Mahajyoti Free Tablet Yojana 2024 | नोंदणी सुरु

Mahajyoti Free Tablet Yojana: महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांना घरी बसून टॅबलेट च्या सहाय्याने त्यांचे शिक्षण ऑनलाईन पद्धतीने पूर्ण करता यावे या उद्देशाने सुरु करण्यात आलेली अत्यंत महत्वाची अशी एक योजना आहे.

महाराष्ट्र शासनाने महाज्योती (महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था) संस्थेसोबत मिळून इयत्ता 10वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना फ्री टॅबलेट देण्याची योजना सुरु केली आहे.
MH-CET / IEL / NEET या परीक्षांच्या 2023 पूर्व तयारीसाठी इमाव (OBC), वी.जा.भ.ज. (VJNT), वि.मा.प्र. (SBC) या प्रवर्गामधील नॉनक्रिमिलेअर उत्पन्न गटातील इच्छुक विद्यार्थ्यांकडून विहित नमुन्यातील अर्ज ऑनलाईन पद्धतीने मागविण्यात येत आहेत.

10वी पास झाल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांना इंजिनिअर, मेडिकलसाठी तयारी करायची असते परंतु आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे त्यांना महागडे कोचिंग क्लासेस लावणे शक्य नसते अशा विद्यार्थ्यांना महाज्योती संस्थेने ऑनलाईन कोचिंग प्रशिक्षण उपक्रम सुरु केला आहे.

या योजनेचा मुख्य उद्देश राज्यातील इयत्ता 10वी उत्तीर्ण होऊन इयत्ता 11वी मध्ये सायन्स विषयामध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन कोचिंग अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी मोफत टॅबलेट चे वितरण करणे आहे जेणेकरून विद्यार्थी टॅबलेटच्या सहाय्याने ऑनलाईन कोचिंग अभ्यासक्रम पूर्ण करू शकतील. [Mahajyoti Free Tablet Yojana]

जर तुम्हाला फ्री टॅबलेट योजनेचा लाभ घायचा असेल तर शासनाच्या अधिकृत वेबसाईट वर जाऊन ऑनलाईन अर्ज करावा लागेल अर्ज करायची सर्व पद्धत आम्ही खाली दिलेली आहे

वाचकांना विनंती

आम्ही महाज्योती फ्री टॅबलेट योजना महाराष्ट्र ची संपूर्ण माहिती या लेखात दिली आहे त्यामुळे तुमची हा लेख शेवट पर्यंत वाचा व या योजनेचा लाभ मिळवा जर तुमच्या परिसरात असे कोणी विद्यार्थी असतील जे महाज्योती फ्री टॅबलेट योजनेचा लाभ घेऊ इच्छित असतील तर त्यांना या योजनेची माहिती अवश्य द्या किंवा आमचे हे आर्टिकल त्यांना शेयर करा जेणेकरून ते या योजनेचा लाभ घेऊ शकतील.

योजनेचे नावमहाज्योती फ्री टॅबलेट योजना महाराष्ट्र
विभागशिक्षण विभाग
राज्यमहाराष्ट्र
योजना कोणी सुरु केलीमहाज्योती संस्था
उद्देशविद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहित करणे
लाभार्थीमहाराष्ट्र राज्यातील विद्यार्थी
लाभअभ्यासक्रमासाठी मोफत टॅबलेट वितरण
अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन

Table Of Content

Mahajyoti Free Tablet Yojana चा मुख्य उद्देश

  • महाराष्ट्र राज्यातील इयत्ता 10वी उत्तीर्ण विद्यार्थी ज्यांनी इयत्ता 11वी सायन्स मध्ये प्रवेश घेतला आहे त्यांना ऑनलाईन कोचिंग प्रशिक्षणासाठी मदत करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे जेणेकरून विद्यार्थी घरी बसून स्वतःचा अभ्यास पूर्ण करू शकतील.
  • राज्यातील विद्यार्थ्यांना सशक्त व आत्मनिर्भर बनविणे.
  • राज्यातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहित करणे.
  • राज्यातील विद्यार्थ्यांचे महाज्योती फ्री टॅबलेट योजनेच्या सहाय्याने जीवनमान सुधारणे.
  • विद्यार्थ्यांना डिजिटल युगासोबत जोडणे.
  • महाज्योती फ्री टॅबलेट योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य करणे.
  • राज्यात डिजिटली शिक्षणाला प्रोत्साहन देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश्य आहे.
  • विद्यार्थ्यांना घरी बसून त्यांचे शिक्षण पूर्ण करता यावे या उद्देशाने या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे. [Mahajyoti Free Tablet Yojana]
Mahajyoti Free Tablet Yojana

महाज्योती फ्री टॅबलेट योजना महाराष्ट्र ची वैशिष्ट्ये

  • या योजनेअंतर्गत इयत्ता 10वी पास झालेले विद्यार्थी ज्यांनी इयत्ता 11वी सायन्स ला प्रवेश घेतला आहे अशा विद्यार्थ्यांना मोफत टॅबलेट देण्यात येते आहेत तसेच ऑनलाईन अभ्यास करण्यासाठी दररोज 6 GB इंटरनेट सुविधा आणि उपयुक्त प्रशिक्षण पुस्तके देण्यात येत आहेत.
  • या योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या टॅबलेट साठी विद्यार्थ्यांकडून कुठल्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही.
  • या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मोफत टॅबलेट चा लाभ दिला जातो.
  • महाज्योति फ्री टॅबलेट योजनेची सुरुवात महाराष्ट्र शासनद्वारे करण्यात आली आहे.
  • राज्यातील विद्यार्थ्यांसाठी सुरु करण्यात आलेली महाज्योती फ्री टॅबलेट योजना एक अत्यंत महत्वाची आणि उपयुक्त अशी योजना आहे.
  • महाज्योती फ्री टॅबलेट योजनेअंतर्गत राज्यात 30 लाख विद्यार्थ्यांना मोफत टॅबलेट वाटप करण्याचा उद्देश्य निर्धारित करण्यात आलेला आहे.
  • महाज्योती फ्री टॅबलेट योजनेअंतर्गत राज्यातील विद्यार्थ्यांसोबत विद्यार्थिनींना देखील लाभ दिला जाणार आहे.
  • राज्यातील विद्यार्थ्याने शैक्षणिक भविष्य सुधारण्यासाठी महाज्योती फ्री टॅबलेट योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
  • या योजनेअंतर्गत मिळालेल्या टॅबलेट च्या सहाय्याने विद्यार्थ्यांना देशातील विविध घडामोडींची माहिती मिळेल व त्यांचा सर्वांगीण विकास होईल. [Mahajyoti Free Tablet Yojana]
  • राज्य सरकार देत आहे आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील प्रत्येक मुलीला 98 हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य त्यासाठी वाचा लेक लाडकी योजना

महाज्योती फ्री टॅबलेट योजना महाराष्ट्र चे लाभार्थी

  • महाराष्ट्र राज्यातील इयत्ता 10वी मध्ये उत्तीर्ण होऊन इयत्ता 11वी मध्ये सायन्स विषयामध्ये प्रवेश घेतलेले विद्यार्थी या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.

ममहाज्योती फ्री टॅबलेट योजना चा लाभ मिळवण्यासाठी आवश्यक गुण

इयत्ता 10वीशहरी भागातील विद्यार्थी70 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुणांनी
उत्तीर्ण झालेला असावा.
इयत्ता 10वीग्रामीण भागातील विद्यार्थी60 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुणांनी
उत्तीर्ण झालेला असावा.

महाज्योती फ्री टॅबलेट योजना महाराष्ट्र चे फायदे

  • या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणासाठी मोफत टॅबलेट मिळणार आहे.
  • या योजनेअंतर्गत विद्यार्थ्याला ऑनलाईन शिक्षणासाठी दररोज 6 GB इंटरनेट सेवा मोफत दिली जाणार आहे.
  • या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी उपयुक्त प्रशिक्षण पुस्तके दिली जाणार आहेत.
  • पात्र विद्यार्थ्यांना या योजनेअंतर्गत JEE, NEET आणि CET ऑनलाईन कोचिंग क्लासेस ची मोफत सुविधा दिली जाणार आहे.
  • या योजनेअंतर्गत मोफत टॅबलेट चा वापर करून विद्यार्थी ऑनलाईन पद्धतीने स्वतःचा अभ्यास पूर्ण करू शकतील.
  • टॅबलेट च्या साहाय्याने विद्यार्थी दुसऱ्या विद्यार्थ्यांसोबत तसेच आपल्या शिक्षकांसोबत अभ्यासासंबंधीच्या प्रश्नांची उत्तरे मिळवू शकतील.
  • या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या टॅबलेट च्या सहाय्याने विद्यार्थी विविध प्रकारचे ऑनलाईन शिक्षण व कोर्से पूर्ण करू शकतील.
  • महाज्योती फ्री टॅबलेट योजना राज्यातील विद्यार्थ्यांना डिजिटली दुनियेत एक पाऊल पुढे जाण्यासाठी उपयुक्त ठरेल.
  • या योजनेअंतर्गत राज्यातील विद्यार्थ्यांचे जीवनमान सुधारेल.
  • या योजनेअंतर्गत राज्यातील विद्यार्थी सशक्त व आत्मनिर्भर बनतील.
  • महाज्योती फ्री टॅबलेट च्या अंतर्गत मिळणाऱ्या टॅबलेटच्या सहाय्याने विद्यार्थी शिक्षणासाठी उपयुक्त पुस्तके डाउनलोड करून अभ्यास करू शकतील.
  • या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या टॅबलेटच्या सहाय्याने विद्यार्थी स्वतःची इतर कामे सुद्धा करू शकतील. [Mahajyoti Free Tablet Yojana]

महाज्योती फ्री टॅबलेट योजना महाराष्ट्र अंतर्गत आवश्यक पात्रता

  • अर्जदार विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवाशी असणे आवश्यक आहे.
  • अर्जदार विद्यार्थी इयत्ता 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

महाज्योती फ्री टॅबलेट योजना चे नियम

  • महाज्योती फ्री टॅबलेट योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांनाच देण्यात येईल.
  • महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील विद्यार्थ्यांना महाज्योती फ्री टॅबलेट योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
  • अर्जदार विद्यार्थ्यांने दहावी उत्तीर्ण होऊन अकरावी मध्ये सायन्स ला प्रवेश घेतलेला असावा.
  • शहरी भागातील विद्यार्थी इयत्ता 10वी मध्ये 70% किंवा त्यापेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण झालेला असावा.
  • ग्रामीण भागातील विद्यार्थी इयत्ता 10वी मध्ये 60% किंवा त्यापेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण झालेला असावा.
  • अर्जदार विद्यार्थ्यांने जर शासनाच्या इतर कोणत्या योजनेअंतर्गत टॅबलेट चा लाभ मिळवला असेल तर त्या विद्यार्थ्याला या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
  • अर्जदार विद्यार्थ्यांचे आई किंवा वडील सरकारी नोकरीत कार्यरत असतील तर अशा विद्यार्थाला या योजनेचा लाभ दिला जाणार नाही. [Mahajyoti Free Tablet Yojana]
  • सरकार ने मुलींच्या उज्वल भविष्यासाठी सुरु केली आहे एक महत्वपूर्ण अशी योजना त्यासाठी वाचा सुकन्या समृद्धी योजना

महाज्योती फ्री टॅबलेट योजना महाराष्ट्र चा लाभ घेण्यासाठी खालील प्रवर्गातील विद्यार्थी अर्ज करू शकतात.

  • OBC (इ मा व)
  • VJNT (वि जा भ ज)
  • SBC (वि मा प्र)

महाज्योती फ्री टॅबलेट योजना महाराष्ट्र अंतर्गत आवश्यक कागदपत्रे

  • विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असल्याचा पुरावा.
  • रेशन कार्ड
  • आधार कार्ड
  • घरपट्टी
  • विज बिल
  • दहावी उत्तीर्ण मार्कशीट (ग्रामीण भागात 60 टक्के / शहरी भागात 70 टक्के)
  • विद्यार्थ्यांचा शाळा सोडल्याचा दाखला.
  • विद्यार्थ्यांचे जात प्रमाणपत्र.
  • नॉन क्रीमीलेयर सर्टिफिकेट
  • विद्यार्थ्याने अकरावी मध्ये सायन्स मध्ये प्रवेश घेतलेल्याची पावती / पुरावा.
  • पासपोर्ट आकाराचे फोटो
  • ई-मेल
  • मोबाईल क्रमांक

महाज्योती फ्री टॅबलेट योजना महाराष्ट्र अंतर्गत अर्ज रद्द होण्याची कारणे

  • अर्जदार विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवाशी नसल्यास अर्ज रद्द केला जाईल.
  • अर्जदार विद्यार्थ्याने इयत्ता 10वी मध्ये 70 टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवले नसल्यास अर्ज रद्द केला जाईल.
  • अर्जदार विद्यार्थ्याने इयत्ता 11वी मध्ये सायन्स विषयामध्ये प्रवेश घेतला नसल्यास अर्ज रद्द केला जाईल.
  • अर्जदार विद्यार्थ्याने अर्जात खोटी माहिती भरल्यास अर्ज रद्द केला जाईल.
  • अर्जदार विद्यार्थ्याने केंद्र किंवा राज्य शासनाद्वारे सुरु एखाद्या योजनेअंतर्गत मोफत टॅबलेट चा लाभ मिळवला असल्यास अर्ज रद्द केला जाईल.
  • अर्जदाराने एकाच वेळी खूप वेळा अर्ज केल्यास बाकीचे अर्ज रद्द केले जातील.
  • शेवटच्या तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही व ते अर्ज रद्द केले जातील. [Mahajyoti Free Tablet Yojana]

महाज्योती फ्री टॅबलेट योजना महाराष्ट्र नोंदणी पद्धत

  • अर्जदाराला सर्वात प्रथम शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.
  • होम पेज वर गेल्यावर Upcoming Event खाली MH-CET /JEE / NEET नोंदणी खाली Read More बटण दिसेल त्याला क्लिक करावे लागेल.
Mahajyoti Free Tablet Yojana

  • आता तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन होईल त्यावर Click Here For Registration या Option वर क्लिक करावे लागेल.
Mahajyoti Free Tablet Yojana

  • आता तुमच्या समोर एक अर्ज उघडेल त्यामध्ये तुम्हाला विचारले सर्व माहिती भरावी लागेल म्हणजे सर्व पुरावे अपलोड करावे लागतील (उदाहरणार्थ Photo, Signature, Leaving Certificate, Cast Certificate, Bonafid Certificate)
Mahajyoti Free Tablet Yojana

  • सर्व माहिती भरून झाल्यावर Upload वर क्लिक करावे.
  • Upload Option वर क्लिक केल्यावर तुमच्यासमोर एक अर्ज उघडेल त्यामध्ये तुम्हाला विचारलेली सर्व माहिती भरायची आहे.
Mahajyoti Free Tablet Yojana
Mahajyoti Free Tablet Yojana
Mahajyoti Free Tablet Yojana
Mahajyoti Free Tablet Yojana

  • अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून झाल्यावर Submit बटनावर क्लिक करावे त्यानंतर थोड्या दिवसांनी महाज्योती संस्थेतर्फे अर्जदार विद्यार्थ्याला संपर्क करण्यात येईल. [Mahajyoti Free Tablet Yojana]
  • विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण पूर्ण करता यावे यासाठी सरकार देत आहे 10 लाखांचे कर्ज त्यासाठी वाचा शैक्षणिक कर्ज योजना
  • स्वतःचे घर बांधण्यासाठी राज्य सरकार देत आहे 2 लाखांचे आर्थिक सहाय्य त्यासाठी वाचा शबरी घरकुल योजना
Mahajyoti Free Tablet Uojana Registration Linkयेथे क्लिक करा
संपर्क क्रमांक7066888845
8956775376
8956775377
8956775378
8956775379
8956775380
पत्ताDr. Babasaheb Ambedkar Samajik Nyay Bhavan,
MA/15/1, S Ambazari Rd,
Vasant Nagar, Nagpur,
Maharashtra 440020
ई-मेल आयडीmahajyotingp[at]gmail[dot]com
mahajyotimpsc21[at]gmail[dot]com
mahajyotiupsc21[at]gmail[dot]com
mahajyotiskill[at]gmail[dot]com
mahajyotingp@gmail.com
Telegram Channelयेथे क्लिक करा

सारांश

आशा करतो कि महाज्योती फ्री टॅबलेट योजना महाराष्ट्र अंतर्गत आपल्याला सर्व माहिती प्राप्त झाली आहे तरीदेखील आपले योजनेसंबंधी काही प्रश्न असल्यास मला ई-मेल किंवा कंमेंट्स च्या माध्यमातून जरूर कळवा आम्ही तुमच्या प्रश्नांची लवकरात लवकर उत्तरे देण्याचा प्रयत्न करू आणि जर तुम्हाला या योजनेची माहिती उपयुक्त वाटली असेल तर तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा जेणेकरून तुमचे मित्र देखील या योजनेचा लाभ घेऊ शकतील.