Rajarshi Shahu Maharaj Scholarship

राज्यातील गरीब कुटुंबातील अनुसूचित जाती वर्गातील विद्यार्थ्यांना पैशा अभावी स्वतःचे शिक्षण सोडावे लागते व ते स्वतःचे शिक्षण पूर्ण करण्यापासून वंचित राहतात व यामुळे त्यांचा सामाजिक विकास होत नाही त्यामुळे गरीब विद्यार्थ्यांच्या या सर्व समस्यांचा विचार करून महाराष्ट्र शासनाने राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना ची सुरुवात केली.

या योजनेअंतर्गत अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत केली जाते.

वाचकांना विनंती

आम्ही Rajashree Shahu Maharaj Scholarship ची संपूर्ण माहिती या लेखात दिली आहे त्यामुळे तुम्ही शेवट हे आर्टिकल शेवट पर्यंत वाचा व या योजनेचा लाभ मिळवा तसेच तुमच्या परिसरात जे विद्यार्थी असतील तर त्यांना या योजनेची माहिती अवश्य द्या किंवा आमचे हे आर्टिकल त्यांना शेयर करा जेणेकरून ते या योजनेचा लाभ घेऊ शकतील.

योजनेचे नाव राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना
विभागसामाजिक न्याय व विशेष सहाय्य्य विभाग
कोणी सुरु केली महाराष्ट्र शासन
योजनेची सुरुवात जुलै 2003
अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन

राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना चे उद्दिष्ट

  • राज्यातील गरीब अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य करून विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा सुधारावा व त्यांच्या गुणवत्तेत वाढ व्हावी तसेच त्यांना सर्वसाधारण विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक स्पर्धेमध्ये ते टिकून रहावेत यासाठी गुणवंत विद्यार्थ्यांना सक्षम करण्याचा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
  • विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी आर्थिक सहाय्य करणे.
  • विद्यार्थ्यांचा सामाजिक विकास करणे.
  • विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहित करणे.
  • विद्यार्थ्यांना शिक्षण पूर्ण करण्यासाठी कोणावर अवलंबून राहण्याची गरज भासू नये. [Rajarshi Shahu Maharaj Scholarship]
chhatrapati shahu maharaj scholarship

Rajarshi Shahu Maharaj Scholarship चे वैशिष्ट्य

  • या योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया ऑनलाईन ठेवण्यात आलेली आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना अर्ज करण्यासाठी कुठल्याच शासकीय कार्यालयाच्या फेऱ्या मारण्याची गरज भासणार नाही त्यामुळे त्यांचा वेळ आणि पैसे दोघांची बचत होईल.

shahu maharaj scholarship Yojana चे लाभार्थी

  • राज्यातील गरीब कुटुंबातील इयत्ता 11वी व इयत्ता 12वी मध्ये शिक्षण घेत असलेले विद्यार्थी.

राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेचा लाभ

  • राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्तीची योजनेअंतर्गत शालांत परीक्षेत 75 टक्के किंवा अधिक गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या आणि इयत्ता 11वी मध्ये प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जातीतील विध्यार्थ्यांसाठी दरमहा 300/- रुपये प्रमाणे 10 महिने शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येईल.
  • हि शिष्यवृत्ती भारत सरकारच्या शिष्यवृत्ती आणि Freeship व्यतिरिक्त दिली जाईल.
  • विद्यार्थ्यांचा सामाजिक तसेच आर्थिक विकास होईल.
  • विद्यार्थी स्वतःचे शिक्षण पूर्ण करू शकतील.
  • विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी पैशांसाठी कोणावर अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही तसेच पैशांअभावी स्वतःचे शिक्षण सोडावे लागणार नाही. [Rajarshi Shahu Maharaj Scholarship]
 इयत्ता  शिष्यवृत्ती दरकालावधी  एकूण
अ 11वी 300/- रुपये दरमहादहा महिने 3,000/- जुपये 
12वी 300/- रुपये दरमहादहा महिने 3,000/- जुपये 

महाराष्ट्र शासनाच्या विविध सरकारी योजनांसाठी येथे क्लिक करा

Chhatrapati Shahu Maharaj Shishyavrutti चे नियम व अटी

  • अर्जदार विद्यार्थी अनुसूचित जातीच्या वर्गातील असावा.
  • शिष्यवृत्तीसाठी उत्पन्नाची अट नाही.
  • विध्यार्थी इयत्ता 11वी किंवा 12वी पर्यंत शिकणारा असावा.
  • शालांत परीक्षेत 75 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळवून उत्तीर्ण झालेला व इयत्ता 11वी किंवा 12वी मध्ये शिकत असलेल्या अनुसूचित जाती वर्गातील विद्यार्थ्यांसाठीच हि योजना लागू आहे.
  • हि शिष्यवृत्ती योजना इयत्ता 11वी आणि 12वी मध्ये शिकणाऱ्या कनिष्ठ महाविद्यालय व महाविद्यालयीन अनुसूचित जातीच्या मुला / मुलींसाठी आहे.
  • विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा.
  • हि योजना भारत सरकार शिष्यवृत्ती व इतर गुणवत्ता शिष्यवृत्ती व्यतिरिक्त राहील.
  • हि शिष्यवृत्ती दरवर्षी शैक्षणिक वर्षाच्या काल मर्यादेपुरतीच म्हणजेच दहा महिन्यांसाठी मंजूर करण्यात येईल.
  • विदयार्थ्यांची 11वी 12वी मध्ये नियमित हजेरी असणे आवश्यक.

राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना अंतर्गत आवश्यक कागदपत्रे

  • विद्यार्थ्यांचे सक्षम अधिकाऱ्याने दिलेले जात प्रमाणपत्र
  • विद्यार्थ्यांची इयत्ता 10वी ची गुणपत्रिका
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • इयत्ता 11वी मध्ये प्रवेश घेतल्याची पावती

Rajarshi Shahu Maharaj Shishyavrutti अंतर्गत अर्ज करण्याची पद्धत

Step 1

  • सर्वात प्रथम शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर जावे.
  • सर्वात प्रथम तुम्हाला तुमची नवीन नोंदणी करावी लागेल त्यासाठी नवीन अर्जदार नोंदणीवर क्लिक करावे.
Rajarshi Shahu Maharaj Scholarship

आता तुम्हाला विचारलेली सर्व माहिती भरायची आहे

  • अर्जदाराचे नाव
  • अर्जदाराचे नाव
  • पासवर्ड
  • पुष्टी करा पासवर्ड
  • ईमेल आयडी
  • भ्रमणध्वनी क्रमांक
  • संपूर्ण माहिती भरून झाल्यावर Register बटनावर क्लिक करा.

लक्षात ठेवा

ई-मेल आयडी टाकल्यावर Get OTP For Email ID Verification आणि मोबाईल क्रमांक टाकल्यावर Get OTP For Mobile Number Verification बटनावर क्लिक करायचे त्यानंतर तुमच्या ई-मेल आणि मोबाईल नंबर वर एक OTP येईल तो टाकायचा आहे.

Rajarshi Shahu Maharaj Scholarship

Step 2

  • तुमची नोंदणी झाल्यावर तुम्हाला तुमचा UserName आणि Password आणि Captcha Code टाकून लॉगिन करायचे आहे.
  • लॉगिन झाल्यावर एक नवीन पेज उघडेल त्याच्या डाव्या बाजूला All Scheme दिसेल त्याच्यावर क्लिक करायचे आहे.
  • त्यानंतर Department मध्ये Social Justice and Special Assistance Department निवडायचे आहे.
  • आणि Scheme Name मध्ये Rajashri Chhatrapati Shahu Maharaj Merit Scholarship निवडायचे आहे.
  • त्यानंतर Search बटनावर क्लिक करून जो Search Result येईल त्यामधील Table Action मधील Apply वर क्लिक करावे.
  • आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यामंध्ये Profile Details मध्ये तुम्हाला विचारलेली सर्व माहिती भरायची आहे.
    Personal Details
    Address Details
    Caste Details
    Income Details
    Course Details

सर्व माहिती भरून झाल्यावर अर्ज Submit करायचा आहे.

Telegram GroupJoin
शासनाची अधिकृत वेबसाईट

महाराष्ट्र शासनाच्या विविध सरकारी योजनांसाठी येथे क्लिक करा

सारांश

आशा करतो कि राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजने अंतर्गत आपल्याला सर्व माहिती प्राप्त झाली आहे तरीदेखील आपले राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना संबंधी काही प्रश्न असल्यास मला ई-मेल किंवा कंमेंट्स च्या माध्यमातून जरूर कळवा आम्ही तुमच्या प्रश्नांची लवकरात लवकर उत्तरे देण्याचा प्रयत्न करू आणि जर तुम्हाला या योजनेची माहिती उपयुक्त वाटली असेल तर तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा जेणेकरून तुमचे मित्र देखील या योजनेचा लाभ घेऊ शकतील. [Rajarshi Shahu Maharaj Scholarship]