Vastrodyog Vinkar Bakshish Yojana: राज्याच्या वस्त्रोद्योगाच्या वाढीस चालना देण्यासाठी व वस्त्रोद्योगाला आवश्यक त्या उपाययोजनांना हातभार लावण्यासाठी महाराष्ट्र शासनाद्वारे पुढील 5 वर्षाच्या कालावधीसाठी एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण 2023-28 जाहिर केलेली एक महत्वाची अशी योजना आहे.
सदर योजनेअंतर्गत पारंपारिक वस्त्रोद्योग, अतिरिक्त प्रोत्साहने हातमाग विणकर समुदयांचा योगदानाचा सन्मान करण्यासाठी आणि सामाजिक व आर्थिक विकासात या क्षेत्राच्या योगदानावर प्रकाश टाकण्यासाठी महाराष्ट्रातील 5 पारंपारीक क्षेत्रांमधील सर्वोत्कृष्ट डिझाईनचा राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त सत्कार केला जाईल.
पहिल्या पुरस्कारासाठी 20,000/- रुपये, दुसऱ्या पुरस्कारासाठी 15,000/- रुपये, तिसऱ्या पुरस्कारासाठी 10,000/- रुपये,बक्षिस दिले जाईल. यामुळे हातमागाच्या कलेच्या वाणांचे संरक्षण होईल आणि याक्षेत्रामध्ये मोठया संधी उपलब्ध होतील.
महाराष्ट्रातील खालील 5 वस्त्रांना पारंपारीक वाण म्हणून घोषीत करण्यात आलेले आहे.
- पैठणी साडी
- हिमरू शॉल
- करवत काटी
- घोंगडी
- खण फॅब्रीक
सदर योजनेअंतर्गत 5 पारंपारिक 1. पैठणी साडी 2. हिमरू शाल 3. करवत काटी साडी 4. घोंगडी 5. खण फॅब्रीक हया वस्त्रोद्योग क्षेत्रामधील सर्वोत्कृष्ट डिझाईन्सचा राष्ट्रीय हातमाग दिनानिमित सत्कार केला जाईल.
पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाला अनुक्रमे 20,000/- रुपये, 15,000/- रुपये आणि 10,000/- रुपये बक्षिस दिले जाईल.
सदर बक्षिसाची रक्कम पारंपारीक वस्त्रोद्योग विणकरांच्या बैंक खात्यामध्ये DBT प्रणालीद्वारे अदा करण्यात येईल.
राज्यातील पारंपारीक वस्त्रोद्योग विणकरांचा सन्मान करण्यासाठी आणि सामाजिक व आर्थिक विकासात या क्षेत्राच्या योगदानावर प्रकाश टाकण्यासाठी, पारंपारीक वस्त्रोद्योग विणकरांना बक्षीस योजना सुरु करण्यात आलेली आहे.
योजनेचे नाव | पारंपारिक वस्त्रोद्योग विणकरांना बक्षीस योजना |
राज्य | महाराष्ट्र |
विभाग | सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग |
योजनेची सुरुवात | 2023 |
लाभार्थी | राज्यातील वस्त्रोद्योग विणकर |
लाभ | 20 हजारांपर्यंत बक्षीस |
उद्देश्य | विणकरांना त्यांच्या पारंपारिक उद्योगाला चालना देणे. |
अर्ज करण्याची पद्धत | ऑफलाईन |
Vastrodyog Vinkar Bakshish Yojana चे उद्दिष्ट
- पारंपारिक वस्त्रोद्योग विणकरांना त्यांच्या पारंपारिक उद्योगाला चालना देणे.
- पारंपारिक वस्त्रोद्योग विणकरांना त्यांच्या उद्योगाच्या विकासासाठी प्रोत्साहित करणे.
- महाराष्ट्राच्या वस्त्रोद्योग क्षेत्राला प्राचीन काळापासून प्रदीर्घ इतिहास आहे. ही वस्त्रे कापूस, रेशीम, आणि लोकर यासह विविध प्रकारच्या सामुग्री पासून तयार केली जातात. उपजिवीकेचे संरक्षण सुनिश्चित करून पारंपारीक वस्त्रोद्योग विणकराना इतर रोजगारांकडे स्थलांतरीत होण्यापासून परावृत्त करण्याच्या दृष्टीने अतिरीक्त प्रोत्साहन देणे या धोरणाचे उदिष्ट आहे.
योजनेचे वैशिष्ट्य:
- राज्य स्तरीय पारंपारिक वस्त्रोद्योग कापड स्पर्धा वस्त्रोद्योग आयुक्तालयाच्या स्तरावर आयोजित करण्यात येईल.
- सदर योजना सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाद्वारे राबविण्यात आली आहे.
- योजनेअंतर्गत दिली जाणारी लाभाची रक्कम लाभार्थ्यांच्या बँक खात्यात DBT च्या सहाय्याने जमा करण्यात येईल.
- या योजनेमुळे महाराष्ट्रातील पारंपारिक वस्त्रोद्योगाला चालना मिळाली आहे..
योजनेचे निकष खालील प्रमाणे राहतील:
अ. पारंपारिक वस्त्राचे विणकाम करणारे सर्व विणकर, खाजगी / सहकारी संस्था / महामंडळ/महासंघाचे/स्वयंसेवी संस्था/गट सदर स्पर्धेत भाग घेवू शकतील.
ब. अर्जासोबत विणकाम करतानाचा विणकराचा जिओ टॅगींग फोटो सादर करणे गरजेचे राहील.
क. महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
योजनेअंतर्गत पुरस्कार निवड करण्याची कार्यपध्दती:
i. स्पर्धेत ठेवण्यांत आलेल्या वाणांचा प्रकार पारंपारीक 5 वस्त्रापैकीच असावा.
ii. निवड समिती प्रत्येक पारंपारीक वाणातून पहिले, दूसरे व तिस-या बक्षिसासाठी वाणाची निवड करेल.
iii. निवड समितीतील प्रत्येक सदस्यास एका वाणास 10 पर्यत गुण देण्याचे अधिकार असतील.
iv. एकूण गुणांच्या आकडेवारीच्या आधारे पहिल्या, दूसऱ्या व तिसऱ्या क्रमांकाच्या बक्षिसासाठी निवड करण्यात येईल.
V. सारखे गुण आल्यास समिती निर्णयानुसार एक बक्षिस दोन स्पर्धकामध्ये विभागून देण्यात येईल.
vi. गुणाचे वाटप, कापडावरील नक्षिकाम (डिझाइन), त्याची अचूकता (करेक्टनेस), रंगसंगती, व कापडाची आकर्षकता यांच्या आधारे करण्यांत येईल.
योजनेचे लाभार्थी:
- राज्यातील वस्त्रोद्योग विणकर
महत्वाच्या तारखा:
- अर्ज करण्याची अंतिम तारीख: 31ऑगस्ट
योजनेअंतर्गत दिला जाणारा लाभ:
योजनेअंतर्गत पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाला अनुक्रमे खालीलप्रमाणे लाभ दिला जाईल.
पहिला क्रमांक | 20,000/- रुपये |
दुसरा क्रमांक | 15,000/- रुपये |
तिसरा क्रमांक | 10,000/- रुपये |
योजनेचा खर्च
- विजेत्या पारंपारीक वस्त्रोद्योग विणकराला आयुक्त वस्त्रोद्योग यांचे मार्फत पुरस्काराची रक्कम व प्रशस्ती पत्राचे वाटप करण्यात येईल.
- स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकाला प्रोत्साहन देण्यासाठी प्रमाणपत्र देण्यात येईल.
योजनेअंतर्गत स्पर्धेसाठी स्पर्धकाची निवड करण्याकरिता समितीची रचना पुढील प्रमाणे राहिल:
आयुक्त (वस्त्रोद्योग, महाराष्ट्र राज्य, नागपूर | अध्यक्ष |
वस्त्रनिर्माण तज्ञ किंवा सहायक आयुक्त (हातमाग) | सदस्य सचिव |
उपसंचालक, विणकर सेवा केंद्र नागपूर / मुंबई | सदस्य |
संचालक, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फैशन टेक्नॉलॉजी (NIFT) मुंबई | सदस्य |
अध्यक्ष / व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळ, नागपूर | सदस्य |
स्कूल ऑफ फॅशन टेक्नालॉजी नागपूर यांचे तज्ञ प्रतिनिधी उ. जिल्हा माहीती अधिकारी, नागपूर | सदस्य |
योजनेचा फायदा:
- विणकर त्यांच्या पारंपारिक वस्त्रोगाच्या वाढीसाठी प्रोत्साहित होतील.
- वस्त्रोद्योग विणकरांना त्यांच्या पारंपारिक उद्योगाला चालना मिळेल.
- सन्मानपत्र आणि प्रशस्तीपत्रे
- प्रदर्शन आणि मेळाव्यांमध्ये सहभागी होण्याची उत्तम संधी
- प्रशिक्षण आणि कौशल्य विकास कार्यक्रमांमध्ये प्राधान्य दिले जाईल.
योजनेचे नियम व अटी:
- अर्जदार महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवाशी असणे आवश्यक आहे.
- अर्जदार विणकर असणे आवश्यक आहे.
- स्पर्धेत ठेवण्यांत आलेल्या वाणांचा प्रकार पारंपारीक 5 वस्त्रापैकीच असावा.
- ही योजना केवळ महाराष्ट्रातील निवडक पारंपारिक वस्त्रांसाठी उपलब्ध आहे
योजनेअंतर्गत आवश्यक कागदपत्रे:
- ओळखपत्र: आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट
- पत्त्याचा पुरावा: रेशन कार्ड, वीज बिल
- प्रमाणपत्र: विणकर असल्याचे प्रमाणपत्र
- ई-मेल आयडी
- मोबाईल नंबर
- फोटो: पासपोर्ट आकाराचे फोटो
योजनेअंतर्गत अर्ज करण्याची पद्धत:
अर्जदाराला आपल्या क्षेत्रातील जिल्हा कार्यालयात / महानगर पालिका कार्यालयात सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागात जाऊन सदर योजनेचा अर्ज घ्यावा लागेल व अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून सोबत आवश्यक कागदपत्रे जोडून अर्ज जमा करावा लागेल.
अर्ज रद्द होण्याची कारणे:
- अर्जदार महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवाशी नसल्यास
- अर्जात खोटी माहिती भरल्यास
- अर्जदार हातमाग विणकर नसल्यास
Telegram Group | Click Here |
GR | Click Here |
संपर्क क्रमांक | 020-2217 2583 |
महत्वाची बाब:
योजनेचे नियम व अटी यामध्ये वेळोवेळी बदल होण्याची शक्यता असते त्यामुळे योजनेच्या अचूक माहितीसाठी अधिकृत पोर्टल किंवा आपल्या क्षेत्रातील जिल्हा कार्यालयात / महानगर पालिका कार्यालयात सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागात जाऊन भेट द्या.