Swayam Siddha Yojana

महाराष्ट्र शासन राज्यातील ग्रामीण भागातील गरीब महिलांना समृद्ध व आत्मसन्मानाचे  सुरक्षित जीवन जगता यावे तसेच महिलांचे अधिकार व हक्क, विविध विधी वित्तीय सेवा तसेच शाश्वत उपजीविकेच्या संधी प्राप्त होण्याच्या दृष्टीने पोषक वातावरणाची निर्मिती करण्यासाठी विविध सरकारी योजना राबवित असते त्या योजनांपैकीच एक योजना जिचे नाव वीरभद्रकाली ताराराणी स्वयंसिद्धा योजना आहे.

कोरोना विषामुमुळे  निर्माण झालेल्या जागतिक महामारीच्या काळात महाराष्ट्र राज्यात ग्रामीण भागात अनेक कुटुंबातील कर्त्या पुरुषाला स्वतःचे  प्राण गमवावे लागले त्यामुळे कुटुंबाच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला त्यामुळे राज्य शासनाने ग्रामीण भागात कोणाच्या काळात ज्या कुटुंबातील कर्ता पुरुष मृत्युमुखी पडला आहे अशा कुटुंबातील विधवा महिलांसाठी उत्पन्नाची साधने निर्माण व्हावीत व त्यांची उपजीविका सन्मानजनक व्हावी तसेच त्यांना रोजगार उपलब्ध व्हावा व तातडीने मदत व्हावी या गोष्टीचा विचार करून 2 नोव्हेंबर 2019 रोजी वीरभद्रकाली ताराराणी स्वयंसिद्धा योजना राबविण्याची घोषणा केली.

राज्यातील विधवा तसेच घटस्फोटित महिलांना त्यांची उपजीविका व्यवस्थित सुरू रहावी व त्यांना समाजात सन्मानपूर्वक जीवन जगता यावे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. [Swayam Siddha Yojana]

वाचकांना विनंती

आम्ही वीरभद्रकाली ताराराणी स्वयंसिद्धा योजना ची संपूर्ण माहिती या लेखात दिली आहे त्यामुळे तुम्ही हे आर्टिकल शेवट पर्यंत वाचा व या योजनेचा लाभ मिळवा जर तुमच्या परिसरात अशा कोणी महिला असतील ज्या या योजनेचा लाभ घेऊ इच्छित असतील तर त्यांना या योजनेची माहिती अवश्य द्या किंवा आमचे हे आर्टिकल त्यांना शेयर करा जेणेकरून ते या योजनेचा लाभ घेऊ शकतील.

योजनेचे नाव वीरभद्रकाली ताराराणी स्वयंसिद्धा योजना
योजनेची सुरवात 2 नोव्हेंबर 2021 
योजना सुरु केली केंद्र सरकार / राज्य शासन 
लाभार्थी विधवा व एकल महिला
अर्ज करण्याची पद्धतऑफलाईन

Swayam Siddha Scheme चे उद्दिष्ट

 • ज्या कुटुंबातील कर्त्या पुरुषाचा कोरोणामुळे मृत्यू झाला आहे त्या कुटुंबावर उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे त्यामुळे अशा कुटुंबांना सन्मानपूर्वक जीवन जगता यावे यासाठी त्या कुटुंबातील विधवा महिलांना उत्पन्नाची साधने निर्माण व्हावीत व त्यांच्याकडे रोजगाराच्या संधी निर्माण होऊन त्या माध्यमातून त्यांची उपजीविका व्यवस्थित सुरू रहावी हा उद्देश समोर ठेवून वीरभद्रकाली ताराराणी स्वयंसिद्धा ही योजना शासनाने सुरू केली.
 • विधवा महिलांचे जीवनमान सुधारावे.
 • राज्यातील विधवा महिलांना सशक्त व आत्मनिर्भर बनविणे.
 • विधवा महिलांचा सामाजिक तसेच आर्थिक विकास करणे.
 • विधवा महिलांना उपजीविकेसाठी पैशांसाठी कोणावर अवलंबून राहण्याची गरज भासू नये तसेच कोणाकडून पैसे कर्ज घेण्याची गरज भासू नये. [Swayam Siddha Yojana]
Swayam Siddha Yojana

Swayam Siddha Yojana ची वैशिष्ट्ये

 • Swayamsiddha Scheme महाराष्ट्र शासन आणि केंद्र सरकार यांच्या सहयोगाने सुरु करण्यात आलेली महिलांसाठी एक उपयुक्त अशी योजना आहे.
 • या योजनेअंतर्गत राज्यातील महिला आत्मनिर्भर बनतील.
 • या योजनेअंतर्ग लाभार्थी महिलांना विविध प्रकारे लाभ देण्यात येतात.
 • या योजनेअंतर्गत महिलांना आपल्या दैनंदिन गरजांसाठी कोणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता नाही.
 • योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया सोपी ठेवण्यात आलेली आहे.
 • Mahila Swayam Siddha Yojana अंतर्गत दिली जाणारी लाभाची राशी लाभार्थी महिलेच्या बँक खात्यात DBT च्या सहाय्याने जमा करण्यात येईल.
 • राज्य सरकार देत आहे आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील प्रत्येक मुलीला 98 हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य त्यासाठी वाचा लेक लाडकी योजना
 • आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबांना सरकार देत आहे 4000/- रुपयांचे अर्थसहाय्य त्यासाठी वाचा खावटी अनुदान योजना
 • आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना सरकार देत आहे 3 लाखाची प्रोत्साहन राशी त्यासाठी वाचा आंतरजातीय विवाह योजना

स्वयंसिद्धा योजना अंतर्गत लाभ मिळवण्यासाठी पात्र व्यक्ती

 • राज्यातील विधवा महिला स्वयंसिद्धा योजना चा लाभ मिळवण्यासाठी पात्र आहेत.

स्वयंसिद्धा योजना चे फायदे

 • ज्या महिलांचे पती कोरणामुळे मृत्यू पावले आहेत अशा विधवा महिलांना वीरभद्रकाली ताराराणी स्वयंसिद्धा योजनेअंतर्गत खालीलप्रमाणे मदत केली जाणार आहे
 • कोरोनामुळे घरातील कर्ता पुरुष मृत्युमुखी पडल्यामुळे विधवा झालेल्या महिलांसाठी आर्थिक समावेशन विषयक उपक्रम राबविण्यात येतील 
 • गावातील एकल/विधवा महिलांना स्वयंसहायता समूहामध्ये प्राधान्याने समावेश करण्यात येईल
 • विधवा/एकल महिलांना रिजर्व बँक ऑफ इंडिया यांच्या नियमावलीनुसार किमान पाच विधवा/ एकल महिला सदस्यांचा स्वतंत्र स्वयंसहाय्यता समूह विशेष स्वयं सहायता समूह स्थापन करून त्यांना महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे लाभ उपलब्ध करून देण्यात येतील.
 • या योजनेअंतर्गत महिला सदस्यांना फिरता निधी तसेच समुदाय गुंतवणूक निधी अदा करण्यात प्राधान्य दिले जाईल
 •  महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत स्वयंसहायता समूहातील सदस्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना विविध सामाजिक सुरक्षा योजनेत समाविष्ट करून घेण्यात येईल
 •  सामाजिक सुरक्षा योजनेमध्ये (PMJJBY, PMSBY, APY)एकल/विधवा महिलांना प्रथम प्राधान्याने समाविष्ट करण्यात येईल
 • एकल विधवा महिलांना PMJJBY व PMSBY योजनेचे रुपये 342/- निधी भरण्यासाठी आर्थिक अडचणी असल्यास स्वयंसहायता समूहातील उपलब्ध निधीतून सदर महिलांना 350/- रुपयांचे बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देण्यात येईल सामाजिक सुरक्षा योजनेचा लाभ घेतल्यानंतर दुर्दैवाने काही घटना घडल्यास जिल्हास्तरावरून सदर महिलांना लवकरात लवकर दाव्याची रक्कम देण्यात येईल.
 •  एकल विधवा महिलांना प्रथम प्राधान्य देऊन महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत विमा योजनेचा लाभ देण्यात येईल
 •  एकल विधवा महिला ज्या स्वयंसहाय्यता समूहामध्ये आहेत अशा समूहांना प्रथम प्राधान्य देऊन बँक पतपुरवठा उपलब्ध करून देण्यात येईल
 • कोरोनामुळे घरातील कर्ता पुरुष मृत्युमुखी पडल्यामुळे एकल/विधवा झालेल्या महिलांना त्यांचे आरोग्य शिक्षण अन्नसुरक्षा इत्यादी कारणासाठी जोखीम प्रवणता निधी प्राधान्याने वितरित करण्यात येईल. [Swayam Siddha Yojana]

दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना अंतर्गत एकल विधवा महिलांना प्रशिक्षण

 महाराष्ट्र राज्यातील कोरोनाणामुळे घरातील कर्त्या पुरुषाचे निधन झालेल्या कुटुंबातील 18 ते 45 वयोगटातील एकल विधवा महिलांना आणि त्या कुटुंबातील 18 ते 35 वयोगटातील युवक-युवती यांना दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजनेच्या अंतर्गत प्रथम प्राधान्य देऊन कौशल्य विषयक निवासी प्रशिक्षण देण्यात येईल

ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण योजना

 ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यात कोरोनामुळे ज्या घरातील कर्त्या पुरुषाचे निधन झालेले आहे अशा कुटुंबातील एकल/विधवा महिलांना तसेच त्या कुटुंबातील 18 ते 35 वयोगटातील युवक-युवतींना स्वयंरोजगार आधारित 10 ते 45 दिवसांचे कृषी विषयक प्रशिक्षण, प्रक्रिया उद्योग विषयी प्रशिक्षण, उत्पादन विषयक प्रशिक्षण व सामान्य उद्योजकता प्रशिक्षण अशा विविध व्यवसायांचे शेती व बिगर शेती व्यवसायाचे मोफत व निवासी प्रशिक्षण दिले जाईल प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर लाभार्थ्यांना उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी बँकेमार्फत कर्ज पुरवठा करण्यासाठी आर्थिक साहाय्य केले जाईल. [Swayam Siddha Yojana]

उन्नत योजना योजना

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायद्याअंतर्गत किमान 100 दिवस काम केलेल्या लाभार्थ्यांकरिता केंद्र शासनाने उन्नती योजना सुरु केली आहे या योजनेअंतर्गत सन 2018 ते 2019 या कालावधीत किमान 100 दिवस काम केलेल्या 18 ते 45 वयोगटातील लाभार्थ्यांना दीन दयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना (DDUGKY),ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था (RSETIS),कृषी विज्ञान केंद्राच्या(KVK), माध्यमातून कौशल्य विषयक प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येतील सदर योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना उपस्थिती भत्ता देखील देण्यात येईल.

महाराष्ट्र राज्यातील कोरोनामुळे घरातील कर्त्या पुरुषाचे निधन झालेले आहे अशा कुटुंबातील विधवा महिलांना या योजनेच्या माध्यमातून रोजगार व स्वयंरोजगार आधारित प्रशिक्षण देताना प्रथम प्राधान्य देण्यात येईल.

 • सरकार ने मुलींच्या उज्वल भविष्यासाठी सुरु केली आहे एक महत्वपूर्ण अशी योजना त्यासाठी वाचा सुकन्या समृद्धी योजना

अन्न प्रक्रिया उद्योगांमध्ये एकल विधवा महिलांना प्राधान्य

 महाराष्ट्र राज्यात कोरोनामुळे घरातील कर्त्या पुरुषाचे निधन झालेल्या कुटुंबातील एकल/विधवा महिलांना PMFME योजनेअंतर्गत अन्न प्रक्रिया उद्योगात छोटी उपकरणे व खेळते भांडवल याकरिता प्रति सदस्य रुपये 40000/- बीज भांडवल देण्यात येईल. [Swayam Siddha Yojana]

वीरभ्रदकाली ताराराणी स्वयंसिद्धा योजना अंतर्गत आवश्यक पात्रता

 • स्वयंसिद्धा योजना अंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्जदार महिला महाराष्ट्र राज्याची मूळ रहिवाशी असणे आवश्यक आहे.
 • महाराष्ट्र राज्यातील फक्त विधवा आणि एकल महिला या योजनेसाठी पात्र आहेत.

स्वयंसिद्धा योजना च्या अटी

 • स्वयंसिद्धा योजना चा लाभ केवळ महाराष्ट्र राज्यातील महिलांनाच दिला जाईल.
 • महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील महिलांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
 • अर्जदार महिला विधवा किंवा तिचा घटस्फोट झालेला असणे आवश्यक आहे.
 • अर्जदार महिलेकडे तिच्या पतीचा मृत्यूचा दाखला असणे गरजेचे आहे तसेच घटस्फोटित महिलेकडे न्यायालयीन आदेश असणे गरजेचे आहे.
 • अर्जदार महिलेचे वय 18 वर्ष ते 45 वर्ष दरम्यान असणे गरजेचे आहे.
 • 45 वर्षावरील महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. [Swayam Siddha Yojana]

Swayam Siddha Scheme अंतर्गत अर्ज रद्द होण्याची कारणे

 • अर्जदार महिला महाराष्ट्र राज्याची मूळ रहिवाशी नसल्यास अर्ज रद्द केला जाईल.
 • अर्जदार महिला विधवा किंवा घटस्फोटित नसल्यास अर्ज रद्द केला जाईल.
 • अर्जदार महिलेचे वय 45 वर्षापेक्षा जास्त असल्यास अर्ज रद्द केला जाईल.
 • अर्जात खोटी माहिती भरल्यास अर्ज रद्द केला जाईल.
 • महिलेकडे तिच्या पतीचा मृत्यू दाखला नसल्यास अर्ज रद्द केला जाईल.
 • अंतिम तारखेनंतर आलेले अर्ज रद्द केले जातील. [Swayam Siddha Yojana]

Swayamsiddha Scheme अंतर्गत अर्ज करण्याची पद्धत

वीरभ्रदकाली ताराराणी स्वयंसिद्धा योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराला सर्वात प्रथम आपल्या क्षेत्राच्या ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा व या योजनेचा अर्ज घ्यावा.
अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून सोबत योग्य कागदपत्रे जोडावीत व सादर अर्ज जमा करावा.
अशा प्रकारे तुमची या योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.

ग्रामीण क्षेत्र

जर अर्जदार ग्रामीण क्षेत्रात राहत असेल तर त्याला त्याच्या गावच्या ग्रामपंचायत कार्यालयात संपर्क करावा लागेल.

शहरी क्षेत्र

जर अर्जदार शहरी भागात राहत असेल तर त्याला त्याच्या क्षेत्राच्या महानगर पालिका कार्यालयात जाऊन महिला व बाल कल्याण विभागात जाऊन संपर्क करावा लागेल.

महाराष्ट्र शासनाची अधिकृत वेबसाईटClick Here
शासन निर्णयClick Here
Telegram GroupJoin
 • स्वतःचे घर बांधण्यासाठी सरकार देत आहे 2.5 लाखाचे आर्थिक अनुदान त्यासाठी वाचा रमाई घरकुल योजना

सारांश

मी आशा करतो कि आपल्याला Swayamsiddha Scheme ची सर्व माहिती प्राप्त झाली आहे तरीदेखील आपले योजनेसंबंधी काही प्रश्न असल्यास मला ई-मेल किंवा कंमेंट्स च्या माध्यमातून जरूर कळवा आम्ही तुमच्या प्रश्नांची लवकरात लवकर उत्तरे देण्याचा प्रयत्न करू आणि जर तुम्हाला या वीरभ्रदकाली ताराराणी स्वयंसिद्धा योजनेची माहिती उपयुक्त वाटली असेल तर तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा जेणेकरून तुमचे मित्र देखील या योजनेचा लाभ घेऊ शकतील. [Swayam Siddha Yojana]