महाराष्ट्र शासन राज्यातील प्रत्येक कुटुंबाचे जीवनमान सुधारावे तसेच त्यांचा आर्थिक तसेच सामाजिक विकास व्हावा या उद्देशाने विविध योजनांची सुरुवात करत असते. त्याचप्रमाणे सरकार ने दोन मुलींसाठी देखील योजनांची सुरुवात केलेली आहे ज्याची माहिती आपण जाणून घेणार आहोत.
योजनेचे नाव | दोन मुलींसाठी योजना |
राज्य | महाराष्ट्र |
उद्दिष्ट | मुलीचा सामाजिक, आर्थिक विकास करणे |
लाभार्थी | राज्यातील मुली |
लाभ | विविध प्रकारचे लाभ |
माझी कन्या भाग्यश्री योजना – मुलगी जन्माला येताच लखपती’ करणारी योजना
महाराष्ट्र राज्यामध्ये मुलींचे शिक्षण, आरोग्य यामध्ये सुधारणा करणे त्यांच्या उज्ज्वल भविष्याकरीता आर्थिक तरतूद करणे, बालिका भ्रुणहत्या रोखणे, मुलींच्या जन्माबाबत समाजामध्ये सकारात्मक विचार आणणे, बालविवाह रोखणे आणि मुलां इतका मुलींचा जन्मदर वाढविणे, मुलींना आर्थिकदृष्ट्या बळकट करणे तसेच मुलींमध्ये योग्य बदल घडवून आणणे या उद्देशाने दिनांक 1 जानेवारी 2014 पासून माझी कन्या भाग्यश्री योजना सुरु करण्यात आली.
महाराष्ट्र राज्यात बहुतांश कुटुंबे हि दारिद्रय रेषेखाली स्वतःचे जीवन जगत आहेत त्यामुळे ते आपल्या कुटुंबाच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी असमर्थ असतात त्यामुळे स्वतःच्या मुलींना योग्य शिक्षण देणे त्यांना शक्य होत नाही. तसेच आपल्या देशात मुलींना कमी महत्त्व दिले जाते त्यामुळे भ्रूणहत्येचे प्रमाण वाढते तसेच मुलींना शिक्षणापासून वंचित ठेवण्यात येते असे नकारात्मक विचारांना बदलण्यासाठी महाराष्ट्र शासनाने माझी कन्या भाग्यश्री योजना ची सुरुवात करण्याचा एक महत्वपूर्ण निर्णय घेतला.
या योजनेचा मुख्य उद्देश राज्यातील मुलींचा जन्मदर वाढविणे, त्यांच्या आरोग्याचा दर्जा उंचावणे, त्यांना शिक्षण देणे व बालविवाहास प्रतिबंध करणे.
योजनेच्या अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
बाल संगोपन योजना महाराष्ट्र:
0 ते 18 वयोगटातील अनाथ, निराश्रित, बेघर व अन्य प्रकारे आपत्तीत असलेले (Crisis) बालकांचे संस्थाबाह्य आणि कौटुंबिक वातावरणात संगोपन व्हावे, यादृष्टीने बालसंगोपन योजना राबविण्यात येते.
जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्याकडे गृह भेटी देण्यासाठी व इतर संनियंत्रण करण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ व परिविक्षा अधिकारी नसतांना सुध्दा त्यांच्यामार्फत सरळ हजारो बालकांना बालसंगोपन योजनेचा लाभ देण्यात येत आहे
बाल संगोपन योजनेची सुरुवात 2005 साली करण्यात आली. या योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील अनाथ, निराधार, बेघर व शारीरिक व्यंग किंवा इतर आपत्ती असलेल्या बालकांच्या संगोपनासाठी मासिक अनुदान दिले जाते जेणेकरून अशा मुलांना आपल्या दैनंदिन गरजांसाठी इतर कोणावर अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही.
योजनेच्या अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
किशोरी शक्ती योजना:
या योजनेअंतर्गत 11 ते 18 वर्ष वयोगटातील ग्रामीण / आदिवासी आणि नागरी क्षेत्रातील मुलींना अंगणवाडी सेविकांच्या मदतीने पोषण आरोग्यविषयक दर्जा, स्वच्छता, अनौपचारिक शिक्षण प्रशिक्षण इत्यादी विषयांवर संपूर्ण माहिती दिली जाते. मुलींना शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या प्रबळ बनविण्यासाठी महाराष्ट्र शासनाने या योजनेची सुरुवात केली आहे.
राज्यातील बहुतांश कुटुंबे दारिद्रय रेषेखाली स्वतःचे जीवन जगत असतात त्यामुळे अशा कुटुंबांना आपल्या कुटुंबाच्या गरजा पूर्ण करणे शक्य नसते त्यामुळे ते आपल्या मुलींचे आरोग्य त्यांचे शिक्षण तसेच त्यांना योग्य आहार देण्यास असमर्थ असतात. या सर्व गोष्टींचा विचार करून महाराष्ट्र शासनाने राज्यातील मुलींच्या उज्वल भविष्यासाठी महाराष्ट्र किशोरी शक्ती योजना सुरु करण्याचा एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
योजनेच्या अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
सुकन्या समृद्धी योजना:
सुकन्या समृद्धी योजना केंद्र सरकार द्वारे 22 जानेवारी 2015 साली माननीय नरेंद्र मोदी यांच्या हस्ते “बेटी बचाओ बेटी पढाओ” या अभियानाअंतर्गत सुरू करण्यात आलेली मुलींसाठी एक महत्त्वाकांक्षी योजना आहे ही केंद्र सरकारची सर्वात कमी गुंतवणुकीची विशेष करून मुलींसाठी बचत योजना आहे मुलीचे शिक्षण, आरोग्य, मुलीचे लग्न तसेच त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी ही एक अतिशय फायदेशीर बचत योजना आहे.
सुकन्या समृद्धी योजनेत दरवर्षी किमान 250/- रुपये व अधिकतम १.५ लाख गुंतवणूक करून या योजनेचा लाभ घेता येतो. सुकन्या समृद्धी योजना खाते उघडल्यापासून ते मुलीचे वय 21 वर्षे पूर्ण झाल्यावर जमा रक्कम व्याजासकट मुलीच्या आई-वडिलांना दिली जाते.
योजनेच्या अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
लेक लाडकी योजना:
आज देखील समाजात मुलींना मुलांपेक्षा कमी महत्व दिले जाते त्यामुळे मुलींची भ्रूणहत्या केली जाते तसेच मुलींच्या शिक्षणाला कमी महत्व दिले जाते व मुलींना कुटुंबाचे ओझे समजले जाते. त्यामुळे राज्यातील मुलींच्या या सर्व समस्यांचा विचार करून समाजात मुलींबद्दल असलेले नकारात्मक विचार बदलून ते सकारात्मक करण्याच्या दृष्टीने तसेच मुलींच्या सक्षमीकरणासाठी तसेच त्यांना शिक्षणासाठी सशक्त व आत्मनिर्भर बनविण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र शासनाने लेक लाडकी योजना सुरु करण्याचा एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
योजनेच्या अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
Telegram Group | Click Here |