Tractor Subsidy In Maharashtra 2024 | ट्रॅक्टर अनुदान योजना

राज्यातील बहुतांश शेतकरी हे दारिद्र्य रेषेखाली स्वतःचे जीवन जगत आहेत.ते शेतीसाठी पारंपरिक पद्धतीचा वापर करत असतात त्यामुळे पारंपरिक शेतीमध्ये त्यांना खूप सारे कष्ठ करावे लागतात.आर्थिक स्थिती कमजोर असल्या कारणामुळे ते आपल्या शेतात आधुनिक यंत्रांचा वापर करण्यास असमर्थ असतात या सर्व गोष्टींचा विचार करून महाराष्ट्र शासनाने ट्रॅक्टर अनुदान योजना सुरु करण्याचा एक महत्वपूर्ण निर्णय घेतला. या योजनेअंतर्गत महाराष्ट्र शासन आपल्या राज्यातील पात्र शेतकऱ्यांना ट्रॅक्टर तसेच शेती अवजारांच्या खरेदीसाठी अनुदान देते.

महाराष्ट्र सरकार कृषी यांत्रिकीकरणाला प्राधान्य देत आहे कृषी क्षेत्रात यांत्रिकीकरण वाढावे या उद्देशाने महाराष्ट्र राज्य शासनाकडून दरवर्षी MahaDBT Portal च्या माध्यमातून नवनवीन उपक्रम राबवले जातात त्यापैकी एक अत्यंत महत्त्वाची योजना जी शेतकऱ्यांच्या दृष्टीने फायद्याची आहे ती म्हणजे ट्रॅक्टर अनुदान योजना या योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासनाकडून कृषी अवजारांवर / यंत्रावर अनुदान उपलब्ध करून दिले जाते या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना खालील गोष्टींवर सरकारकडून अनुदान दिले जाते तसेच यासाठी शेतकऱ्यांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागतो.

योजनेचे नावTractor Subsidy Scheme
राज्यमहाराष्ट्र राज्य
विभागकृषी विभाग
लाभार्थीराज्यातील शेतकरी
लाभटॅक्टर खरेदीसाठी आर्थिक मदत
उद्देशशेतकऱ्यांना कृषी यांत्रिकी करणाचा लाभ पोहोचणे.
अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन/ऑफलाईन

ट्रॅक्टर अनुदान योजना उद्दिष्ट

  • शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी सरकार विविध प्रयत्न करत असते आणि त्यामुळे शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवित असते पुष्कळ शेतकरी असे आहेत जे अजून पारंपरिक पद्धतीने शेती करतात अशा पारंपरिक पद्धतीने करण्यात येणाऱ्या शेतीला पुष्कळ वेळ लागतो म्हणून राज्य शासनाने शेतकऱ्यांची शेती विषयक कामे आधुनिक पद्धतीने आणि अधिक सुखकर आणि सोयीची करण्यासाठी या योजनेची सुरुवात केली आहे.
  • ट्रॅक्टर अनुदान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना जमीन सुधारणा औजारे / यंत्र, पूर्वमशागत औजारे, आंतर मशागत यंत्र, पेरणी व लागवड यंत्रे, पीक संरक्षण यंत्र, काढणी व मळणी अवजारे इत्यादी शेतीची कामे जलद गतीने करून देणारी यंत्रे विकत घेण्यासाठी अनुदान देऊन अर्थसहाय्य करण्यात येते.
  • कमी जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना कृषी यांत्रिकी करणाचा लाभ पोहोचणे हे या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
  • शेतीची उत्पादकता आणि कार्यक्षमता वाढवणे.
  • शेती खर्च कमी करणे.
Tractor Subsidy Scheme

योजनेचे वैशिष्ट्य:

  • ट्रॅक्टर अनुदान योजना महाराष्ट्र राज्यातील शेकऱ्यांसाठी सुरु करण्यात आलेली एक महत्वाची अशी एक योजना आहे.
  • या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना शेती उपयुक्त अवजारे विकत घेण्यासाठी अनुदान उपलब्ध करून देण्यात येते.
  • या योजनेअंतर्गत अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन केली गेली आहे त्यामुळे अर्जदार शेतकरी घरी बसून आपल्या मोबाईलच्या सहाय्याने या योजनेअंतर्गत अर्ज करू शकतो त्यामुळे अर्जदार शेतकऱ्याला कुठल्याच सरकारी कार्यालयाच्या फेऱ्या मारण्याची आवश्यकता भासणार नाही त्यामुळे त्याचा वेळ आणि पैसे दोघांची बचत होईल.
  • या योजनेअंतर्गत लाभाची रक्कम लाभार्थी शेतकऱ्याच्या बँक खात्यात DBT च्या सहाय्याने जमा करण्यात येईल.

योजनेचे लाभार्थी:

  • महाराष्ट्र राज्यातील सर्व जाती धर्मातील शेतकरी ट्रॅक्टर अनुदान योजनेअंतर्गत अर्ज करू शकतात.

योजनेअंतर्गत दिले जाणारे आर्थिक अनुदान:

8 ते 20 HP क्षमतेच्या ट्रॅक्टरसाठी40% अनुदान किंवा 75,000 रुपये
20 ते 40 HP क्षमतेच्या ट्रॅक्टरसाठी1 लाख रुपये अनुदान
40 ते 70 HP क्षमतेच्या ट्रॅक्टरसाठी1 लाख 25 हजार रुपये अनुदान
अनुसूचित जाती, जमाती आणि लहान आणि
अल्पभूमीधारक शेतकऱ्यांसाठी
अतिरिक्त 10% अनुदान
महिला शेतकऱ्यांसाठीअतिरिक्त 5% अनुदान

महत्त्वाचे तारखा:

  • अर्ज स्वीकारण्याची सुरुवात: 1 जून 2024
  • अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख: 30 नोव्हेंबर 2024

योजनेचे फायदे:

  • गतिक्षमतेत वाढ:: शेतीची कामे कमी वेळात जलद गतीने लवकर होण्यासाठी मोठी मदत होईल.
  • अनुदान: राज्य शासनाकडून अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना 50 टक्के अनुदान दिले जाते.
  • राज्य शासनाकडून खुल्या प्रवर्गातील शेतकऱ्यांना 40 टक्के अनुदान दिले जाते.
  • या योजनेअंतर्गत शेतकरी स्वतःच्या आवडीचा ट्रॅक्टर खरेदी करू शकतो.
  • कमी व्याजदर: अनुदान योजनेमुळे शेतकऱ्याला बँकांकडून किंवा संस्थांकडून कमी व्याजदरात कर्जाची सुविधा देखील दिली जाते.
  • या योजनेअंतर्गत देशातील कोणताही नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकतो.
  • प्राथमिकता: महिला शेतकऱ्यांना या योजनेसाठी प्राथमिकता दिली जाते.
  • आर्थिक उत्पन्नात वाढ: शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढण्यास मदत होईल.
  • शासनाचा सहभाग: या योजनेअंतर्गत केंद्र आणि राज्य शासनाकडून शेतकऱ्यांना अनुदान दिले जाते.

राज्य शासनाच्या कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना खालील कृषी यंत्र / अवजारांच्या खरेदीसाठी लाभ घेता येईल.

  • ट्रॅक्टर
  • पॉवर टिलर
  • बैल चलित यंत्रे / अवजारे
  • फलोत्पादन यंत्र / अवजारे
  • स्वयंचलित यंत्र
  • काढणी यंत्र
  • काढणी पश्‍चात तंत्रज्ञान
  • मनुष्य चलित यंत्र / अवजारे
  • ट्रॅक्टरची अवजारे
  • प्रक्रिया संच
  • वैशिष्ट्यपूर्ण यंत्र अवजारे
  • ट्रॅक्टर / पॉवर टिलर चलित अवजारे

महाराष्ट्र शासनाचा कृषी यांत्रिकरण योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना जमीन मशागतीच्या यंत्र / अवजारांच्या खरेदीसाठी लाभ घेता येईल

  • पॉवर डटलर
  • क्विटर पॉवर डटलर चडलत
  • औजारे
  • 29 बीएचपी पेक्षा कमी नांगर
  • वखारमोल्ड
  • बोडडनांगर

जमीन सुधारणा पूर्वमशागत अवजारे:

  • तव्याचा नांगर
  • चीजल नांगर, वखर
  • पॉवर, वखर, बांड फॉमडर
  • क्रष्ट ब्रेकर, पोस्ट होल डगर लेव्हलर ब्लेड
  • कल्टिव्हेटर (भोगडा)
  • रोटोकल्टिव्हेटर
  • डवड स्लॅशर
  • रीजर, रोटो पडलर
  • केज व्हील
  • बटाटा प्लांटर पूर्वमशागत

आंतर मशागत यंत्र:

  • ग्रास डवड स्लॅशर
  • फरो ओपनर
  • पॉवर डवडर (2 बीएचपी पेक्षा कमी इडजन चडलत)

पेरणी व लाकडी यंत्रासाठी अर्थसहाय्य:

  • रेज्ड बेड प्लांटर
  • न्युमॅडटक प्लांटर
  • न्युमॅडटक व्हेडजटेबल, सीडर,रेज्ड बेड प्लांटर इनक्लाईन प्लेट व शेपर अटॅचमेंट
  • न्युमॅडटक व्हेडजटेबल ट्रान्सप्लांटर
  • पेरणी यंत्र / बियाणे खत पेरणी यंत्र (5 फण)
  • बीज प्रक्रिया डिम
  • ट्रिक्टर माउंटेड ऑपरेटेड स्प्रेअर (एअरकॅरअर / एअर अडसस्ट)

पीक संरक्षण अवजारांसाठी अनुदान:

  • ट्रिक्टर माउंटेड ऑपरेटेड स्प्रेअर (बूम टाईप)
  • ट्रिक्टर ऑपरेटेड इलेक्ट्रिस्टॅडटक स्प्रेअर
  • ट्रिक्टर ड्रिन ररपर

काढणी व मळणी अवजारे:

  • ररपर कम बाईडर
  • कांदा काढणी यंत्र
  • भुईमूग शेंगा तोडणी यंत्र
  • बटाटा काढणी यंत्र
  • भुईमूग काढणी यंत्र
  • मस्ट चांग यंत्र, प्लास्टिक मस्ट
  • स्टी ररपर
  • राईस स्टी ररपर
  • उस पाचट कुट्टी
  • कडबा कुट्टी
  • कोकोनट फ्रडां चॉपर
  • स्टबल शेव्हर
  • मोवर
  • मोवर श्रेडर
  • प्लायल हारव्हेस्टर
  • बहुपीक मळणी यंत्र
  • भात मळणी यंत्र
  • उफणणी पंखा
  • मका सोलणी यंत्र
  • मोल्ड बोडनांगर

योजनेअंतर्गत पात्रता:

  • अर्जदार व्यक्ती महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवाशी असणे आवश्यक आहे.

योजनेच्या अटी:

  • एका शेतकऱ्याला फक्त एकाच ट्रॅक्टर चा लाभ घेता येईल.
  • स्वतःच्या नावावर जमीन असणे आवश्यक आहे.
  • शेतकरी अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती वर्गामधील असणे आवश्यक त्यासाठी जातीचे प्रमाणपत्र आवश्यक
  • या योजनेचा फायदा केवळ एकच औजारासाठी देण्यात येईल म्हणजे राज्य शासनाद्वारे देण्यात येणारे अनुदान फक्त एकाच औजारासाठी देण्यात येईल उदाहरणार्थ ट्रॅक्टर अवजारे / यंत्र इत्यादी.
  • शेतकऱ्याचे स्वतःचे आधार कार्ड असणे आवश्यक
  • लाभार्थी कुटुंबामधील एखाद्या व्यक्तीकडे जर ट्रॅक्टर असेल तर ट्रॅक्टर चलित औजारासाठी लाभार्थी व्यक्ती पात्र मानण्यात येईल परंतु त्यासाठी ट्रॅक्टर असल्याचा पुरावा सोबत जोडणे आवश्यक असेल.
  • जर एखाद्या लाभार्थी व्यक्तीने औजारासाठी लाभ घेतला असेल  परंतु त्याच औजारासाठी किमान 10 वर्षे तरी अर्ज करता येणार नाही परंतु इतर औजारासाठी अर्ज करता येईल.
  • एखाद्या शेतकऱ्याने या आधी जर एखाद्या कृषी अनुदानाचा लाभ घेतला असल्यास त्याला ट्रॅक्टर योजनेचा लाभ घेता येणार नाही.
  • अर्जदाराचे वय 18 वर्ष पूर्ण असणे आवश्यक आहे.
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराकडे स्वतःच्या मालकीची शेतजमीन असणे आवश्यक आहे.

योजनेअंतर्गत आवश्यक कागदपत्रे:

  • ओळखीचा पुरावा: आधार कार्ड, पॅन कार्ड, पारपत्र, ड्राइविंग लायसेन्स
  • शेतीचा उतारा: 7/12 उतारा 8अ दाखला
  • जात प्रमाणपत्र: अर्जदार अनुसूचित जाती जमाती चा असल्यास जात प्रमाणपत्र (सक्षम अधिकाऱ्यांनी दिलेला)
  • उत्पन्नाचा दाखला.: अर्जदाराच्या कुटुंबाचा वार्षिक उत्पन्नाचा दाखला. (सक्षम अधिकारी किंवा तहसीलदार यांनी दिलेला)
  • स्वयंघोषणापत्र
  • बँक खाते: राष्ट्रीयकृत बँकेत बचत खाते असणे आवश्यक.
  • पूर्व संमती पत्र
  • पासपोर्ट आकाराचे फोटो
  • अवजाराचे कोटेशन: जो आवजार खरेदी करायचा आहे त्या अवजाराचे कोटेशन.
  • अवजार तपासणी अहवाल: केंद्र शासनाच्या मान्यताप्राप्त तपासणी संस्थेने दिलेला अवजार तपासणी अहवाल

योजनेअंतर्गत आवश्यक अर्ज रद्द होण्याची कारणे:

  • अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी नसल्यास अर्ज रद्द केला जाईल.
  • अर्जदार शेतकरी नसल्यास अर्ज रद्द केला जाईल.
  • अर्जदाराने केंद्र किंवा राज्य शासनाद्वारे सुरु एखाद्या योजनेअंतर्गत ट्रॅक्टर चा लाभ मिळवला असल्यास अर्ज रद्द केला जाईल.
  • अर्जदाराने अर्जात खोटी माहिती भरल्यास अर्ज रद्द केला जाईल.
  • अर्जदाराने एकाच वेळी अनेक वेळा अर्ज केला असल्यास बाकीचे अर्ज रद्द केले जातील.

योजनेअंतर्गत आवश्यक ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत:

पहिला टप्पा:

  • अर्जदाराला सर्वात प्रथम शासनाच्या अधिकृत वेबसाईट वर जावे लागेल.
  • होम पेज वर नवीन अर्ज नोंदणी (New Registration) वर क्लिक करावे लागेल.
Tractor Subsidy Scheme home page

  • आता तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल त्यात तुम्हाला विचारलेली संपूर्ण माहिती जसे कि तुमचे संपूर्ण नाव,मोबाईल क्रमांक, ईमेल, पासवर्ड, इत्यादी टाकून रजिस्टर या बटनावर क्लिक करावे.
Tractor Subsidy Scheme Registration

  • अशा प्रकारे तुमचे रेजिस्ट्रेशन पूर्ण होईल.

दुसरा टप्पा:

  • आता तुम्हाला लॉगिन वर क्लिक करून पासवर्ड टाकून लॉगिन करावे लागेल.
Tractor Subsidy Scheme Log In

  • Login झाल्यावर My Scheme वर क्लिक करून ट्रॅक्टर अनुदान योजना २०२२ – २०२३ या पर्यायावर क्लिक करून Apply बटन वर क्लिक करावे.
  • आता एक नवीन पेज उघडेल त्यात या योजनेचा अर्ज असेल त्या अर्जामध्ये तुम्हाला विचारले सर्व माहिती भरायची आहे आणि योग्य ती कागदपत्रे अपलोड करायची आहेत आणि Apply बटणावर क्लिक करायचे आहे.
  • अशाप्रकारे तुमची या योजनेअंतर्गत ऑनलाइन अर्जाची प्रक्रिया पूर्ण होईल.

योजनेअंतर्गत आवश्यक ऑफलाईन अर्ज करण्याची पद्धत:

  • अर्जदाराला सर्वात प्रथम आपल्या क्षेत्राच्या जिल्हा कार्यालय जावे लागेल.
  • जिल्हा कार्यालयात कृषी विभागात कृषी अधिकाऱ्यांकडून ट्रॅक्टर अनुदान योजनेचा अर्ज घ्यावा लागेल.
  • अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून योग्य ती कागदपत्रे जोड़ून सादर अर्ज अधिकाऱ्यांकडे जमा करावा लागेल.
  • अशा प्रकारे तुमची या योजनेअंतर्गत ऑफलाईन अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.
Telegram GroupJoin
शासनाची अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

महाराष्ट्र शासनाच्या इतर योजना

आंतरजातीय विवाह अनुदान महाराष्ट्र शासन PDF
ई पीक पाहणी
ई पीक पाहणी नोंदणी
महाज्योती फ्री टॅबलेट योजना
अहिल्यादेवी सिंचन विहीर योजना
दोन मुलींसाठी योजना
लहान मुलींसाठी योजना
रोजगार संगम योजना
बचत गटाचे फायदे
बचत गटाचे नियम
महिला बचत गट नावे
महिला बचत गट नोंदणी अर्ज
बचत गट ठराव नमुना PDF
पुरुष बचत गट नावे
शिवभोजन योजना
पिवळ्या रेशन कार्ड चे फायदे
ग्रामीण कुटीर उद्योग
चंदन कन्या योजना
शेतकरी योजना
बॅच बिल्ला काढण्याची पद्धत
जलयुक्त शिवार योजना
पारंपारिक वस्त्रोद्योग विणकरांना बक्षीस योजना
अण्णासाहेब पाटील कर्ज योजना
अण्णासाहेब पाटील महामंडळ कर्ज योजना कागदपत्रे
लेक लाडकी योजना
कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना
मिनी ट्रॅक्टर व त्यांची उपसाधने यांचा पुरवठा करणे ची योजना
राजे यशवंतराव होळकर महामेष योजना
विहीर अनुदान योजना
मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजना
महिला सन्मान योजना
महाराष्ट्र मुख्यमंत्री किसान योजना
निर्धूर चुल वाटप योजना
Baby Care Kit Yojana
महिला बचत गट समृद्धी कर्ज योजना
थेट कर्ज योजना
प्रधानमंत्री पीक विमा योजना
चर्मकार समाज योजना
गाय म्हैस शेळी मेंढी पालन अनुदान योजना
अटल बांबू समृद्धी योजना
महिला स्वयंसिद्धी व्याज परतावा योजना
मध केंद्र योजना
राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना
शौचालय अनुदान योजना
जिव्हाळा कर्ज योजना
डिजल पंप सब्सिडी योजना
मल्चिंग पेपर योजना
राष्ट्रीय वयोश्री योजना
खावटी अनुदान योजना
मुख्यमंत्री रोजगार निर्मिति योजना
शबरी घरकुल योजना
प्रधानमंत्री मुद्रा योजना
पंडित दिनदयाळ उपाध्याय स्वयंम योजना
वसंतराव नाईक कर्ज योजना
कृषी ड्रोन अनुदान योजना
बांधकाम कामगार योजना
संजय गांधी निराधार योजना
आचार्य बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजना
सायकल वाटप योजना
वीरभद्रकाली ताराराणी स्वयंसिद्धा योजना
प्रधानमंत्री स्वामित्व योजना
प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना
रुफटॉप सोलर योजना
श्रावणबाळ अनुदान योजना
सैनिक शाळेतील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता योजना 
गटई स्टॉल योजना
राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना
प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना
प्रधानमंत्री जीवन ज्योति बीमा योजना
गाय गोठा अनुदान योजना
डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना
शेळी मेंढी पालन योजना
ट्रॅक्टर अनुदान योजना
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना
सुकन्या समृद्धी योजना
प्रधानमंत्री मातृ वंदना योजना
किशोरी शक्ती योजना
माझी कन्या भाग्यश्री योजना
बाल संगोपन योजना
फ्री सिलाई मशीन योजना
पीएमसी महिला आणि बालकल्याण योजना
रमाई घरकुल योजना
महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजना
पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा
युवकांना विविध व्यावसायिक प्रशिक्षण योजना
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मोफत सायकल वाटप योजना
अपंग बस सवलत योजना
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना
आंतरजातीय विवाह योजना
मोटार वाहन चालक प्रशिक्षण योजना
कोरोना मृतांच्या नातेवाईकांना 50 हजारांची मदत
शैक्षणिक कर्ज योजना
आम आदमी विमा योजना
महाडीबीटी शिष्यवृत्ती
सावित्रीबाई फुले स्कॉलरशिप
पॅन कार्ड क्लब क्लेम करण्याची पद्धत
प्रधानमंत्री किसान हेल्पलाईन नंबर
पोस्ट ऑफिस ग्राम सुरक्षा योजना
दहीहंडी विमा योजना
शरद पवार इन्स्पायर फेलोशिप
विद्याधन स्कॉलरशिप
मेडले फार्मा शिष्यवृत्ती
इंडिया स्माइलिंग फाउंडेशनल शिष्यवृत्ती कार्यक्रम
मुख्यमंत्री अप्रेंटिसशिप योजना
एचडीएफसी लिमिटेड बढते कदम शिष्यवृत्ती
मर्क इंडिया चॅरिटेबल ट्रस्ट शिष्यवृत्ती कार्यक्रम

2 thoughts on “Tractor Subsidy In Maharashtra 2024 | ट्रॅक्टर अनुदान योजना”

  1. स्वराज कोड ट्रॅक्टर अंतर मशागत साठी आहे. या साठी यंत्र म्हणून अनूदास पात्र राहिल का ?

Comments are closed.

Join WhatsApp Group!