Gatai Stall Scheme राज्यातील गटई कामगारांना स्वतःचा व्यवसाय सुरु करण्यासाठी मोफत पत्र्याचे स्टॉल बांधून देण्याच्या उद्देशाने सुरु करण्यात आलेली अत्यंत महत्वाची अशी एक योजना आहे.
महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रातील अनुसूचित जातीतील चर्मकार समाजातील (चर्मकार, ढोर, होलार, मोची इत्यादी) व्यक्तींना त्यांचे जीवनमान उंचाविण्यासाठी समाजात त्यांना मनाचे स्थान निर्माण करून देण्याच्या उद्देशाने तसेच त्यांचा शैक्षणिक आर्थिक व सामाजिक विकास होण्यासाठी गटई स्टॉल योजनेची सुरुवात केली आहे.
महाराष्ट्र राज्यामध्ये चामड्याच्या वस्तु व पादत्राणे दुरुस्तीच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर अनुसूचित जाती प्रवर्गातील व्यक्ती कार्यरत असून त्यांची उपजिविका ही चामड्याच्या वस्तू व पादत्राणे दुरुस्तीच्या क्षेत्रावर अवलंबून आहे. अनुसूचित जाती प्रवर्गातील पादत्राणे दुरुस्ती करणारे व्यावसायिक हे रस्त्याच्या कडेला उन्हात बसून आपली सेवा जनतेला देत असतात. या व्यावसायिकांना ऊन, वारा व पाऊस यांपासून संरक्षण मिळावे व त्यांची आर्थिक उन्नती व्हावी यासाठी ग्रामपंचायत, नगरपालिका क्षेत्रात 100 टक्के सहायक अनुदानावर गटई कामगारांना गटई स्टॉल देण्याची योजना दिनांक 31/12/1197 च्या शासन निर्णयान्वये सुरु करण्यात आली असून दिनांक 14/03/2013 च्या शासन निर्णयानुसार गटई स्टॉल पुरवठ्याबाबतची कार्यवाही संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ मुंबई यांच्यामार्फत करण्यात येते.

वाचकांना विनंती
आम्ही गटई स्टॉल योजनेची संपूर्ण माहिती या लेखात दिली आहे त्यामुळे तुमची हा लेख शेवट पर्यंत वाचा व या योजनेचा लाभ मिळवा जर तुमच्या परिसरात असे कोणी गटई कामगार असतील जे गटई स्टॉल योजनेचा लाभ घेऊ इच्छित असतील तर त्यांना या योजनेची माहिती अवश्य द्या किंवा आमचे हे आर्टिकल त्यांना शेयर करा जेणेकरून ते या योजनेचा लाभ मिळवू शकतील.
योजनेचे नाव | गटई स्टॉल योजना |
विभाग | सामाजिक न्याय व विशेष सहाय्य्य विभाग |
योजनेची सुरुवात | 2013 |
राज्य | महाराष्ट्र राज्य |
कोणी सुरु केली | महाराष्ट्र सरकार |
लाभार्थी | महाराष्ट्र राज्यातील चर्मकार समाज |
लाभ | महाराष्ट्र शासनाकडून मोफत पत्र्याचे स्टॉल उपलब्ध करून दिले जातात |
उद्देश | चर्मकार बांधवांची आर्थिक उन्नती करणे |
अर्ज करण्याची पद्धत | ऑफलाईन |
Gatai Stall Scheme चा उद्देश
- चर्मकार उद्योग हा चर्मकार समाजाचा एक पारंपारिक उद्योग आहे त्यामुळे त्यांना त्यांचा चर्म उद्योग करण्यासाठी एखादे हक्काचे स्थान मिळावे या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने Gatai Kamgar Yojana ची सुरुवात केली आहे.
- आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि दारिद्र रेषेखालील अनुसूचित जाती चर्मकार समुदायांचे जीवन उंचावणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
- योजनेअंतर्गत राज्यातील चर्मकार बांधवांचे जीवनमान सुधारणे, चर्मकार बांधवांचा सामाजिक तसेच आर्थिक विकास करणे, तसेच त्यांना सशक्त व आत्मनिर्भर बनविणे.
- गटई कामगारांना पत्र्याचे स्टॉल बांधण्यासाठी आर्थिक समस्येचा सामना करावा लागू नये तसेच त्यांना कोणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता भासू नये तसेच कोणाकडून कर्ज घेण्याची गरज भासू नये या उद्देशाने Gatai Yojana ची सुरुवात करण्यात आली आहे.
- गटई कामगारांचे ऊन, वारा आणि पावसापासून संरक्षण करणे हा गटई कामगार योजनेचा मुख्य उद्देश्य आहे.
- गटई कामगारांचे भविष्य उज्वल बनविणे.

Gatai Stall Scheme ची वैशिष्ट्ये
- गटई स्टॉल योजना महाराष्ट्र शासनाच्या आयुक्त समाज कल्याण पुणे या महामंडळामार्फत संयुक्तपणे ही योजना राबविण्यात येते
- या योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया अत्यंत सोपी ठेवण्यात आलेली आहे त्यामुळे अर्जदाराला अर्ज करण्यासाठी कुठल्याही समस्यांचा सामना करावा लागणार नाही.
- या योजनेअंतर्गत लाभाची रक्कम लाभार्थ्यांच्या बँक खात्यात DBT च्या सहाय्याने जमा करण्यात येते.
शासनाच्या इतर योजना
- राज्य सरकार नागरिकांना देत आहे मोफत गॅस कनेक्शन व सोबत एक भरलेला सिलेंडर त्यासाठी वाचा प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना
- राज्य सरकार देत आहे आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील प्रत्येक मुलीला 98 हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य त्यासाठी वाचा लेक लाडकी योजना
- राज्य सरकार महिलांना देत आहे मोफत शिलाई मशीन त्यासाठी वाचा फ्री सिलाई मशीन योजना
- आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबांना सरकार देत आहे 4000/- रुपयांचे अर्थसहाय्य त्यासाठी वाचा खावटी अनुदान योजना
- आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना सरकार देत आहे 3 लाखाची प्रोत्साहन राशी त्यासाठी वाचा आंतरजातीय विवाह योजना
गटाई कामगार योजना चे लाभार्थी
- राज्यातील चर्मकार समाजातील गटई कामगार गटई स्टॉल योजनेचे लाभार्थी आहेत.
Gatai Yojna चा लाभ
- रस्त्याच्या कडेला काम करणाऱ्या गटई कारागिरांना 100 टक्के अनुदान तत्त्वावर पत्र्याचे स्टॉल पुरवले जातात व रोख 5,000/- रुपये अनुदान स्वरूपात देण्यात येते.
- योजनेच्या सहाय्याने चर्मकार बांधवाना त्यांच्या हक्काचे स्थान मिळण्यास मदत झाली आहे.
- चर्मकार बांधवांना गटई स्टॉल सोबत अधिकृत परवाना सुद्धा दिला जातो.
- या योजनेमुळे चर्मकार बांधवांचे उन, वारा व पावसापासून संरक्षण होते कारण स्टॉल त्यांना उन, वारा आणि पावसापासून आश्रय देतात.
- चर्मकार बांधव त्यांच्या हक्काच्या स्टॉलमध्ये बसुन स्वतःचा उद्योग करू शकतात.
- गटई स्टॉल योजनेअंतर्गत चर्मकार बांधवांचे जीवनमान सुधारेल.
- या योजनेअंतर्गत राज्यातील चर्मकार समाजाचा सामाजिक तसेच आर्थिक विकास होईल.
- गटई स्टॉल योजनेअंतर्गत चर्मकार समाज सशक्त व आत्मनिर्भर बनतील.
- चर्मकार बांधवांना स्टॉल बांधण्यासाठी कोणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता भासणार नाही तसेच कोणाकडून कर्ज घेण्याची आवश्यकता भासणार नाही.

Gatai Stall Scheme साठी आवश्यक पात्रता
- गटई स्टॉल योजनेसाठी फक्त चर्मकार समाजाचे बांधव पात्र असतील
गटई योजना च्या अटी
- अर्जदार हा अनुसूचित जातीतील चर्मकार समाजाचा असणे आवश्यक आहे.
- अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
- अर्जदाराने ज्या व्यवसायाची निवड केली असेल त्या व्यवसायाचे त्याला संपूर्ण ज्ञान व अनुभव असणे आवश्यक आहे.
- अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ग्रामीण भागासाठी 98 हजार रुपये व शहरी भागासाठी 1.20 लाख पर्यंत असणे आवश्यक आहे. राज्य शासन पुरस्कृत योजनांसाठी शहरी व ग्रामीण भागातील उत्पन्न मर्यादा 1 लाख रुपयांपर्यंत असणे आवश्यक आहे.
- या योजनांचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याकडे जातीचा दाखला असणे आवश्यक आहे व जातीचा दाखला तहसीलदार किंवा तत्सम सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेला असावा.
- या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याकडे उत्पन्नाचा दाखला असणे आवश्यक आहे व उत्पन्नाचा दाखला तहसीलदार किंवा तत्सम सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेला असावा.
- गटई स्टॉल योजनेअंतर्गत अर्जदारांना या महामंडळाकडून (आयुक्त समाज कल्याण पुणे) अथवा इतर कोणत्याही शासकीय उपक्रमांतर्गत आर्थिक लाभ घेतलेला नसावा. अर्जदाराने अर्जासोबत इतर कोणत्या शासकीय योजनेचा लाभ घेतलेला नाही असे घोषणा पत्र देणे आवश्यक आहे.
- अर्जदाराने स्टॉलची मागणी केलेली जागा ग्रामपंचायत, कंटेन्टमेंट बोर्ड किंवा महानगरपालिकेद्वारे भाड्याने/भाडेपट्टीवर / खरेदी केलेली / अधिकृत मोफत उपलब्ध करून देणे आवश्यक आहे किंवा अर्जदाराची स्वतःची मालमत्ता असणे आवश्यक आहे.
- अर्जदारास स्टॉल चे वाटप झाल्यानंतर त्या स्टॉलची देखभाल, दुरुस्ती इत्यादी बाबींची जबाबदारी लाभार्थ्यांची स्वतःची राहील.
- एका कुटुंबात फक्त एकच स्टॉल मंजूर केला जाईल.
- स्टॉल वाटपाबाबतचे पत्र लाभार्थ्याच्या छाया चित्रासह स्टॉलमध्ये दर्शनी भागावर लावणे बंधनकारक राहील.
- एखादा स्टॉलचे वाटप झाल्यानंतर सदर स्टॉल ची विक्री करता येणार नाही.
- सदर स्टॉल भाडेतत्त्वावर देता येणार नाही.
- लाभार्थ्यास स्टॉल हस्तांतरण करता येणार नाही.
- महामंडळाने वेळोवेळी घालून दिलेल्या अटी व शर्ती लाभार्थ्यांवर बंधनकारक राहतील.
Gatai Stall Scheme Age Kimit
- अर्जदाराचे वय 18 वर्षे ते 50 वर्षापर्यंत असावे.
शासनाच्या इतर योजना
- राज्य सरकार ग्रामीण भागातील कुटुंबांना देत आहे मोफत चूल त्यासाठी वाचा निर्धूर चुल वाटप योजना
- शौचालय बांधण्यासाठी सरकार देत आहे आर्थिक अनुदान त्यासाठी वाचा शौचालय अनुदान योजना
- चर्मकार बांधवांना सरकार देत आहे विविध प्रशिक्षण त्यासाठी वाचा चर्मकार समाज योजना
- स्वतःचा व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकार देत आहे बिनव्याजी कर्ज त्यासाठी वाचा अण्णासाहेब पाटील कर्ज योजना
- जेष्ठ नागरिकांना सरकार देत आहे दरमहिना 1500/- रुपयांचे अर्थसहाय्य त्यासाठी वाचा श्रावणबाळ अनुदान योजना
गटाई योजना अंतर्गत लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- राशन कार्ड
- रहिवाशी दाखला
- मोबाईल नंबर
- ई-मेल आयडी
- पासपोर्ट आकाराचे फोटो
- अर्जदाराचे जातीचे प्रमाणपत्र
- अर्जदाराचा उत्पन्नाचा दाखला.
- अर्जदार अपंग असल्यास अपंगाचे प्रमाणपत्र.
- बँक पासबुक झेरॉक्स
Gatai Stall Scheme अंतर्गत अर्ज करण्याची पद्धत
या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी अर्जदाराला आपल्या जवळच्या जिल्हा समाजकल्याण कार्यालयात जाऊन गटई स्टॉल योजनेचा अर्ज घ्यावा लागेल आणि अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून सोबत आवश्यक कागदपत्रे जोडून सदर अर्ज जमा करावा लागेल.
शासनाची अधिकृत वेबसाईट | Click Here |
गटई स्टॉल योजनेसाठी संपर्क कार्यालय | सहाय्यक आयुक्त जिल्हा समाजकल्याण विभाग |
Telegram Channel | Click Here |
सारांश
आशा करतो कि Gatai Stall Yojana अंतर्गत आपल्याला सर्व माहिती प्राप्त झाली आहे तरीदेखील आपले या योजनेसंबंधी काही प्रश्न असल्यास मला ई-मेल किंवा कंमेंट्स च्या माध्यमातून जरूर कळवा आम्ही तुमच्या प्रश्नांची लवकरात लवकर उत्तरे देण्याचा प्रयत्न करू आणि जर तुम्हाला या योजनेची माहिती उपयुक्त वाटली असेल तर तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा जेणेकरून तुमचे मित्र देखील या योजनेचा लाभ घेऊ शकतील.