राज्यातील 65 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील निवृत्त आणि गरजू स्त्री आणि पुरुषांना त्यांच्या वृद्ध काळात आर्थिक सहाय्य देण्याच्या उद्देशाने 2001 मध्ये महाराष्ट्र शानसांद्वारे सुरु करण्यात आलेली योजना आहे.
या योजनेअंतर्गत लाभार्थ्याला दरमहा 1500/- रुपयांचे आर्थिक सहाय्य दिले जाते.
श्रावणबाळ योजना अंतर्गत अर्ज करताना अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी लागतात त्याची माहिती आम्ही खाली दिलेली आहे.
श्रावणबाळ योजना कागदपत्रे:
- विहीत नमुन्यातील अर्ज: आपल्या क्षेत्रातील ग्रामपंचायत कार्यालय, तलाठी,कार्यालय किंवा तहसील कार्यालयातून अर्ज घ्यावा.
- वयाचा दाखला: शाळा सोडल्याचा दाखला
- उत्पन्नाचा दाखला: ग्रामसेवक/तलाठी यांचेकडून मिळालेला वार्षिक उत्पन्नाचा दाखला
- रहिवासी दाखला
- स्वयं घोषणापत्र
- आधार कार्ड
- बँक खाते क्रमांक
- पासपोर्ट आकाराचा फोटो
आवश्यक पात्रता:
- अर्जदार व्यक्ती महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवाशी असणे आवश्यक आहे.
- अर्जदार बीपीएल कुटुंबातील असणे आवश्यक आहे
- अर्जदार व्यक्तीचे वय 65 वर्षांपेक्षा जास्त असणे गरजेचे आहे.
- अर्जदार हा निवृत्त असावा तसेच त्याला इतर कोणत्याही मार्गाने नियमित उत्पन्न मिळत नसावे.
- कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1 लाखापेक्षा जास्त असता कामा नये.
Join Telegram Channel | Click Here |