Solar Panel Yojana Maharashtra

आपल्या देशात औद्योगिक क्षेत्रात वाढ होत चाललेली आहे त्यामुळे विजेच्या मागणीत दिवसेंदिवस प्रचंड वाढ होत चालली आहे. वीजनिर्मितीसाठी वापरण्यात येणाऱ्या कोळश्याचा साठा सुद्धा अपुरा पडत चालला आहे. त्यामुळे पारंपरिक वीज निर्मिती साधने अपुरी पडत चाललेली आहेत त्यामुळे देशाला पुढच्या येणाऱ्या काही काळात विजेच्या समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे. या सर्व गोष्टीचा विचार करून केंद्र सरकार ऊर्जा मंत्रालयाने रूफटॉप सोलर योजना महाराष्ट्र राबविण्याचा विचार केला.

या योजनेअंतर्गत घरगुती, गृहनिर्माण संस्था व निवासी कल्याणकारी संघटना यांच्या छतावर रूफटॉप सोलर ऊर्जा निर्मिती यंत्रणा बसविण्यात येणार आहे त्यासाठी शासनाकडून 40 टक्क्यांपर्यंत अनुदान दिले जाणार आहे या योजनेमुळे घरगुती वीज बिलात बचत होण्यास मदत होईल तर सौर ऊर्जेमुळे जास्तीची ऊर्जा नेट मीटरिंगद्वारे महावितरणाला विकता येणार आहे त्यामुळे ग्राहकाला थोडीफार आर्थिक मदत मिळण्यास मदत होईल या योजनेअंतर्गत घरगुती वर्गवारीतील ग्राहकांना किमान 1 किलोवॅट क्षमतेची छतावर (रूफटॉप) सौर ऊर्जानिर्मिती यंत्रणा बसविण्यासाठी केंद्र शासनाकडून टप्पा 2 अंतर्गत वित्त सहाय्य अनुदान देण्यात येणार आहे.

या योजनेचा मुख्य उद्देश राज्यातील नागरिकांना त्यांच्या घराच्या, कारखान्याच्या, कचेरीच्या छतावर सोलर पॅनल बसविण्यासाठी 40 टक्के अनुदान देणे जेणेकरून वीज मंडळावरील वाढत चालणारा विजेचा भार कमी होईल.

योजनेचे नावसोलर पॅनल योजना महाराष्ट्र
लाभार्थीघरगुती ग्राहक, गृहनिर्माण रहिवासी संस्था,
निवासी कल्याणकारी संघटना,
गाव, पाडा, वस्ती, दुर्गम आदिवासी जमाती
लाभछतावर सोलर बसविण्यासाठी आर्थिक सहाय्य
योजनेची सुरुवात 2016
अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन

Solar Panel Yojana Maharashtra चे उद्दिष्ट

  • रूफटॉप सोलर पॅनलच्या सहाय्याने मासिक घरगुती बिलात बचत करणे.
  • रूफटॉप सोलर पॅनल ला लावण्यात आलेल्या नेट मीटरिंगद्वारे शिल्लक वीज महावितरण प्रति युनिट प्रमाणे ग्राहकांकडून विकत घेऊन त्यामुळे ग्राहकांना याचा थोडाफार आर्थिक लाभ मिळवून देणे.
  • पारंपारिक उर्जा स्तोत्रांवरील ताण कमी करून सौर ऊर्जेच्या वापराला प्रोत्साहन देणे.
  • नागरिकांना अक्षय ऊर्जेच्या वापरासाठी प्रोत्साहित करणे
  • राज्यावरील विजेचा भार कमी करणे.
  • प्रदूषण विरहित वीजनिर्मितीला प्रोत्साहन देणे.
Solar Panel Yojana Maharashtra

योजनेचे वैशिष्ट्य:

  • या योजनेअंतर्गत लाभार्थ्याला स्वतःच्या छतावर सोलर पॅनल बसविण्यासाठी 40 टक्के अनुदान देण्यात येते.
  • सोलर रूफटॉप योजना महाराष्ट्र च्या सहाय्याने राज्यातील नागरिक विजेच्या बाबतीत आत्मनिर्भर बनतील.
  • योजनेअंतर्गत नागरिकांच्या विजेची बचत होईल जेणेकरून त्यांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होईल.
  • अनुदानाची राशी लाभार्थ्यांच्या बँक खात्यात DBT च्या सहाय्याने जमा केली जाते. [Solar Panel Yojana Maharashtra]

योजनेअंतर्गत दिले जाणारे अनुदान:

  • या योजनेअंतर्गत लाभार्थ्यास 20 टक्के ते 40 टक्के अनुदान देण्यात येते.

योजनेचे लाभार्थी:

  • महाराष्ट्र जे नागरिक स्वतःच्या घराच्या छतावर सोलर पॅनल बसविण्यासाठी इच्छुक आहे ते या योजनेअंतर्गत अर्ज करून लाभ मिळवण्यासाठी पात्र आहेत.

योजनेचा फायदा:

  • या योजनेचा लाभ महाराष्ट्रातील सर्व नागरिक घेऊ शकतात.
  • या योजनेअंतर्गत गृहनिर्माण संस्था, निवासी संघटनांना 20 टक्के अनुदान दिले जाईल.
  • या योजनेअंतर्गत घरगुती ग्राहक, गृहनिर्माण रहिवाशी संस्था व निवासी कल्याणकारी संघटनांना या योजनेचा लाभ घेता येतो.
  • या योजनेमुळे विजेच्या बिलात कपात होते.
  • पर्यावरणाला हानी न पोहोचवता वीजेची निर्मिती करता येते.
  • निशुल्क वीजेची निर्मिती करता येते.
  • अंदाजे 25 वर्ष सोलर पॅनल चा उपयोग करून विजेची निर्मिती करता येते.
  • 5 ते 6 वर्षात योजनेअंतर्गत भरलेल्या रकमेची भरपाई होते. 
  • या योजनेअंतर्गत लाभार्थी विजेच्या बाबतीत आत्मनिर्भर बनेल.
  • सौर ऊर्जेवर विविध सुविधा उपलब्ध झाल्यामुळे खंडीत विज पुरवठयामुळे निर्माण होणाऱ्या समस्यांतुन सुटका होईल.
  • पर्यावरण पुरक / अपारंपरीक / पुर्णनिर्मितीक्षम उर्जा चा वापर वाढेल त्यामुळे प्रदुषण मुक्त वातावरण निर्मीती होईल.
  • योजनेच्या माध्यमातून तयार झालेली अतिरिक्त ऊर्जा लाभार्थी 30 पैसे प्रतियुनिट ने विदयुत मंडळाला विकून आर्थिक लाभ मिळवता येतो.

योजनेअंतर्गत आवश्यक पात्रता:

  • अर्जदार व्यक्ती महाराष्ट्र राज्याच्या मूळ रहिवाशी असणे आवश्यक आहे.

योजनेचे नियम व अटी:

  • ज्या गावात, वस्तीत, दुर्गम भागात विद्युतऊर्जा अजून पोहोचली नाही आहे अशा गावांना या योजनेअंतर्गत प्रथम प्राधान्य देण्यात येईल.
  • ज्या ठिकाणी विद्युत ऊर्जा नियमित नाही म्हणजेच ज्या ठिकाणी विद्युत ऊर्जा जाते व येते अशा ठिकाणाची या योजनेअंतर्गत प्रथम निवड करण्यात येईल.
  • एखाद्या विद्युत प्रकल्पातून एक पेक्षा अधिक गावांची निवड करण्यात आली असेल तर अशा गावांना प्राधान्य क्रम देण्यात येईल.
  • गावांची निवड करते वेळेस त्या गावची प्राथमिक माहिती उदाहरणार्थ गावाचे नाव तालुक्याचे नाव, जिल्याचे नाव त्या गावची लोकसंख्या, गावातील आदिवासी जमात जनसंख्या, गावातील एकूण घरांची संख्या त्या गावात विद्युत ऊर्जेचा नियमितपणा, भौगोलिक परिस्थिती इत्यादी माहिती सोबत जोडणे आवश्यक आहे.
  • या योजनेअंतर्गत निवड करण्यात येणारे गाव, वस्ती, पाडा, वाडी हे अतिदुर्गम भागातील तसेच आदिवासी, गरीब, दारिद्र रेषेखालील असावे.
  • 1 किलोवॅट सौर ऊर्जा उपकरणाला 10 वर्ग मिटर जागेची गरज लागते.
  • एका परिवारातील फक्त एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येईल.
  • अर्जदाराने केंद्र किंवा राज्य शासनाद्वारे सुरु करण्यात आलेल्या इतर कोणत्या सोलर योजनेचा लाभ घेतला असेल तर अशा अर्जदारास या योजनेचा लाभ घेता येणार नाही.

योजनेअंतर्गत मिळणारे वित्त सहाय्य:

या योजनेअंतर्गत मिळणारे रूफटॉप सोलर उपकरण घराच्या छतावर बसविण्यात येते व त्या उपकरणाच्या माध्यमातून दिवसा सौर प्रकाशातून विद्युत निर्मिती होते व निर्माण झालेल्या विजेचा उपयोग हा घरातील उपकरणांच्या (टीव्ही, पंखा, बल्ब इत्यादी) वापरासाठी केला जातो.
तसेच या सौर ऊर्जेचा उपयोग व्यावसायिक वापरासाठी सुद्धा केला जातो त्यासाठी जास्त किलोवॅट सौर ऊर्जा उपकरणाचा वापर केला जातो.

  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याला स्वतःकडची थोडीफार रक्कम भरावी लागते आणि बाकीची रक्कम अनुदान स्वरूपात महाराष्ट्र शासनाकडून दिली जाते.
  • घरगुती ग्राहकांसाठी 1 ते 3 किलोवॅट विद्युत निर्मिती करणाऱ्या सौर उपकरणासाठी शासनाकडून 40 टक्के अनुदान दिले जाते.
  • 3 किलोवॅट व त्यापेक्षा अधिक 10 किलोवॅट पर्यंत विद्युत निर्मिती सौर उपकरणासाठी 20 टक्के अनुदान दिले जाते.
  • सामूहिक वापरासाठी 500 किलोवॅट विद्युत निर्मिती करणारे सौर उपकरणावर 20 टक्के अनुदान दिले जाते.
  • गृहनिर्माण रहिवासी संस्था व निवासी कल्याणकारी संघटनेमध्ये राहणाऱ्या ग्राहकांना प्रत्येक घरासाठी 10 किलोवॅट विद्युत निर्मिती करणाऱ्या सौर उपकरणावर 20 टक्के अनुदान दिले जाते.

योजनेअंतर्गत आवश्यक कागदपत्रे:

  • अर्जदाराचे आधार कार्ड
  • मोबाईल क्रमांक
  • अर्जदाराचे बचत बँक खाते
  • अर्जदाराच्या घराच्या मालकी हक्काची कागदपत्रे
  • अर्जदाराच्या घरातील सह-हिस्सेदारांचे संमतीपत्र
  • चालू विज बिल
  • अर्जदार महाराष्ट्र राज्याचा 15 वर्ष रहिवाशी असल्याचा दाखला
  • अर्जदाराचे अलिकडल्या काळातील पासपोर्ट साईज आकाराचे फोटो
  • रेशन कार्ड अर्जदाराच्या कुटुंबाचा उत्पन्नाचा दाखला.

सौर ऊर्जा निर्मिती करणाऱ्या यंत्रणेची किंमत खालील प्रमाणे:

या योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या रूफटॉप सौर ऊर्जा उपकरणाची 5 वर्ष देखभाल खर्चासहित करण्यात येणारी किंमत

रुफटॉप सौर ऊर्जा उपकरणकिंमत 
1 किलोवॅट 46,820/- रुपये
1 ते 2 किलोवॅट 42,470/- रुपये
2 ते 3 किलोवॅट 41,380/- रुपये
3 ते 10 किलोवॅट 40,290/- रुपये
10 ते 100 किलोवॅट 37,020/- रुपये

योजनेअंतर्गत प्रति किलोवॅट किंमत जाहीर करण्यात आली आहे:

वरील दराप्रमाणे जर एखाद्याला 3 किलोवॅट क्षमतेचे रुफटॉप सौर सौर उपकरण बसवायचे असेल तर त्यास

  • 3 × 41,380 = 1,24,140/- रुपये रक्कम भरावी लागेल.
  • या रकमेमध्ये महाराष्ट्र शासनाचे 40 टक्के अनुदान असते.
  • 40 टक्के अनुदान म्हणजे 1,24,140 × 40 ÷ 100 = 49,656/- रुपये
  • 49,656/- रुपये शासनाकडून या योजनेअंतर्गत वित्त सहाय्य दिले जाते.
  • म्हणजे ग्राहकास फक्त 1,24,140 – 49,656 = 74,484/- रुपयांचा खर्च करावा लागतो.

योजनेअंतर्गत अर्ज रद्द होण्याची कारणे:

  • अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी नसल्यास अर्ज रद्द केला जाईल.
  • अर्जदाराने अर्जात खोटी तसेच दिशाभूल करणारी माहिती भरल्यास अर्ज रद्द केला जाईल.
  • एकाच वेळी दोन अर्ज केल्यास त्यामधील एक अर्ज रद्द केला जाईल.
  • केंद्र किंवा राज्य शासनाद्वारे सुरु करण्यात आलेल्या इतर कोणत्या सोलर योजनेचा लाभ घेतला असेल तर अशा परिस्थिती अर्ज रद्द केला जाईल.

योजनेअंतर्गत अर्ज करण्याची पद्धत:

  • अर्ज करण्यासाठी तुम्हाला शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर जायचे आहे.
  • होम पेज वर Apply For Solar Rooftop बटनावर क्लिक करायचं आहे.
Solar Panel Yojana Maharashtra

  • आता तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल त्यात तुम्हाला तुमचं राज्य आणि वीज वितरण कंपनीची निवड करायची आहे.
Solar Panel Yojana Maharashtra

  • आता तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल त्यामध्ये Apply Now बटनावर क्लिक करावे लागेल.
Solar Panel Yojana Maharashtra

  • आता तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन होईल त्यात या योजनेचा अर्ज ओपन होईल अर्ज भरायच्या आधी दिलेल्या सूचना वाचून घेणे आवश्यक आहे.
  • आता अर्जात विचारलेली खालीलप्रमाणे सर्व माहिती भरायची आहे.
Solar Panel Yojana Maharashtra

  • Consumer Number येथे तुम्हाला तुमचा Consumer Number टाकायचा आहे (Consumer Number तुमच्या विज बिलावर दिलेला असतो)
  • Consumer Number टाकल्यावर तुम्हाला एक Pop Up येईल त्याला OK करायचं आहे.
  • Ok केल्यावर तुमच्या समोर एक नवीन पेज Open होईल. 
  • या नवीन पेजवर तुम्हाला
    1. ग्राहक जोडणी प्रकार: तुम्हाला Low Tension किंवा High Tension निवडायचं आहे. (1 ते 3 किलोवॅट पर्यंत Low Tension आणि त्या पुढील किलोवॅट High Tension मध्ये येतात.)
    2. तुमचा ग्राहक क्रमांक टाकायचा आहे.
    3. Biling Unit टाकायचं आहे. आणि Search Consumer वर क्लिक करायचं आहे.
  • आता तुमच्या समोर तुमची सर्व माहिती दिसेल.
  • या मध्ये तुम्हाला तुमची राहिलेली माहिती (Email, Mobile Number) भरायची आहे किंवा Update करायची आहे. 
  • सर्व माहिती भरून झाल्यावर I Agree वर क्लिक करून Submite वर क्लिक करायचं आहे.
  • यानंतर तुम्हाला Data Submitted Successfully चा Message दिसेल त्याला Ok करायचं आहे.
  • आता तुम्हाला पहिल्या टॅबवर पुन्हा जायचं आहे त्यावर तुम्ही भरलेला आणि Update केलेली सर्व माहिती दिसेल. 
  • आता तुम्हाला उर्वरित माहिती भरायची आहे
  • तुम्हाला अर्जामध्ये तुमचा Landmark टाकायचा आहे.
  • ई-मेल टाकायचा आहे. 
  • आधार कार्ड नंबर टाकायचा आहे.
  • आता तुम्हाला Scheme Name मध्ये MNRE-RTS-PH II Subsidy निवडायचं आहे. (या योजनेचा दुसरा टप्प्याअंतर्गत लाभ घेऊ इच्छितो)
  • आता RE Generator Type मध्ये Solar ला टिक करायचं आहे व Connection Type मध्ये Only rooftop capacity निवडायचं आहे.
  • Rooftop Capacity मध्ये तुम्हाला ज्या किलोवॅट ची गरज आहे ती टाकायची आहे (1 किलोवॅट, 2 किलोवॅट, 3 किलोवॅट)
  • Output Voltage Of RE System मध्ये 230/240 Volt निवडायचं आहे. 
  • Do you want to maintain the chronology in case of there is indequate distribution transformer capacity : No करायच आहे.
  • त्यानंतर तुहाला Instaltion Cost दिसेल ज्यामध्ये तुम्हाला सबसिडी दिली जाते व तुम्हाला भरावयाची रक्कम दिलेली आहे. ( Estimate Cost to be bome by consumer in Rs. XYZ)
  • आता तुहाला Generate OTP करून रक्कम भरायची आहे.
  • तुम्हाला तुमचे Application Status तपासायचे करायचे आहे.
  • तुमचं Application Accept झाल्यावर तुम्हाला Annexure Form भरून योग्य त्या कागदपत्रांची झेरॉक्स प्रत जोडून जवळच्या विदयुत महावितरण कार्यालयात जमा करायचे आहे.
शासनाची अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
Solar Rooftop Yojana Toll Free Number1800-180-3333
Annexure Formयेथे क्लिक करा
Telegram GroupClick Here

महाराष्ट्र शासनाच्या इतर योजना

आंतरजातीय विवाह अनुदान महाराष्ट्र शासन PDF
ई पीक पाहणी
ई पीक पाहणी नोंदणी
महाज्योती फ्री टॅबलेट योजना
अहिल्यादेवी सिंचन विहीर योजना
दोन मुलींसाठी योजना
लहान मुलींसाठी योजना
रोजगार संगम योजना
बचत गटाचे फायदे
बचत गटाचे नियम
महिला बचत गट नावे
महिला बचत गट नोंदणी अर्ज
बचत गट ठराव नमुना PDF
पुरुष बचत गट नावे
शिवभोजन योजना
पिवळ्या रेशन कार्ड चे फायदे
ग्रामीण कुटीर उद्योग
चंदन कन्या योजना
शेतकरी योजना
बॅच बिल्ला काढण्याची पद्धत
जलयुक्त शिवार योजना
पारंपारिक वस्त्रोद्योग विणकरांना बक्षीस योजना
अण्णासाहेब पाटील कर्ज योजना
अण्णासाहेब पाटील महामंडळ कर्ज योजना कागदपत्रे
लेक लाडकी योजना
कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना
मिनी ट्रॅक्टर व त्यांची उपसाधने यांचा पुरवठा करणे ची योजना
राजे यशवंतराव होळकर महामेष योजना
विहीर अनुदान योजना
मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजना
महिला सन्मान योजना
महाराष्ट्र मुख्यमंत्री किसान योजना
निर्धूर चुल वाटप योजना
Baby Care Kit Yojana
महिला बचत गट समृद्धी कर्ज योजना
थेट कर्ज योजना
प्रधानमंत्री पीक विमा योजना
चर्मकार समाज योजना
गाय म्हैस शेळी मेंढी पालन अनुदान योजना
अटल बांबू समृद्धी योजना
महिला स्वयंसिद्धी व्याज परतावा योजना
मध केंद्र योजना
राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना
शौचालय अनुदान योजना
जिव्हाळा कर्ज योजना
डिजल पंप सब्सिडी योजना
मल्चिंग पेपर योजना
राष्ट्रीय वयोश्री योजना
खावटी अनुदान योजना
मुख्यमंत्री रोजगार निर्मिति योजना
शबरी घरकुल योजना
प्रधानमंत्री मुद्रा योजना
पंडित दिनदयाळ उपाध्याय स्वयंम योजना
वसंतराव नाईक कर्ज योजना
कृषी ड्रोन अनुदान योजना
बांधकाम कामगार योजना
संजय गांधी निराधार योजना
आचार्य बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजना
सायकल वाटप योजना
वीरभद्रकाली ताराराणी स्वयंसिद्धा योजना
प्रधानमंत्री स्वामित्व योजना
प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना
रुफटॉप सोलर योजना
श्रावणबाळ अनुदान योजना
सैनिक शाळेतील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता योजना 
गटई स्टॉल योजना
राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना
प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना
प्रधानमंत्री जीवन ज्योति बीमा योजना
गाय गोठा अनुदान योजना
डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना
शेळी मेंढी पालन योजना
ट्रॅक्टर अनुदान योजना
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना
सुकन्या समृद्धी योजना
प्रधानमंत्री मातृ वंदना योजना
किशोरी शक्ती योजना
माझी कन्या भाग्यश्री योजना
बाल संगोपन योजना
फ्री सिलाई मशीन योजना
पीएमसी महिला आणि बालकल्याण योजना
रमाई घरकुल योजना
महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजना
पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा
युवकांना विविध व्यावसायिक प्रशिक्षण योजना
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मोफत सायकल वाटप योजना
अपंग बस सवलत योजना
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना
आंतरजातीय विवाह योजना
मोटार वाहन चालक प्रशिक्षण योजना
कोरोना मृतांच्या नातेवाईकांना 50 हजारांची मदत
शैक्षणिक कर्ज योजना
आम आदमी विमा योजना
महाडीबीटी शिष्यवृत्ती
सावित्रीबाई फुले स्कॉलरशिप
पॅन कार्ड क्लब क्लेम करण्याची पद्धत
प्रधानमंत्री किसान हेल्पलाईन नंबर
पोस्ट ऑफिस ग्राम सुरक्षा योजना
दहीहंडी विमा योजना
शरद पवार इन्स्पायर फेलोशिप
विद्याधन स्कॉलरशिप
मेडले फार्मा शिष्यवृत्ती
इंडिया स्माइलिंग फाउंडेशनल शिष्यवृत्ती कार्यक्रम
मुख्यमंत्री अप्रेंटिसशिप योजना
एचडीएफसी लिमिटेड बढते कदम शिष्यवृत्ती
मर्क इंडिया चॅरिटेबल ट्रस्ट शिष्यवृत्ती कार्यक्रम

2 thoughts on “Solar Panel Yojana Maharashtra”

  1. Good system to have green energy All buildings roof may be made of solar panels

Comments are closed.

Join WhatsApp Group!