सायकल वाटप योजना महाराष्ट्र 2024

या योजनेअंतर्गत राज्यातील दुर्गम भागातील शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना सायकल घेण्यासाठी आर्थिक सहाय्य केले जाते.

सायकल वाटप योजना महाराष्ट्र: महाराष्ट्रात अति दुर्गम भागात जेथे सुयोग्य रस्ते नाहीत तसेच वाहतुकीची पुरेशी साधने नाहीत अशा भागात विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी तसेच शाळेतून घरी परत येण्यासाठी खूप परिश्रम घ्यावे लागतात त्यांना उन्हातून मैलो न मैल चालत जावे लागते त्यामुळे त्यांना शाळेत जायला व परत यायला पुष्कळ वेळ लागतो त्यामुळे पुष्कळ विद्यार्थी आपले शालेय शिक्षण सोडून देतात व ते शिक्षणापासून वंचित राहतात. राज्यातील ग्रामीण भागात आज सुद्धा पुष्कळ कुटुंबे हि दारिद्र्य रेषेखाली आपले जीवन जगत असतात त्यामुळे ते आपल्या कुटुंबाच्या गरज पूर्ण करण्यासाठी असमर्थ असतात त्यामुळे आपल्या मुलांना सायकल घेण्यासाठी त्यांच्याजवळ पुरेसे पैसे नसतात या सर्व गोष्टींचा विचार करून महाराष्ट्र शासनाने राज्यातील ज्या ग्रामीण भागात विद्यार्थ्यांचे घर आणि शाळा या मधील अंतर 5 किलोमीटर आहे अशा शालेय मुलींना सायकल खरेदीसाठी आर्थिक सहायता करण्याचा निर्णय घेतला आहे.

योजनेचे नावCycle Vatap Yojana Maharashtra
विभागनियोजन विभाग
राज्यमहाराष्ट्र राज्य
उद्देशमुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहित करणे
लाभार्थीग्रामीण भागातील गरजू विद्यार्थिनी
लाभ5,000/- रुपये आर्थिक सहायता
अर्ज करण्याची पद्धतअर्ज करण्याची पद्धत

सायकल अनुदान योजना महाराष्ट्र ची उद्दिष्ट्ये

  1. महाराष्ट्र राज्यातील गरजू मुलींना घरातून शाळेत व शाळेतून घरी येण्यासाठी सायकल वाटप करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश्य आहे जेणेकरून मुलींना शिक्षणासाठी मैलोनमैल पायी चालत जाण्याची गरज भासणार नाही. व त्यामुळे मुलींच्या महत्वपूर्ण वेळेची बचत होईल.
  2. या योजनेचा मुख्य उद्देश राज्यातील दुर्गम भागातील मुलींना शाळेत जाण्यासाठी मोफत सायकल वाटप करणे जेणेकरून मुली शाळेत जाण्यासाठी प्रोत्साहित होतील.
  3. महाराष्ट्र शासनाने राज्यातील दुर्गम भागात राहणाऱ्या मुलींच्या शिक्षणाला चालना देण्यासाठी आणि त्यांची शाळा सोडण्याचा दर कमी करण्यासाठी राजमाता जिजाऊ मोफत सायकल वाटप योजना नावाची योजना सुरू केली आहे.
cycle vatap yojana Maharashtra

सायकल वाटप योजनेची वैशिष्ट्ये

  • सायकल वाटप योजना महाराष्ट्र शासनाकडून सुरु करण्यात आलेली योजना आहे
  • गरजू मुलींना इयत्ता 8वी ते 12वी पर्यंतचा शालेय शिक्षणाच्या कोणत्याही टप्प्यात सायकल खरेदी करण्याची स्वतंत्रता राहील.
  • मुलीच्या कुटुंबाला सायकल घेण्यासाठी कोणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता भासणार नाही किंवा कोणाकडून कर्ज घेण्याची आवश्यकता भासणार नाही.
  • या योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया अत्यंत सोपी ठेवण्यात आली आहे त्यामुळे मुलींना या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी कोणत्याही सरकारी कार्यालयाच्या फेऱ्या मारण्याची आवश्यकता भासणार नाही.
  • सायकल वाटप योजनेअंतर्गत मिळणारी लाभाची राशी DBT च्या सहाय्याने लाभार्थी मुलीच्या बँक खात्यात जमा केली जाते.
  • योजनेअंतर्गत मिळणाऱ्या आर्थिक सहाय्याने मुली सायकल खरेदी करून स्वतःचे शिक्षण पूर्ण करू शकतील व भविष्यात चांगली नोकरी मिळवू शकतील किंवा स्वतःचा स्वरोजगार स्थापित करून राज्यातील इतर बेरोजगार नागरिकांना नोकरीच्या संधी उपलब्ध करू शकतील.

सायकल वाटप योजनेचे फायदे

  • सायकल वाटप योजनेअंतर्गत लाभार्थी मुलींना महाराष्ट्र शासनाकडून सायकल खरेदी करण्यासाठी 5,000/- रुपयांची आर्थिक मदत केली जाईल त्यामुळे कुटुंबाला आपल्या मुलींसाठी सायकल विकत घेण्यासाठी पैशांसाठी कोणावर अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही व कोणाकडून पैसे उधार घेण्याची गरज देखील भासणार नाही.
  • या योजनेच्या सहाय्याने मुलींना शाळेत जाण्यासाठी प्रोत्साहन मिळेल व त्या आपले शिक्षण पूर्ण करू शकतील.
  • या योजनेच्या सहाय्याने मुलींना घरातून शाळेत व शाळेतून घरी येणासाठी पायी चालत जाण्याची गरज लागणार नाही.
  • या योजनेमुळे मुलींच्या वेळेची बचत होईल
  • मुलींना स्वतःचे शिक्षण पूर्ण करण्यास मदत होईल
  • या योजनेअंतर्गत मिळणारी आर्थिक मदत लाभार्थी मुलींच्या बँक खात्यात DBT च्या सहाय्याने जमा केली जाईल.

सायकल वाटप योजनेसाठी आवश्यक पात्रता

  • अर्जदार विद्यार्थिनी महाराष्ट्र राज्याची मूळ रहिवाशी असणे आवश्यक आहे
  • विद्यार्थिनी इयत्ता 8वी ते 12वी वर्गात शिकत असणे आवश्यक आहे

सायकल वाटप योजनेच्या अटी

  • सायकल वाटप योजनेचा लाभ केवळ इयत्ता 8वी ते 12वीत शिकणाऱ्या मुलींना देण्यात येईल
  • या योजनेचा लाभ घ्यायचा असल्यास मुलीच्या शाळेचे घरापासून अंतर 5 किलोमीटर किंवा त्यापेक्षा जास्त असणे आवश्यक आहे
  • सायकल वाटप योजनेअंतर्गत फक्त 5,000/- रुपयांची आर्थिक मदत केली जाईल व त्या वरील सायकलच्या खरेदीसाठी लाभार्थी मुलीस स्वतः जवळची रक्कम भरावी लागेल
  • महाराष्ट्राच्या बाहेरील मुलींना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही
  • लाभार्थी मुलीला इयत्ता 8वी ते 12वी या 4 वर्षांमध्ये सायकल खरेदीसाठी एकदाच अनुदान देय राहील
  • गरजू मुलींना सायकल वाटप करताना जी गावे/वाड्या/तांडे/पाडे हे डोंगराळ व अतिदुर्गम भागात आहेत जिथे जाण्यासाठी योग्य रस्ते नाहीत तथा वाहतुकीची पुरेशी साधने नाहीत/व्यवस्था उपलब्ध नाही अशा ठिकाणी राहणाऱ्या गरजू मुलींना प्राधान्य देण्यात येईल
  • सायकल वाटप योजनेअंतर्गत फक्त मुलींनाच या योजनेचा लाभ दिला जाईल
  • मुलांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
  • सायकल च्या देखभालीचा खर्च लाभार्थ्यास स्वतः करावा लागेल शासनाकडून यासाठी कोणतेच आर्थिक आर्थिक सहकार्य दिले जाणार नाही.

सायकल वाटप योजनेअंतर्गत समाविष्ट शाळा

  • शासकीय शाळा
  • जिल्हा परिषद शाळा
  • शासकीय अनुदानित शाळा
  • तसेच ज्या अनुदानित व शासकीय आश्रमशाळेतील मुलींना डे स्कॉलर प्रवेश दिला जातो व ज्यांना दररोज घरापासून ये जा करावी लागते अशा शाळेच्या मुलींना हि योजना लागू करण्यात येईल

सायकल वाटप योजनेअंतर्गत अनुदान उपलब्ध करण्याचे टप्पे

  • पहिला टप्यात गरजू मुलींच्या राष्ट्रीयकृत बँक खात्यात डी.बी.टी. (Direct Benefit Transfer) द्वारे 3500/- रुपये आगाऊ रक्कम जमा करण्यात येईल.
  • दुसऱ्या टप्प्यात लाभार्थी मुलींनी सायकल खरेदी केल्यानंतर सायकल खरेदीची पावती व इतर कागदपत्रे सादर केल्यानंतर त्यांना उर्वरित 1,500/- रुपये थेट अदा करण्यात येईल.

सायकल वाटप योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • राशन कार्ड
  • निवास प्रमाण पत्र
  • पासपोर्ट साईज फोटो
  • मोबाईल नंबर
  • ई-मेल आयडी
  • बँक खाते
  • विद्यार्थिनी इयत्ता 8वी ते 12वी मध्ये शिकत असल्याचे शाळेचे प्रमाणपत्र
  • सायकल खरेदी पावती

महत्वाच्या गोष्टी

  • ही योजना फक्त मुलींसाठी आहे.
  • एका कुटुंबातील फक्त एका मुलीलाच या योजनेचा लाभ मिळू शकतो.
  • विद्यार्थ्यांनी निवडलेल्या सायकलची किंमत 5000 रुपयांपर्यंत मर्यादित आहे. व उर्वरित रक्कम विद्यार्थ्यांनी स्वतः भरावी लागेल.

सायकल वाटप योजनेसाठी अर्ज करण्याची पद्धत

या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी गरजू विद्यार्थिनीं ना स्वतःच्या शाळेत जाऊन शालेच्या ऑफिसमधून किंवा प्राचार्यांकडून या योजनेचा अर्ज घ्यावा लागेल आणि अर्जात विचारलेली सर्व माहिती आणि आवश्यक कागदपत्रे जोडून सदर अर्ज शाळेत जमा करावा.

किंवा

अर्जदार विद्यार्थिनीला स्वतःच्या जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन नियोजन विभागाला भेट द्यावी लागेल आणि या योजनेचा अर्ज घ्यावा लागेल आणि अर्जात विचारलेली सर्व माहिती आणि आवश्यक कागदपत्रे जोडून अर्ज सदर कार्यालयात जमा करावा
अशा प्रकारे आपल्याला या योजनेचा लाभ घेता येईल.

Telegram GroupJoin
योजनेचा शासन निर्णययेथे क्लिक करा

महाराष्ट्र शासनाच्या इतर योजना

आंतरजातीय विवाह अनुदान महाराष्ट्र शासन PDF
ई पीक पाहणी
ई पीक पाहणी नोंदणी
महाज्योती फ्री टॅबलेट योजना
अहिल्यादेवी सिंचन विहीर योजना
दोन मुलींसाठी योजना
लहान मुलींसाठी योजना
रोजगार संगम योजना
बचत गटाचे फायदे
बचत गटाचे नियम
महिला बचत गट नावे
महिला बचत गट नोंदणी अर्ज
बचत गट ठराव नमुना PDF
पुरुष बचत गट नावे
शिवभोजन योजना
पिवळ्या रेशन कार्ड चे फायदे
ग्रामीण कुटीर उद्योग
चंदन कन्या योजना
शेतकरी योजना
बॅच बिल्ला काढण्याची पद्धत
जलयुक्त शिवार योजना
पारंपारिक वस्त्रोद्योग विणकरांना बक्षीस योजना
अण्णासाहेब पाटील कर्ज योजना
अण्णासाहेब पाटील महामंडळ कर्ज योजना कागदपत्रे
लेक लाडकी योजना
कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना
मिनी ट्रॅक्टर व त्यांची उपसाधने यांचा पुरवठा करणे ची योजना
राजे यशवंतराव होळकर महामेष योजना
विहीर अनुदान योजना
मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजना
महिला सन्मान योजना
महाराष्ट्र मुख्यमंत्री किसान योजना
निर्धूर चुल वाटप योजना
Baby Care Kit Yojana
महिला बचत गट समृद्धी कर्ज योजना
थेट कर्ज योजना
प्रधानमंत्री पीक विमा योजना
चर्मकार समाज योजना
गाय म्हैस शेळी मेंढी पालन अनुदान योजना
अटल बांबू समृद्धी योजना
महिला स्वयंसिद्धी व्याज परतावा योजना
मध केंद्र योजना
राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना
शौचालय अनुदान योजना
जिव्हाळा कर्ज योजना
डिजल पंप सब्सिडी योजना
मल्चिंग पेपर योजना
राष्ट्रीय वयोश्री योजना
खावटी अनुदान योजना
मुख्यमंत्री रोजगार निर्मिति योजना
शबरी घरकुल योजना
प्रधानमंत्री मुद्रा योजना
पंडित दिनदयाळ उपाध्याय स्वयंम योजना
वसंतराव नाईक कर्ज योजना
कृषी ड्रोन अनुदान योजना
बांधकाम कामगार योजना
संजय गांधी निराधार योजना
आचार्य बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजना
सायकल वाटप योजना
वीरभद्रकाली ताराराणी स्वयंसिद्धा योजना
प्रधानमंत्री स्वामित्व योजना
प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना
रुफटॉप सोलर योजना
श्रावणबाळ अनुदान योजना
सैनिक शाळेतील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता योजना 
गटई स्टॉल योजना
राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना
प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना
प्रधानमंत्री जीवन ज्योति बीमा योजना
गाय गोठा अनुदान योजना
डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना
शेळी मेंढी पालन योजना
ट्रॅक्टर अनुदान योजना
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना
सुकन्या समृद्धी योजना
प्रधानमंत्री मातृ वंदना योजना
किशोरी शक्ती योजना
माझी कन्या भाग्यश्री योजना
बाल संगोपन योजना
फ्री सिलाई मशीन योजना
पीएमसी महिला आणि बालकल्याण योजना
रमाई घरकुल योजना
महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजना
पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा
युवकांना विविध व्यावसायिक प्रशिक्षण योजना
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मोफत सायकल वाटप योजना
अपंग बस सवलत योजना
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना
आंतरजातीय विवाह योजना
मोटार वाहन चालक प्रशिक्षण योजना
कोरोना मृतांच्या नातेवाईकांना 50 हजारांची मदत
शैक्षणिक कर्ज योजना
आम आदमी विमा योजना
महाडीबीटी शिष्यवृत्ती
सावित्रीबाई फुले स्कॉलरशिप
पॅन कार्ड क्लब क्लेम करण्याची पद्धत
प्रधानमंत्री किसान हेल्पलाईन नंबर
पोस्ट ऑफिस ग्राम सुरक्षा योजना
दहीहंडी विमा योजना
शरद पवार इन्स्पायर फेलोशिप
विद्याधन स्कॉलरशिप
मेडले फार्मा शिष्यवृत्ती
इंडिया स्माइलिंग फाउंडेशनल शिष्यवृत्ती कार्यक्रम
मुख्यमंत्री अप्रेंटिसशिप योजना
एचडीएफसी लिमिटेड बढते कदम शिष्यवृत्ती
मर्क इंडिया चॅरिटेबल ट्रस्ट शिष्यवृत्ती कार्यक्रम

2 thoughts on “सायकल वाटप योजना महाराष्ट्र 2024”

Comments are closed.

Join WhatsApp Group!