दहीहंडी विमा योजना महाराष्ट्र 2024: राज्यात दरवर्षी दहीहंडी उत्सव मोठ्या प्रमाणावर आयोजित करण्यात येतो. दहीहंडी उत्सव साजरा करतांना मानवी मनोरे रचतांना धोका असल्याचे निरीक्षण न्यायालय, प्रशासन व अन्य संस्थानी वारंवार केलेले आहे. मात्र लोकोत्सव साजरा करण्यासाठी परंपरा जपणे हे महत्त्वाचे असल्याने, अनेक गोविंदा पथक त्यामध्ये सहभागी होतात.दहीहंडी उत्सवात सहभागी होत असताना बऱ्याच वेळेस अपघात/दुर्घटना होतात. काही वेळा पथकातील गोविंदांचा अपघाती मृत्यू अथवा गंभीर दुखापत होऊन जीवाला धोका निर्माण होतो. परिणामी या गोविंदांना व कुटुंबियांना उर्वरित आयुष्य आर्थिक विवंचनेत व्यतीत करावे लागते. यानुषंगाने राज्यात दहीहंडी उत्सवात सहभागी होऊन मानवी मनोरे रचणाऱ्या गोविंदांचा विमा उतरवून त्यांना आर्थिक संरक्षण देण्याच्या उद्देश्याने दहीहंडी आर्थिक सहाय्य योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
दहिहंडी उत्सव मधील सहभागी गोविंदाना मानवी मनोरे रचताना अपघात / दुर्घटना होण्याची शक्यता असते. काही वेळा गोविंदा पथकातील गोविंदाचा दुर्दैवी अपघाती मृत्यू घडून येतो किंवा गंभीर दुखापत होऊन जीवाला धोका निर्माण होतो. परिणामी अपघातग्रस्त गोविंदाना व त्यांच्या कुटूंबियांना आर्थिक विवंचनेला सामोरे जावे लागते. सन २०२३ प्रमाणे सन २०२४ मध्ये दहीहंडी उत्सवा दरम्यान मानवी मनोरे रचणाऱ्या राज्यातील ७५००० गोविंदांना खालीलप्रमाणे विमा संरक्षण देण्यास याद्वारे मान्यता देण्यात येत आहे.
विवरण | विमा संरक्षण |
अपघाती मृत्यू | 10 लाख रुपये |
दोन अवयव किंवा दोन डोळे गमावल्यास | 10 लाख रुपये |
एक हाथ, एक पाय किंवा एक डोळा गमावल्यास | 5 लाख रुपये |
कायमस्वरूपी पूर्ण अपंगत्व | 10 लाख रुपये |
कायम अपूर्ण/पक्षपाती अपंगत्व | विमा पॉलीसी मध्ये नमूद केलेल्या टक्केवारीनुसार |
अपघातामुळे रुग्णालयीन खर्च | प्रत्यक्षात झालेला खर्च किंवा जास्तीत जास्त 1 लाख रुपये |
दहीहंडी पथकास आर्थिक सहाय्य योजनेचा उद्देश्य
राज्यात दहीहंडी उत्सवात सहभागी होऊन मानवी मनोरे रचणाऱ्या गोविंदांचा विमा उतरवून त्यांना आर्थिक संरक्षण देण्याच्या उद्देश्याने दहीहंडी आर्थिक सहाय्य योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
दहीहंडी पथकास आर्थिक सहाय्य योजनेची वैशिष्ट्ये
- दहीहंडी पथकास आर्थिक सहाय्य योजना महाराष्ट्र सरकारद्वारे सुरु करण्यात आली आहे.
- महाराष्ट्र राज्यातील दहीहंडी पथकाची आर्थिक सहाय्य देण्याच्या उद्देशाने सुरु करण्यात आलेली एक महत्वपूर्ण योजना आहे.
दहीहंडी उत्सवामध्ये सहभागी गोविंदा पथकांकडून मानवी मनोरे रचताना अपघात झाल्यास व त्यामध्ये गोविंदांचा मृत्यु झाल्यास अथवा त्यांना गंभीर दुखापत होऊन अवयव निकामी झाल्यास अशा गोविंदांना/कायदेशीर वारसास मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून खालील प्रमाणे आर्थिक सहाय्य देण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे
- गोविंदा पथकातील सहभागी खेळाडू प्रत्यक्ष दहीहंडीच्या थरावरुन /मानवी मनोन्यावरून पडल्याने मृत्यु पावल्यास त्या खेळाडूच्या कायदेशीर वारसास रुपये १० लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्यात येईल.
- गोविंदा पथकातील सहभागी खेळाडू प्रत्यक्ष दहीहंडीच्या थरावरुन/मानवी मनोऱ्यावरून पडल्याने त्याचे दोन्ही डोळे अथवा दोन्ही हात अथवा दोन्ही पाय अथवा कोणतेही महत्वाचे दोन अवयव निकामी झाल्यास त्यास ७.५० लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्यात येईल.
- गोविंदा पथकातील सहभागी खेळाडू प्रत्यक्ष दहीहंडीच्या थरावरुन/मानवी मनोन्यावरून पडल्याने त्याचा एक डोळा अथवा एक हात अथवा एक पाय अथवा कोणताही महत्वाचा एक अवयव निकामी झाल्यास अथवा गंभीर इजा झाल्यास त्यास ५ लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्यात येईल.
- दहीहंडी उत्सवामध्ये सहभागी गोविंदांना वरील प्रमाणे आर्थिक सहाय्य करण्यासंदर्भात अटी व शर्ती या शासन निर्णयासोबतच्या नमुद केल्यानुसार राहतील. या शासन निर्णयानुसार आर्थिक सहाय्यास पात्र असणा-या गोविंदांना अर्थ सहाय्य करण्यासंबंधीचा प्रस्ताव सादर करण्याची कार्यपध्दती, अर्जाचे स्वरुप व सहपत्रे याबाबतचे आदेश स्वतंत्रपणे देण्यात येतील.
दहीहंडी पथक आर्थिक सहाय्य योजनेसाठी आवश्यक पात्रता
- अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असणे आवश्यक आहे
दहीहंडी उत्सवादरम्यान मानवी मनोरे तयार करतांना दुर्घटनाग्रस्त झालेल्या गोविंदांना आर्थिक सहाय्य करण्यासंदर्भातील अटी व शर्ती
- महाराष्ट्र राज्यात आयोजित करण्यात येणाऱ्या दहीहंडी उत्सवामध्ये प्रत्यक्ष सहभागी असलेल्या अपघातग्रस्त गोविंदांना सदर आर्थिक सहाय्य अनुज्ञेय राहील.
- दहीहंडी उत्सवाचे आयोजन करणाऱ्या आयोजक संस्थेने. या आयोजनासाठी स्थानिक प्रशासनाच्या तसेच अन्य आवश्यक परवानग्या घेणे आवश्यक राहील.
- दहीहंडी आयोजनासंदर्भात मा.न्यायालय, प्रशासन, पोलिस यंत्रणा यांचेकडून वेळावेळी देण्यात येणाऱ्या सुचना / आदेश यांचे आयोजक संस्था तसेच सहभागी गोविंदा पथक यांनी पालन केले असणे आवश्यक राहील.
- दहीहंडी उत्सवात सहभागी होणाऱ्या पथकामधील गोविंदांचे मानवी मनोरे तयार करण्याबाबत संबधित पथकातील सदस्यांनी औपचारीक अथवा अनौपचारीक प्रशिक्षण घेतले असल्याचे आयोजकांनी खात्री करून घ्यावी.
- सदर उत्सव आयोजित करणाऱ्या संस्थेने, सहभागी गोविंदांच्या सुरक्षेची काळजी घेणाऱ्या सर्व उपाययोजना केलेल्या असाव्यात.
- दहीहंडी उत्सवादरम्यान मानवी मनोरे तयार करत असतांना अपघात होऊन गोविंदांचा मृत्यू/गोविंदांना दुखापत झाल्यास सदर आर्थिक सहाय्य अनुज्ञेय राहील. मानवी मनोरे तयार करण्याव्यतिरिक्त अन्य कारणांमुळे अपघात / दुर्घटना झाल्यास सदर आर्थिक सहाय्य अनुज्ञेय राहणार नाही.
- दहीहंडी उत्सवामध्ये सहभागी होणाऱ्या गोविंदांबाबत शासन निर्णय महिला व बाल विकास विभाग दि. २४ ऑगस्ट, २०१६ नुसार विहीत केलेल्या वयोमर्यादेचे पालन करणे बंधनकारक आहे. सबब १८ वर्षापेक्षा कमी वयाच्या सहभागी गोविंदाबाबत सदर आर्थिक सहाय्य अनुज्ञेय राहणार नाही.
- दहीहंडी उत्सवामध्ये मानवी मनोरे रचतांना अपघात झाल्यास गोविंदांना तात्काळ वैद्यकीय मदत देण्याबाबत आयोजकांनी स्थानिक प्रशासनाच्या सहाय्याने आवश्यक ती कार्यवाही करावी.
- दहीहंडी उत्सवामध्ये मानवी मनोरे रचतांना झालेल्या अपघाताबाबत आयोजकांनी तात्काळ स्थानिक प्रशासन तसेच संबंधित पोलिस यंत्रणा यांचेकडे तात्काळ अहवाल सादर करणे आवश्यक राहील.
- हा आदेश केवळ चालू वर्षासाठी (सन २०२२) लागू राहतील. दहीहंडी उत्सवामध्ये सहभागी होणाऱ्या गोविंदांचा विमा उतरविणे याबाबत निर्णय स्वतंत्रपणे घेण्यात येईल.
Telegram Group | Join |
शासन निर्णय 1 | Click Here |
शासन निर्णय 2 | Click Here |