विहीर नोंदणी अर्ज

राज्यातील बहुतांश शेतकरी पैशाच्या अभावी शेतात विहीर खणण्यासाठी असमर्थ असतात त्यामुळे पंचायत समिती विहीर योजना अंतर्गत राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब नागरिकांना तसेच शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात विहीर खोदण्यासाठी शासनाकडून 4 लाखाचे अनुदान देण्यात येते. जेणेकरून शेतकऱ्यांना पिण्यासाठी तसेच शेती पीक सिंचनासाठी पाणी उपलब्ध होईल.
या योजनेला मागेल त्याला विहीर योजना महाराष्ट्र तसेच पंचायत समिती विहीर योजना 2024 या नावाने देखील ओळखण्यात येते.

राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांना त्यांच्या शेती पिकासाठी पाणी उपलब्ध होत नाही त्यामुळे ते शेती क्षेत्राकडे पाठ फिरवताना दिसत आहॆ. शेती पिकासाठी विहिरींमधून पाण्याची उपलब्धता केली जाऊ शकते परंतु आर्थिक स्थिती कमजोर असल्याकारणामुळे शेतकरी शेतात विहीर खोदण्यासाठी असमर्थ असतात त्यामुळे राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब शेतकऱ्यांच्या या सर्व समस्यांचा विचार करून राज्य शासनाने राज्यात विहीर अनुदान योजना सुरु करण्याचा एक महत्वपूर्ण निर्णय हाती घेतला.

मागील काही काळापासून महाराष्ट्र राज्याने मनरेगाच्या योग्य नियोजनातून प्रत्येक कुटुंब लखपती करण्याचा निर्धार केला आहे. भूजलाच्या सर्वेक्षणाप्रमाणे राज्यात अजून 3,87,500 विहीरी खोदणे शक्य आहे. मनरेगाअंतर्गत या विहिरी लवकरात लवकर खोदल्या गेल्यास आणि त्याच्यातून उपलब्ध पाण्याचा किफायतशीर वापर (ठिबक / तुषार लावून) केला गेल्यास मोठ्या संख्येने कुटुंबे लखपती होतील व पर्यायाने महाराष्ट्र राज्य दारिद्रय कमी करण्याबाबतीत केरळच्या बरोबरीकडे वाटचाल करेल अशी आशा आहे त्यासाठी राज्य शासनाने मागेल त्याला विहीर योजना 2024 सुरु करण्याचा विचार केला आहे.

योजनेचे नावनवीन विहीर अनुदान योजना महाराष्ट्र
लाभ4 लाख रुपये
उद्देश्यशेतकऱ्याचा आर्थिक विकास करणे
लाभार्थीराज्यातील शेतकरी
अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन/ऑफलाईन

पंचायत समिती विहीर योजना चे उद्दिष्ट

  • राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात पाण्याची उपलब्धता व्हावी या उद्देशाने मागासवर्गीय विहीर योजना ची सुरुवात करण्यात आली आहॆ.
  • राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबाचा सामाजिक तसेच आर्थिक विकास करणे.
  • शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारणे.
  • शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देणे.
  • राज्यातील शेतकऱ्यांचे दारिद्र्य संपविणे.
  • राज्यातील शेतकऱ्यांना विहीर खोदण्यासाठी अनुदान उपलब्ध करून त्यांना सशक्त व आत्मनिर्भर बनविणे.
  • राज्यातील शेतकऱ्यांना या योजनेच्या सहाय्याने विहीर खोदण्यासाठी अनुदान उपलब्ध करून देऊन त्यांना शेती करण्यासाठी प्रोत्साहित करणे तसेच राज्यातील इतर नागरिकांना शेती क्षेत्राकडे आकर्षित करणे.
  • शेतकऱ्यांना शेती सिंचनासाठी पाण्याचा स्रोत उपलब्ध करून देणे.
  • शेतकऱ्याचे भविष्य उज्वल बनविणे.
  • राज्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांसाठी पाण्याची चिंता करण्याची आवश्यकता भासू नये तसेच पाण्याच्या चिंतेपासून मुक्तता करणे.
  • आर्थिक दृष्ट्या गरीब शेतकयांना शेतात विहीर खोदण्यासाठी पैशांसाठी कोणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता भासू नये तसेच कोणाकडून व्याजाने कर्ज घेण्याची आवश्यकता भासू नये.
Vihir Yojana Maharashtra

Vihir Yojana Maharashtra चे वैशिष्ट्य

  • महाराष्ट्र शासनाच्या पंचायत समिती कृषी विभाग योजना 2024 अंतर्गत मागेल त्याला विहीर अनुदान योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
  • राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्याच्या उद्देशाने तसेच त्यांचा सामाजिक व आर्थिक विकास व्हावा तसेच त्यांना सशक्त व आत्मनिर्भर बनविण्याच्या उद्देशाने सुरु करण्यात आलेली हि एक महत्वाची अशी एक योजना आहे.
  • राज्यातील शेतकऱ्यांना शेती क्षेत्रासाठी प्रोत्साहित करण्यासाठी तसेच राज्यातील नागरिकांना शेती क्षेत्राकडे आकर्षित करण्यासाठी एक महत्वाचे असे पाऊल मानले जाते आहे.
  • विहीर अनुदान योजनेला मागेल त्याला विहीर अनुदान योजना या नावाने देखील ओळखण्यात येते आहे.
  • या योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया सोपी ठेवण्यात आली आहे जेणेकरून राज्यातील शेतकऱ्यांना अर्ज करताना कुठल्याच समस्येचा सामना करण्याची आवश्यकता भासणार नाही.
  • या योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया ऑनलाईन केली गेली आहे जेणेकरून अर्जदार घरी बसून आपल्या मोबाईल च्या सहाय्याने अर्ज करू शकेल व त्याला कुठल्याच सरकारी कार्यालयाच्या फेऱ्या मारण्याची आवश्यकता भासणार नाही जेणेकरून त्याचा वेळ आणि पैसे दोघांची बचत होईल.
  • सिंचन विहीर योजना अंतर्गत राज्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना लाभ घेता यावा याकरिता महाराष्ट्र शासनाने गावात मंजूर करण्यात येणाऱ्या विहिरींची संख्यांची अट ही रद्द केलेली असून आता जास्तीत जास्त लोकांना लाभ मिळवता येणार आहे
  • राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्याच्या उद्देशाने तसेच त्यांना आर्थिक पाठबळ देण्याच्या उद्देशाने सुरु करण्यात आलेली महत्वाची अशी एक योजना आहे.
  • या योजनेअंतर्गत मिळणारी आर्थिक सहाय्याची राशी लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल त्यामुळे योजनेत घोटाळा होण्याची शक्यता नसेल.
  • या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व जाती धर्माच्या शेतकऱ्यांना समाविष्ट करण्यात आले आहे.

Vihir Anudan Yojana Maharashtra चे लाभार्थी

  • राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब शेतकरी जे स्वतःच्या शेतात विहीर खोदण्यासाठी असमर्थ आहेत असे शेतकरी योजनेचे लाभार्थी आहेत.
  • अनुसूचित जाती प्रवर्गातील व्यक्ती
  • अनुसूचित जमाती प्रवर्गातील व्यक्ती
  • भटक्या व विमुक्त जाती प्रवर्गातील व्यक्ती
  • इतर मागासवर्गीय प्रवर्गातील व्यक्ती
  • इतर मागास वर्गातील शेतकरी
  • महिला कर्ता असलेल्या कुटुंबातील महिला
  • इंदिरा आवास योजनेचे लाभार्थी
  • जॉब कार्ड धारक व्यक्ती
  • जमिनी सुधारक सुधारण्याचे लाभार्थी
  • नीरधीसूचित जमाती
  • दारिद्र्यरेषेखाली लाभार्थी
  • अनुसूचित जमाती व अन्य परंपरागत वननिवासी वन हक्क मान्य करणे अधिनियम 2006 खालील लाभार्थी.
  • सीमांत शेतकरी म्हणजेच ज्यांच्याकडे अडीच एकर पर्यंत जमीन आहे असे शेतकरी.
  • अल्पभूधारक शेतकरी ज्यांच्याकडे पाच एकर पर्यंत जमीन आहे असे शेतकरी.
  • शारीरिक दृष्ट्या विकलांग व्यक्ती कर्ता असलेली कुटुंबे.

Magel Tyala Vihir Yojana अंतर्गत शेतकऱ्यांना होणारा फायदा

  • मागेल त्याला विहीर योजना अंतर्गत राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात विहीर बांधण्यासाठी 4 लाख रुपये अनुदान देण्यात येते.
  • राज्यातील शेतकऱ्यांचा सामाजिक तसेच आर्थिक विकास होईल.
  • राज्यातील शेतकरी विहीर खोदण्यासाठी सशक्त व आत्मनिर्भर बनतील.
  • राज्यातील शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारेल.
  • शेतकऱ्यांना शेती सिंचनासाठी पाण्याचा स्रोत मिळेल त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यास मदत होईल.
  • या योजनेच्या सहाय्याने शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ मिळेल.
  • राज्यातील शेतकरी स्वावलंबी बनतील व स्वतःच्या पायावर उभे राहतील.
  • राज्यातील शेतकरी शेती व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहित होतील तसेच इतर नागरिक शेती व्यवसाय करण्यासाठी आकर्षित होतील.
  • शेतकऱ्यांना राज्य शासनाकडून 4 लाखांचे अनुदान उपलब्ध करून दिले जाईल त्यामुळे शेतकयांना विहीर खोदण्यासाठी पैशांसाठी कोणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता भासणार नाही तसेच कोणाकडून जास्त व्याज दराने पैसे उधार घेण्याची आवश्यकता भासणार नाही.
  • शेतकऱ्यांचे भविष्य उज्वल बनेल तसेच त्यांना आर्थिक पाठबळ मिळेल.

नवीन विहीर अनुदान योजना महाराष्ट्र अंतर्गत दिले जाणारे अनुदान

  • लाभार्थी शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात विहीर खोदण्यासाठी 4 लाख रुपयांचे असून देण्यात येते.

मागेल त्याला विहीर योजना अंतर्गत लाभार्थी निवड प्रक्रिया

  • योजनेअंतर्गत लाभार्थी निवड प्रक्रिया हि ग्रामसेवक यांच्या मार्फत करण्यात येईल.
  • ग्रामसभा / ग्रामपंचायतीच्या मान्यतेनंतर एका महिन्याच्या आत प्रशासकीय मान्यता देण्याची जबाबदारी गट विकास अधिकारी यांची राहील. प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर 15 दिवसाच्या आत तांत्रिक मान्यता देण्याची जबाबदारी तांत्रिक सहाय्यकाची राहील.

Vihir Yojana Maharashtra अंतर्गत विहिर कोठे खोदावी याबाबत विहीर खोदणे नियम

  • दोन नाल्यांच्या मधिल क्षेत्रात व नाल्यांचे संगमाजवळ जेथे मातीचा किमान 30 से.मी. चा थर व किमान 5 मीटर खोलीपर्यंत मऊ (झिजलेला खडक) आढळतो तेथे.
  • नदी व नाल्या जवळील उथळ गाळाच्या प्रदेशात.
  • जमिनीच्या सखल भागात जेथे किमान 30 से. मी. पर्यंत मातीचा थर व किमान 5 मीटर खोली पर्यंत मुरुम (झिजलेला खडक) आढळतो.
  • नाल्याच्या तिरावर जेथे उंचवटा आहे तेथे, परंतु सदर उंचावर चोपण किंवा चिकण माती नसावी.
  • घनदाट व गर्द पानांच्या झाडांच्या प्रदेशात .
  • नदी व नाल्याचे जुने प्रवाह पात्र जेथे आता नदी पात्र नसतांना देखील वाळु, रेती व गारगोट्या थर दिसून येते.
  • नदीचे/ नाल्याचे गोलाकार वळणाच्या आतील भूभाग.
  • अचानक दमट वाटणाऱ्या अथवा असणाऱ्या जागेत.

पंचायत समिती विहीर योजना अंतर्गत विहिर कोठे खोदु नये याबाबत माहिती

  • भूपृष्ठावर कडक खडक दिसणाऱ्या जागेत.
  • डोंगराचा कडा व आसपासचे 150 मीटरचे अंतरात.
  • मातीचा थर 30 से.मी. पेक्षा कमी असणाऱ्या भूभागात.
  • मुरमाची (झिजलेला खडक) खोली 5 मीटर पेक्षा कमी असणाऱ्या भूभागात.
  • (मुरुमाची खोली सर्वसाधारणपणे अस्तित्वात असलेल्या जवळपासच्या विहिरीत डोकावले असता समजते. आसपास विहीर नसल्यास जवळच्या नदी / नाल्याच्या काठावरुन मुरुमाची खोलीचा अंदाज मिळू शकतो.)
  • विहीर खोदतांना खाली काळा खडक / पाषाण लागल्यास मशीन वापरुन पुढील खोदकाम करता येते. मात्र त्याने खर्च वाढतो. म्हणून पुढील खोदकाम न करता त्या विहिरीचे खोदकाम तेथेच बंद करुन पंचनामा करुन पुर्णत्वाचे दाखले द्यावे. तसेच, १४ (क) मध्ये नमूद केल्याप्रमाणे अंदाजपत्रकात मंजूर केलेल्या खोली इतके काम करुनही एखाद्या विहिरीस पाणी लागले नसल्यास तसे नमूद करुन विहिर निष्फळ ठरविण्यात यावी. अशा दोन्ही प्रकारे अपयशी झालेल्या विहिरीत पावसाचे पुरेसे पाणी यावे या करिता, शेतात चर खोदकाम व फार्म बंडिंग करून पाण्याचा निचरा विहीरी समोरच्या Recharge Pit मध्ये सोडावा. अशाने संपूर्ण पावसाळ्यात एकदा जरी चांगला पाऊस पडला तरी ती विहीर भरून जाईल. तसेच, गरज असल्यास विहिरीच्या खालच्या बाजूला भूमिगत बंधारा बांध जेणेकरुन या विहरीत साचलेले पावसाचे पाणी 3-4 महिने टिकून राहील. त्याचा उपसा करुन संबंधित शेतकऱ्याने संरक्षित सिंचन करावे व आपल्या पिकाची उत्पादकता वाढवून आपले उत्पन्न वाढवावे.

पंचायत समिती विहीर योजना अंतर्गत आवश्यक पात्रता

  • अर्जदार व्यक्ती हि शेतकरी असणे आवश्यक आहॆ तसेच त्याच्याजवळ शेती योग्य जमीन असणे आवश्यक आहॆ.

मागासवर्गीय विहीर योजना चे नियम

  • फक्त महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांनाच विहिरीसाठी अनुदान योजनेचा लाभ दिला जाईल.
  • राज्याच्या बाहेरील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
  • अर्जदार शेतकऱ्याकडे शेती योग्य भूमी असणे गरजेचे आहे.
  • शेतात विहीर असता कामा नये.
  • अर्जदार व्यक्ती हा शेतकरी असणे आवश्यक आहे.
  • अर्जदार शेतकरी आर्थिक दृष्ट्या गरीब असणे आवश्यक आहे.
  • अर्जदार व्यक्तीचे स्वतःचे बँक खाते असणे आवश्यक आहे व बँक खाते आधार कार्ड सोबत लिंक असणे आवश्यक आहे.
  • अर्जदाराने यापूर्वी  विहीर, शेततळे, सामुदायिक शेततळे अथवा भात खाचरासोबत तयार होणारी बोडी या घटकांचा शासकीय योजनांमधून लाभ घेतलेला नसावा.
  • लाभधारकाकडे किमान 0.40 हेक्टर क्षेत्र सलग असावे.
  • लाभार्थी शेतक-याची जमीन विहीरीसाठी तांत्रिकदृष्ट्या पात्र असणे आवश्यक राहील. (यासंदर्भात शाखा अभियंता / उप अभियंता यांनी भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेचे अधिकारी / कर्मचारी यांच्यासोबत जागेची पाहणी करून त्यांचा अहवाल घेण्यात येईल)
  • शेतात ज्या ठिकाणी विहीर खोदकाम करायचे आहे त्या ठिकाणपासून 500 मीटर पर्यंत विहीर नसावी.
  • दोन विहिरीमधील किमान 150 मीटर अंतराची अट ही रन ऑफ झोन तसेच अनुसूचित जाती व जमाती व दारिद्र रेषेखालील कुटुंब याकरिता लागू करण्यात येणार नाही.
  • अर्जदार व्यक्तीच्या 7/12 वर विहीर नोंदणी नसवी.
  • लाभार्थीकडे ऑनलाईन एकूण जमिनीचा दाखला असावा.
  • लाभार्थी एकापेक्षा जास्त असेल तर अशावेळी संयुक्तपणे ते विहीर अनुदान योजनेचा लाभ घेवू शकतात मात्र त्यासाठी एकूण सलग जमिनीचे क्षेत्र 0.40 पेक्षा जास्त असणे गरजेचे आहे.
  • या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी अर्जदार व्यक्तीकडे जॉब कार्ड असणे आवश्यक आहे.
  • जर अर्जदार व्यक्तीच्या जमिनीचे सह हिस्सेदार असतील तर अशा परिस्थितीत अर्जदाराला अर्जासोबत त्या हिस्सेदारांचे ना हरकत प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.

विहीर खोदणे खर्च

  • शेतात विहीर खोदण्यासाठी अंदाजे 4 लाखांपर्यंत खर्च लागण्याची शक्यता असते त्यामुळे विहीर अनुदान योजनेअंतर्गत विहीर खोदण्यासाठी शेतकऱ्यांना राज्य शासनाकडून 4 लाखांचे आर्थिक सहाय्य दिले जाते.

मागेल त्याला विहीर योजना साठी आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • रेशन कार्ड
  • रहिवाशी दाखला
  • मोबाईल नंबर
  • ई-मेल आयडी
  • रोजगार हमी योजनेची जॉब कार्ड
  • उत्पन्नाचा दाखला
  • बँक खात्याचा तपशील
  • जमिनीचे कागदपत्रे 7/12 व 8अ
  • पासपोर्ट आकाराचे फोटो
  • सामुदायिक विहीर असल्यास सर्व लाभार्थी मिळून 0.40 हेक्टर पेक्षा अधिक सलग जमिन असल्याचा पंचनामा
  • सामुदायिक विहीर असल्यास समोपचाराने पाणी वापराबाबत सर्व लाभार्थ्यांमध्ये करारपत्र

नवीन विहीर अनुदान योजना 2024 अंतर्गत अर्ज करण्याची पद्धत

  • अर्जदार शेतकऱ्याला सर्वात प्रथम आपल्या क्षेत्रातील ग्राम पंचायत कार्यालयात जावे लागेल व ग्राम सेवकाकडून विहीर अनुदान योजनेचा अर्ज घ्यावा लागेल किंवा जिल्हा कार्यालयात कृषी विभागात जाऊन विहीर अनुदान योजनेचा अर्ज घ्यावा लागेल व अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून अर्जासोबत आवश्यक अशी कागदपत्रे जोडून अर्ज जमा करावा लागेल.
  • अर्ज पेटी दर सोमवारी उघडण्यात येऊन त्यातील अर्ज ऑनलाईन भरण्याचे कार्य ग्रामपंचायतीचे असेल. हे कार्य ग्रामपंचायत स्वतःचे डाटा एंट्री ऑपरेटर किंवा ग्राम रोजगार सेवक यांच्या मदतीने करेल. याप्रमाणे मनरेगाच्या सर्व मागण्या ऑनलाईन भरल्या जातील ही जबाबदारी त्या ग्रामपंचायतीसाठी जबाबदार असलेले तांत्रिक सहाय्यकाची राहील. वेळ प्रसंगी तांत्रिक सहाय्यकास सुद्धा ऑनलाईनसाठी डाटा एंट्री करावी लागली तर करतील.
  • अशा प्रकारे तुमची विहीर अनुदान योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.

Vihir Anudan Yojana Maharashtra 2024 Online Apply

  • विहीर अनुदान योजनेअंतर्गत ऑनलाईन कर्ज करण्यासाठी अर्जदाराला महाडीबीटी पोर्टल वर जावे लागेल.
  • पोर्टल वर शेतकरी योजना वर क्लिक करावे लागेल.
  • आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना वर क्लिक करावे लागेल.
Vihir Yojana Maharashtra

  • आता तुमच्यासमोर या योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या लाभाची संपूर्ण माहिती दिली जाईल ती वाचून अर्ज करा वर क्लिक करावे लागेल.
Vihir Yojana Maharashtra

  • आता तुमच्यासमोर या योजनेचा अर्ज उघडेल अर्जात विचारलेली सर्व माहिती योग्य प्रकारे भरून सोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी लागतील.
  • सर्व माहिती भरून झाल्यावर सबमिट बटनावर क्लिक करावे लागेल.
  • अशा प्रकारे विहीर अनुदान योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.
Telegram GroupJoin
Vihir Anudan Yojana FormClick Here
विहीर नोंदणी अर्ज 2024 OnlineClick Here
मागेल त्याला विहीर योजना अर्जClick Here
विहीर नोंदणी अर्ज PDF 2024Click Here
मागेल त्याला विहीर योजना gr pdfClick Here

महाराष्ट्र शासनाच्या इतर योजना

आंतरजातीय विवाह अनुदान महाराष्ट्र शासन PDF
ई पीक पाहणी
ई पीक पाहणी नोंदणी
महाज्योती फ्री टॅबलेट योजना
अहिल्यादेवी सिंचन विहीर योजना
दोन मुलींसाठी योजना
लहान मुलींसाठी योजना
रोजगार संगम योजना
बचत गटाचे फायदे
बचत गटाचे नियम
महिला बचत गट नावे
महिला बचत गट नोंदणी अर्ज
बचत गट ठराव नमुना PDF
पुरुष बचत गट नावे
शिवभोजन योजना
पिवळ्या रेशन कार्ड चे फायदे
ग्रामीण कुटीर उद्योग
चंदन कन्या योजना
शेतकरी योजना
बॅच बिल्ला काढण्याची पद्धत
जलयुक्त शिवार योजना
पारंपारिक वस्त्रोद्योग विणकरांना बक्षीस योजना
अण्णासाहेब पाटील कर्ज योजना
अण्णासाहेब पाटील महामंडळ कर्ज योजना कागदपत्रे
लेक लाडकी योजना
कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना
मिनी ट्रॅक्टर व त्यांची उपसाधने यांचा पुरवठा करणे ची योजना
राजे यशवंतराव होळकर महामेष योजना
विहीर अनुदान योजना
मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजना
महिला सन्मान योजना
महाराष्ट्र मुख्यमंत्री किसान योजना
निर्धूर चुल वाटप योजना
Baby Care Kit Yojana
महिला बचत गट समृद्धी कर्ज योजना
थेट कर्ज योजना
प्रधानमंत्री पीक विमा योजना
चर्मकार समाज योजना
गाय म्हैस शेळी मेंढी पालन अनुदान योजना
अटल बांबू समृद्धी योजना
महिला स्वयंसिद्धी व्याज परतावा योजना
मध केंद्र योजना
राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना
शौचालय अनुदान योजना
जिव्हाळा कर्ज योजना
डिजल पंप सब्सिडी योजना
मल्चिंग पेपर योजना
राष्ट्रीय वयोश्री योजना
खावटी अनुदान योजना
मुख्यमंत्री रोजगार निर्मिति योजना
शबरी घरकुल योजना
प्रधानमंत्री मुद्रा योजना
पंडित दिनदयाळ उपाध्याय स्वयंम योजना
वसंतराव नाईक कर्ज योजना
कृषी ड्रोन अनुदान योजना
बांधकाम कामगार योजना
संजय गांधी निराधार योजना
आचार्य बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजना
सायकल वाटप योजना
वीरभद्रकाली ताराराणी स्वयंसिद्धा योजना
प्रधानमंत्री स्वामित्व योजना
प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना
रुफटॉप सोलर योजना
श्रावणबाळ अनुदान योजना
सैनिक शाळेतील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता योजना 
गटई स्टॉल योजना
राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना
प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना
प्रधानमंत्री जीवन ज्योति बीमा योजना
गाय गोठा अनुदान योजना
डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना
शेळी मेंढी पालन योजना
ट्रॅक्टर अनुदान योजना
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना
सुकन्या समृद्धी योजना
प्रधानमंत्री मातृ वंदना योजना
किशोरी शक्ती योजना
माझी कन्या भाग्यश्री योजना
बाल संगोपन योजना
फ्री सिलाई मशीन योजना
पीएमसी महिला आणि बालकल्याण योजना
रमाई घरकुल योजना
महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजना
पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा
युवकांना विविध व्यावसायिक प्रशिक्षण योजना
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मोफत सायकल वाटप योजना
अपंग बस सवलत योजना
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना
आंतरजातीय विवाह योजना
मोटार वाहन चालक प्रशिक्षण योजना
कोरोना मृतांच्या नातेवाईकांना 50 हजारांची मदत
शैक्षणिक कर्ज योजना
आम आदमी विमा योजना
महाडीबीटी शिष्यवृत्ती
सावित्रीबाई फुले स्कॉलरशिप
पॅन कार्ड क्लब क्लेम करण्याची पद्धत
प्रधानमंत्री किसान हेल्पलाईन नंबर
पोस्ट ऑफिस ग्राम सुरक्षा योजना
दहीहंडी विमा योजना
शरद पवार इन्स्पायर फेलोशिप
विद्याधन स्कॉलरशिप
मेडले फार्मा शिष्यवृत्ती
इंडिया स्माइलिंग फाउंडेशनल शिष्यवृत्ती कार्यक्रम
मुख्यमंत्री अप्रेंटिसशिप योजना
एचडीएफसी लिमिटेड बढते कदम शिष्यवृत्ती
मर्क इंडिया चॅरिटेबल ट्रस्ट शिष्यवृत्ती कार्यक्रम

1 thought on “विहीर नोंदणी अर्ज”

  1. विहीर योजना ग्रामपंचायत मार्फत राबविल्यास सक्सेस होणार नाही या मधे सरपंच व ग्रामसेवक लाभार्थीना वेठीस धरतात हा आज पर्यंत चा अनुभव आहे क्रुपया या वर शासनाने फेरविचार करावा ही विनंती.

Comments are closed.

Join WhatsApp Group!