मोटार वाहन चालक प्रशिक्षण योजना महाराष्ट्र 2025

मोटार वाहन चालक प्रशिक्षण योजना महाराष्ट्र: भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाद्वारे राबवली जाणारी एक योजना आहे. या योजनेचा उद्देश अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि मागासवर्गीय समुदायातील बेरोजगार तरुणांना वाहन चालवण्याचे प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगार मिळवण्यास मदत करणे आहे.

राज्यातील वाहनांची वाढणारी संख्या, वाहतुक व्यवस्था, रस्ते व दिवसेंदिवस लोकांचा पर्यटनाकडे वाढणारा कल लक्षात घेता, वाहन व्यवसायामध्ये रोजगाराची मोठया प्रमाणात संधी निर्माण होत आहे. तथापि, मागासवर्गीय समाजामध्ये शिक्षणाचे प्रमाण कमी असून त्याबरोबरच बेरोजगारीचे प्रमाण सुध्दा जास्त आहे. मागासवर्गीय विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात व त्यांना कौशल्यपुर्ण प्रशिक्षण मिळावे, म्हणून सदरच्या विद्यार्थ्यांना व्यावसायिक प्रशिक्षण देणे आवश्यक आहे.
मोटार वाहन प्रशिक्षण ही योजना राज्यात सन १९७२ पासून लागू करण्यात आलेली आहे. सदर योजनेंतर्गत प्रथमत: महाराष्ट्र राज्य महामार्ग परिवहन महामंडळ यांचेमार्फत मागासवर्गीय उमेदवारांना प्रशिक्षण देण्यात येत होते. महामंडळामार्फत सुरु असणाऱ्या मोटार वाहन प्रशिक्षण योजनेस नवीन मोटार वाहन अधिनियम, १९८८ नुसार काही अडचणी उपस्थित केल्यामुळे उमेदवार प्रशिक्षित करणेबाबत असमर्थता व्यक्त केलेली होती. त्यामुळे मागासवर्गीय उमेदवार मोटार वाहन चालकाचे प्रशिक्षण घेण्यास वंचित होऊ नये, म्हणून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामार्फत देण्यात येणाऱ्या प्रशिक्षण योजनेप्रमाणेच प्रशिक्षण देण्यात यावे, म्हणून शासनाने संदर्भातील दिनांक २६ जुलै, १९९५ च्या शासन निर्णयान्वये सुधारीत योजनेस मान्यता दिली.

योजनेची वैशिष्ट्ये

प्रशिक्षण केंद्रांची स्थापना:

  • राज्यभर प्रशिक्षित व प्रमाणित प्रशिक्षण केंद्रांची उभारणी केली जाते.
  • येथे आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून वाहन चालविण्याचे प्रशिक्षण दिले जाते.

प्रशिक्षणाचा भाग:

  • वाहतूक नियम: रस्त्यावरील वाहतूक नियमांचे सखोल शिक्षण.
  • सुरक्षितता: रस्त्यावरील सुरक्षितता व आपत्कालीन परिस्थिती हाताळण्याचे तंत्र.
  • तांत्रिक कौशल्य: वाहन चालविण्याचे मूलभूत आणि प्रगत तंत्रज्ञान शिकवले जाते.
  • व्यावसायिक वाहन: व्यावसायिक (जड वाहन) वाहन चालवण्याचे विशेष प्रशिक्षण.
driver-training-schemes

मोटार वाहन चालक प्रशिक्षण योजना महाराष्ट्र चे लाभार्थी

  • महाराष्ट्र राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील व्यक्ती

मोटार वाहन चालक प्रशिक्षण योजनेचा लाभ

  • बेरोजगार तरुणांना रोजगार मिळवण्यास मदत होईल व राज्यातील बेरोजगारी कमी होईल.
  • स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.
  • वाहतूक क्षेत्रात कुशल मनुष्यबळ तयार होईल.
  • राज्यातील बेरोजगारी कमी होईल.

मोटार वाहन चालक प्रशिक्षण योजनेअंतर्गत समाविष्ट वर्ग

मोटार वाहन चालक प्रशिक्षण ही योजना खालील प्रवर्गाच्या उमेदवारांना लागू करण्यात आली आहे.

  • अनुसूचित जाती
  • अनुसूचित जमाती
  • इतर मागास वर्गीय
मोटार वाहन चालक प्रशिक्षण योजनेअंतर्गत मोटार वाहन प्रशिक्षणासाठी देण्यात येणारी रक्कम

युवक व युवतींना वाहन चालक व वाहक प्रशिक्षण देण्याची येाजना मोटार ड्रायव्हिंग प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेमार्फत राज्यातील सर्व जिल्हयात राबविण्यात येते. त्याकरिता प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेस शासन खालीलप्रमाणे रक्कम अदा केली जाते.

प्रशिक्षण प्रकारप्रशिक्षण दर रु.प्रशिक्षण कालावधी
हलके वाहन4264/-40 दिवस
अवजड वाहन4960/-40 दिवस
वाहक1728/-8 दिवस

तसेच लाभार्थ्यांना पोस्टाने चालक/ वाहक परवाना पाठविणे करीता प्रतिलाभार्थी 100/- रुपये एवढी रक्कम मंजुर करण्यात येते.

मोटार वाहन चालक प्रशिक्षण योजनेच्या लाभाचे स्वरूप
  • लाभार्थी उमेदवारांना खाजगी ड्रायव्हीग स्कूलमध्ये प्रशिक्षण देण्यात येते प्रत्येक सत्रात किमान 50 उमेदवारांना प्रवेश देण्यात येतो तसेच वाहकाचे (चालक) मोफत प्रशिक्षण देण्यात येते.
  • प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर प्रशिक्षणार्थ्यास प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत परीक्षा घेऊन वाहन चालविण्याचा परवाना दिला जातो. तर वाहकास प्रशिक्षणानंतर बॅच देण्यात येतो.
  • प्रशिक्षण पूर्ण होऊन संबंधितांना परवाना / बॅच मिळाल्यानंतर शासनाने विहित केलेल्या शुल्काची प्रतिपूर्ती प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेस अदा केली जाते.
  • प्रशिक्षण कालावधीमध्ये जिल्हा कार्यालय ते प्रशिक्षण केंद्रापर्यंत जाणे येण्याचे भाडे, आरोग्य तपासणी, छायाचित्र, चालकाचा कच्चा व पक्का परवाना, वाहक परवाना व बिल्ला, राहण्याची व जेवण्याची व्यवस्था इत्यादि संबंधित प्रशिक्षण संस्थेमार्फत केली जाते.
  • प्रशिक्षण केंद्राच्या मुख्यालयी राहणारा स्थानिक प्रशिक्षणार्थी वसतिगृहात रहात नसल्यास मोटार वाहन चालक प्रशिक्षणार्थीस 300/- रुपये व वाहक प्रशिक्षणार्थ्यास 150/- रुपये याप्रमाणे प्रशिक्षण काळात प्रशिक्षण संस्थेमार्फत विद्यावेतन देण्यात येते.
अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील बेरोजगार युवकांसाठी मोटार वाहन चालक प्रशिक्षण योजना नियमावली
  • सदरची योजना राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येईल.
  • केंद्र शासन, राज्य शासन व महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळा मार्फत चालविण्यात येणाऱ्या वाहनचालक प्रशिक्षण संस्था, तसेच मोटार वाहन विभागाने प्राधिकृत केलेल्या प्रशिक्षण देणारी संस्था ही मोटार वाहन अधिनियमांतर्गत नमूद, सर्व मुलभूत सोयींनीयुक्त असेल.
    प्रशिक्षण हे केंद्रीय मोटार वाहन कायदा व त्या अंतर्गत करण्यात आलेले नियम तसेच महाराष्ट्र मोटार वाहन कायदा व त्या अंतर्गत करण्यात आलेले नियम यामधील तरतुदीनुसार राहील.
  • सदरील प्रशिक्षण हे खालील परवान्यासाठी राहील
Driving Training Scheme Chart

  • प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांची निवड ई-निविदेव्दारे शासन स्तरावरुन करण्यात येईल.तथापी,प्रशिक्षण देणारी संस्था जर केंद्र व राज्य शासनामार्फत किंवा महामंडळा मार्फत चालविली जात असेल, तर त्यांनी नमूद केलेले दराबाबत वाटाघाटी करण्यात येतील. त्यानंतर अंतिम दर ठरविण्यात येईल.
  • निवासी प्रशिक्षण– प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेस प्रती विद्यार्थी निविदेमध्ये अंतिम केलेल्या दराप्रमाणे खर्चाची प्रतिपूर्ती सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण यांचेकडून करण्यात येईल. यामध्ये मोटार वाहन प्रशिक्षण, मोटार वाहन प्रात्यक्षिक, सिमुलेटर ट्रेनिंग, वर्कशॉप ट्रेनिंग, निवास, भोजन, वैद्यकीय चाचणी, कच्चे व पक्के लायसन्स, फोटो याबाबींचा समावेश राहील.
  • अनिवासी प्रशिक्षण– प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेस प्रती विद्यार्थी निविदेमध्ये अंतिम केलेल्या दराप्रमाणे खर्चाची प्रतिपूर्ती सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण यांचेकडून करण्यात येईल. यामध्ये मोटार वाहन प्रशिक्षण, मोटार वाहन प्रात्यक्षिक, सिमूलेटर ट्रेनिंग, वर्कशॉप ट्रेनिंग, वैद्यकीय चाचणी, कच्चे व पक्के लायसन्स, फोटो याबाबींचा समावेश राहील.
  • निवासी उमेदवारास प्रशिक्षण कालावधीमध्ये मोटार वाहन प्रशिक्षण, मोटार वाहनाचे प्रात्यक्षिक, सिमुलेटर ट्रेनिंग, क्लासरुम ट्रेनिंग देणे बंधनकारक राहील. तसेच प्रशिक्षणार्थीची निवास, भोजनाची व्यवस्था करणे आवश्यक राहील.
  • प्रत्येक उमेदवाराचा दैनिक हजेरीपट ठेवण्यात येईल.
  • प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांना संस्थेने वाहन चालक परवाना मिळवून देणे बंधनकारक राहील.
  • यशस्वीरित्या प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांची यादी आवश्यक त्या माहितीसह विहीत नमुन्यात तयार करुन संबंधीत, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण यांचेकडे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर १० दिवसांच्या आत सादर करण्यात येईल.
  • प्रशिक्षण कालावधीत अनिवासी प्रशिक्षणार्थीचा दैनंदिन खर्च भागविण्यासाठी १२००/- रुपये विद्यावेतन म्हणून देय राहील. सदरची रक्कम प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर व वाहन चालक परवाना प्राप्त झाल्यानंतर सहाय्यक आयुक्त,
    समाज कल्याण हे प्रशिक्षणार्थीच्या बँक खात्यावर परस्पर वर्ग करतील.
  • प्रशिक्षण पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थीची यादी संबंधीत संस्था, प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण विभाग, तसेच संबंधीत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण हे अद्यावत करतील.
  • प्रशिक्षणासाठी क्षेत्रनिहाय नमूद केलेले भौतिक उद्दिष्टे शासन स्तरावरुन निश्चित करुन सर्व सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण यांना देण्यात येईल. त्यानुसार संबंधीत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण यांनी लाभार्थी निवड समिती मार्फत प्रशिक्षणार्थीची निवड करणे. निवड केलेल्या प्रशिक्षणार्थीची यादी संस्थेला उपलब्ध करुन देण्यात येईल.
  • निवड झालेल्या प्रशिक्षण संस्थेबरोबर सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण हे आवश्यक तो करारनामा करुन घेतील.
  • निवड करण्यात आलेल्या प्रशिक्षणार्थीकडून विहीत नमुन्यातील बंधपत्र सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण करून घेतील.

मोटार वाहन चालक प्रशिक्षण योजना लाभार्थी निवडीचे निकष

  1. प्रशिक्षणार्थी हा महाराष्ट्र राज्याचा कायमस्वरुपी रहिवासी असावा.
  2. प्रशिक्षणार्थी हा अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील असावा.
  3. अर्जदाराचे वय जाहिरात प्रसिध्द केल्याच्या दिनांकास हलके वाहन चालक परवाना करीता वय १८ वर्षे पुर्ण, तर जड वाहन चालक परवाना करीता वय २० वर्षे पूर्ण असावे. वरील दोन्ही परवान्यांसाठी अर्जदाराची कमाल वयोमर्यादा ३५ वर्षे राहील.
  4. ज्या उमेदवारास जड वाहन परवाना प्रशिक्षण घ्यावयाचे आहे, त्याचे कडे हलके मोटार वाहन परवाना (ट्रान्सपोर्ट) १ वर्षे पूर्ण झालेले असणे आवश्यक आहे.
  5. अर्जदार हा किमान इयत्ता ८ वी उत्तीर्ण व बेरोजगार असावा.
  6. अर्जदाराचे वास्तव्य हे संबंधीत जिल्ह्यातील असणे बंधनकारक आहे. त्यासाठी वास्तव्याच्या ठिकाणचे पालक / स्वत:च्या नावावरील रेशनकार्ड/विद्युत देयक / आधारकार्ड इत्यादी कागदपत्रे सादर करणे बंधनकारक आहे.
  7. अर्जदाराच्या वडिलांचे सर्व मार्गांनी मिळणारे वार्षिक उत्पन्न रु.२.५० लाख पेक्षा जास्त नसावे. त्या पुष्टर्थ सक्षम प्राधिकारी ( तहसिलदार) यांचा उत्पन्नाचा दाखला सादर करण्यात यावा.
  8. अर्जदार हा अनुसूचित जाती व नवबौध्द घटक वर्गातील असल्याबाबत जातीचे विहीत प्रमाणपत्र दाखल करणे बंधनकारक राहील.
  9. एकूण उद्दिष्टांपैकी हलके मोटार वाहन प्रशिक्षणासाठी १०% जागा महिलांसाठी आरक्षित राहतील. तथापी, महिला प्रशिक्षणार्थीचे अर्ज कमी प्रमाणात प्राप्त झाल्यास रिक्त जागा पुरुष उमेदवारांमधून भरण्यात येतील.
  10. प्रशिक्षणार्थी उमेदवार हे मोटार परिवहन अधिनियम तरतूदीनुसार शारिरीक व वैद्यकीयदृष्ट्या पात्र असावा.
  11. अर्जदार यांनी यापूर्वी या योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
  12. अर्जदाराकडे हलके मोटार वाहन चालक परवाना (license) असल्यास, असे अर्जदार या योजनेत जड वाहन परवान्याखेरीज लाभ घेण्यास पात्र राहणार नाहीत.
  13. सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण हे स्थानिक वर्तमानपत्रात जाहीर प्रसिध्दीस देऊन इच्छूक उमेदवारांचे विहीत नमुन्यात अर्ज मागवत. प्राप्त अर्जांची दिनांक निहाय विहीत नमुन्यातील वहीमध्ये नोंद करण्यात येईल. त्या अनुषंगाने खालील प्रमाणे कार्यवाही केली जाईल.

अ) प्राप्त झालेल्या अर्जांची कार्यालय स्तरावर छानणी करण्यात यावी व पात्र लाभार्थ्यांची यादी तयार करण्यात येईल.
ब) शासनाकडून जिल्हानिहाय उद्दिष्टे प्राप्त झाल्यानंतर, त्यानुसार पात्र लाभार्थ्यांमधून प्रशिक्षणासाठी लाभार्थ्यांची निवड लॉटरी पध्दतीने करुन त्याची यादी व प्रतिक्षा यादी तयार करण्यात येईल. व सदरची यादी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण यांचेमार्फत संबंधीत प्रशिक्षण संस्थेस देण्यात येईल.
क) संबंधीत प्रशिक्षण संस्थेने निवड यादी प्राप्त झाल्यानंतर प्रशिक्षणासाठी हजर राहणेसाठी लाभार्थ्यांना हस्ते पोहच देय डाकेने कळविण्यात येईल. तसेच त्याच्या भ्रमणध्वनीवर एसएमएस वर कळविण्यात येईल.
ड) प्रशिक्षण सत्रासाठी हजर झालेल्या लाभार्थ्याकडून आवश्यक ते बंधपत्र रु. १००/- चे स्टँप पेपरवर करुन घेणे, तसेच इतर अटींची पुर्तता करुन घेण्यात येईल.
इ) संबंधीत संस्थेने निवड यादीतील लाभार्थ्यांची प्रथमतः वैद्यकीय तपासणी जिल्हा सामान्य रुग्ण्यालय / ग्रामीण रुग्णालय, महानगरपालिका व नगरपालिकेच्या रुग्णालयामध्ये करण्यात येईल व त्यामध्ये वैद्यकीयदृष्ट्या पात्र ठरणाऱ्या उमेदवारांनाच प्रशिक्षण सत्रासाठी रुजू करुन घेण्यात येईल.
(ई) निवड समितीने तयार केलेली निवड यादी व प्रतिक्षा यादी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण यांचे स्वाक्षरीने संबंधीत संस्थेस देण्यात येईल. निवड यादीतील उमेदवार विहीत मुदतीत हजर न झाल्यास प्रतिक्षा यादीतील उमेदवारांना अनुक्रमांकानुसार प्रशिक्षणासाठी बोलविण्यात येईल.

14. अर्जदाराची प्रशिक्षणासाठी निवड झाल्यानंतर मध्येच प्रशिक्षण सोडता येणार नाही, तसे केल्यास झालेला खर्च उमेदवारांकडून वसूलपात्र राहील. व तसे बंधपत्र प्रशिक्षणार्थीकडून घेणे बंधनकारक राहील.

मोटार वाहन चालक प्रशिक्षण योजनेसाठी आवश्यक पात्रता
  • अर्जदार नागरिक हा महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवाशी असणे आवश्यक आहे.
मोटार वाहन चालक प्रशिक्षण योजनेच्या अटी व शर्ती
  • प्रशिक्षणार्थी उमेदवार हा मोटार परिवहन अधिनियम तरतुदीनुसार वयोमर्यादा, शैक्षणिक अहर्ता, शारीरिक पात्रता, जातीचा दाखल इत्यादी बाबींची पूर्तता करणारा असावा.
  • मोटार वाहन प्रशिक्षण योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्र राज्यातील नागरिकांनाच देण्यात येईल.
  • महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील नागरिकांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
  • प्रशिक्षणार्थी हा महाराष्ट्र राज्याचा कायमस्वरुपी रहिवासी असावा.
  • अर्जदार अनुसूचित जाती,अनुसूचित जमाती,इतर मागास वर्गीय प्रवर्गाचा असावा.
  • अर्जदाराचे वय जाहिरात प्रसिध्द केल्याच्या दिनांकास हलके वाहन चालक परवाना करीता वय 18 वर्षे पुर्ण, तर जड वाहन चालक परवाना करीता वय 20 वर्षे पूर्ण असावे. वरील दोन्ही परवान्यांसाठी अर्जदाराची कमाल वयोमर्यादा 35 वर्षे राहील.
  • ज्या उमेदवारास जड वाहन परवाना प्रशिक्षण घ्यावयाचे आहे, त्याचे कडे हलके मोटार वाहन परवाना (ट्रान्सपोर्ट) 1 वर्षे पूर्ण झालेले असणे आवश्यक आहे.
  • अर्जदार हा किमान इयत्ता 8वी उत्तीर्ण व बेरोजगार असावा.
  • अर्जदाराचे वास्तव्य हे संबंधीत जिल्ह्यातील असणे बंधनकारक आहे. त्यासाठी वास्तव्याच्या ठिकाणचे पालक /स्वत:च्या नावावरील रेशनकार्ड/विद्युत देयक/ आधारकार्ड इत्यादी कागदपत्रे सादर करणे बंधनकारक आहे.
  • अर्जदाराच्या वडिलांचे सर्व मार्गांनी मिळणारे वार्षिक उत्पन्न 2.50 लाख पेक्षा जास्त नसावे. त्या पुष्टर्थ सक्षम प्राधिकारी (तहसिलदार) यांचा उत्पन्नाचा दाखला सादर करण्यात यावा.
  • अर्जदार हा अनुसूचित जाती व नवबौध्द घटक वर्गातील असल्याबाबत जातीचे विहीत प्रमाणपत्र दाखल करणे बंधनकारक राहील.
  • एकूण उद्दिष्टांपैकी हलके मोटार वाहन प्रशिक्षणासाठी 10% जागा महिलांसाठी आरक्षित राहतील. तथापी, महिला प्रशिक्षणार्थीचे अर्ज कमी प्रमाणात प्राप्त झाल्यास रिक्त जागा पुरुष उमेदवारांमधून भरण्यात येतील.
  • प्रशिक्षणार्थी उमेदवार हे मोटार परिवहन अधिनियम तरतूदीनुसार शारिरीक व वैद्यकीयदृष्ट्या पात्र असावा.
  • अर्जदार यांनी यापूर्वी या योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
  • अर्जदाराकडे हलके मोटार वाहन चालक परवाना (license) असल्यास, असे अर्जदार या योजनेत जड वाहन परवान्याखेरीज लाभ घेण्यास पात्र राहणार नाहीत.
मोटार वाहन चालक प्रशिक्षण योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
  • अर्जदाराचे आधार कार्ड
  • महाराष्ट्र राज्याचा वास्तव्याचा पुरावा
  • रहिवाशी पुरावा
  • राशन कार्ड प्रत
  • पासपोर्ट आकाराचे फोटो
  • शिक्षण प्रमाणपत्र
  • अर्जदाराचे जन्म प्रमाणपत्र / शाळा सोडल्याचा दाखला
  • अर्जदाराचा जातीचा दाखला
  • मेडिकल प्रमाणपत्र
मोटार वाहन चालक प्रशिक्षण योजनेअंतर्गत अर्ज रद्द होण्याची कारणे
  • अर्जदार व्यक्ती महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी नसल्यास अर्ज रद्द केला जाईल.
  • अर्जदार व्यक्ती आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील नसल्यास अर्ज रद्द केला जाईल.
  • अर्जदाराने अर्जात खोटी माहिती भरल्यास अर्ज रद्द केला जाईल.
  • एकाच वेळी दोन अर्ज केल्यास एक अर्ज रद्द केला जाईल.
  • अर्जदाराचे वय 18 वर्षापेक्षा कमी आणि 35 वर्षापेक्षा जास्त असल्यास अर्ज रद्द केला जाईल.
  • अर्जदार कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त असल्यास अर्ज रद्द केला जाईल.
  • अर्जदार शारिरीक दृष्ट्या विकलांग असल्यास अर्ज रद्द केला जाईल.
मोटार वाहन चालक प्रशिक्षण अर्ज करण्याची पद्धत

मोटार वाहन चालक प्रशिक्षण योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराने त्याच्या जवळच्या संबधित जिल्ह्याचे विशेष जिल्हा समाजकल्याण अधिकारी कार्यालयात जाऊन सदर योजनेचा अर्ज घ्यावा व अर्जात विचारलेली सर्व माहिती योग्य प्रकारे भरून सोबत विचारलेल्या कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रति जोडाव्यात व अर्ज जमा करावा.संबंधित योजनेचे अधिकारी अर्ज आणि कागदपत्रांची पडताळणी करून अर्जदारास काही दिवसात कळवतील.

संपर्क

संबंधित केंद्राचे प्रभारी प्रमुख, संबंधित प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय

Telegram Group 1Join
Telegram Group 2Join
Facebook Page 1Follow
Facebook Page 2Follow
Motar Driving Training FormDownload

महाराष्ट्र शासनाच्या इतर योजना

आंतरजातीय विवाह अनुदान महाराष्ट्र शासन PDF
ई पीक पाहणी
ई पीक पाहणी नोंदणी
महाज्योती फ्री टॅबलेट योजना
अहिल्यादेवी सिंचन विहीर योजना
दोन मुलींसाठी योजना
लहान मुलींसाठी योजना
रोजगार संगम योजना
बचत गटाचे फायदे
बचत गटाचे नियम
महिला बचत गट नावे
महिला बचत गट नोंदणी अर्ज
बचत गट ठराव नमुना PDF
पुरुष बचत गट नावे
शिवभोजन योजना
पिवळ्या रेशन कार्ड चे फायदे
ग्रामीण कुटीर उद्योग
चंदन कन्या योजना
शेतकरी योजना
बॅच बिल्ला काढण्याची पद्धत
जलयुक्त शिवार योजना
पारंपारिक वस्त्रोद्योग विणकरांना बक्षीस योजना
अण्णासाहेब पाटील कर्ज योजना
अण्णासाहेब पाटील महामंडळ कर्ज योजना कागदपत्रे
लेक लाडकी योजना
कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना
मिनी ट्रॅक्टर व त्यांची उपसाधने यांचा पुरवठा करणे ची योजना
राजे यशवंतराव होळकर महामेष योजना
विहीर अनुदान योजना
मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजना
महिला सन्मान योजना
महाराष्ट्र मुख्यमंत्री किसान योजना
निर्धूर चुल वाटप योजना
Baby Care Kit Yojana
महिला बचत गट समृद्धी कर्ज योजना
थेट कर्ज योजना
प्रधानमंत्री पीक विमा योजना
चर्मकार समाज योजना
गाय म्हैस शेळी मेंढी पालन अनुदान योजना
अटल बांबू समृद्धी योजना
महिला स्वयंसिद्धी व्याज परतावा योजना
मध केंद्र योजना
राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना
शौचालय अनुदान योजना
जिव्हाळा कर्ज योजना
डिजल पंप सब्सिडी योजना
मल्चिंग पेपर योजना
राष्ट्रीय वयोश्री योजना
खावटी अनुदान योजना
मुख्यमंत्री रोजगार निर्मिति योजना
शबरी घरकुल योजना
प्रधानमंत्री मुद्रा योजना
पंडित दिनदयाळ उपाध्याय स्वयंम योजना
वसंतराव नाईक कर्ज योजना
कृषी ड्रोन अनुदान योजना
बांधकाम कामगार योजना
संजय गांधी निराधार योजना
आचार्य बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजना
सायकल वाटप योजना
वीरभद्रकाली ताराराणी स्वयंसिद्धा योजना
प्रधानमंत्री स्वामित्व योजना
प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना
रुफटॉप सोलर योजना
श्रावणबाळ अनुदान योजना
सैनिक शाळेतील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता योजना 
गटई स्टॉल योजना
राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना
प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना
प्रधानमंत्री जीवन ज्योति बीमा योजना
गाय गोठा अनुदान योजना
डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना
शेळी मेंढी पालन योजना
ट्रॅक्टर अनुदान योजना
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना
सुकन्या समृद्धी योजना
प्रधानमंत्री मातृ वंदना योजना
किशोरी शक्ती योजना
माझी कन्या भाग्यश्री योजना
बाल संगोपन योजना
फ्री सिलाई मशीन योजना
पीएमसी महिला आणि बालकल्याण योजना
रमाई घरकुल योजना
महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजना
पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा
युवकांना विविध व्यावसायिक प्रशिक्षण योजना
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मोफत सायकल वाटप योजना
अपंग बस सवलत योजना
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना
आंतरजातीय विवाह योजना
मोटार वाहन चालक प्रशिक्षण योजना
कोरोना मृतांच्या नातेवाईकांना 50 हजारांची मदत
शैक्षणिक कर्ज योजना
आम आदमी विमा योजना
महाडीबीटी शिष्यवृत्ती
सावित्रीबाई फुले स्कॉलरशिप
पॅन कार्ड क्लब क्लेम करण्याची पद्धत
प्रधानमंत्री किसान हेल्पलाईन नंबर
पोस्ट ऑफिस ग्राम सुरक्षा योजना
दहीहंडी विमा योजना
शरद पवार इन्स्पायर फेलोशिप
विद्याधन स्कॉलरशिप
मेडले फार्मा शिष्यवृत्ती
इंडिया स्माइलिंग फाउंडेशनल शिष्यवृत्ती कार्यक्रम
मुख्यमंत्री अप्रेंटिसशिप योजना
एचडीएफसी लिमिटेड बढते कदम शिष्यवृत्ती
मर्क इंडिया चॅरिटेबल ट्रस्ट शिष्यवृत्ती कार्यक्रम

8 thoughts on “मोटार वाहन चालक प्रशिक्षण योजना महाराष्ट्र 2025”

  1. मला ड्रायव्हिंग शिकायची इच्छा आहे.मी फॉर्म कुठे आणि कसा भरून?

    • वाहन चालक प्रशिक्षण घेण्यासाठी तुम्हला तुमच्या क्षेत्रातील नगर पालिका कार्यालय जावे लागे व सामाजिक न्याय विभागात जाऊन सदर योजनेचा अर्ज घेऊन तो भरून जमा करावा लागेल.
      अर्ज जमा केल्यावर १ महिन्याच्या आत तुम्हाला फोन करून संपर्क केला जाईल.

  2. नमस्ते सर/ मॅम,

    माझं नाव किरण / मनीषा बावधनकर.
    मी मुळची कोल्हापूरची आहे. सध्या पुणे शहरांत हॉस्टेल वर राहते आहे. बेरोजगार असून ड्रायव्हिंग शिकायची आहे. जेणेकरून ड्रायव्हिंग क्षेत्रात काही उदरनिर्वाहचा पर्याय शोधू शकेन.
    माझ्याकडे LMV लायसन्स आहे.
    पण प्रॅक्टिस हवी आहे.
    तसेच अवजड वाहन लायसन्स देखील काढायचे आहे.

    पुणे शहरांत मला या योजनेचा फायदा घेता येईल का?
    मला ड्रायव्हिंग शिकायची नितांत गरज आहे.
    कृपया योग्य ते मार्गदर्शन करावे, आपणांस नम्र विनंती.

    -किरण / मनीषा बावदनकर.

    • तुम्ही मोटर वाहन चालक प्रशिक्षण योजनेचा नक्की लाभ मिळवू शकता त्यासाठी तुम्हाला अर्ज करणे आवश्यक आहे.
      अर्ज केल्यानंतर अधिकाऱ्यांमार्फत तुमच्या अर्जाची तसेच कागदपत्रांची तपासणी केली जाईल व तुम्ही पात्र ठरल्यास तुम्हाला या योजनेअंतर्गत मोफत वाहन चालक प्रशिक्षण दिले जाईल सोबत वाहन चालवण्याचा परवाना देखील दिला जाईल.

  3. बरं.
    आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल मनःपुर्वक आभारी आहे.

    माफ करा.. पण मला एक दोन गोष्टी समजू शकल्या नाहीत.

    1. माझ्या आधार कार्ड वर कोल्हापूरचा पत्ता आहे. तर पुण्यात या योजनेचा लाभ मिळू शकेल का?

    2. LMV लायसन्स आहे. पण प्रॅक्टिस मिळू शकेल का? की या योजने अंतर्गत पुन्हा लायसन्स काढता येऊ शकेल?

    3. की already LMV लायसन्स असताना फक्त हेवी लायसन्स चा लाभ मिळेल?

    4. सध्या मी एका अपंग मुलांच्या छोट्या शाळेत दुपार नंतर क्रीडा खेळ शिकवायला जाते आहे. तर ती वेळ सांभाळून सहकार्य केलं जाऊ शकेल का?

    माफ करा पण पुणे शहरामध्ये सगळं काही वेळ सांभाळून करावं लागतं म्हणून विचारते आहे.

    – आपली विश्वासू,
    मनीषा / किरण बावदनकर.
    9158858318

    • या योजनेअंतर्गत फक्त नवीन चालक प्रशिक्षणाचा लाभ दिला जातो तसेच काही वेळा अधिकारी हे अर्जदाराच्या घरी प्रत्यक्ष भेट देऊन त्याच्या कुटुंबाच्या आर्थिक परिस्थितीची पडताळणी करतात व त्या नंतरच या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी पात्र ठरवले जाते.

  4. आपण या योजनेचा फॉर्म वर्षभरात कधीही भरू शकतो का…? कि काही ठराविक वेळ आहे हा फॉर्म भरून सबमिट करण्यासाठी…?

Comments are closed.

Join WhatsApp Group!