणे आवश्यक आहे.
 • महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील नागरिकांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
 • शेतकऱ्याच्या कुटुंबात मुलगी असणे आवश्यक आहे.
 • अर्जदार शेतकऱ्याच्या कुटुंबातील मुलीचे वय 1 वर्ष ते 10 वर्ष असणे आवश्यक आहे.
 • शेतकऱ्यांना 12 वर्ष चंदनाच्या झाडांचे जतन करणे अनिवार्य आहे.
 • योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांना १५००/- रुपये नोंदणी शुल्क भरणे अनिवार्य आहे.
 • स्वतःचे घर बांधण्यासाठी सरकार देत आहे 2.5 लाखाचे आर्थिक अनुदान त्यासाठी वाचा रमाई घरकुल योजना

चंदन कन्या योजनेअंतर्गत आवश्यक कागदपत्रे

 • मुलीचे आधार कार्ड
 • वडिलांचे आधार कार्ड
 • रहिवाशी दाखला
 • मुलीचा जन्माचा दाखला
 • पासपोर्ट आकाराचे फोटो
 • मोबाईल नंबर
 • शेतकरी असल्याचे प्रमाणपत्र
 • जमिनीचा 7/12

चंदन कन्या योजना अंतर्गत नोंदणी करण्यासाठी

 • चंदन कन्या योजनेच्या अधिक माहितीसाठी, अर्जासाठी तसेच नोंदणीसाठी 7038443333 या नंबर वर मिस कॉल किंवा व्हॉटसअप करावे.
Telegram GroupJoin

सारांश

आम्ही आशा करतो कि तुम्हाला चंदन कन्या योजना ची सर्व माहिती आपल्याला प्राप्त झाली आहे तरीदेखील आपले योजनेसंबंधी काही प्रश्न असल्यास मला ई-मेल किंवा कंमेंट्स च्या माध्यमातून जरूर कळवा आम्ही तुमच्या प्रश्नांची लवकरात लवकर उत्तरे देण्याचा प्रयत्न करू आणि जर तुम्हाला या योजनेची माहिती उपयुक्त वाटली असेल तर तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा जेणेकरून तुमचे मित्र देखील या योजनेचा लाभ घेऊ शकतील. [Chandan Kanya Yojana]