महाराष्ट्र राज्यात बहुतांश कुटुंबे हि दारिद्र्य रेषेखाली स्वतःचे जीवन जगत असतात तसेच त्यांच्याजवळ कायम स्वरूपाची नोकरी नसल्याकारणामुळे त्याची आर्थिक स्थिती कमजोर असते त्यामुळे त्यांना स्वतःच्या कुटुंबाच्या गरजा पूर्ण करता येत नाहीत तसेच दिवसेंदिवस वाढणारे शिक्षण शुल्क या गोष्टींमुळे त्यांना आपल्या मुलांना महाविद्यालयीन शिक्षण देण्यासाठी आर्थिक समस्यांचा सामना करावा लागतो परिणामी गरीब कुटुंबातील विद्यार्थी इयत्ता १०वी उत्तीर्ण झाल्यावर महाविद्यालयीन शिक्षण घेण्यापासून वंचित राहतो.
तसेच काही कुटुंबे आपल्या मुलांच्या महाविद्यालयीन शिक्षणासाठी कर्ज घेतात व कर्ज परत न फेडू शकल्यामुळे त्यांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागते.या सर्व गोष्टींचा विचार करून विद्याधन फाउंडेशन ने राज्यातील इयत्ता १०वी पास विद्यार्थ्यांना त्यांचे इयत्ता ११वी आणि इयत्ता १२वी चे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करण्यासाठी Vidyadhan Scholarship ची सुरुवात करण्याचा एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे जेणेकरून राज्यातील गरीब कुटुंबातील विद्यार्थी या Vidyadhan Scholarship च्या सहाय्याने स्वतःचे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करू शकतील.
Vidyadhan Scholarship अंतर्गत इयत्ता १२वी आणि पदवी पूर्ण होईपर्यंत शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांनी परीक्षेत प्राप्त केलेल्या गुणवत्तेवर आधारित राहील.
सरोजिनी दामोदर फाउंडेशन द्वारे दिली जाणारी विद्याधन हि संपूर्ण भारतातील उच्च शिक्षण शिष्यवृत्ती आहे. सरोजिनी दामोदरन फाउंडेशन ची स्थापना १९९९ मध्ये श्री एस.डी.शिबुलाल (संस्थापक इन्फोसिस) आणि श्रीमती कुमारी शिबुलाल (व्यवस्थापकीय विश्वस्थ) यांनी केली होती.आजपर्यंत फाउंडेशन ने केरळ, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा, गुजरात, महाराष्ट्र, गोवा, ओडिसा आणि दिल्ली येथे २७ हजारांहून अधिक शिष्यवृत्ती वितरित केल्या आहेत.कार्यक्रमात सध्या ४७ हजारांहून अधिक विद्यार्थी आहेत.
विद्याधन स्कॉलरशिप अंतर्गत निवडलेले विद्यार्थी दोन वर्षाच्या शिष्यवृत्तीसाठी पात्र असतील पण शिक्षणात त्यांनी चांगली कामगिरी केली तर त्यांना त्यांच्या आवडीची कोणतीही पदवी अभ्यासक्रम करण्यासाठी शिष्यवृत्ती दिली जाईल.
विद्याधन स्कॉलरशिप योजनेअंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी प्रतिवर्ष १००००/- ते २००००/- रुपयांपर्यंत शिष्यवृत्ती दिली जाते.
विद्यधान स्कॉलरशिप चा लाभ मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.
विशेष सूचना: आम्ही Vidyadhan Scholarship ची संपूर्ण माहिती या लेखात दिली आहे त्यामुळे तुमची हा लेख शेवट पर्यंत वाचा व या योजनेचा लाभ मिळवा जर तुमच्या परिसरात असे कोणी विद्यार्थी असतील जे Vidyadhan Scholarship चा लाभ घेऊ इच्छित असतील तर त्यांना या योजनेची माहिती अवश्य द्या किंवा आमची हि आर्टिकल त्यांना शेयर करा जेणेकरून ते या योजनेचा लाभ घेऊ शकतील.
योजनेचे नाव | विद्याधन स्कॉलरशिप |
सुरुवात | 1999 |
लाभार्थी | गरीब कुटुंबातील इयत्ता 11वी चे विद्यार्थी |
लाभ | 10,000/- रुपये ते 20,000/- रुपये |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
विद्याधन स्कॉलरशिप योजनेचा उद्देश
- राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करण्यासाठी शिष्यवृत्ती प्रदान करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे जेणेकरून विद्यार्थी स्वतःचे शिक्षण पूर्ण करू शकतील.
- राज्यातील विद्यार्थ्यांचे जीवनमान सुधारणे हे विद्याधन स्कॉलरशिप योजनेचा उद्देश आहे.
- राज्यातील विद्यार्थ्यांचा सामाजिक तसेच आर्थिक विकास करणे हा विद्याधन स्कॉलरशिप योजनेचा मुख्य उद्देश आहे
- राज्यातील विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी आत्मनिर्भर बनविणे.
- राज्यात साक्षरतेचे प्रमाण वाढविणे हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट्य आहे.
- या शिष्यवृत्तीद्वारे देऊ केलेल्या दीर्घकालीन आर्थिक सहाय्याचा उद्देश आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील हुशार विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे आणि त्यांचे उज्ज्वल आणि सुरक्षित भविष्यासाठी पाया घालण्यात मदत करणे आहे.
- राज्यातील विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी कोणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता पडता कामा नये हा या योजनेचा उद्देश आहे.
विद्यधान स्कॉलरशिप योजनेचे वैशिष्ट्य
- विद्याधन स्कॉलरशिप योजनेची सुरुवात विद्याधन फाउंडेशन द्वारे करण्यात आली आहे.
- विद्याधन स्कॉलरशिप अंतर्गत अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन करण्यात आली आहे त्यामुळे अजदार विद्यार्थी आपल्या मोबाईल च्या सहाय्याने अर्ज करू शकतो व त्यास कोणत्याच कार्यालयाच्या फेऱ्या मारण्याची आवश्यकता भासणार नाही जेणेकरून त्याचा वेळ आणि पैसे दोघांची बचत होईल.
- या योजनेची अर्ज करण्याची पद्दत ऑनलाईन केली गेली असल्यामुळे अर्जदार विद्यार्थी अर्ज केल्यापासून लाभ मिळेपर्यंत अर्जाची सर्व स्थिती आपल्या मोबाईल वर बघू शकतो.
- विद्याधन स्कॉलरशिप अंतर्गत मिळणारी लाभाची रक्कम विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात DBT च्या सहाय्याने जमा केली जाते.
- या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यास सशक्त व आत्मनिर्भर बनण्यास मदत होईल.
- विद्याधन स्कॉलरशिप च्या सहाय्याने विद्यार्थ्यांचे जीवनमान सुधारण्यास मदत होईल.
- विद्यार्थ्यांना स्वतःचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी कोणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता भासणार नाही किंवा कोणाकडून जास्त व्याज दराने कर्ज घेण्याची आवश्यकता भासणार नाही.
- योजनेच्या सहाय्याने विद्यार्थी शिक्षणासाठी स्वावलंबी बनतील.
विद्याधन स्कॉलरशिप चे लाभार्थी
राज्यातील गरीब कुटुंबातील इयत्ता 10वी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी या योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहेत.
विद्याधन स्कॉलरशिप चे लाभ
- विद्याधन स्कॉलरशिप अंतर्गत इयत्ता 10वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना इयत्ता 11वी व इयत्ता 12वी शिक्षण पूर्ण करण्यासाठी प्रतिवर्ष 10,000/- रुपये ते 20,000/- रुपयांची शिष्यवृत्ती दिली जाते.
- आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबांना आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी चिंता करण्याची आवश्यकता भासणार नाही.
- या योजनेअंतर्गत विद्यार्थी सशक्त व आत्मनिर्भर बनतील
- विद्याधन स्कॉलरशिप अंतर्गत विद्यार्थी स्वतःचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी स्वावलंबी बनतील.
- कुटुंबाला मुलांच्या शिक्षणासाठी कोणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता भासणार नाही किंवा कोणाकडून कर्ज घेण्याची आवश्यकता भासणार नाही.
- विद्याधन स्कॉलरशिप अंतर्गत विद्यार्थी स्वतःचे शिक्षण पूर्ण करून त्यांचा सामाजिक विकास होईल.
- विद्याधन स्कॉलरशिप अंतर्गत विद्यार्थी आपले शिक्षण पूर्ण करून चांगली नोकरी मिळवू शकतील तसेच राज्यात स्वतःचा लघु उद्योग सुरु करून बेरोजगार नागरिकांसाठी रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध करू शकतील.
- विद्याधन स्कॉलरशिप च्या सहाय्याने राज्यात साक्षरतेचे प्रमाण वाढेल.
विद्याधन स्कॉलरशिप अंतर्गत निवड प्रक्रिया
अर्जदाराने अर्जामध्ये दिलेल्या माहितीची आणि कागदपत्रांची तपासणी केली जाते व अर्जातील माहितीच्या आधारे अर्जदाराची निवड केली जाते व निवड केलेल्या उमेदवारांना छोट्या ऑनलाईन चाचणी / मुलाखतीसाठी आमंत्रित केले जाते.
विद्याधन स्कॉलरशिप योजनेसाठी आवश्यक पात्रता
अर्जदार विद्यार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असणे आवश्यक आहे.
विद्याधन स्कॉलरशिप योजनेच्या अटी
- फक्त महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांनाच विद्याधन स्कॉलरशिप चा लाभ दिला जाईल.
- महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना विद्याधन स्कॉलरशिप चा लाभ दिला जाणार नाही.
- अर्जदार विद्यार्थी इयत्ता 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
- अर्जदार विद्यार्थ्याने इयत्ता 10वी मध्ये 85% पेक्षा जास्त गन मिळविलेले असणे आवश्यक आहे किंवा CGPA प्राप्त केलेले असावे.
- अपंग विद्यार्थ्याने इयत्ता 10वी मध्ये 75% गुण मिळविणे आवश्यक आहे.
- अर्जदार विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २ लाखांपेक्षा जास्त असता कामा नये.
- आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांनाच या योजनेचा लाभ दिला जाईल.
- विद्याधन स्कॉलरशिप अंतर्गत निवडलेल्या विद्यार्थ्यांना फाउंडेशन च्या मार्गदर्शन कार्यक्रमांना उपस्थिती राहणे आवश्यक आहे.
- अर्जदार कुटुंबाच्या कोणी व्यक्ती सरकारी कार्यालयात नोकरी करत असल्यास त्यास या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
- अर्जदार विद्यार्थी केंद्र किंवा राज्य शासनाद्वारे सुरु करण्यात आलेल्या एखाद्या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेत असल्यास त्याला या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
- लाभार्थी विद्यार्थ्याने मधीच स्वतःचे शिक्षण सोडल्यास त्याला या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
- विद्यार्थी चुकीची माहिती देऊन विद्याधन स्कॉलरशिप चा लाभ घेत असल्यास त्याला या योजनेमधून बाद करून लाभाची रक्कम वसूल करण्यात येईल.
- उत्पन्न दाखल्यासाठी रेशनकार्ड चा स्वीकार केला जाणार नाही.
विद्याधन स्कॉलरशिपसाठी आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- रेशन कार्ड
- रहिवाशी पुरावा
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
- पासपोर्ट साईज फोटो
- इयत्ता 10वी उत्तीर्ण मार्कशीट
- बँक खाते
- उत्पन्नाचा दाखला
विद्याधन स्कॉलरशिप अंतर्गत ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत
पहिले चरण
- अर्जदाराला सर्वात प्रथम विद्याधन स्कॉलरशिप च्या अधिकृत वेबसाईट वर जावे लागेल.
- होम पेज वर Apply For Scholarship वर क्लिक करावे लागेल.
- आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये Maharashtra 11th std Program 2023 ( मराठी सूचनांसाठी येथे क्लिक करा) वर क्लिक करावे लागेल.
- आता तुम्हाला विद्याधन स्कॉलरशिप च्या अटी आणि शर्ती दिसतील त्या वाचून घ्यायच्या आहेत आणि खाली Apply Now वर क्लिक करावे लागेल.
- आता तुमच्यासमोर Student Registration चा अर्ज उघडेल त्यामध्ये विचारलेली माहिती (First Name,Last Name,Email,Password,Confirm Password) भरून Register वर क्लिक करावे लागेल.
- आता तुमच्या Gmail वर Confirmation लिंक येईल त्यावर क्लिक करायचे आहे.
- अशा प्रकारे तुमची रेजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण होईल
दुसरे चरण
- आता तुम्हाला तुमचा इमेल आयडी आणि पासवर्ड च्या सहाय्याने लॉगिन करावे लागेल.
तिसरे चरण
- लॉगिन केल्यावर तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये Maharashtra 11th std Program 22 मध्ये Apply Now वर क्लिक करावे लागेल.
- आता तुमच्यासमोर विद्याधन स्कॉलरशिप चा अर्ज उघडेल त्यामध्ये विचारलेली सर्व माहिती (Interview Place,Permanent Address,Father & Mother Details,SSLC/Xth Details,PUC / Intermediate / 11th & 12th Details,Family Income & House Details,Other Details,Additional Information) भरून Submit बटनावर क्लिक करायचे आहे.
- अशा प्रकारे तुमची विद्याधन स्कॉलरशिप अंतर्गत अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल
Telegram Group | Join |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
vidyadhan[dot]maharashtra[at] sdfoundationindia[dot]com | |
Contact | 8390421550 / 9611805868 |
सारांश
आशा करतो कि विद्याधन स्कॉलरशिप अंतर्गत आपल्याला सर्व माहिती प्राप्त झाली आहे तरी देखील आपले Vidyadhan Scholarship Program अंतर्गत काही प्रश्न असल्यास मला ई-मेल किंवा कंमेंट्स च्या माध्यमातून जरूर कळवा आम्ही तुमच्या प्रश्नांची लवकरात लवकर उत्तरे देण्याचा प्रयत्न करू आणि जर तुम्हाला या योजनेची माहिती उपयुक्त वाटली असेल तर तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा जेणेकरून तुमचे मित्र देखील या योजनेचा लाभ घेऊ शकतील.