अंतर्गत तरुणांसाठी विविध कार्यक्रम राबविण्यात येतात. तरुणांनी दिवसेंदिवस कमी होत जाणाऱ्या नोकऱ्यांच्या मागे न जात एखादा स्वयंरोजगार करावा तसेच त्यांनी स्वतःच्या पायावर उभे रहावे यासाठी विविध प्रशिक्षण देण्यात येते तसेच स्वयंरोजगार सुरु करण्यासाठी वैयक्तिक 10,000/- रुपये अनुदान आणि आवश्यकतेनुसार व्यवसायांचे किट्स देखील देण्यात येतात.
राज्यात बहुतांश तरुण / तरुणी हे सुशिक्षित आहेत परंतु नोकऱ्यांची कमी उपलब्धता यामुळे त्यांना त्यांच्या शिक्षणानुसार नोकऱ्या उपलब्ध नाहीत त्यामुळे तरुण नोकरीसाठी वणवण फिरत असतो त्यामुळे तरुण/तरुणी यांनी व्यवसाय क्षेत्राकडे वळावे व स्वतःचा एखादा स्वरोजगार सुरु करावा या उद्देशाने व्यावसायिक प्रशिक्षण योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे.
योजनेचे नाव | व्यवसाय प्रशिक्षण योजना |
लाभार्थी | राज्यातील तरुण/तरुणी |
लाभ | व्यवसाय प्रशिक्षण दिले जाते |
उद्देश्य | तरुणांना स्वतःच्या पायावर उभे करणे |
नोंदणी पद्धत | ऑफलाईन |
Vyavsayik Prashikshan Yojana चे उद्दिष्ट
- राज्यातील तरुण-तरुणींना विविध व्यावसायिक प्रशिक्षण देऊन त्यांना स्वयंरोजगार सुरु करण्यास तसेच स्वतःच्या पायावर उभे राहण्यास मदत करणे हा या योजनेमागचा प्रमुख उद्देश आहे.
- युवकांना स्वतःच उद्योग सुरु करण्यासाठी सशक्त व आत्मनिर्भर बनविणे.
- राज्यातील बेरोजगारी कमी करणे.
- राज्यात रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध करणे.
योजनेचे वैशिष्ट्य:
- या योजनेअंतर्गत दिली जाणारी लाभाची राशी लाभार्थी युवकांच्या बँक खात्यात DBT च्या सहाय्याने जमा करण्यात येईल.
योजनेअंतर्गत दिले जाणारे आर्थिक सहाय्य:
- युवकांना स्वतःचा एखादा लघु उद्योग सुरु करण्यासाठी 10 हजारांचे आर्थिक सहाय्य दिले जाते.
योजनेचे लाभार्थी:
- राज्यातील बेरोजगार युवक जे स्वतःचा एखादा उद्योग सुरु करण्यासाठी इच्छुक आहेत.
योजनेअंतर्गत होणारा फायदा:
- या योजनेअंतर्गत तरुण/तरुणींना विविध प्रकारच्या व्यवसायाचे प्रशिक्षण दिले जाते.
- युवकांना स्वतःचा एखादा लघु उद्योग सुरु करण्यासाठी 10 हजारांचे आर्थिक सहाय्य दिले जाते.
- 18 ते 45 वयोगटातील तरुण-तरुणींना मोफत प्रशिक्षण तसेच प्रशिक्षण काळात मासिक बस पास दिला जातो.
- राज्यातील तरुण उद्योग सुरु करण्यासाठी सशक्त तसेच आत्मनिर्भर बनतील.
- राज्यातील बेरोजगारी कमी होईल.
- राज्यात रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील.
आवश्यक पात्रता:
- अर्जदार महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवाशी असणे आवश्यक आहे.
योजनेचे नियम व अटी:
- अर्जदार पुणे महानगरपालिका हद्दीत किमान 3 वर्षे रहिवाशी असणे आवश्यक आहे.
- अर्जदार मागासवर्गीय किंवा अपंग असणे आवश्यक आहे.
- प्रशिक्षणासाठी अर्जदाराला आवश्यक ती अनामत रक्कम भरावी लागेल प्रशिक्षण अर्धवट सोडल्यास अथवा प्रशिक्षणात अनुत्तीर्ण झाल्यास किंवा प्रवेश देवूनही प्रवेश न घेतल्यास अनामत रक्कम जप्त करण्याचा पुणे महानगरपालिकेस अधिकार राहील.
- अर्जदाराच्या कुटुंबाचे सर्व मार्गांनी मिळणारे वार्षिक उत्पन्न 1 लाखापेक्षा कमी असणे आवश्यक आहे.
- एका प्रशिक्षणानंतर पूरक प्रशिक्षण एकापेक्षा जास्त विषयांचे करता येतील.
- अटी व नियम यात बदल करण्याचा / अर्ज नाकारण्याचा अधिकार मा. मुख्य समाज विकास अधिकारी, स.वि.वि. पुणे महानगरपालिका यांचेकडे राहील. तसेच त्यांचा या विषयाबाबत निर्णय अंतिम राहील.
- स्कॅन डॉक्युमेंट्स संलग्न करणे आवश्यक आहे.
- प्रशिक्षण विषयासाठी आवश्यक असलेली शैक्षणिक अर्हता असणे आवश्यक.
- दिनांक 01 मे 2001 नंतर जन्माला आलेल्या व ह्यात अपत्यामुळे कुटुंबाच्या अपत्यांची संख्या 2 पेक्षा जास्त झाल्यास लाभ घेता मिळणार नाही.
आवश्यक कागदपत्रे:
- कुटुंबाचे पुणे महानगरपालिका हद्दीत किमान ३ वर्षे वास्तव्य असल्याचा पुरावा म्हणून मागील ३ वर्षाचा मनपा टॅक्स पावती किंवा लाईट बिल किंवा टेलिफोन बिल (लॅण्डलाईन) किंवा झोपडी फोटो पास/झोपडी सेवा शुल्क पावती/भाडे करारनामा यांपैकी एक जोडणे आवश्यक.
- रेशनिंग कार्डची साक्षांकित प्रत
- अपत्य पडताळणीसाठी जोडणे आवश्यक.
- वयाच्या पुराव्यासाठी जन्मदाखला / शाळेचा दाखला किंवा बोनाफाईड प्रमाणपत्र आवश्यक.
- अर्जदार मागासवर्गीय असल्यास जातीचा दाखला जोडणे आवश्यक आहे.
- अर्जदार अपंग असल्यास अपंगत्वाचा दाखला जोडणे आवश्यक राहील.
- अर्जदाराने शेवटची परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे गुणप्रमाणपत्र जोडणे आवश्यक.
- अर्जदाराच्या शिक्षणाचे प्रमाणपत्र.
- झोपडपट्टीतील अर्जदारांनी शेजार समूह गटाचा उत्पन्नाचा दाखला जोडावा. व झोपडपट्टी व्यतिरिक्त राहत असलेल्या अर्जदारांनी मा. तहसीलदार, जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याकडील उत्पन्नाचा दाखला जोडणे आवश्यक
अर्ज रद्द होण्याची कारणे:
- अर्जदार महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवाशी नसल्यास
- अर्जात खोटी तसेच चुकीची माहिती भरल्यास
- अर्जदार बँकेचा थकबाकीदार असल्यास
- अर्जदार केंद्र सरकार किंवा राज्य शासनाच्या एखाद्या प्रशिक्षण योजनेअंतर्गत लाभ घेत असल्यास किंवा लाभ घेतला असल्यास.
योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत:
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी शासनाच्या अधिकृत वेबसाईट वर जावे लागेल.
- वेबसाईटवर गेल्यावर नवीन नोंदणी वर क्लिक करावे व विचारलेली सर्व माहिती भरून स्वतःची नोंदणी करावी.
- नोंदणी करून झाल्यावर आपली योजना जाणून घ्या Option वर क्लिक करावे.
- व विचारलेली सर्व माहिती भरून आपली योजना जाणून घ्यावी व त्या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करावा.
ऑफलाईन अर्ज करण्याची पद्धत:
- खालीलपैकी कोणत्याही ठिकाणी संपर्क साधून या योजनेचा अर्ज घ्या व अर्जात विचारलेली सर्व माहिती योग्य प्रकारे भरून आवश्यक अशा कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रति जोडून सदर अर्ज जमा करावा.
- अर्ज जमा केल्यावर अर्ज जमा केल्याची पोच पावती घ्यावी.
Telegram Group | Join |
अधिकृत वेबसाईट | Click Here |
पत्ता | 1. प्रभाग पातळीवरील समुह संघटिकांचे कार्यालय, पुणे 2. तुमच्या जवळील क्षेत्रिय कार्यालय 3. समाज विकास कार्यालय, एस.एम. जोशी हॉल, दारुवाला पूल, रास्ता पेठ, पुणे |
संपर्क | 020-25501281 / 82 / 83 / 84 |