Antarjatiya Vivah Yojana Maharashtra

समाजातील अस्पृश्यता निवारण करण्यासाठी व आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी तसेच समाजातील जात, धर्म भेदभाव नष्ट करण्यासाठी सुरु करण्यात आलेली योजना आहे. या योजनेअंतर्गत विवाह करणाऱ्या जोडप्यांना 50,000/- रुपयांची रक्कम प्रोत्साहन म्हणून देण्यात येते. तसेच
आंतरजातीय विवाह योजना अंतर्गत विवाह करणाऱ्या जोडप्यांपैकी एक जण म्हणजेच मुलगा किंवा मुलगी अनुसूचीत जाती प्रवर्गातील व दलित समाजातील असल्यास अशा जोडप्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशन च्या माध्यमातून 2.5 लाख रुपये प्रोत्साहन स्वरूपात देण्यात येते.

आपल्या देशात अजूनही काही भागात जात, धर्म यावरून भेदभाव केला जातो आणि जात आणि धर्माच्या नावाखाली दंगे देखील घडवले जातात. तसेच समाजात आंतरजातीय विवाहाबद्दल अजून सुद्धा खूप साऱ्या चुकीच्या समजुती \लोकांच्या मनात आहेत या सर्व चुकीच्या समजुतींना नष्ट करण्यासाठी व भेदभाव कमी करण्यासाठी सरकार विविध योजना सुरु करत असतात त्या योजनांपैकी एक योजना म्हणजे आंतरजातीय विवाह योजना महाराष्ट्र.

या योजनेअंतर्गत खुल्या प्रवर्गातील मुलगा किंवा मुलगी जर अनुसूचित जाती  प्रवर्गातील मुलगा किंवा मुलीसोबत विवाह करतात तर अशा परिस्थितीत त्या जोडप्यांना या योजनेचा लाभ दिला जाईल.
या योजनेअंतर्गत दिली जाणारी 50% रक्कम केंद्र सरकार आणि 50% रक्कम राज्य शासनाकडून दिली जाते. [Antarjatiya Vivah Yojana Maharashtra]

योजनेअंतर्गत अनुसूचित जाती-जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती यापैकी एक व्यक्ती आणि दुसरी व्यक्ती हिंदू, जैन, लिंगायत, शीख या धर्मातील असेल तर त्या विवाहास आंतरजातीय विवाह म्हणून संबोधण्यात येते.

अनुसूचित जातीमधून बौध्द धर्मात धर्मांतर केलेल्यांना अनुसूचित जातीचा दर्जा मिळावा या हेतूने केंद्र शासनाने घटना आदेश 1950 मध्ये सुधारणा करुन अनुसूचित जातीसंबंधी घटना आदेश बौध्द धर्मियांना लागू करण्यात आल्याचे घोषित केले आहे. त्यानुसार अनुसूचित जातीची यादी हिंदू अथवा शिख अथवा बौध्द धर्मियांनाही लागू झालेली आहे. त्यानुसार बौध्द धर्मात धर्मांतर केलेल्या अनुसूचित जातीच्या व्यक्ती या योजनेखालील सवलती मिळण्यास पात्र ठरलेल्या आहेत. [Antarjatiya Vivah Yojana Maharashtra]

Antarjatiya Vivah Yojana Maharashtra

वाचकांना विनंती

आम्ही आंतरजातीय विवाह योजना महाराष्ट्र ची संपूर्ण माहिती या लेखात दिली आहे त्यामुळे तुम्ही हा लेख शेवट पर्यंत वाचा व या योजनेचा लाभ मिळवा जर तुमच्या परिसरात असे कोणी व्यक्ती असतील ज्यांनी आंतरजातीय विवाह केला असेल तर त्यांना या योजनेची माहिती अवश्य द्या किंवा आमच हे आर्टिकल त्यांना शेयर करा जेणेकरून ते या योजनेचा लाभ घेऊ शकतील.

योजनेचे नाव आंतरजातीय विवाह योजना महाराष्ट्र
विभागसमाज कल्याण विभाग
राज्यमहाराष्ट्र
योजनेची सुरुवात3 सप्टेंबर 1959
कोणी सुरू केली केंद्र सरकार / महाराष्ट्र राज्य शासन
लाभार्थीमहाराष्ट्र राज्यातील नागरिक
लाभ 3 लाख रुपये प्रोत्साहन रक्कम
योजनेचा उद्देश समाजातील जात / धर्म भेदभाव नष्ट करणे.
अर्ज करण्याची पद्धतऑफलाईन

Table Of Content

आंतरजातीय विवाह योजना महाराष्ट्र चा मुख्य उद्देश

  • समाजात होणारा जात, धर्म भेदभाव नष्ट करून सर्वाना समान हक्क देण्याच्या उद्देश्याने तसेच आंरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने आंतरजातीय विवाह योजना महाराष्ट्र ची सुरुवात करण्यात आली आहे.
  • योजनेअंतर्गत राज्यातील नागरिकांचा सामाजिक तसेच आर्थिक विकास करणे.
  • राज्यातून जाती धर्म भेदभाव नष्ट करणे.
  • समाजात जाती धर्माबद्दल असलेला गैर समज नष्ट करणे.
  • नवं जोडप्यास आर्थिक सहाय्य करणे.
  • राज्यातील नागरिकांचा सामाजिक तसेच आर्थिक विकास करणे.
  • नागरिकांना सशक्त तसेच आत्मनिर्भर बनविणे हा या योजनेचा उद्देश आहे.
  • नागरीकांचे जीवनमान सुधारणे.
  • आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने या योजनेची सुरवात करण्यात आली आहे.
  • प्रत्येक धर्माला समान स्थान देणे.
  • सर्वाना समान हक्क देणे. [Antarjatiya Vivah Yojana Maharashtra]
Antarjatiya Vivah Yojana Maharashtra

आंतरजातीय विवाह योजना महाराष्ट्र ची वैशिष्ट्ये

  • आंतरजातीय विवाह योजना ची सुरुवात महाराष्ट्र शासनद्वारे करण्यात आली आहे.
  • जाती-जातीतील जातीयतेची तेढ कमी होऊन समानता वृद्धिंगत व्हावी तसेच सर्व जातींतील व्यक्तीमध्ये एकोपा वाढावा या उदांत दृष्टिकोनातून आंतरजातीय विवाह करणाऱ्या व्यक्तीस प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने महाराष्ट्र शासनाकडून सुरु करण्यात आलेली आंतरजातीय विवाह योजना एक अत्यंत महत्वाची अशी योजना आहे.
  • आंतरजातीय विवाह योजना महाराष्ट्र अंतर्गत अनुसूचित जाती प्रवर्गातील आंतरजातीय विवाहास राज्य शासनाकडून 50000/- रुपये व डॉ. बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशन च्या माध्यमातून 2.5 लाख रुपये असे दोन्ही मिळून 3 लाख रुपये लाभार्थी वधू-वरास दिले जातात.
  • आंतरजातीय विवाह योजना महाराष्ट्र च्या माध्यमातून जातिगत भेदभाव कमी करून प्रत्येक धर्माला समान स्थान देणे आहे.
  • या योजनेच्या सहायाने राज्यातील नागरिक सशक्त व आत्मनिर्भर होण्यास मदत होईल.
  • राज्यातील नागरिकांचा सामाजिक तसेच आर्थिक विकास होण्यास मदत होईल.
  • राज्यातील नागरिकांचे जीवनमान सुधारण्यास मदत होईल.
  • या योजनेअंतर्गत दिली जाणारी प्रोत्साहन रक्कम DBT च्या सहाय्याने थेट लाभार्थीच्या बँक खात्यात जमा केली जाते.
  • या योजनेसाठी अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन करण्यात आली आहे त्यामुळे अर्जदारास कोणत्याच सरकारी कार्यालयाच्या फेऱ्या मारण्याची आवश्यकता भासणार नाही जेणेकरून अर्जदाराचा वेळ आणि पैसे दोघांची बचत होईल. [Antarjatiya Vivah Yojana Maharashtra]

आंतरजातीय विवाह योजना महाराष्ट्र खालील प्रकारासाठी लागू आहे

  • महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असलेल्या अनुसूचित जाती,अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
Inter Cast Marriage Scheme Maharashtra Information

आंतरजातीय विवाह योजना महाराष्ट्र चे लाभार्थी

  • ज्यांनी आंतरजातीय विवाह केला आहे अशी जोडपी आंतरजातीय विवाह योजना महाराष्ट्र चे लाभार्थी आहेत.

आंतरजातीय विवाह योजना महाराष्ट्र अंतर्गत दिला जाणारा लाभ

या योजनेअंतर्गत विवाह करणाऱ्या जोडप्यांना 50,000/- रुपयांची रक्कम प्रोत्साहन म्हणून देण्यात येते. तसेच आंतरजातीय विवाह योजना अंतर्गत विवाह करणाऱ्या जोडप्यांपैकी एक जण म्हणजेच मुलगा किंवा मुलगी अनुसूचीत जाती प्रवर्गातील व दलित समाजातील असल्यास अशा जोडप्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशन च्या माध्यमातून 2.5 लाख रुपये प्रोत्साहन स्वरूपात देण्यात येते. [Antarjatiya Vivah Yojana Maharashtra]

आंतरजातीय विवाह योजना महाराष्ट्र चे फायदे

  • आंतरजातीय विवाह योजना महाराष्ट्र च्या सहाय्याने आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांचे जीवनमान सुधारेल.
  • या योजनेच्या सहाय्याने आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांचा सामाजिक व आर्थिक विकास होईल.
  • आंतरजातीय विवाह करणारी जोडपी सशक्त व आत्मनिर्भर बनतील.
  • आंतरजातीय विवाह योजना महाराष्ट्र च्या सहाय्याने राज्यातील नागरिक आतंरजातीय विवाह करण्यास प्रोत्साहित होतील.
  • राज्यातून जाती, धर्म भेदभाव नष्ट होण्यास मदत होईल.
  • समाजात जाती धर्माबद्दल असलेला गैर समज नष्ट होण्यास मदत होईल. [Antarjatiya Vivah Yojana Maharashtra]

Antarjatiya Vivah Yojana Maharashtra अंतर्गत आवश्यक पात्रता

  • अर्जदार हा महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असणे आवश्यक आहे.
  • सरकार गटई कामगारांना देत आहे मोफत पत्र्याचे स्टॉल त्यासाठी वाचा गटई स्टॉल योजना
  • आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबांना सरकार देत आहे 4000/- रुपयांचे अर्थसहाय्य त्यासाठी वाचा खावटी अनुदान योजना
  • स्वतःचा लघु उद्योग सुरु करण्यासाठी सरकार देत आहे 1 लाखाचे कमी व्याज दरात कर्ज त्यासाठी वाचा थेट कर्ज योजना

आंतरजातीय विवाह योजना महाराष्ट्र चे नियम व अटी

  • फक्त महाराष्ट्रातील नागरिकांनाच आंतरजातीय विवाह योजना चा लाभ दिला जाईल.
  • महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील नागरिकांना योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
  • लाभार्थी विवाहित जोडप्यांपैकी एक जण (मुलगा किंवा मुलगी) अनुसूचित जाती अनुसूचित जमाती विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग यांपैकी असावा.
  • आंतरजातीय विवाह योजना महाराष्ट्र अंतर्गत दिली जाणारी रक्कम फक्त त्याच लाभार्थ्यांना आहे ज्यांनी अनुसूचित जाति प्रवर्गातील मुलगा किंवा मुली सोबत विवाह केला आहे.
  • केवळ अशा जोडप्यांनाच या योजनेचा लाभ घेता येईल ज्यांचा विवाह हिंदू विवाह अधिनियम कायदा 1955 किंवा विशेष विवाह अधिनियम कायदा 1954 अंतर्गत झाला असेल.
  • या योजनेअंतर्गत विवाह करणाऱ्या मुलाचे वय 21 वर्ष व मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे.
  • आंतरजातीय विवाह योजना महाराष्ट्र अंतर्गत लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांना कोर्ट मॅरेज करणे अनिवार्य आहे.
  • अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती विशेष मागासवर्गीय यापैकी एक व्यक्ती (मुलगा किंवा मुलगी) व दुसरी व्यक्ती (मुलगा किंवा मुलगी) हिंदू लिंगायत जैन शीख बौद्ध असल्यास हा विवाह आंतरजातीय विवाह मानण्यात येईल. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागासवर्गीय यामधील आंतर प्रवर्गातील विवाहास आंतरजातीय विवाह मानण्यात येईल
  • अर्जदाराने या आधी जर केंद्र सरकार किंवा राज्य शासनाद्वारे सुरु एखाद्या आंतरजातीय विवाह योजनेचा लाभ घेतला असेल तर त्यास या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
  • सदर योजनेचा लाभ घेणा-या जोडप्यापैकी वधू / वराचे कुटूंब महानगरपालिका क्षेत्रात किमान 3 वर्षे वास्तव्य असलेबाबत पुरावा म्हणून मालमत्ता धारक असल्यास चालू वर्षाचा मालमत्ता कर भरल्याची पावती/ निवडणूक ओळखपत्र/ मतदार यादीतील नांव/ पाणीपट्टी/ वीज बिल/ आधार कार्ड/ 3 वर्षाचा भाडे करारनामा/ पारपत्र (Pass Port)/ रेशनकार्ड / विवाह नोंदणी दाखला / राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक पुरावा म्हणून सादर करावा लागेल.
  • सदर योजनेचा लाभ आंतरजातीय विवाह केलेल्या व्यक्तींनाच मिळू शकेल.(अ.जा./अ.ज./भ.ज./वि.भ.ज./ई.मा.व./वि.मा.व. व यामधिल आंतर प्रवर्ग शासन निर्णयानुसार)
  • अर्जासोबत वर व वधु यांचा शाळा सोडल्याचा दाखला जोडणे आवश्यक आहे.
  • वर अथवा वधु जे मागासवर्गीय असतील त्याबाबत संबंधित सक्षम | प्राधिकारी यांनी दिलेल्या जातीचा दाखला.
  • अर्जासोबत महाराराष्ट्राचे रहीवासी असल्यास मा.जिल्हाधिकारी यांचा दाखला जोडणे आवश्यक आहे.
  • विवाह नोंदणी दाखला अर्जासोबत जोडणे अनिवार्य राहील.
  • अर्जासोबत दोघांचे अलीकडील काळात काढलेले पासपोर्ट साईज | आकाराचे फोटो लावणे आवश्यक राहील.
  • विवाह झाल्यानंतर तीन वर्षाच्या आत अर्ज सादर करणे आवश्यक आहे.
  • अर्जदाराने पॅनकार्डची छायांकित प्रत सोबत जोडणे आवश्यक आहे.
  • अर्जदाराने जिल्हा कार्यालय, ठाणे येथून संबंधित योजनेचा लाभ घेतला असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्जासोबत जोडण्यात आलेली सर्व छायांकित कागदपत्रे सक्षम अधिकाऱ्याने/स्वक्षांकित प्रमाणित केलेली असावीत.
  • दाखल केलेल्या अर्जाच्या अनुषंगाने अर्थसहाय्य मंजुर करणे अथवा नाकारण्याचा अंतिम अधिकार मा. आयुक्त यांना राहील. [Antarjatiya Vivah Yojana Maharashtra]

आंतरजातीय विवाह योजना महाराष्ट्र अंतर्गत आवश्यक कागदपत्रे

  • लाभार्थी विवाहित जोडप्याचा विवाह दाखला.
  • आधार कार्ड
  • वार्षिक उत्पन्नाचा दाखला
  • कोर्ट मॅरेज प्रमाणपत्र
  • मोबाईल क्रमांक
  • ईमेल
  • पासपोर्ट आकाराचे मुला / मुलीचे फोटो
  • लाभार्थी विवाहित जोडप्यांपैकी एक जण अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास वर्गातील असल्याचा दाखला.
  • दोन प्रतिष्ठित व्यक्तींचे शीफारस पत्र
  • लाभार्थी वधू-वराचा शाळा सोडल्याचा दाखला
  • लाभार्थी वधू-वराचे एकत्रित कलर फोटो
  • राष्ट्रीयकृत बँकेत बचत खाते असणे आवश्यक.
  • बँक खाते आधार कार्ड सोबत लिंक असणे आवश्यक
  • लाभार्थ्याकडे कोर्ट मॅरेज विवाह प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

आंतरजातीय विवाह योजना महाराष्ट्र अंतर्गत अर्ज रद्द होण्याची कारणे

  • अर्जात संपूर्ण माहिती न भरल्यास अर्ज रद्द केला जाईल.
  • अर्जात खोटी माहिती भरल्यास अर्ज रद्द करण्यात येईल.
  • विवाह आंतरजातीय नसल्यास अर्ज रद्द करण्यात येईल.
  • अर्जात बँक खाते चुकीचे भरल्यास लाभाची रक्कम जमा करण्यात येणार नाही.
  • अर्जात IFSC Code चुकीचा भरल्यास लाभाची रक्कम जमा करण्यात येणार नाही.
  • एकाच वेळी 2 अर्ज केल्यास अर्ज रद्द करण्यात येईल.
  • अर्जदाराने या आधी केंद्र व राज्य शासनाद्वारे सुरू एखाद्या आंतरजातीय विवाह योजनेचा लाभ प्राप्त केला असेल तर अशा परिस्थितीत सादर योजनेअंतर्गत अर्ज रद्द केला जाईल. [Antarjatiya Vivah Yojana Maharashtra]

आंतरजातीय विवाह योजना महाराष्ट्र अंतर्गत ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत

  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी जोडप्याला महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.
  • वेबसाईटच्या होम पेजवर गेल्यावर आंतरजातीय विवाह योजना दिसेल त्याला क्लिक करावे. क्लिक केल्यावर एक नवीन पेज ओपन होईल.
  • नवीन पेजवर एक रजिस्टेशन अर्ज असेल त्यामध्ये विचारलेली सर्व माहिती (मुलाचे संपूर्ण नाव, मुलीचे संपूर्ण नाव, जन्मतारीख, जात, लग्नाची तारीख, आधार क्रमांक इत्यादी) भरावी व योग्य ती कागदपत्रे PDF स्वरूपात अपलोड करावीत आणि अर्ज सबमिट करावा.
  • अशाप्रकारे तुमचे ऑनलाईन रजिस्ट्रेशन पूर्ण होईल. [Antarjatiya Vivah Yojana Maharashtra]
  • सरकार ने मुलींच्या उज्वल भविष्यासाठी सुरु केली आहे एक महत्वपूर्ण अशी योजना त्यासाठी वाचा सुकन्या समृद्धी योजना

आंतरजातीय विवाह योजना महाराष्ट्र अंतर्गत ऑफलाईन अर्ज करण्याची पद्धत

  • अर्जदाराला सर्वात प्रथम आपली नजीकच्या जिला कार्यालयात जायचे आहे.
  • जिला कार्यालयातून आंतरजातीय विवाह योजनेचा अर्ज घ्यायचा आहे किंवा आम्ही खाली दिलेल्या लिंक वरून अर्ज डाउनलोड करायचा आहे.
  • अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून सोबत आवश्यक ती कागदपत्रे जोडायची आहेत व भरलेला अर्ज जिला कार्यालयात जमा करायचा आहे.
  • अशा प्रकारे तुमची आंतरजातीय विवाह योजनेअंतर्गत ऑफलाईन अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल. [Antarjatiya Vivah Yojana Maharashtra]
महाराष्ट्र शासनाची अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
आंतरजातीय विवाह अनुदान महाराष्ट्र शासन PDFयेथे क्लिक करा
आंतरजातीय विवाह अनुदान अर्ज PDFयेथे क्लिक करा
संपर्क कार्यालयसंबंधित जिल्हा समाज कल्याण अधिकारी,
जिल्हा परिषद / मुंबई शहर व उपनगरासाठी
समाज कल्याण अधिकारी.
Telegram ChannelClick Here

सारांश

आम्ही आशा करतो कि तुम्हाला आंतरजातीय विवाह योजना महाराष्ट्र ची सर्व माहिती प्राप्त झाली आहे तरीदेखील आपले या योजनेसंबंधी काही प्रश्न असल्यास मला ई-मेल किंवा कंमेंट्स च्या माध्यमातून जरूर कळवा आम्ही तुमच्या प्रश्नांची लवकरात लवकर उत्तरे देण्याचा प्रयत्न करू आणि जर तुम्हाला या योजनेची माहिती उपयुक्त वाटली असेल तर तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा जेणेकरून तुमचे मित्र देखील या योजनेचा लाभ घेऊ शकतील. [Antarjatiya Vivah Yojana Maharashtra]