Dr Babasaheb Ambedkar Swadhar Yojana

अंतर्गत राज्यातील विद्यार्थ्यांना भोजन भत्ता, निवास भत्ता, निर्वाह भत्ता आणि इतर शैक्षणिक सुविधांसाठी क्षेत्रानुसार अनुदान दिले जाते. विद्यार्थ्यांना वार्षिक खर्चासाठी अनुदान म्हणून रक्कम मंजूर करण्यात येते हे अनुदान विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात DBT च्या सहाय्याने जमा केले जाते.

दिवसेंदिवस वाढत असलेल्या महाविद्यालयांची संख्या आणि त्यामुळे महाविद्यालयात प्रवेश घेणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या संख्येच्या प्रमाणात वाढ झालेली दिसून येत आहे त्यामुळे राज्यातील शासकीय वसतिगृह कमी पडत चालली आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांना राहण्याच्या समस्यांना तोंड द्यावे लागते व याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होतो पुष्कळ विद्यार्थ्यांची राहण्याची व्यवस्था नसल्यामुळे त्यांना दहावीनंतर विद्यालयात प्रवेश घेता येत नाही व त्यामुळे त्यांना स्वतःचे शिक्षण बंद करावे लागते त्यामुळे अशा विद्यार्थ्यांना रहायची व्यवस्था उपलब्ध व्हावी यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना ची सुरुवात करण्यात आली आहे.

राज्यात शिकणाऱ्या इयत्ता 11वी, इयत्ता 12वी व्यावसायिक किंवा बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये प्रवेश मिळालेल्या तसेच शासकीय वसतिगृहात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती तसेच नवबौद्ध विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे

Dr Babasaheb Ambedkar Swadhar Yojana

योजनेचे नावभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना
राज्यमहाराष्ट्र
विभागसमाज कल्याण विभाग
योजनेची सुरुवात2016-2017
लाभार्थीअनुसूचित जाती, जमाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थी
लाभशिक्षण पूर्ण करण्यासाठी आर्थिक सहाय्य
अर्ज करण्याची पद्धतऑफलाइन

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचे उद्दिष्ट

  • महाराष्ट्र राज्यातील जे विद्यार्थी स्वतःचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी किंवा उच्चशिक्षणासाठी स्वतःचे घर सोडून दुसऱ्या शहरात राहतात त्यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना मार्फत आर्थिक मदत करण्यात येते. जेणेकरून त्यांना त्याचे शिक्षण पूर्ण करता येईल आणि त्याच्या दैनंदिन जीवनातील इतर खर्चात सुद्धा थोड्याफार प्रमाणात मदत करता येईल या उद्देश्याने सुरु करण्यात आली आहे.
  • विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी आर्थिक सहाय्य करणे.
  • विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहित करणे.
    विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी स्वावलंबी बनवून त्यांचा स्वतःच्या पायावर उभे करणे हा या योजनेचा उद्देश आहे.
Dr Babasaheb Ambedkar Swadhar Yojana

स्वाधार योजनेचे वैशिष्ट्य:

  • महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नवबौद्ध विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी सुरु करण्यात आलेली एक महत्वाची अशी एक योजना आहे.
  • या योजनेअंतर्गत देण्यात येणारी लाभाची रक्कम लाभार्थ्यांच्या बँक खात्यात DBT च्या सहाय्याने जमा करण्यात येते.
  • स्वतःचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांना कुठल्याच आर्थिक तंगी चा सामना करावा लागू नये या उद्देशाने सुरु करण्यात आलेली बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना खूप महत्वाची योजना आहे.

स्वाधार योजनेचे लाभार्थी:

  • महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नवबौद्ध विद्यार्थीं भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना चा लाभ मिळवण्यासाठी पात्र आहेत.

स्वाधार योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना होणार फायदा:

  • भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना अंतर्गत विद्यार्थ्यांना 60,000/- रुपयांपर्यंत आर्थिक सहाय्य केले जाते.
  • योजनेअंतर्गत लाभार्थी विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रवर्गानुसार अनुदान देण्यात येते.
  • स्वाधार योजनेच्या सहाय्याने विद्यार्थी त्यांचे शिक्षण पूर्ण करू शकतील.
  • या योजनेअंतर्गत राज्यातील विद्यार्थी शिक्षणासाठी आत्मनिर्भर बनतील.

स्वाधार योजनेअंतर्गत मिळणारे अनुदान:

या योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या अनुसूचित जाती,अनुसूचित जमाती व नवबौद्ध या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना खालील प्रमाणे अनुदान देण्यात येईल.

खर्चाची बाबमुंबई शहर, मुंबई उपनगर,
नवी मुंबई, ठाणे, पुणे,
पिंपरी-चिंचवड, नागपूर
या ठिकाणी शिक्षण घेणाऱ्या
विद्यार्थ्यांना अनुदान रक्कम
इतर महसूल विभागीय शहरातील व
उर्वरित क वर्ग महानगरपालिका
क्षेत्रातील शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना
अनुदान रक्कम
उर्वरित ठिकाणी
शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना
अनुदान रक्कम
भोजन भत्ता32,000/-28,000/-25,000/-
निवास भत्ता20,000/-15,000/-12,000/-
निर्वाह भत्ता8,000/-8,000/-6,000/-
एकूण पत्ता6,000/-51,000/-43,000/-

वरील रक्कम व्यतिरिक्त वैद्यकीय व अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थ्यांसाठी प्रति वर्ष रुपये 5,000/- व अन्य शाखेतील विद्यार्थ्यांना प्रति वर्ष  2,000/- इतकी रक्कम देण्यात येईल.

स्वाधार योजनेअंतर्गत आवश्यक पात्रता:

  • अर्जदार विद्यार्थी हा महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवाशी असणे आवश्यक आहे.
  • राज्यातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती तसेच नवबौद्ध विद्यार्थीच या योजनेसाठी पात्र असतील.

स्वाधार योजनेचे नियम व अटी:

  • ज्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे अशा विद्यार्थ्यांना इयत्ता 10वी, इयत्ता 12वी, पदवी किंवा पदविका परीक्षेत 60 टक्क्यापेक्षा जास्त गुण असणे अनिवार्य आहे.
  • या योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ही मर्यादा 50 टक्के आवश्यक आहे.
  • ज्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे अशा विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे.
  • विद्यार्थी त्याच्या राहत्या जिल्याच्या बाहेर शिक्षण घेत असावा.
  • विद्यार्थी ज्या ठिकाणी राहतो त्याच ठिकाणी शिक्षण घेत नसावा.
  • लाभार्थी विद्यार्थ्यांची निवड ही त्याच्या गुणवत्तेनुसार करण्यात येईल.
  • एखादा विद्यार्थी शिक्षण पूर्ण करण्यासाठी शासनाच्या इतर कोणत्या योजनेचा लाभ घेत असेल तर अशा विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
  • विद्यार्थ्यांना स्वतःचे बँक खाते आधार कार्ड सोबत लिंक करणे आवश्यक आहे.
  • जर एखादा विद्यार्थी शासकीय वसतिगृहात राहत असेल तर अशा विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
  • विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे अनिवार्य आहे.
  • विद्यार्थी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती नवबौद्ध प्रवर्गातील असणे आवश्यक आहे तसे जातीचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
  • अर्जामध्ये खोटी, बनावट माहिती तसेच दिशाभूल करणारे पुरावे /कागदपत्रे देऊन लाभ घेतल्यास किंवा शैक्षणिक अभ्यासक्रम पुर्ण न केल्यास अथवा नोकरी व व्यवसाय करीत असल्यास आणि इतर मार्गाने या योजनेचा लाभ घेऊन गैरवापर केल्याचे निदर्शनास आल्यास विद्यार्थी कारवाईस पात्र राहील व विद्यार्थ्याला सदर योजनेकरीता अपात्र ठरवण्यात येईल व विद्यार्थ्याला सदर योजनेअंतर्गत मिळालेली रक्कम (12 टक्के) व्याजासह वसूल करण्यात येईल.
  • भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना संदर्भात काही वाद निर्माण झाल्यास नियामक मंडळ यांना याबाबत निर्णय घेण्याचे सर्व अधिकार असतील अर्ज करणारा विद्यार्थी हा शासन मान्यताप्राप्त महाविद्यालयांमधून प्रवेशित असावा.

स्वाधार योजनेअंतर्गत आवश्यक कागदपत्रे:

  • अर्जाचा नमुना
  • विद्यार्थ्याचे दहावी पास प्रमाणपत्र (साक्षांकित प्रत)
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • जन्माचा दाखला
  • सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला विद्यार्थ्यांचा / विद्यार्थ्यांच्या वडिलांचा जातीचा दाखला.
  • सन 2021-22 या आर्थिक वर्षात तहसीलदार किंवा सक्षम प्राधिकारी यांनी दिलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांचा / आई-वडील यांचा उत्पन्नाचा दाखला.
  • विद्यार्थ्यांचा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी दाखला. विद्यार्थीचे ज्या राष्ट्रीयकृत बँकेत बचत खाते आहे त्या खात्याची झेरॉक्स प्रत.
  • पालकाचे / आई-वडीलांचे सदर अर्जात नमूद केलेले घोषणापत्र.
  • मुख्याध्यापकाचे प्रमाणपत्र किंवा शिफारस पत्र.
  • विद्यार्थी BPL कुटुंब धारक असल्यास प्राधान्य देण्यात येईल.
  • अर्जदार दिव्यांग असल्यास त्याचे प्रमाणपत्र. महाविद्यालयात प्रवेश घेतल्यावर संबंधित महाविद्यालयाकडून बोनाफाईड दाखला सादर करावा.
  • ज्या महाविद्यालयात प्रवेश घेतला आहे तिथून महाविद्यालय उपस्थिती प्रमाणपत्र.
  • विद्यार्थी शासकीय वसतिगृहात प्रवेशित नसल्याचे शपथपत्र

स्वाधार योजनेअंतर्गत अर्ज करताना भरावयाची माहिती:

  • अर्जदार विद्यार्थ्यांचे संपूर्ण नाव
  • वडिलांचे संपूर्ण नाव
  • आईचे संपूर्ण नाव
  • जात व प्रवर्ग
  • अर्जदाराचा संपूर्ण पत्ता
  • उपविभागीय अधिकारी / उपजिल्हाधिकारी यांनी दिलेला रहिवाशी दाखला
  • अर्जदाराचा मोबाइलला क्रमांक
  • अर्जदार दिव्यांग असल्यास दिव्यांगांचा प्रकार आणि टक्केवारी
  • अर्जदाराने ज्या जिल्ह्यातून जातीचा दाखल काढला त्या जिल्याचे नाव
  • उपविभागीय अधिकारी / उपजिल्हाधिकारी यांनी दिलेला जात प्रमाणपत्र माहिती
  • अर्जदाराचे आधार कार्ड क्रमांक
  • आधारकार्डवरील पत्ता
  • राष्ट्रीयकृत बँकेचे नाव
  • बँक खाते क्रमांक
  • बँक शाखेचा IFSC Code
  • बँक खाते आधारकार्ड सोबत संलग्न आहे किंवा नाही
  • ज्या महाविद्यालयात अर्जदाराने प्रवेश घेतला आहे त्याचा पत्ता व नोंदणी क्रमांक
  • अभ्यासाचे नाव
  • प्रवेश दिनांक व वर्ष
  • अभयसक्रम: पदवी / पदविका / पदव्युत्तर ( इतर असल्यास नोंद करावे )
  • 10वी मधील उत्तीर्ण वर्ष व टक्केवारी
  • अर्जदाराने शिष्यवृत्ती घेतली असल्यास त्याचा User ID
  • अर्जदाराच्या पालकाचे नाव
  • पालकाचे अर्जदाराशी असलेले नाते
  • वडील जीवित नसल्यास त्यांचे मृत्यूचे प्रमाणपत्र झेरॉक्स
  • पालकांचा व्यवसाय
  • जेथे व्यवसाय करतात तेथील पत्रव्यवहाराचा पत्ता
  • पालकांचे मागील वर्षाचे उत्पन्न तहसीलदार यांनी दिलेला दाखला झेरॉक्स
  • बँक खात्याच्या पहिल्या पानाची झेरॉक्स किंवा Cancelled Cheque

अर्ज रद्द होण्याची कारणे:

  • अर्जदार विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवाशी नसल्यास अर्ज रद्द केला जाईल.
  • अर्जदाराला इयत्ता 10वी, 12वी, पदवी किंवा पदविका परीक्षेत 60 टक्क्यांपेक्षा जास्त गुण नसल्यास अर्ज रद्द केला जाईल.
  • विद्यार्थ्याने अर्जात खोटी तसेच दिशाभूल करणारी माहिती भरल्यास अर्ज रद्द केला जाईल.
  • अर्जदार विद्यार्थी केंद्र किंवा राज्य शासनाच्या इतर योजनेअंतर्गत शिक्षणासाठी अनुदान प्राप्त करत असल्यास अर्ज रद्द केला जाईल.
  • अर्जदार विद्यार्थ्याने एकापेक्षा जास्त अर्ज केल्यास अर्ज रद्द केला जाईल.
  • अर्जदार विद्यार्थी शिक्षण घेत नसल्यास अर्ज रद्द केला जाईल.

योजनेअंतर्गत अर्ज करण्याची पद्धत:

  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थी ज्या जिल्ह्याचा रहिवासी असेल तेथील जिल्ह्याच्या समाजकल्याण कार्यालयात जाऊन बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा अर्ज घ्यायचा आहे.
Dr Babasaheb Ambedkar Swadhar Yojana

  • किंवा आम्ही खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून अर्ज डाउनलोड करायचा आहे.
  • अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून योग्य ती कागदपत्रांची झेरॉक्स प्रत जोडून सदर अर्ज सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयात जमा करायचा आहे.
  • अशा प्रकारे तुमची या योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.
Telegram GroupJoin
Swadhar Yojana Formयेथे क्लिक करा

अर्ज करताना खालील गोष्टी लक्षात ठेवा:

  • अर्ज करण्यापूर्वी आपण आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करत असल्याची खात्री करा.
  • अर्जात विचारलेली सर्व माहिती भरा.
  • अर्जात खोटी माहिती भरू नका.
  • अंतिम तारखेपूर्वी अर्ज करा.

महाराष्ट्र शासनाच्या इतर योजना

आंतरजातीय विवाह अनुदान महाराष्ट्र शासन PDF
ई पीक पाहणी
ई पीक पाहणी नोंदणी
महाज्योती फ्री टॅबलेट योजना
अहिल्यादेवी सिंचन विहीर योजना
दोन मुलींसाठी योजना
लहान मुलींसाठी योजना
रोजगार संगम योजना
बचत गटाचे फायदे
बचत गटाचे नियम
महिला बचत गट नावे
महिला बचत गट नोंदणी अर्ज
बचत गट ठराव नमुना PDF
पुरुष बचत गट नावे
शिवभोजन योजना
पिवळ्या रेशन कार्ड चे फायदे
ग्रामीण कुटीर उद्योग
चंदन कन्या योजना
शेतकरी योजना
बॅच बिल्ला काढण्याची पद्धत
जलयुक्त शिवार योजना
पारंपारिक वस्त्रोद्योग विणकरांना बक्षीस योजना
अण्णासाहेब पाटील कर्ज योजना
अण्णासाहेब पाटील महामंडळ कर्ज योजना कागदपत्रे
लेक लाडकी योजना
कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना
मिनी ट्रॅक्टर व त्यांची उपसाधने यांचा पुरवठा करणे ची योजना
राजे यशवंतराव होळकर महामेष योजना
विहीर अनुदान योजना
मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजना
महिला सन्मान योजना
महाराष्ट्र मुख्यमंत्री किसान योजना
निर्धूर चुल वाटप योजना
Baby Care Kit Yojana
महिला बचत गट समृद्धी कर्ज योजना
थेट कर्ज योजना
प्रधानमंत्री पीक विमा योजना
चर्मकार समाज योजना
गाय म्हैस शेळी मेंढी पालन अनुदान योजना
अटल बांबू समृद्धी योजना
महिला स्वयंसिद्धी व्याज परतावा योजना
मध केंद्र योजना
राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना
शौचालय अनुदान योजना
जिव्हाळा कर्ज योजना
डिजल पंप सब्सिडी योजना
मल्चिंग पेपर योजना
राष्ट्रीय वयोश्री योजना
खावटी अनुदान योजना
मुख्यमंत्री रोजगार निर्मिति योजना
शबरी घरकुल योजना
प्रधानमंत्री मुद्रा योजना
पंडित दिनदयाळ उपाध्याय स्वयंम योजना
वसंतराव नाईक कर्ज योजना
कृषी ड्रोन अनुदान योजना
बांधकाम कामगार योजना
संजय गांधी निराधार योजना
आचार्य बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजना
सायकल वाटप योजना
वीरभद्रकाली ताराराणी स्वयंसिद्धा योजना
प्रधानमंत्री स्वामित्व योजना
प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना
रुफटॉप सोलर योजना
श्रावणबाळ अनुदान योजना
सैनिक शाळेतील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता योजना 
गटई स्टॉल योजना
राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना
प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना
प्रधानमंत्री जीवन ज्योति बीमा योजना
गाय गोठा अनुदान योजना
डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना
शेळी मेंढी पालन योजना
ट्रॅक्टर अनुदान योजना
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना
सुकन्या समृद्धी योजना
प्रधानमंत्री मातृ वंदना योजना
किशोरी शक्ती योजना
माझी कन्या भाग्यश्री योजना
बाल संगोपन योजना
फ्री सिलाई मशीन योजना
पीएमसी महिला आणि बालकल्याण योजना
रमाई घरकुल योजना
महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजना
पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा
युवकांना विविध व्यावसायिक प्रशिक्षण योजना
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मोफत सायकल वाटप योजना
अपंग बस सवलत योजना
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना
आंतरजातीय विवाह योजना
मोटार वाहन चालक प्रशिक्षण योजना
कोरोना मृतांच्या नातेवाईकांना 50 हजारांची मदत
शैक्षणिक कर्ज योजना
आम आदमी विमा योजना
महाडीबीटी शिष्यवृत्ती
सावित्रीबाई फुले स्कॉलरशिप
पॅन कार्ड क्लब क्लेम करण्याची पद्धत
प्रधानमंत्री किसान हेल्पलाईन नंबर
पोस्ट ऑफिस ग्राम सुरक्षा योजना
दहीहंडी विमा योजना
शरद पवार इन्स्पायर फेलोशिप
विद्याधन स्कॉलरशिप
मेडले फार्मा शिष्यवृत्ती
इंडिया स्माइलिंग फाउंडेशनल शिष्यवृत्ती कार्यक्रम
मुख्यमंत्री अप्रेंटिसशिप योजना
एचडीएफसी लिमिटेड बढते कदम शिष्यवृत्ती
मर्क इंडिया चॅरिटेबल ट्रस्ट शिष्यवृत्ती कार्यक्रम
Join WhatsApp Group!